आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर, 2012

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

प्रवचने नोव्हेंबर १०

शेजार असतां रामाचा । दु:खाची, काळजीची,काय वार्ता ।।

ज्याला म्हणावें मी ‘ माझे ‘ । त्यावर माझी सत्ता न गाजे ।। स्व:तचा नाहीं भरंवसा हें अनुभवास येई । परि वियोगाचें दु:ख अनिवार होई ।। तुम्ही विचारी, सुज्ञ आहांत । थोडासा करावा विचार ।।

सर्व सत्ता रामरायाचे हातीं । तेथें आपल्या मानवाची काय गति ? ।। विचाराने दु:ख सारावें । सर्वांचे समाधान राखावें ।। सर्व केलें रामार्पण । हा नव्हे शब्दांचा खेळ जाण । अर्पण केल्याची खूण ।

न लागावी काळजी तळमळ जाण ।। परमात्म्याचे रक्षण । कोणतेही स्थळी, कोणतेही काळीं, असतें हा भरवसा ।याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा ।।ठेवा रामावर पूर्ण विश्वास ।

न करावे उपासतापास ।|

DSCF3225 DSCF3226

वसुबारस

                                                ॐ 

                    स्वस्ति श्री शालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर 

                  दक्षिणायन शरदऋतु आश्र्विन कृष्णपक्ष नक्षत्र पूर्वा 

                  राशिप्रवेश कन्या ११ शनिवार रमा एकादशी व वसुबारस 

              ऐके दिवस ला आली आहे.

             तसेच दिनांक तारीख १० नोव्हेंबर २०१२ साल आहे
शनिवार आहे.

                         वसुबारस ला साधारण दिवाळी 

              सुरु होत असते. गाई वासरू याची पूजा करतात. चारा पोळी 

          वगेरे घास घालतात गाईला ! गवारी ची भाजी करतात.यंदा एकादशी 

          असलीतरी वसुबारस चा सकाळी उपवास करून वसुबारस करणारे 

        संध्याकाळी जेवतात.एकादशी न करणारे सौ. बायका सौ   महिला !

   

                               DSCF3270 DSCF3274

श्री ब्रम्ह्मचैतन्य प्रवचने

श्री ब्रम्ह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

प्रवचने नोव्हेंबर ९

लोकांची मन दुखवणे ही हिंसाच

ही जी  सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे तिची नक्कल म्हणजे चित्रकला होय. चित्रकाराने रंगविलेले चित्र खोटे असून जे खऱ्यासारखे भासते, त्याला उत्तम चित्र असे म्हणतात.

भगवंताचे होऊन जी कला येइल ती खरी. भगवंताने आपल्याकडून जे करवून घेतले ती कला समजावी.जे कर्म भगवंताकडे न्यायला मदत करते ती कलाच होय या कलेमध्ये मनाला

गुंतवून आणि उद्दोगात राहणे ही भगवत्सेवाच आहे. मन म्हणजे कल्पनाचे मूर्त स्वरूप. मन चंचल आहे तोपर्यंत देहालासुध्दा स्वस्थता नाही,मनाची चलबिचल होते म्हणूनच

अभ्यास करायला पाहिजे. मनाला शिक्षण देणे याचे नाव अभ्यास करणे. मनाची चलबिचल होते म्हणूनच अभ्यास करायला पाहिजे. मनाला शिक्षण देणे याचे नाव अभ्यास करणे.

मनाची विश्रांती हीच खरी विश्रांती होय

DSCF3225 DSCF3226

अंगकोर

अंगकोर येथे जगात सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. हे मंदिर १२ व्या शतकात राजा सूर्यवर्मन याने यासोधारापुरा (आजचे अंगकोर) ख्मेर ची राजधानी, येथे बांधले.

पूर्वीच्या राज्यांच्या शैवि समा पासून दूर जात, हे मंदिर विष्णू ला समर्पित आहे. हे मंदिर ख्मेर स्थापत्य याचा सुंदर नमुना आहे.

हे एक कंबोडिया चे चिन्ह बनले असून ते त्यांच्या राष्ट्रीय झेंड्या वर पण दर्शविले आहे. हे कंबोडिया चे एक मुख्य आकर्षण आहे.

अमेरिका अध्यक्ष ओबामा

अमेरिका

अमेरिका का चे   अध्यक्ष

2012 साल चे दिनांक तारीख ८ नोव्हेंबर २०१२ साल ला

अमेरिका याचे अध्यक्ष ओमाबा निवडून आले आहेत.

दुसऱ्यांदा जिंकणारे सतरावे १७ अध्यक्ष ओबामा आहेत.

DSCF3266  DSCF3267

DSCF3268 DSCF3196

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

प्रवचने नोव्हेंबर ८

कर्तव्य करावे,मग व्हायचे ते होऊ द्दावे

जगामध्ये आणि जीवनामध्ये दु:ख आहे यात शंका नाही.पण त्यापैकी पंचवीस टक्के दु:खच बाहेरून येते. युध्द, माहागाई, दुष्काळ, चोऱ्यामाऱ्या, दारिद्र्य इत्यादीचे दु:ख बाहेरून येते.पण पंचाहत्तर

टक्के आपले दु:ख आपल्यापासून निर्माण होत असते. आपले शरीर, मन आणि हृदयस्थ  भगवंत मिळून आपण बनतो. भगवंत आनंदरूप असल्याने तो दु:ख निर्माण करू शकणारच नाही.देहाचा स्वभाव

झिजणे, क्षीण होणे, असमर्थ होत जाणे हा असल्याने तो आपल्या मार्गाने जात असतो.तो दु:ख निर्माण करू शकत नाही. जे जडच आहे ते सुखही देऊ शकत नाही आणि दु:खही निर्माण करू शकत नाही. असे आपले मन, कोठेतरी चिकटणे हा मनाचा स्वभाव धर्म असल्याने ज्याला ते चिकटते त्याचे गुणधर्म अम्गीकारते. भक्ताचे  मन भगवंताला चिकटते म्हणून त्याच्या मनातून दु:ख निर्माण

होऊच शकत नाही.ज्याचे मन देहाला चिकटते, त्याचे मन दु:ख निर्माण करीत असले पाहिजे. भगवंतापासून वेगळेपण आणि देहाशी एकपण, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.देह लहान आहे,

आकुंचित आहे,तात्पुरता आहे. सान्त आहे,तोच मी आहे अशा घट्ट भावनेने जिकडेतिकडे दोनपण दिसू लागते आणि त्यातून भयरुपी समंध साकार होतो आणि तो जीवाला छळतो.भगवंताच्या स्मरणात आनंदाची मस्ती भोगायला जन्मलेल्या माणूस, भयापोटी चिंता चिंतेपायी दु:ख निर्माण करतो म्हणून त्याच्या नामात राहणाऱ्याला देहाचे काय होईल याचे भय उरत नाही.

DSCF3225 DSCF3226

विणकाम

मी पूर्वी पांढरे दोरे मिळतात .त्याचे विणकाम केलेले आहे. पाचं ५ फुट लांब धागा घेतला आहे.धागा दुहेरी करायचा. एका काठीला गाठ मारायची.दोन मधून धागा काढून घावायाचा. खूप धागे ओवून घावायाचे दोन २ दोन २ याचे तीन ३धागे घेउन पहिला धागा वर  दुसरा धागा घालायचा मधला धागा दोन मधुन काढून घावायाचा परत तसे न करता उलटी गाठ मारायची म्हणजे पिळ बसत न आही.सरळ विणून गालीच्छा सारखे विणकाम केले आहे.पण भरपूर धागे लागतात.व प्रत्येक वेळेला लांब लांब धाग्यातून गाठी माराव्या लागतात.मी आपले नमुना म्हणून थोडेसे लहान लहान विणकाम केले आहे.

DSCF3258 DSCF3259

DSCF3260 DSCF3261

ज्वारीचा भात

ज्वारीचा भात किंवा उपमा:

१ बापातेले ऊल ज्वारी घेतली. अर्धा बाऊल कच्चे शेंगदाणे घेतले. कडीपत्ता थोडा घेतला.खोबर किसून घेतले. हळद, हिंग,चवी प्रमाणे मीठ घेतले.मिरच्या चार ४ घेतल्या. तिळ कुट भाजलेले घेतले.कांदा एक १ घेतला. ज्वारीला थोड पाणी लावले.मिक्सर मधून बारीक केले. कांगरम दा विळीने बारीक चिरून घेतचांगले ला. पेटत्या ग्यास वर ठेवले.तेल मोहरी ची फोडणी केली. दुसऱ्या ग्यास पेटवून त्या वर पातेल्यात पाणी गरम करण्यास ठेवले. फोडणी झाल्या नंतर कडीपत्ता कच्चे शेंगदाणे चिरलेला कांदा घातला.थोडस परतून घेतले. ज्वारी बारीक केलेली फोडणी कांदा शेंगदाणे हळद हिंग ह्यात घातली. परत सर्व परतून घेतले. गरम पाणी सर्व मध्ये घातले. हलविले.शिजवू दिले. २ दोन बाऊल पाणी गरम घातले. वाफ आली. आणली. झाकण ठेवले. परत हलविले. परत वाफ आणली.झाकण ठेवले.

छान ज्वारीचा भात उपमा तयार झाला. केला. किसलेले खोबर घातले. बारीक केलेली ज्वारी बारीक चिरलेला कांदा कच्चे त्यात शिजलेले शेंगदाणे कडीपत्ता चा वास कांदा हिंग याचा वास हळद रंग व शिजलेली बारीक केलेली ज्वारी किसलेले खोबर सर्व एकत्र ज्वारीचा भात उपमा तयार झाला केला मी !नंतर छायाचित्र काढले व सर्व संगणक मध्ये लिहून काढले.

ज्वारीचा भात ब्लॉग मीच तयार केला आहे.

 DSCF3252 DSCF3253

DSCF3254 DSCF3255

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने ७

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

प्रवचने  नोव्हेंबर ७

साधन निष्कामबुध्दीने आणि सावधानपणे करावे. भगवंतापासून जो निराळा राहात  नाही तो मुक्तच.  ‘ मी भगवंताचा ‘ म्हटले की तिथे बध्दपणा संपला. ‘ मी ‘  नसून ‘ तो ‘ आहे हे जाणणे म्हणजे मुक्तता प्राप्त करुन घेणे. देहात असून देहातील राहातो तो मुक्त. ‘ राम कर्ता ‘ हे जाणतो तो मुक्त. ‘ माझे, माझे  ‘ असे म्हणून आपण बध्दावस्था लावून घेतो. बध्दाचे आवरण काढून टाकले की आपण मुक्तच आहोत. माझ्या मनावर कशाचाही परिणाम झाला नाही आणि समाधान कायम राहिले, की मुक्तवस्था ‘ माझ्यासारखा पापी मीच ‘ असे आपण मनानेच ठरवतो आणि दु:ख करीत बसतो. मी एक भगवंताचाच झालो, आता नाही कोणाचा, असे म्हणावे आणि जगात नटासारखे वागावे. भगवंता जवळ माया ही छाये प्रमाणे आहे.आपण मायेचा नियंता जो भगवंत, त्याचे होऊन राहावे;

DSCF3225 DSCF3226

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने ६

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

प्रवचने नोव्हेंबर ६

भगवंताची कृपा. खरोखर भगवंताच्या कृपेशिवाय बाकी गोष्टी असून वा नसून  सारख्याच आहेत.एखादी मुलगी लग्न होऊन सासरी गेली; तिथे सासू, सासरा, दीर, नणंद, जावा वगैरे सर्व लोकांशी तिचे चांगले आहे, पण नवऱ्याशी मात्र पटत नाही, तर तिला खरे सुखसमाधान मिळणार नाही. परंतु समजा, नवऱ्याशी चांगले आहे.पण  इतरांशी तितकेच ठीक नाही,तर तिचे अडणार नाही,तसेच एखाद्दाच्या आजारात पैसा,डॉक्टर, औषधे, माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत,पण त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व व्यर्थ आहे. याच्या उलट भगवंताची कृपा आहे, पण इतर गोष्टींचा अभाव आहे, तरी काम भागते.म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे; आणि ती मिळविण्याकरिता, त्याचे स्मरण हाच एक मार्ग आहे.

DSCF3225 DSCF3226

लाल भोपळा च्या घाऱ्या

 ॐ

लाल भोपळा च्या घारा घाऱ्या :

 लाल भोपळा १o रुपये  पावशेर आणला घेतला. साल काढून विळीने फोडी केल्या. एका पातेल्यात फोडी घातल्या. पाणी एक बाऊल घातले. ग्यास पेटवून ग्यास वर  भोपळा चिरलेला फोडी व पाणी घातलेले पातेले ठेवले. शिजवू दिले. कुकर मध्ये पाणी आटत नाही. फोडी पाण्यात चांगल्या शिजतात. फोपळा शिजवून गार केला. भोपळा मध्ये तेल घातले. अर्धा बाऊल हरबारा डाळीचे पीठ घातले. एक १ बाऊल गव्हाचे पीठ घातले. पाणी वापरले न आही.गूळ पाव बाऊल घातला शिजलेला लाल भोपळा गूळ पाव बाऊल अर्धा हरबरा डाळीचे पीठ एक १ बाऊल गव्हाचे पीठ तेल चार चमचे मोहन सर्व एकत्र गोळा केला. १५ मिनिट नंतर गोळा च्या लाट्या घेऊन पुरी सारख्या केल्या.त्याला भोक बोटाने छिद्र पाडली.थोड जाड सर ठेवले.तो पर्यंत ग्यास वर कढईत तापलेले तेल ह्यात  लाल भोपळा याच्या घारा घाऱ्या तळून काढल्या. लाल भोपळ्या  च्या घारा घार्या घाऱ्या नां लाल भोपळा ची चव व गूळ व तेल व हरबरा डाळीच्या चव च चांगली आळी आहे. लाल भोपळा घाऱ्या गार व गरम दोन्ही चांगल्या लागतात.

DSCF3228 DSCF3227

DSCF3237 DSCF3236

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने ५

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर

प्रवचने नोव्हेंबर ५

भगवंत हाच एकमेव आधार वाटला पाहिजे. एक भगवंत सत्य आहे.आपले कुठे चुकत असेल तर ते हेच, आम्ही प्रपंच सत्य माणतो  फणस कापायला ज्याप्रमाने हाताला  तेल  लावावे लागते  त्याप्रमाणे, राजकारण घ्या, किंवा प्रपंच घ्या, हरिप्रेमाचे तेल आधी हाताला लावावे. समर्थांनी ‘ मुख्य हरिकथानिरुपण ‘ असे सांगितले; म्हणजे बाकीच्या गोष्टी आपोआप मागे येतील. आम्ही कर्तेपण मिरवू पाहतो इथेच सर्व बिघडते.

हरीचे अधिष्ठान ठेवण्या आधी आम्ही आपल्या कर्तेपणाचे अधिष्ठान ठेवतो.

DSCF3225 DSCF3226

रांगोळी

दाराच्या उंबरा वर हल्ली रांगोळी काढण्याऐवजी प्ल्यस्टीक च्या पट्ट्या लावतात.
कागदावर जर रांगोळी काढली तर ती चिटकवली तर आपले आपण काढलेली रांगोळी
दारात दिसेल व आपल्याला आपण रांगोळी काढल्याचे समाधान व स्वत:काढल्याचे वैशिष्ठ राहिल.

मी लांब च लांब स्वस्तिक काढले आहे.घरात व कागद ह्या मध्ये पण कागद ह्यावर कोणतीही रांगोळी काढून लावता येते.

सहज कागद ह्यावर काढण्याचा प्रयंत्न केला आहे.स्वस्तिक लांब चे लांब काढून.

DSCF3248  DSCF3250  DSCF3238  DSCF3246

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने ४

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
प्रवचने नोव्हेंबर 4

भगवंत सगुणात आले म्हणजे काय ?
एक गृहस्थ मला भेटले, ते म्हणाले, हिंदू धर्मासारखा धर्म नाही ;
परंतु देव सगुणात आले हे नाही मला कबूल. म्हणे निरनिराळ्या
उपासना सांगितल्या ! देव जर निर्गुण निराकार, तर राम, कृष्ण,
शिव, दत्त अशा या एवढ्या निरनिराळ्या उपासना कशाला ?
पूढे एक दिवस त्यांच्या विषयी एका गृहस्थाने त्यांच्या घरी चौकशी
केली, तेव्हा प्रत्येकजण निरनिराळे नाव घेऊन सांगू लागले. कोणी
‘ दादा ‘ घरी नाहीत असे म्हणाले, तर कोणी ‘ दामोदर ‘ घरी नाही म्हणाले,
कोणी ‘ रावसाहेब ‘ नाहीत म्हणाले. हे सर्व जरी म्हटले तरी त्यायोगे भेटणारा
मनुष्य ज्याप्रमाणे तो गृहस्थ एकच, त्याप्रमाणे हे भगवंताच्या निर्गुणाचे
सगुणात झाले. भगवंत सगुणामध्ये आला की, जे नियम आपल्याला लागू
असतात तेच नियम त्यालाही लागू होतात. सगुणाशिवाय निर्गुण उपासना
करतो म्हणतो,त्याला त्याचे मर्मच नाही कळले.
खरी तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याला नाही ते कळत.
आपले वेद , उपनिषदे ब्रह्मसूत्रे आणि त्यावरची भाष्ये यांनी निर्गुण
स्वरुपाची रुपरेषा काढून दिली. संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि ताचे हग
भगवंताचे सुंदर चित्र तयार केले; ही सगुणभक्ती होय. सगुणोपासनेपासून मोक्ष
मिळणार नाही .

DSCF3225 DSCF3226

शेंगदाणे कडीपत्ता चटणी

                                           ॐ
शेंगदाणे कडीपत्ता चटणी : बाऊल भर कच्चे शेंगदाणे घेतले.
दोन २ रुपये चा कडीपत्ता घेतला.लिंबू अख्ख घेतले.
चार ४ हिरवी मिरची घेतली.घेतले. मीठ चवी प्रमाणे घेतले.
शेंगदाणे भाजून घेतले साल काढली नाहीत.शेंगदाणे गार केले.
सालासगट मिक्सर मध्ये घातले.हिरवी मिरची ४ चार घातली कमी
कडीपत्ता भरपूर घातला.त्याचा व शेंगदाणे भाजलेल्या चा वास चांगला
आला. येतो.
तिखट पाहिजे असेल तर २ दोन मिरची पण घालावी.मीठ घातले.लिंबू कापून
रस घातला थोडे पाणी घातले. मस्त बारीक केले.पाणी असल्यामुळे एकत्र छान
केले.झाले. भाजलेले सालासगट शेंगदाणे असल्यामुळे खमंग वास चटणी ला आला आहे.
येतो.भाजलेले शेंगदाणे, कडीपत्ता, हिरवी मिरची, मीठ ,लिंबू , पाणी, सर्व एकत्र करून
मिक्सर मधून एकत्र केले.थोडे पाणी मूळे पातळ केले.झाले.बोटाने चाटून खाता येते पोळी
दशमी कशा बरोबर मस्त लागते.वाटल्यास तेल मोहरी ची फोडणी केली तरी चालते.
गरम फोडणी घालू नये. ओल नारळ याचा कीस याची पण अशा प्रकारे करतात.केली
तरी चालते.पण शेंगदाणे भाजलेले खमंग वास व चव फार च चांगली लागते.

   DSCF3229 DSCF3231

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने ३ नोव्हेंबर

                                                 ॐ
                              श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
                                   प्रवचने ३ नोव्हेंबर
विषय मनात आले की भगवंताची आठवण करावी.
‘ भगवंता, माझा भोग बरा कर, ‘ असे आपण जर त्याला
म्हटले नाही, तर त्याच्या स्मरणाची जाणीव आपल्याला होईल.
भगवंताच्या स्मरणात आनंद आहे. आनंदाची जाणीव झाली की
दु:खाची जाणीव कमी होईल. अनुसंघाने जे काय साधायचे ते हेच.
भगवंताच्या आड येते त्याची पर्वा करु नये. भिक्षा मागण्याचा जरी
प्रसंग आला तरी भगवंताचे अनुसंधान सोडू नये. घरादाराला रात्रीच्या
वेळी आपण पाहारा ठेवतो. चोर येतील त्या वेळेस सावध राहातो.तसेच
संधिच्या वेळेस भगवंतापासून दूर होऊ नये म्हणजे झाले. वेळेला सावध रहाणे
ज्याला साधत नसेल त्याने अखंड सावध राहावे. विषय मनात आले की तिथे
भगवंताची आठवण ठेवून द्दावी. ‘ अंते मति: सा गति: ‘ अशी आपल्यात म्हण आहे.
जन्मात जे केले नाही ते मृत्यु च्या वेळेला कसे आठवता येईल ? एवढ्याकरिता
भगवंताचे अक्षंड स्मरणात राहावे.
भगवंताचे नाम हे औषध समजावे. भगवंताची प्राप्ती हे त्याचे फल.
औषध मात्र थेंब थेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे. नामस्मरण
जर शेवटपर्यंत चालू राहिले तर तो ‘ योगच ‘ आहे; आणि
‘ एकाशी ‘ योग साधणारा तो योगी समजावा

DSCF3225.DSCF3226

श्री यंत्र मंदिर

माझ्या चुलत बहिणी सौ राजेश्वरी (ज्योस्तना) व शैलजा धाट
श्री यंत्र मंदिर डाकोर येथे त्या गेलेल्या आहेत. त्यांनी श्री यंत्र
मंदिर याचे छायाचित्र फोटो मला पाहण्या करता पाठविले आहेत.
त्यांना श्री यंत्र मंदिर पाहतांना माझी त्यांना आठवण आली झाली.
ताई श्री यंत्र काढते ह्या साठी.मला पण हे समजल्या नंतर व
श्री यंत्र याचे फोटो छायाचित्र पाहिल्या नंतर खूप मस्त व
श्री यंत्र व मी ह्याची आठवण ह्या बद्दल बध्दल अभिमान वाटला !

    

श्री ब्रह्मचैतन्य प्रवचने नोव्हेंबर २

                                     ॐ
                   श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
                            प्रवचने नोव्हेंबर २
                      आसक्ती भगवंताची असावी.
कोणत्याही धर्माची आपण कधीही निंदा करु नये.
प्रत्येक धर्मात निरनिराळे विधी लावलेले असतात.
धर्माला विधीची फार जरुरी असते. विषयसुध्दा आम्ही
विधीने भोगतो. आम्ही गंगेवर स्नानाला जातो असे म्हणतो
खरोखर, मनाने आपण गंगेवर गेलो तरी चालू शकते.
तेव्हा गंगेला स्नानाला जाऊन अपवित्र मनाने परत आलो तर
त्या स्नानाचा काय उपयोग ? नाम घेऊन विषयाचा धंदा केला तर
काय उपयोग ? कर्माची बंधने तुटावित म्हणून शास्त्राची बंधने पाळावी
लागतात. देवाला पैसा देण्याचा हेतू हाच की माझा लोभ कमी व्हावा.
खरे तर म्हणजे, आपल्याला कर्म केल्याशिवाय करमतच नाही. पण
आपण फळाची आशा उगीचच करीत असतो; इथेच आपले चुकते.
काहीही न करता राहणे मनुष्याला शक्य नसते. उदाहरणार्थ,
एखाद्दाला सांगितले की, हातपाय न हलविता, काही न करता
स्वस्थ रहा, तर ती त्याला शिक्षाच होईल. जर काही तरी करणे
जरूरच आहे, तर उचितच गोष्ट करावी.जी गोष्ट बंधनाला
कारण होते ती विपरीतच असते. कर्तेपणाच्या अभिमानाने
केलेले कर्म हे असे विपरीत कर्म होय. ज्ञानावस्थेमध्ये
झालेले कर्म पूर्णच असते. त्या अगोदर कर्म पूर्ण होत नाही.
धर्म तरी काय सांगतो ? तर प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे.
पण कर्तव्य तरी कशासाठी करायचे ? तर ते भगवंतासाठी होय.
भगवंताच्या ठिकाणी श्रध्दा ठेवून कर्तव्य करावे, तरच
मानव सुखी होईल .

DSCF3225 DSCF3226

रांगोळी कुईरी

                              ॐ
रांगोळी कुईरी : कुईरी चार प्रकारे काढली आहे.
१ सात ७ टिपके ते एक १ पर्यंत व सहा पर्यंत काढून
दोन्ही बाजूने तीन पाकळ्या फूल येतात.सात ७ टिपके देऊन
दोन्ही बाजूने एक १ पर्यंत काढून चार ४ पाकळ्या फूल येतात.
अकरा ११ टिपके देऊन दोन्ही बाजूने एक पर्यंत टिपके देऊन
पाकळ्या फूल नऊ येतात. एकोणीस टिपके देऊन दोन्ही बाजूने चौदा पर्यंत
एकत्र केले. पंधरा १५ ला सात ७ सात ७ पासून एक १ पर्यंत टिपके दोन्ही बाजूने
दिले.पाकळ्या फूल सतरा १७ येतात.अशा प्रकारे रांगोळी व कागद स्केच पेन यांनी
काढली आहे. कागद भिंतीला लावता येतो. लावता येतात.

     DSCF3182 DSCF3183

    DSCF3185 DSCF3186

  DSCF3188 DSCF3189DSCF3190DSCF3191

DSCF3193 DSCF3194

श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने १ नोव्हेंबर

|| श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर ||

प्रवचने १ नोव्हेंबर

गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे.

गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. वेद हे देवाच्या नि:श्वातून निघाले,तर गीता ही त्याच्या
मुखातून निघाली. गीतेचा विषय कोणता ? गीतेचा विषय म्हणजे मोहाचा नाश करण्याचे
तत्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या विवेचन, हा होय. गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला मोह झाला;

याचा अर्थ असा की, त्याला कर्तेपणाचा अभिमानाने असमाधान उत्पन्न झाले , आणि त्यामुळे काय करावे आणि काय न करावे याची शंका त्याला उत्पन्न झाली. गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाला मोह नाश पावला;

याचा अर्थ असा की, कर्ता परमात्मा आहे हे निश्चित झाल्यामुळे जीवाच्या कर्माचे सुखदु:ख संपले.

खरोखर, गीतेचे रहस्य सांगावे ज्ञानेश्वर महाराजांनीच. भारतीय युध्दामध्ये परमात्मा पितांबर नेसून

अर्जुनाच्या रथावर बसून रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले. पुढे हजारो वर्षानी, भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली.

ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाणी होय.त्यात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करावे.
‘मी मागे आहे, तू पुढे चल.’ हेच भगवंतांनी आपणा सर्वांना सांगितले आहे.

DSCF3225  DSCF3226

पंचांग

                                        ॐ
पंचांग : श्रीशालिवाहन राजा यांनी स्वस्ति शक व नाम संवत्सर
सुरु केले आहे.नाम ६० आहेत एकच नाम परत वेळा येते.
आता स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम चालू आहे.
पंचाग चैत्र पाडवा ला सुरु होते.तसेच वर्ष पण चैत्र पाडवा ला
सुरु होते.१२ महिने असतात व तीन वर्षाने येणारे अधिक महिना
पंचांग मध्ये असतात. १ ) चैत्र २ ) वैशाख ( ३ जेष्ठ ४ ) आषाढ ५ ) श्रावण
६ )भाद्रपद ७ ) आश्र्विन ८ ) कार्तिक ९ ) मार्गशीर्ष १० ) पौष ११ ) माघ
१२ ) फाल्गुन असे बारा महिने असतात. फाल्गुन शेवट चा महिना असतो.
अधिक महिना तीन ३ वर्षाने केंव्हा ही येतो.
पंचांग प्रमाणे प्रत्येक महिना मध्ये सण वेगवेगळे असतात.
ती माहिती मी लिहिली आहे. पंचांग मध्ये वर्षा चे मुहूर्त असतात.
तिथी वार राशिप्रवेश दक्षिणायन उत्तरायण असते सहा ऋतु असतात.
१ वसंतऋतु २ ग्रीष्मऋतु ३ वर्षाऋतु ४ शरदऋतु ५ हेमंतऋतु ६ शिशिरऋतु
दोन महिना मध्ये १ ऋतु असतात.
पंचांग चंद्र कसा फिरतो त्यावर लिहिलेले असते.
२७ नक्षत्र व १२ राशि लिहिलेले आहेत.
|| नवग्रह स्तोत्र || आहेत .पंचांग मध्ये
मी सर्व लिहून काढली आहेत.
सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि राहु केतु हे
ग्रहशील चक्र आहेत.
कोणता ही तिथी व वार लिहिलेले असतात.दोन २ तिथी
एका वारी येतात तरी १ ते १४ शुक्लपक्ष १५ ला पौर्णिमा असते
१ ते १४ कृष्णपक्ष १५ अमावास्या असते.
१ च्या तेथे वार असतो. नक्षत्र योग करण चंद्र राशिप्रेवेश व
इंग्रजी साल या ची तारीख दिनांक असते. तिथी ची माहिती असते.
१ प्रतिपदा २ व्दितीया २ त्रीताया ४ शुक्लपक्ष विनायक चतुर्थी
४ संकष्ट चतुर्थी मंगळवार ला चतुर्थी आली तर अंगारिका
चतुर्थी असते. ५ पंचमी ६ षष्ठी ७ सप्तमी ८ अष्टमी ९ नवमी
१० दशमी ११ एकादशी १२ घबाड १३ प्रदोष शिवारात्रि १४ चतुर्दशी
१५ शुक्लपक्ष पौर्णिमा ३० कृष्णपक्ष अमावास्या १४ पर्यंत
शुक्लपक्ष१४ व कृष्णपक्ष १४ सारखे तिथी असते १४ चौदा नंतर
१५ पौर्णिमा शुक्लपक्ष व १४ नंतर कृष्णपक्ष ३० आमावस्या असते.
मासवार राशिभविष्य आहे.
भारातात दिसणारी ग्रहणे याची माहिती आहे.
अनंत चतुर्दशी ची माहिती आहे. नवरात्र विषयी माहिती आहे.
गौरीपूजन याची माहिती आहे. श्राध्द विषयी माहिती आहे.
गर्भवती व सण / व्रते विषयी माहिती आहे. एका वर्षात
कोणते कार्ये करावीत याची माहिती आहे.सोयर / सूतक
धार्मिक आचरण याची माहिती आहे.
चंद्र नक्षत्र चरण समाप्ति भा.प्र. वेळेत
शुभ दिवस आनंदी दिवस चांगला दिवस १४ नं चांगला
चांगला दिवस शुभ दिवस उत्तम दिवस चांगला दिवस ११ नं चांगला
२० प्र.वर्ज्य चांगला दिवस १७ प.चांगला १५ प.वर्ज्य
असे दिवस पाहता येतात हि माहिती असते.
साखरपुडा डोहाळ जेवण बारसे जावळ गृहप्रवेश ( लौकिक )
हि माहिती पंचांग मध्ये असते.
ही सर्व माहिती सर्व साल च्या पंचांग मध्ये असते.
मी स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
चे पंचांग दाखवित आहे.

 DSCF3177 DSCF3174   DSCF3101 DSCF3175

%d bloggers like this: