श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने
ॐ
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
प्रवचने नोव्हेंबर १०
शेजार असतां रामाचा । दु:खाची, काळजीची,काय वार्ता ।।
ज्याला म्हणावें मी ‘ माझे ‘ । त्यावर माझी सत्ता न गाजे ।। स्व:तचा नाहीं भरंवसा हें अनुभवास येई । परि वियोगाचें दु:ख अनिवार होई ।। तुम्ही विचारी, सुज्ञ आहांत । थोडासा करावा विचार ।।
सर्व सत्ता रामरायाचे हातीं । तेथें आपल्या मानवाची काय गति ? ।। विचाराने दु:ख सारावें । सर्वांचे समाधान राखावें ।। सर्व केलें रामार्पण । हा नव्हे शब्दांचा खेळ जाण । अर्पण केल्याची खूण ।
न लागावी काळजी तळमळ जाण ।। परमात्म्याचे रक्षण । कोणतेही स्थळी, कोणतेही काळीं, असतें हा भरवसा ।याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा ।।ठेवा रामावर पूर्ण विश्वास ।
न करावे उपासतापास ।|