आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 12, 2012

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

प्रवचने नोव्हेंबर १२

बध्द आणि मुक्त यांतला फरक. बध्द हे जगाचे असतात. मुक्त हे जगाचे नसून एका भगवंताचे असतात. संताची चौकशी करताना, त्याची उपासना कोणती,गुरु कोण हे पाहतात; त्याच्या आईबापांची नाही चौकशी करीत. संतांना देहाची आठवण नसते; ते आपला देहाभिमान, मीपण, भगवंताला देतात.परामात्म्यापेक्षा विषयाची गोडी ज्याला जास्त तो बध्द. विषयाचे प्रेम कमी होणे म्हणजे मुक्तदशेचा मार्गाला लागणे. ‘ मी भगवंताचा ‘ म्हटले की तिथे बध्दपणा संपला. आपण बध्द आहोत हे तरी,आपणच, बध्द आहोत अशी भावना करून घेतली आहे म्हणून. आपण, मूळ तेच रुप स्वयंसिध्द असताना, सर्व इंद्रिये मिळून होणारा देह मी असे म्हणतो; म्हणजे मीपणा म्हणनारा कोणीतरी वेगळा आहे हे खरे; आपल्याला ते बारोबर समजत नाही इतकेच.मीपणा आपल्यात इतका बनलेला असतो.

DSCF3225 DSCF3226

वाढ दिवस

१२ नोव्हेंबर  (११)  २०१२  साल  ला 

प्रणव   चा वाढ दिवस  आहे ! प्रणव ला वाढ  दिवस च्या  शुभेच्छा  !!  

 DSCF3257 DSCF3101

%d bloggers like this: