आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 21, 2012

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने

                                                     ॐ
                                    श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
                             प्रवचने नोव्हेंबर २१
कल्पना थांबून वृत्ती स्थिर झाली पाहिजे गेला तर आपल्या देशाचे
एखादा मनुष्य तालुक्याच्या ठिकाणी गेला, आणि त्याला ‘ तुम्ही कुठले ? ‘
असे विचारले, तर तो आपल्या खेडेगावाचे नाव सांगेल. जिल्ह्याच्या ठिकाणी
गेला तर तो तालुक्याचे नाव सांगेन, इलाख्याच्या ठिकाणी गेला तर जिल्ह्याचे नाव सांगेल;
तसेच दुसऱ्या प्रांतात गेला तर आपल्या इलाख्याचे नाव सांगेल, आणि परदेशात गेला तर आपल्या
देशाचे न नाव सांगेल. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जेवढी विशालता येईल तेवढे भेदभाव कमी होतात.
तसे मनुष्य कोणताही धर्माचा असला तरी सर्व धर्म मूळ एकच असल्यामुळे, त्या मुळाशी जो गेलं
त्याला सर्व धर्म सारखेच. पण एवढी विशाल दृष्टी येईपर्यंत, जो ज ज्या धर्मात जन्माला आला त्या
धर्माचे आचरण करणे हेच हिताचे असते.

DSCF3225 DSCF3226

उंबरात रांगोळी

                    ॐ
रोज खर तर दारात उंबरात पांढरी रांगोळी काढतात.
पांढरी रांगोळी ने स्वस्तिक, गाई चे पावलं
दोन्ही बाजूच्या कोपरा जवळ काढतात.
मध्ये कासव किंवा कोणतीही रांगोळी काढतात.
हल्ली रांगोळी पुसली जाते फरशी असल्यामुळे व दिसत
पण नाही रांगोळी फरशी डिझायन ची असल्यामुळे !
तरी पण उंबरा ला लांब रेषा काढून दोन्ही बाजूने स्वस्तिक
गाई चे ची पाऊलं काढतात. हळद कुंकू वाहतात ! घालतात !

मी रोज एवढ काढत असते.

 DSCF3352 DSCF3353

DSCF3354 DSCF3355

%d bloggers like this: