आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 16, 2012

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

प्रवचने नोव्हेंबर १६

अभिमान जाणे ही देवाची कृपाच.
आता उत्सव पुरा झाला; आता तुम्ही सर्वजण परत जाल,
तर क्षेत्रात आल्याची काही खूण घेऊन जा. ती खूण म्हणजे काय ?
क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगुण सोडावा; आपल्याला जी काही
प्रिय वस्तू असते ती सोडावी. तर इथे येऊन, विषयांपैकी एखाद्दा
विषय तरी तुम्ही सोडाल का ? इथे साक्षात् परमात्मा आले आहेत,
त्यांचे तुम्हा सर्वांना दर्शन झाले आहे. तर मला वाटते याहून तुम्ही
काही तरी जास्त करणे आवश्यक आहे. तर एक गोष्ट इथे द्दावी आणि
एक गोष्ट इथून घेऊन जावी : अभिमान इथे सोडावा, आणि त्याच्या
बदली देवाची कृपा घेऊन जावी.अभिमान तुम्हाला देता येईल का ?
अभिमान जाणे म्हणजे देवाची कृपा होणे आहे.

DSCF3225 DSCF3226

गवारी ची भाजी

                                  ॐ
गवारी ची भाजी : गवार पंधरा १५ रुपये पावशेर आहे.
मी दहा १० रुपये ची गवार घेतली.गवार हाताच्या बोटाने
शिरा काढून निवडली. बारीक बारीक तुकडे केले.ग्यास पेटवून
पातेले ठेवले. तेल मोहरी ची फोडणी केली.त्यात धुतलेली व निवडलेली
गवार घातली. थोडे पाणी घातले.हळद,हिंग,लाल तिखट.मीठ घातले.
सर्व शिजवू दिले.शेंगदाणे याचा कुट घातला.सर्व परत हलवून वाफा आणली.
झाकण ठेवून.थोड पाणी रस भाजीत राहील असे गावर ची भाजी तयार केली.
निवडलेली गावर शेंगदाणे कुट लाल तिखट मीठ हिंग पाणी.तेल मोहरी ची
फोडणी सर्व याची गावर याची भाजी तयार झाली. केली मी !

DSCF3290 DSCF3291

%d bloggers like this: