आपले स्वागत आहे!

उडीद डाळीचे वडे

                                   ॐ
डाळीचे वडे : एक बाऊल उडीद डाळ भांड्यात घेतली.
पाणी घालून धुतली. पाणी ठेवून सात ७ /आठ ८ तास पाण्यात
उडीद डाळ भिजत ठेवली. नतंर मिक्सर मधून बारीक केली.पातेल्यात
बारीक केलेली उडीद डाळ मध्ये लाल तिखट मी बहुतेक लाल तिखट च
वापरते.मीठ हिंग हळद गरम तेल घातले.कढईत तेल घातेले ग्यास शेगडी
पेटवून कढई व तेल गरम केले.त्यात उडीद डाळ भिजलेली बारीक केलेली
हिंग मीठ तिखट हळद गरम तेल सर्व घातलेले याचे बारीक बारीक भजी
सारखे वडे तळून तांबूस काढले.
मस्त हलके व आतून वडा पण चांगला शिजला.गरम तेला मुळे .व
डाळ पण खूप भिजली त्यामुळे उडीद वडा हलका झाला.
दही याचे ताक केले.ताकाताच काही उडीद वडे घातले मुरु दिले.
पाण्यातून बाहेर काढतात तसे केले नाही मी.ताकातच उडीद वडे
भिजविले.परत दही घातले.मीठ लाल तिखट घातले. मी साखर घालत
नाही.गोड पदार्थ गोड व तिखट पदार्थ तिखट असतो ठेवते.
साधे उडीद वडे व दही ह्यातले उडीद वडे खूपच चांगले झाले आहेत !

  DSCF3310 DSCF3312

DSCF3314 DSCF3315

Comments on: "उडीद डाळीचे वडे" (2)

  1. Naagaapurchee aai mast dahiwade karaayachee…..Sau.Gangaakadepan(Dilligatela) asaayche.

Leave a reply to वसुधा उत्तर रद्द करा.