आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 14, 2012

मटार बटाटा भाजी

                         ॐ
मटार व बटाटा भाजी : मटार दाणे सोलून घेतले.
दोन बटाटे साला सगट विळीने चिरून कापून घेतले.
मध्यम फोडी केल्या.बटाटा च्या.
ग्यास पेटवून पातेले ठेवले तेल मोहरी ची फोडणी दिली केली.
त्यात चिरलेला धुतलेला बटाटा फोडी घातल्या मटार दाणे घातले.
थोड एक बाऊल पाणी घातले.टाकले.बटाटा फोडी मटार दाणे पाण्यात
शिजवू दिले.नंतर काही वेळाने हळद मीठ हिंग लाल तिखट घातले.
परत पाणी बटाटा फोडी मटार दाणे मसाला शिजवू दिला दिले.
थोड भाजी मध्ये पाणी रस रस्सा ठेवला.शेंगदाणे कुट व असे काही घातले.
नाही. बटाटा फोडी व मटार दाणे हळद मीठ हिंग लाल तिखट पाणी याची चांगली
चव आली.आहे.साखर न घालता बटाटा फोडी व मटार दाणे पाणी रस्सा मसाला
छान शिजवून पाताल्यात भाजी केली आहे.बटाटा फोडिला गोड चव आली आहे.
मटार दाणे याला व रस रस्सा याला पण चव गोड साखर न घालता गोड चव आली आहे.

DSCF3443 DSCF3447

वसुधालय अर्पणपत्रिका


अर्पणपत्रिका
पहाटेच्या अनाघात दंवाला …..
दूर निळ्या डोंगरा पलीकडून …..
येणाऱ्या गूढ घंटानादाला,
किनार किनार उजळत
उलगडत येणाऱ्या
केशरी सूर्यप्रकाशाला …..
झाडांना वरच्या वर उसळवून
फुलाफुलांना उखाणे घालणाऱ्या
वाऱ्या भिंगोऱ्या पाखरांना
रंगोल्हासदग तृणफुलांना
मातीच्या वासांनी जीवन
सतेज करणाऱ्या या
प्रत्येक स्वरपूर्ण
अर्थवाही चराचरात्मक
अस्तित्वाला
जळणे विसरून
उजळण्यासाठी
धडपणाऱ्या ज्योतिंना ….
हे ” वसुधालय “
सादर सप्रेम समेपण .
– श्रीकांत चिवटे

DSCF3430

श्रीतुळसीमाहात्म्य

                                 ॐ
श्रीतुळसीमाहात्म्य
जे तुलसीची माळा ।। प्राणि घालिती गळां ।।
मी स्वरुपसावळां ।। आहे तेथे ।। १२ ।।
ब्रह्मा विष्णु महेश ।। तिन्ही देव तुलसीस ।।
आतुडती सावकाश ।। तुलसीपूजने ।। १३ ।।
नित्य करी तुलसीपूजन ।। स्मरणे संतोष पावे श्रीकृष्ण ।।
तेणे होय सुखसंपन्न ।। धन्य धन्य भक्त माझा ।। १४ ।।
फुकाची तुलसी पूजिती ।। तयांच्या यमयातना तुटती ।।
बळे घेऊनि जाती ।। विष्णुदूत वैकुंठी ।। १५ ।।
जयासी जाणें वैकुंठासी ।। ते वैकुंठ आहे तुलसी पाशी ।।
मनी विश्र्वासे तुलसी ।। पूजन करावे ।। १६ ।।
तुलसीस घालिती उदक त्या प्राणियांसी कैंचे दु:ख ।।
सदासर्वकाळ पावती सुख ।। तुलसीपूजने ।। १७ ।।
जो करी तुलसीपूजा ।। भक्तिभावे गरुडध्वजा ।।
कृष्ण म्हणे केवळ भक्त माझा ।। अति प्रीती होय ।। १८ ।।
तुलसीवृंदावन ज्याचे अंगणी ।। प्रात:काळी दर्शन घडे नित्यनेमी ।।
त्याच्या पातकांची होय धुनी ।। तो पुण्यप्राणी जाणावा ।। १९ ।।
फुकाचे घालिती तुलसीस पाणी ।। यमदूत सांगती यमालागुनी ।।
बळे विष्णुदास नेती वैकुंठभुवनी ।। त्या प्राणियासी ।। २० ।।
कुंभीपाक पडिला ओस ।। प्राणियांसी नाही दोष ।।
बळे नेती विष्णुदास ।। आम्हापासुनी ।। २१ ।।

           DSCF3431

%d bloggers like this: