आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 17, 2012

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर

प्रवचने नोव्हेंबर  १७

गरज फक्त आपल्या निष्ठेची  येणारच
परमेश्वरापाशी काया मागावे ? तुम्ही त्रास घेऊन इतक्या लांब
गोंदवल्याला जे आलात ते विषय मागण्यासाठी आला आहात का ?
मागितलेत तर तो देणार नाही असे नाही. आपल्याप्रमाणे तो मर्यादित
स्वरूपाचा दाता नाही. आपण दान केले तर तितके आपल्यापैकी कमी होते,
पण त्याने कितीही दिले तरी ते कमी होणे शक्य नाही. पण विषय मागूण मिळाले
तरी आपले खरे कल्याण होईल का ? त्याने तुम्हाला खरे समाधान होईल का ?
नाही कारण देहभोग आज एक गेला तरी दुसरा पुन: म्हणून देहभोग येतील ते येऊ देत
देवाच्या मनात ज्या स्थितीत ठेवायचे असेल त्या स्थितीत ‘ मला समाधान दे ‘
हेच त्याच्यापाशी मागावे. त्याची करुणा भाकून ‘ मला तू निर्विषय कर आणि काही
मागावे अशी इच्छाच होऊ नये देणे मला दे. असे तुम्ही अनन्य शरण जाऊन मागावे.
त्यातच तुमचे कल्याण आहे.

DSCF3225 DSCF3226

PONDICHERRY माताजी

                           ॐ
PONDICHERRY च्या माताजी चां
17 (१७ ) नोव्हेंबर हा समाधी चा दिवस आहे.
1973 (१९७३ ) 17 ( १७ ) नोव्हेंबर (११) साल !
ला त्यांची समाधी चा दिवस !
माझा माताजीं ना मना पासून नमस्कार !
हा दिवस ला माताजीं च्या खोलीत माताजीं च्या दर्शन
घेण्यासाठी जाण्यास मिळते. देश – परदेश मधून मुद्दाम
मुध्दाम माताजीं च्या समाधी च दर्शन माताजीं च्या
खोलीत दर्शन घेण्या करीता मुद्दाम येतात.

DSCF3332 DSCF3333

DSCF3335

उडीद डाळीचे वडे

                                   ॐ
डाळीचे वडे : एक बाऊल उडीद डाळ भांड्यात घेतली.
पाणी घालून धुतली. पाणी ठेवून सात ७ /आठ ८ तास पाण्यात
उडीद डाळ भिजत ठेवली. नतंर मिक्सर मधून बारीक केली.पातेल्यात
बारीक केलेली उडीद डाळ मध्ये लाल तिखट मी बहुतेक लाल तिखट च
वापरते.मीठ हिंग हळद गरम तेल घातले.कढईत तेल घातेले ग्यास शेगडी
पेटवून कढई व तेल गरम केले.त्यात उडीद डाळ भिजलेली बारीक केलेली
हिंग मीठ तिखट हळद गरम तेल सर्व घातलेले याचे बारीक बारीक भजी
सारखे वडे तळून तांबूस काढले.
मस्त हलके व आतून वडा पण चांगला शिजला.गरम तेला मुळे .व
डाळ पण खूप भिजली त्यामुळे उडीद वडा हलका झाला.
दही याचे ताक केले.ताकाताच काही उडीद वडे घातले मुरु दिले.
पाण्यातून बाहेर काढतात तसे केले नाही मी.ताकातच उडीद वडे
भिजविले.परत दही घातले.मीठ लाल तिखट घातले. मी साखर घालत
नाही.गोड पदार्थ गोड व तिखट पदार्थ तिखट असतो ठेवते.
साधे उडीद वडे व दही ह्यातले उडीद वडे खूपच चांगले झाले आहेत !

  DSCF3310 DSCF3312

DSCF3314 DSCF3315

%d bloggers like this: