आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 4, 2012

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने ४

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
प्रवचने नोव्हेंबर 4

भगवंत सगुणात आले म्हणजे काय ?
एक गृहस्थ मला भेटले, ते म्हणाले, हिंदू धर्मासारखा धर्म नाही ;
परंतु देव सगुणात आले हे नाही मला कबूल. म्हणे निरनिराळ्या
उपासना सांगितल्या ! देव जर निर्गुण निराकार, तर राम, कृष्ण,
शिव, दत्त अशा या एवढ्या निरनिराळ्या उपासना कशाला ?
पूढे एक दिवस त्यांच्या विषयी एका गृहस्थाने त्यांच्या घरी चौकशी
केली, तेव्हा प्रत्येकजण निरनिराळे नाव घेऊन सांगू लागले. कोणी
‘ दादा ‘ घरी नाहीत असे म्हणाले, तर कोणी ‘ दामोदर ‘ घरी नाही म्हणाले,
कोणी ‘ रावसाहेब ‘ नाहीत म्हणाले. हे सर्व जरी म्हटले तरी त्यायोगे भेटणारा
मनुष्य ज्याप्रमाणे तो गृहस्थ एकच, त्याप्रमाणे हे भगवंताच्या निर्गुणाचे
सगुणात झाले. भगवंत सगुणामध्ये आला की, जे नियम आपल्याला लागू
असतात तेच नियम त्यालाही लागू होतात. सगुणाशिवाय निर्गुण उपासना
करतो म्हणतो,त्याला त्याचे मर्मच नाही कळले.
खरी तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याला नाही ते कळत.
आपले वेद , उपनिषदे ब्रह्मसूत्रे आणि त्यावरची भाष्ये यांनी निर्गुण
स्वरुपाची रुपरेषा काढून दिली. संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि ताचे हग
भगवंताचे सुंदर चित्र तयार केले; ही सगुणभक्ती होय. सगुणोपासनेपासून मोक्ष
मिळणार नाही .

DSCF3225 DSCF3226

शेंगदाणे कडीपत्ता चटणी

                                           ॐ
शेंगदाणे कडीपत्ता चटणी : बाऊल भर कच्चे शेंगदाणे घेतले.
दोन २ रुपये चा कडीपत्ता घेतला.लिंबू अख्ख घेतले.
चार ४ हिरवी मिरची घेतली.घेतले. मीठ चवी प्रमाणे घेतले.
शेंगदाणे भाजून घेतले साल काढली नाहीत.शेंगदाणे गार केले.
सालासगट मिक्सर मध्ये घातले.हिरवी मिरची ४ चार घातली कमी
कडीपत्ता भरपूर घातला.त्याचा व शेंगदाणे भाजलेल्या चा वास चांगला
आला. येतो.
तिखट पाहिजे असेल तर २ दोन मिरची पण घालावी.मीठ घातले.लिंबू कापून
रस घातला थोडे पाणी घातले. मस्त बारीक केले.पाणी असल्यामुळे एकत्र छान
केले.झाले. भाजलेले सालासगट शेंगदाणे असल्यामुळे खमंग वास चटणी ला आला आहे.
येतो.भाजलेले शेंगदाणे, कडीपत्ता, हिरवी मिरची, मीठ ,लिंबू , पाणी, सर्व एकत्र करून
मिक्सर मधून एकत्र केले.थोडे पाणी मूळे पातळ केले.झाले.बोटाने चाटून खाता येते पोळी
दशमी कशा बरोबर मस्त लागते.वाटल्यास तेल मोहरी ची फोडणी केली तरी चालते.
गरम फोडणी घालू नये. ओल नारळ याचा कीस याची पण अशा प्रकारे करतात.केली
तरी चालते.पण शेंगदाणे भाजलेले खमंग वास व चव फार च चांगली लागते.

   DSCF3229 DSCF3231

%d bloggers like this: