आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 1, 2012

बटाटा ज्वारीचे पीठ थालीपीठ

                                  ॐ
बटाटा व ज्वारीचे पीठ व हरबरा डाळीचे पीठ याचे थालीपीठ
दोन बटाटे पातेल्यात घेतले. धुतले. कापून चार ४ फोडी केल्या.
पातेल्यात ठेवले पाणी घातले.ग्यास पेटवून पातेले बटाटा व पाणी
याचे पातेले ठेवले उकळू दिले शिजविलें बटाटा फोडी.बटाटा गर केला.
बटाटा ची साल काढली.त्यात एक बाऊल ज्वारीचे पीठ घातले.अर्धा
बाऊल हरबरा डाळीचे पीठ घातले.बटाटा हाताने च बारीक केला. पिठात घातला.
लाल तिखट मीठ हळद हिंग घातले.सर्व एकत्र केले.थोडे पाणी कळत न कळत घातले.
उकडलेला बटाटा बारीक केलेला मऊ केलेला ज्वारीचे पीठ हरबरा डाळीचे पीठ लाल तिखट मीठ
हिंग हळद थोड कच्च तेल घालून पीठ बटाटा चा गोळा केला.तवा वर तेल लावले पसरले
गोळा थापला मोठा केला मध्ये व बाजूला भोक पाडली दोन्ही बाजूने थालीपीठ शिजवून घेतले
भाजले.बटाटा उकडलेला व हरबरा डाळीचे पीठ ज्वारीचे पीठ सर्व मसाला तेल मुळे कुरकुरीत
व मऊ पण थालीपीठ तयार झाले.केले.भोक असल्यामुळे आतून पण थालीपीठ चांगले शिजले.
भाजले गेले आहे.

DSCF3389 DSCF3390

DSCF3391

%d bloggers like this: