श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने
ॐ
श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
प्रवचने नोव्हेंबर २६
भगवंताशी आपले नाते जोडावे.
भगवंताचे नाम मुखातून न येण्यापेक्षा मुकेपण बरे का ?
दृष्टी जर भगवंताची मूर्ती पहात नसेल तर ती दृष्टी काय कामाची ?
आपले कान त्याची कीर्ती जर ऐकत नसतील तर ते कान काय कामाचे ?
डोळ्यांनी भगवंताची मूर्ती पाहणे मुखाने भगवंताचे नामस्मरण करणे,
कानांनी त्याचेच गुणानुवाद ऐकणे, हाच खरा अभ्यास आहे. भगवच्चरित्र
ऐकायचे कशासाठी ? तर त्याप्रमाणे वागण्यासाठी. भगत्प्राप्तीसाठी एक
सुलभ उपाय आहे : भगवंताशी आपले नाते जोडावे, कोणते तरी नाते लावावे.
भगवंत हा माझा स्वामी आहे.मी त्याचां सेवक आहे. तो माता, मी लेकरू;
तो पिता मी पुत्र; तो पती मी पत्नी तो पुत्र, मी आई नाते लावून वाढवावे
भगवंताला आपलासा करून घेतलाच म्हणजे आपली काळजी त्याला वाटते.