आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 9, 2012

श्री ब्रह्मचैतन्य महाराज

मी वसुधालय ब्लॉग मध्ये नोव्हेंबर २०१२ साल ला
२९ नोव्हेंबर श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचे प्रवचने
लिहिली आहेत ३० नोव्हेंबर २०१२ साल ला
श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांची माहिती गोंदवले गाव
व मी कधी गोंदवले येथे श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांची
समाधी पाहिली आहे हे सर्व ३० नोव्हेंबर (११) २०१२ साल
च्या वसुधालय ब्लॉग मध्ये आहे.

ठरवून मी व आमची माझी मुले २ डिसेंबर (१२) २०१२ साल ला
गोंदवले येथे जाऊन आलो आहोत ठरविले ठरविलं तरी घडण व होण
महत्वाच आहे. मला श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांची समाधी व गोंदवले गाव
येथे जाऊन आले लिखाण केल्या नंतर याच मला मनाला तृप्तता मना पासून आहे
हे नक्क्की चं !

आम्ही भाड्याने कार गाडी घेतली सकाळी ७ वाजता निघालो.
रास्यात नाष्टा केला व गोंदवले येथे ११ वाजता सकाळी पोहचलो.

श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचे समाधी चे दर्शन घेतले. घरातून
खाऊ नेला तो तेथे दिला मनाला खूप हलक वाटलं त्यावेळा.
१२ वाजता आरती च्या वेळेला पोहचलो.

आरती साठी थांबलो व श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवले येथील
प्रसाद घेतला.पांढरा भात मसाले भात मटकी ची उसळ आमटी ताक
व गहू याची गूळ घालून केलेली खीर असा प्रसाद मिळाला खाल्ला.
परत श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी च दर्शन घेतलं घेतले.
व कोल्हापूर ला ५ वाजता घरी आलो.

जाताना सांगली च्या पुढे हत्ती व माहूत दिसला. आमच्या चालत्या कार गाडीतून मी काचेतून हत्ती व माहूत याचे छायाचित्र फोटो घेतला आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराज येथे एकाच ठिकाण चे मी व मुले यांचे छायाचित्र फोटो घेतले आहेत. कार गाडी चालविणारे ड्रायव्हर यांनी आमची व्यवस्थित बसतांना उठताना कार गाडी याचे दार उघडून बसले असे काळजी घेतली. आम्ही पण घराचे च घर चे च असल्या सारखे त्यांना नास्ठा दिला.
थोड्या वेळ पण तेवढी च आपुलकी आपले पणा राहिला आहे. मुख्य म्हणजे माझे लिखाण ३० नोव्हेंबर २०१२ साल ला लिहून झाले व २ डिसेंबर २०१२ साल ला श्री ब्रह्मचैतन्य महाराज याचे समाधी चे दर्शन झाले.ठरविले ठरवल तरी घडण होण महत्वा च आहे.

महत्व व मनाला हलक तृप्त समाधान आहे हे नक्की !नक्कीच !
श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना माझा मनापासून नमस्कार.

श्री राम जय राम जयजय राम श्री राम जय राम जयजय राम

DSCF3419 DSCF3420DSCF3426 DSCF3423 DSCF3415DSCF3413

paint

%d bloggers like this: