आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 6, 2012

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने ६

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

प्रवचने नोव्हेंबर ६

भगवंताची कृपा. खरोखर भगवंताच्या कृपेशिवाय बाकी गोष्टी असून वा नसून  सारख्याच आहेत.एखादी मुलगी लग्न होऊन सासरी गेली; तिथे सासू, सासरा, दीर, नणंद, जावा वगैरे सर्व लोकांशी तिचे चांगले आहे, पण नवऱ्याशी मात्र पटत नाही, तर तिला खरे सुखसमाधान मिळणार नाही. परंतु समजा, नवऱ्याशी चांगले आहे.पण  इतरांशी तितकेच ठीक नाही,तर तिचे अडणार नाही,तसेच एखाद्दाच्या आजारात पैसा,डॉक्टर, औषधे, माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत,पण त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व व्यर्थ आहे. याच्या उलट भगवंताची कृपा आहे, पण इतर गोष्टींचा अभाव आहे, तरी काम भागते.म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे; आणि ती मिळविण्याकरिता, त्याचे स्मरण हाच एक मार्ग आहे.

DSCF3225 DSCF3226

लाल भोपळा च्या घाऱ्या

 ॐ

लाल भोपळा च्या घारा घाऱ्या :

 लाल भोपळा १o रुपये  पावशेर आणला घेतला. साल काढून विळीने फोडी केल्या. एका पातेल्यात फोडी घातल्या. पाणी एक बाऊल घातले. ग्यास पेटवून ग्यास वर  भोपळा चिरलेला फोडी व पाणी घातलेले पातेले ठेवले. शिजवू दिले. कुकर मध्ये पाणी आटत नाही. फोडी पाण्यात चांगल्या शिजतात. फोपळा शिजवून गार केला. भोपळा मध्ये तेल घातले. अर्धा बाऊल हरबारा डाळीचे पीठ घातले. एक १ बाऊल गव्हाचे पीठ घातले. पाणी वापरले न आही.गूळ पाव बाऊल घातला शिजलेला लाल भोपळा गूळ पाव बाऊल अर्धा हरबरा डाळीचे पीठ एक १ बाऊल गव्हाचे पीठ तेल चार चमचे मोहन सर्व एकत्र गोळा केला. १५ मिनिट नंतर गोळा च्या लाट्या घेऊन पुरी सारख्या केल्या.त्याला भोक बोटाने छिद्र पाडली.थोड जाड सर ठेवले.तो पर्यंत ग्यास वर कढईत तापलेले तेल ह्यात  लाल भोपळा याच्या घारा घाऱ्या तळून काढल्या. लाल भोपळ्या  च्या घारा घार्या घाऱ्या नां लाल भोपळा ची चव व गूळ व तेल व हरबरा डाळीच्या चव च चांगली आळी आहे. लाल भोपळा घाऱ्या गार व गरम दोन्ही चांगल्या लागतात.

DSCF3228 DSCF3227

DSCF3237 DSCF3236

%d bloggers like this: