आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 2, 2012

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने नोव्हेंबर २

                                     ॐ
                   श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
                            प्रवचने नोव्हेंबर २
                      आसक्ती भगवंताची असावी.
कोणत्याही धर्माची आपण कधीही निंदा करु नये.
प्रत्येक धर्मात निरनिराळे विधी लावलेले असतात.
धर्माला विधीची फार जरुरी असते. विषयसुध्दा आम्ही
विधीने भोगतो. आम्ही गंगेवर स्नानाला जातो असे म्हणतो
खरोखर, मनाने आपण गंगेवर गेलो तरी चालू शकते.
तेव्हा गंगेला स्नानाला जाऊन अपवित्र मनाने परत आलो तर
त्या स्नानाचा काय उपयोग ? नाम घेऊन विषयाचा धंदा केला तर
काय उपयोग ? कर्माची बंधने तुटावित म्हणून शास्त्राची बंधने पाळावी
लागतात. देवाला पैसा देण्याचा हेतू हाच की माझा लोभ कमी व्हावा.
खरे तर म्हणजे, आपल्याला कर्म केल्याशिवाय करमतच नाही. पण
आपण फळाची आशा उगीचच करीत असतो; इथेच आपले चुकते.
काहीही न करता राहणे मनुष्याला शक्य नसते. उदाहरणार्थ,
एखाद्दाला सांगितले की, हातपाय न हलविता, काही न करता
स्वस्थ रहा, तर ती त्याला शिक्षाच होईल. जर काही तरी करणे
जरूरच आहे, तर उचितच गोष्ट करावी.जी गोष्ट बंधनाला
कारण होते ती विपरीतच असते. कर्तेपणाच्या अभिमानाने
केलेले कर्म हे असे विपरीत कर्म होय. ज्ञानावस्थेमध्ये
झालेले कर्म पूर्णच असते. त्या अगोदर कर्म पूर्ण होत नाही.
धर्म तरी काय सांगतो ? तर प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे.
पण कर्तव्य तरी कशासाठी करायचे ? तर ते भगवंतासाठी होय.
भगवंताच्या ठिकाणी श्रध्दा ठेवून कर्तव्य करावे, तरच
मानव सुखी होईल .

DSCF3225 DSCF3226

रांगोळी कुईरी

                              ॐ
रांगोळी कुईरी : कुईरी चार प्रकारे काढली आहे.
१ सात ७ टिपके ते एक १ पर्यंत व सहा पर्यंत काढून
दोन्ही बाजूने तीन पाकळ्या फूल येतात.सात ७ टिपके देऊन
दोन्ही बाजूने एक १ पर्यंत काढून चार ४ पाकळ्या फूल येतात.
अकरा ११ टिपके देऊन दोन्ही बाजूने एक पर्यंत टिपके देऊन
पाकळ्या फूल नऊ येतात. एकोणीस टिपके देऊन दोन्ही बाजूने चौदा पर्यंत
एकत्र केले. पंधरा १५ ला सात ७ सात ७ पासून एक १ पर्यंत टिपके दोन्ही बाजूने
दिले.पाकळ्या फूल सतरा १७ येतात.अशा प्रकारे रांगोळी व कागद स्केच पेन यांनी
काढली आहे. कागद भिंतीला लावता येतो. लावता येतात.

     DSCF3182 DSCF3183

    DSCF3185 DSCF3186

  DSCF3188 DSCF3189DSCF3190DSCF3191

DSCF3193 DSCF3194

%d bloggers like this: