आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर 27, 2012

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने

                                        ॐ
                          श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
                                प्रवचने नोव्हेंबर २७
निर्गुणाची जाणीव ठेवून सगुणोपासनेत राहावे.
समजा आपल्याला एका गावाला जायचे आहे.
त्या गावाला जाणारी आगगाडी धरून आपण आही तिची संगती करतो.
आपले गाव आले की गागी सोडतो. हे जर खरे, त्याचप्रमाणे,
निर्गुण हे आपले साध्य असले तरी आज आपल्याला सगुणच
खरे मानून त्याची संगती केली पाहिजे.निर्गुणाशिवाय सगुण
खरे ही गोष्ट खरी; पण सगुण खरे धरून चालल्याशिवाय हा
निर्गुणापर्यंत पोहोचता येणार नाही हेही तितकेच खरे.सगुणोपासनेत
स्वत:चा विसर पडला की, एकीकडे ‘ मी ‘ नाहीसा होतो आणि दुसरीकडे
देव नाहीसा होतो,आणि शेवटी परमात्मा शिल्लक उरतो.म्हणून
आपण निर्गुणाची ओळख करून घेऊन सगुणात राहावे.
स्वत:चा विसर जर रामाच्या पूजनात पडू लागला, तर निर्गुण आणखी
दुसरे कोणते राहिले.?

DSCF3225 DSCF3226

बोटाने काढलेली रांगोळी

                                      ॐ
बोटाने काढलेली रांगोळी :
बोटाने गोल करायचा व पाहिजे तसे चित्र डीझाईन
करुन रांगोळी तयार करता येते.मी पूर्वी पण रांगोळी
पसरून डीझाईन तयार केले आहे.नाव पण कोरली आहेत रांगोळीत
आता परत तसेच रांगोळी वापरुन नवीन डीझाईन तयार केले आहे.
रंगीत रांगोळी व पांढरी रांगोळी वापरुन तयार केलेले डीझाईन आहे.

DSCF3370 DSCF3371

%d bloggers like this: