आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 15, 2012

दिवाळी

                                 ॐ
                              दिवाळी
दिवाळीचा सण आहे प्रकाशाचा आनंदाचा
ह्या उजळून जीवन बनवाचे अधिक नव नवीन
दिवाळीचा दिवस येतो वासुबारासेचा गाई गोऱ्याचा पूजेचा
स्त्रिया ओवाळती गाई वासराला लुटती आनंद पूजेचा
येतो नरक चतुर्दशीअभ्यंग स्नानाने करुनी जाती सारे
देवदर्शनाला लुटण्या दिवाळी च्या आनंदाला
लक्ष्मीपूजन आहे सण अती आनंदाचा आणि प्रसन्नतेचा
महालक्ष्मी येते प्रत्येक घरात आनंदाने करु तिचे स्वागत
वामनाने बळीराजाला मागितले तीन पाऊले जमीन
वामनाने तिसऱ्या पावलाला बळीराजाला घातले पाताळाला
पाडवा सण पिता पतीच्या मानाचा करुनी त्यांचे हार्दीक पूजन
मानराखूयां त्यांच्या अतीमोलाचा
भाऊबीज सण बहीण भावाचा निखळ प्रेमाचा आणि शुध्द नात्याचा
बंधू भगिनी नाते आहे अतूट निर्व्याज प्रेमाचे वारसा त्याचा चालवूया पुढेच पुढे
सारेच सण देतात संस्कृतीची शिकवण करुनी आनंदाने सण उजलवू या आपले जीवन
हे सारे नाही नुसते संस्कृती पुराण घडवा भव्य दिव्य आपले ही जीवन
वाढविते उंचीचे जीवन आपुल्या आत्म्याची आणि अमूल्य जीवनाची
दिवाळी सणात निसर्ग सुध्दा साथ देतो काळी माती ( आई ) शेती भाती पिकवून
नवीन धान्य पुरवितो तऱ्हे तऱ्हे च्या पदार्थ बनवून खाऊन मानवी जीवन तृप्त होतो
समाधानाचा मोठ्ठा धडा मानवाला तो निसर्ग शिकवितो लाख लाख मोलाचे देवाचे
देणे त्याचा विसर ना व्हावा हे ची त्यासी मागणे .
सौ सुनीती रे देशपांडे

बेसनलाडू करंजी

                                           ॐ
बेसनलाडू करंजी : हरबरा डाळीचे पीठ एक बाऊल घेतले पिठी साखर पाऊन पाऊल घेतली..
काजू बदाम जायफळ सादुक तूप.तुपात हरबारा डाळीचे पीठ भाजले सादुक तुपात.गार पीठ
केले त्यात पिठी साखर बदाम पूड काऊ पूड जायफळ घातले. हरबरा डाळीचे लाडूएकत्र गोळा केला
गार केलाकणिक तेल मीठ घालून पाण्यात भिजविली. गोळे छोटे छोटे करून लाटून त्यात बेसन लाडू चे
सारण भरले.कारंजी चा आकार दिला दोन मोदक केले. सेव सादुक तपात टाळून काढले.
कणिक मऊ व बेसन लाडू मऊ छान कारंजी तयार केली.हरबरा डाळीचे पीठ तुपात भाजल्या मुळे खमंग
पणा आला.मस्त नवीन कणिक भाजून करण्या पेक्षा हरबरा डाळीचे पीठ भाजून केलेली पिठी साखर सर्व
घातलेले व सादुक तुपात टाळले कारंजी मोदक मस्त तयार केले.मी !

DSCF3298 DSCF3296

DSCF3278 DSCF3303DSCF3223 DSCF3196

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

प्रवचने नोव्हेंबर 15

काळजीचे मूळ कर्तेपणात आनंद पाहायला आपल्याला दुसरीकडे कुठे जावे लागते का ? नाही. जो स्वत:च आनंदरूप आहे त्याने आपण होऊन ‘ मी ‘  दु:खी आहे ‘ असे मानून घेतले आहे. कारण एकजण आपले तोंड आरशात पाहायला गेला. पण त्याला दिसले नाही. त्यावर दुसरा एकजण म्हणाला, ‘ मी दाखवितो ‘ असे म्हणून आरशावर मळ बसला होता तो पुसून, त्याने पाहायला सांगितले, तेव्हा तोंड स्वच्छ दिसले. त्याप्रमाणे साधू लोक करीत असतात ते ते आपल्याला सांगत असतात की तूच ब्रह्मरूप आहेस; म्हणजे तू स्वत:सिध्द आणि आनंदरूप आहेस. परंतु आपण काय करतो, की हा प्रपंच माझा आहे असे मजतो. आणि त्यामुळे त्यातले सर्व सुखदु:ख आपण आपल्यावर लादून घेतो ज्याने तो उत्पन्न केला त्याला तो रक्षण करण्याची शक्ती असते तो ते आपल्या इच्छेप्रमाणे करीत असतो पण तिथे आपल्यावर कर्तेपणा ओढुन घेउन आपण सर्व काळजी करीत असतो.

DSCF3225 DSCF3226

दिवाळी

                                     ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
तसेच नोव्हेंबर २०१२ साल दिवाळी.चे छायाचित्र एकत्र
फोटो लावत आहे.

       DSCF3270 DSCF3274dscf1182 DSCF3306

DSCF3196 DSCF3150

DSCF3287 DSCF3115dscf3024 dscf3058

DSCF3303 DSCF3271

DSCF3308 DSCF3298

कार्तिक शुक्लपक्ष व्दितीया

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर दक्षिणायन शरदऋतु कार्तिक शुक्लपक्ष नक्षत्र अनुराधा ज्येष्ठा २ व्दितीया गुरुवार यमव्दितीया ( भाऊबीज) यमपूजन चंद्रदर्शन ( १९।३६प. )

भाऊ सौ बहिण याच्या सासरी जातो.व फराळ व ओवाळणी घालतो. भाऊ ची वाट सौ बहिण पहात असते. भाऊ भेटेल म्हणून. ओवाळणी तर असतेच. पहिला दिवाळ सण माहेरी करतात.चंद्र याला पण ओवाळतात. पत्र फोन करून ही भेटी गाठी करतात. हैद्राबाद ला आम्ही चुलत बहिण भावंड एकत्र राहत.चुलत भावंड पण ओवाळून ओवाळणी देत.चार ४ आणे ओवाळणी असे.आम्ही सर्व बहिणी खूष असत.आता चार ४आणे वर किती शुण्य हे सांगता येणार नाही. दिवाळीत सर्वांना घेऊन फटाके आणले जात असे. सर्वांना पाच पाच ५ फटाके मिळत. सर्वजण खूष असत.कोणी कोणाचे घेत नसत,लाकडी काडीला गोल फटाका असे. काडीने आपटला कीतारीख जोरात आवाज येत.असत,आता असे फटाके दिसतच नाहीत. फराळ आधी करून ठेवायची पध्दत नव्हती चुली वर मध्ये सकाळी ताजे करत काय फराळ देत ते काही आठवत नाही. सासरी पण एकत्र खूप वर्ष दिवाळी केली फराळ मात्र आधीच करून ठेवत, माझ्या सौ सासूबाई म्हणत वर्षातून एकदा तरी सर्व सण जमा एकेका च्या घरी.दिवाळीत नाही पण आम्ही एकत्र केंव्हातरी जमतो आता सुध्दा !

तसेच दिनांक तारीख १५ नोव्हेंबर ( ११ ) २०१२ साल गुरुवार भाऊबीज आहे.

दिवाळी आहे.

DSCF3270 DSCF3274

%d bloggers like this: