आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 25, 2012

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने

                                          ॐ
                        श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
                                     प्रवचने नोव्हेंबर २५
विषय, वासना इत्यादि सोडून भगवंताला शरण जावे.
भगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे.भगवंताचे मर्म ओळखायला,
मी दिली आहे. भगवंत निश्चित आहे हे काहींना अनुभवाने कळले.
आपण त्यांचे आत्पवाक्य प्रमाण मानले. भगवंताचे अस्तित्व जर निश्चित आहे तर
त्याची ओळख तरी कशी करून घ्यावी ? बीजगणितामध्ये उदाहरण सोडविताना एक
अज्ञान ‘ क्ष ‘ घ्याखवा लागतो. उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या ‘ क्ष ‘ ची खरी किमत काय
आहे हे आपल्याला कळत नाही, पण तो घेतल्याशिवाय चालत नाही; त्याप्रमाणे,
जीवनाचे कोडे सोडविण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत
धरलाच पाहिजे. या भगवंताचे खरे स्वरूप, जीवनाचे कोडे सुटेल त्या वेळी
आपल्याला कळेल, खरोखर जन्ममरणापासून मुक्त होण्याचा मार्ग आपल्याला
दाखवितो तो खरा आप्त. भगवंताचे सर्वांत अधिक काय आवडते, हे
संतांनी सांगून टाकले, ते म्हणजे ‘ आपण विषय, वासना इत्यादी सर्व
काही सोडून भगवंताला शरण जावे,’ आपण नेहमी विषयांना शरण जातो.
भगवंताला जो शरण गेला त्याला जगाची भीतीच नाही उरत.सर्व चमत्कार
करता येतात, पण भगवंताला शरण जाणे कठीण आहे.

DSCF3225 DSCF3226

दुर्गा देवीची आरती

              ॐ
दुर्गा देवीची आरती
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी |
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी ||
वारी वारी जन्ममरणाते वारी |
हारी पडलो आता संकट नीवारीं ||
जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथिनी |
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी ||धृ o ||
त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐशी नाही |
चारीं श्रमले परंतु न बोलवे काही |
साही विवाद करिता पडलो प्रवाही |
ते तू भक्तालागी पावसि लवलाही || १ ||
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा |
क्लेशांपासुनि सोडी तोडी भवपाशा |
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा |
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा || २ ||

DSCF3360 DSCF3196

%d bloggers like this: