आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 9, 2012

श्री ब्रम्ह्मचैतन्य प्रवचने

श्री ब्रम्ह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

प्रवचने नोव्हेंबर ९

लोकांची मन दुखवणे ही हिंसाच

ही जी  सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे तिची नक्कल म्हणजे चित्रकला होय. चित्रकाराने रंगविलेले चित्र खोटे असून जे खऱ्यासारखे भासते, त्याला उत्तम चित्र असे म्हणतात.

भगवंताचे होऊन जी कला येइल ती खरी. भगवंताने आपल्याकडून जे करवून घेतले ती कला समजावी.जे कर्म भगवंताकडे न्यायला मदत करते ती कलाच होय या कलेमध्ये मनाला

गुंतवून आणि उद्दोगात राहणे ही भगवत्सेवाच आहे. मन म्हणजे कल्पनाचे मूर्त स्वरूप. मन चंचल आहे तोपर्यंत देहालासुध्दा स्वस्थता नाही,मनाची चलबिचल होते म्हणूनच

अभ्यास करायला पाहिजे. मनाला शिक्षण देणे याचे नाव अभ्यास करणे. मनाची चलबिचल होते म्हणूनच अभ्यास करायला पाहिजे. मनाला शिक्षण देणे याचे नाव अभ्यास करणे.

मनाची विश्रांती हीच खरी विश्रांती होय

DSCF3225 DSCF3226

अंगकोर

अंगकोर येथे जगात सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. हे मंदिर १२ व्या शतकात राजा सूर्यवर्मन याने यासोधारापुरा (आजचे अंगकोर) ख्मेर ची राजधानी, येथे बांधले.

पूर्वीच्या राज्यांच्या शैवि समा पासून दूर जात, हे मंदिर विष्णू ला समर्पित आहे. हे मंदिर ख्मेर स्थापत्य याचा सुंदर नमुना आहे.

हे एक कंबोडिया चे चिन्ह बनले असून ते त्यांच्या राष्ट्रीय झेंड्या वर पण दर्शविले आहे. हे कंबोडिया चे एक मुख्य आकर्षण आहे.

%d bloggers like this: