आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 24, 2012

Sri Aurobindo

                  ॐ
S r I  A u r o b i n d o
A s h r a m P O N D I C H E R R Y
S r i A u r o b i n d o
यांना 24 .11 ( नोव्हेंबर ) ला सिध्दी
प्राप्त झालेला दिवस आहे.

DSCF3395 DSCF3397

DSCF3398 DSCF3399

DSCF3099 DSCF3101

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने

                                   ॐ
                 श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
                         प्रवचने नोव्हेंबर २४
उत्कट भावनेने भगवंताची उपासना करावी.
विस्तव माहीत नसला, तरी तो हाताला चुकूनही लागला तरी
हात भाजतो; हा परीस आहे हे माहीत नसूनही, लोखंडाचा घण
त्यावर मारला तरी त्याचे सोने व्हायचे रहात नाही. त्याप्रमाणे
ज्ञानाशिवाय नुसते भक्तीने जरी भगवंताकडे गेले तरी काम होते. परंतु
दुसऱ्या विषयांची आसक्ती जोवर आपल्याला सुटत नाही तोवर मनापासून
भगवद् भक्ती होत नाही. जिथे उत्कट भावना आहे तिथे सगुण मुर्तीला
मनुष्यधर्म प्राप्त होतील. उपासक देहाला विसरला की उपस्यमुर्तीमध्ये
त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल; शिवाय जे इतर लोक थोडे
तन्मय झाले आहेत, त्यांनादेखील ते अनुभवाला येईल. परंतु उपासकाची
किंवा भक्ताची भावना नेहमी तितकी उत्कट राहीलच असा नेम नाही.
म्हणून अशा उपासकाला मूर्तीमधल्या चैतन्याचा अनुभव येऊनदेखील
पारमार्थिकदृष्ट्या फायदा होइलच असे निश्चित नाही .

DSCF3225 DSCF3226

श्री दुर्गा स्तोत्र

                                      ॐ
                              श्री दुर्गा स्तोत्र
                          श्री युधिष्ठिर विरचितं
जय जय आनंदकासार मराळिके । पद् मनयने दुरितवनपावके |
त्रिविधतापभवमोचके । सर्व व्यापके मृडानी ।। ११ ।।
शिवमानसकनकलतिके । जय चातुर्यचंपककलिके ।
शुंभनिशुंभदैत्यान्ति के ।निजजनपालके अपर्णे ।। १२ ।।
तव मुखकमलशोभा देखोनी । इंदुबिंब गेले विरोनी ।
ब्रह्मादिदेवा बाळे तान्ही । स्वानंदसदनी निजविसी ।।१३ ।।
जीव शिव दोन्ही बाळके । अंबे त्वां निर्मिली कौतुके ।
स्वरूप तुझे जीव नोळखे । म्हणोनी पडिला आवर्ती ।। १४ ।।
शिव तुझे स्मरणी सावचित । म्हणोनि तो नित्यमुक्त ।
स्वानंदपद हाता येत । तुझे कृपेने जननीये ।। १५ ।।
मेळवूनि पंचमहाभूतांचा मेळ त्वां रचिला ब्रह्मांडगोळ ।
इच्छा परतता तत्काळ क्षणे । निर्मूळ करिसी तू ।। १६ ।।
अनंत बालादित्य श्रेणी ।। तव प्रभेमाजी गेल्या लपोनी ।
सकलसौभाग्यशुभकल्याणी । रामारमणवरप्रदे ।। १७ ।।
जय शबररिपुरवल्लभे । त्रैलोक्यनगरारंभस्तंभे ।
आदिमाये आत्मप्रभे । सकलारंभे । मूलप्रकृति ।। १८ ।।
जय करुणामृतसरिते । भक्तपालके गुणभरिते ।
अनंतब्रह्मांडफलांकिते । आदिमाये अन्नपूर्णे ।। १९ ।।
तू सच्चिदानंदप्रणवरुपिणी । सकलचराचरव्यापिनी ।
सर्गस्थित्यंतकारिणी । भवमोचनी ब्रह्मानंदे ।। २० ।।
ऐकूनि धर्माचे स्तवन ।दुर्गा जाहली प्रसन्न ।।
म्हणे तुमचे शत्रू संहारीन ।राज्यी स्थापीन धर्माते ।। २१ ।।
तुम्ही वास करा येथे । प्रगटो नेदी जनात । शत्रू क्षय पावती समस्त ।
सुख अद् भूत तुम्हां होय ।। २२ ।।
त्वां जे स्तोत्र केले पूर्ण । ते जे त्रिकाल करिती पठण ।
त्यांचे सर्व काम पुरवीन । सदा रक्षीन अंतर्बाह्य ।। २३ ।।
इति श्री युधिष्ठिर विरचितं दुर्गा स्तोस्त्रम् समाप्तम्.

DSCF3360 DSCF3196

%d bloggers like this: