आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 14, 2012

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

प्रवचने नोव्हेंबर १४

                  प्रपंच भगवंताचा आहे असे जाणून करावा.

हे जे सर्व जग दिसते, त्याला कुणी तरी नियंता आहे असे तुम्हाला वाटते का ? एखाद्दा नास्तिकाला विचारले की,  ‘ हे जग कुणी निर्माण केले ? ‘ तर तो काय सांगेल, तर पांचभौतिक तत्वांपासून याची उत्पत्ती झाली आहे.पण ही तत्वे कुणी निर्माण केली ? त्यावर तो सांगेल, ‘ ते मात्र मला कळत नाही.’पण जे कळत नाही त्याला सुध्दा कुणीतरी कर्ता असलाच पाहिजे, म्हणून, देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही. जिथे सध्या वस्ती नाही तिथेही मंदिरे बांधलेली आपण पाहतो; आणि ती कुणी बांधली याचा तपास करू लागलो असताना बांधणारा कोण हे जरी समजले नाही तरी, ज्या अर्थी ती आहेत, त्या अर्थी त्यांना कुणीतरी बांधणारा आहेच.म्हणून काय की, जगाचा कुणी तरी कर्ता हा असलाच पाहिजे. तो कोण हे आपल्याला समजत नाही इतकेच.

DSCF3225 DSCF3226

कार्तिक प्रतिपदा

                                                     ॐ
कार्तिक प्रतिपदा : दिवाळी पाडवा :
बळीराजा अतिशय धार्मिक होता सतत यज्ञ करायचा.एकदा यज्ञ करीत असतांना
वामनाच्या रुपात श्रीविष्णू त्या ठिकाणी आले बळी राजाने स्वागत व पूजन केले.
तीन पावले जमीन मागितली दानाचे संकल्प सोडते वेळी पाण्याच्या झारीतून पाणी
पडत नाही म्हल्यावर दर्भाची काडी घातली शुक्राचार्यांचा डोळा फुटला ते संतापले.विश्वास
डळमळू लागला त्याच बरोबर दया आली.’ वामनाच्या खऱ्या रूपाची ओळख पटली
प्रत्यक्ष भगवान विष्णूच आहेत अशा वेळी मी त्यांना दिलेले दान कसे नाकारू?
जे त्यांचेच आहे ते मी त्यांना देण्यात मी मागे का पाहू?आपल्या संस्कृतीत
पश्चातापला फार महत्व आहे. तीन पावलं भूमी मागतो,पाहिलं पाऊल स्वर्गलोक
दुसरं पाऊल मृत्युलोक तिसर पाऊल च्या वेळी बळी राजा आपल मस्तक खाली
झुकावतो.आणि म्हणतो देवा या इथे ठेवा क्षणभर विचार न करता तो उत्तरतो.
त्याचे दातृत्व पाहून भगवान प्रसन्न होतात त्याला वर देतात ‘ कार्तिक प्रतिपदा
दिवस लोक तुझी पूजा करतील . बलीराजाला पाताळात पाठवून दिले.

DSCF3270 DSCF3275

DSCF3115 DSCF3196

                                               ॐ
                              भूप राग वाजविला होता !

                            DSCF3293

कार्तिक पाडवा

स्वस्ति श्रीशालिवाहान शक १९३४ नंदननाम संवत्सर दक्षिणायन शरदऋतु कार्तिक शुक्लपक्ष १ प्रतिपदा बुधवार नक्षत्र विशाखा बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा. वहीपूजन पतीस ओवाळणे. काही ठिकाणी वडील यांना पण ओवाळतात. मी लग्ना आधी माझे वडील यांना ओवाळत ! नंतर पत्र फोन असे. तसेच दिनांक तारीख १४नोव्हेंबर (११) २०१२ साल आहे.बुधवार आहे. १४ नोव्हेंबर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस असतो. मी माझे वडील व इतर सर्वजण यांचा फोटो छायाचित्र लावत आहे.

DSCF3270 DSCF3275

DSCF3278 DSCF3285

%d bloggers like this: