आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 22, 2012

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने

                                                   ॐ
                          श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
                                   प्रवचने नोव्हेंबर २२
देव अत्यंत मायाळू आहे.
तुम्ही फार कष्ट करून येथे येता. किती दगदग, किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो !
बरे, इथे आल्यावर हाल काय कमी होतात ? परंतु कशासाठी आपण येतो, आपल्याला
काय हवे हे आपल्याला कळते का ? आपल्याला देव खरोखरच हवासा वाटतो का ? याचा
विचारच आपण फारसा करत नाही. आपल्यावर काही संकट आले, किंबहुना आपले काही वाईट
झाले, की आपण म्हणतो, देवाने असे कसे केले ? असे म्हणणे यासारखे दुसरे पाप नाही.
देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा एकवेळ परवडला, कारण तो ‘ देवाने वाईट केले ‘
असे तरी म्हणणार नाही.देव खरोखर अत्यंत मायाळू आहे. त्याला कुणाचेही दु:ख सहन होत नाही.
कोणत्या आईला आपल्या मुलाला दु:ख कष्ट झालेले आवडेल ? म्हणून देवाने माझे वाईट केले ही
खोटी समजूत प्रथम मनातून काढून टाका .

DSCF3225 DSCF3226

कंबोडिया

अंगकोर येथे जगात सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. हे मंदिर १२ व्या शतकात राजा सूर्यवर्मन याने यासोधारापुरा (आजचे अंगकोर) ख्मेर ची राजधानी, येथे बांधले.

पूर्वीच्या राज्यांच्या शैवि समा पासून दूर जात, हे मंदिर विष्णू ला समर्पित आहे. हे मंदिर ख्मेर स्थापत्य याचा सुंदर नमुना आहे.

वाळलेली पानं

                           ॐ
विडा ची पानं पाने ह्यवर मी खूप
पूर्वी लाल कुंकू पाण्यात मिसळून
काडी ने विडा च्या पानावर चित्र काढलेली
आहेत ती विडा ची पानं व चित्र आज ही चांगली
आहेत विडा ची पानं वाललेली असली तरी चांगली
ठेवली आहेत.! वाळ लेली असली तरी पाहण्यास
चांगल वाटत आहे. !

DSCF3363 DSCF3364

DSCF3366 DSCF3365

DSCF3367 DSCF3368

%d bloggers like this: