आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 15, 2012

दूधी भोपळा मूग डाळ भाजी

                        ॐ
दूधी भोपळा व मूग डाळ याची भाजी:
दुधी भोपळा पांढरा भोपळा ८ रुपये ला एक दूधी भोपळा घेतला.आणला.
दूधी भोपळा धुतला सालासगट विळीने ने बसून चिरला कापला मध्यम
फोडी केल्या. कुकर मध्ये पांढरा भोपळा च्या फोडी घातल्या.टाकल्या.
एक बाऊल मुग याची डाळ कच्ची घेतली कुकर मध्ये घातली.
पांढरा भोपळा साला सगट चिरलेला व मूगडाळ कच्ची व दोन बाऊल
पाणी कुकर मध्ये घातले. ग्यास पेटवून ग्यास वर कुकर ठेवला कुकरचे झाकण
लावले.शिट्टी ठेवली. चार शिट्ट्या दिल्या कुकर गार झाल्यानंतर कुकर चे झाकण
काढले. कुकर मध्ये शिजलेल्या दुधी भोपळा व कच्ची मुग शिजलेली ह्यात हळद
हिंग मीठ लाल तिखट घातले.लोखंडी कढईत तेल मोहरी ची फोडणी केली दिली.
व कुकर च्या दुधी भोपळा व मुगडाळ व लाल तिखट मीठ हिंग हळद याला वरून कुकर मध्ये च
फोडणी दिली घातली टाकली. कच्ची मुग डाळ व साला सगट चिरलेले कापलेले दुधी भोपळा च्या फोडी
छान चांगल्या च शिजल्या.पूर्वी मुग डाळ भिजत टाकून घालून भाजी करत असे पण आता
पचण्यास व चावण्यास सोप व सुटसुटीत व सर्व सत्व युक्त भाजी तयार केली.आहे. झाली आहे.
दुधी भोफळा पाढंरा भोफळा याची भाजी.कच्ची मूग मुग डाळ शिजवून केलेली आहे.

DSCF3450 DSCF3452

DSCF3455 DSCF3456

थंडी

                                    ॐ
थंडी : डिसेंबर 2012 २०१२ साल चालू आहे.
थंडी पडत आहे.वाजत आहे.थंडी थंडी करून खिडकी ची
दार सतत लावू नये. एखादी तरी खिडकी उघडी ठेवावी.तीच तीच
हवा घरात फिरणार नाही.बाहेरून आल्या नंतर गरम व वास येतो.
तो येणार नाही.हल्ली फळांची साबण मिळतात.पण आपण घरात
आणलेली फळ याची साल दोन्ही हाताच्याबोटा ने हाताने मऊ करून
चेहरा याला लावले तर नैसर्गिक फळ चेहरा याला लावले जातात.
साबण याने चेहरा फुटणार नाही.थंडी थंडी करून सारखे गरम कपडे वापरू घालू
नये.नैसर्गिक हवा शरीराला लागू द्दावी.सकाळी गरम पाणी चहा घेतला की थंडी कमी
होते.कॉ ट न कपडे घालावे अंग भर पदर घेतल्या नंतर थंडी कमी वाजते.व दिसतं दिसते पण
छान ! तरी पण रात्री झोपतांना पायाला व्यासलीन तेल लावावे. मोजे घालावे.पाय गरम राहतात.
पांघरून खराब होत नाही.व पायाला भेगा पडत नाहीत.ह्या वयाला पण माह्या पायाला भेघा नाहीत.
दिवस भर पण अधून मधून मोजे घालावे.म्हणजे पाय सारखे घासले जात नाहीत.पूर्वी आम्ही तसेच वावरत.
बाळांत पणात पण हल्ली मोजे वापरले जातात.पाय मस्त मऊ व भेघा नसलेले आहेत.
भारत भारतात पण चांगले व्यासलीन मिळते.मधून मधून साय लावावी चेहरा ला.मऊ व तजेल चेहरा राहतो
दिसतो.फळ भरपूर भाजी भरपूर ह्या थंडीत मिळते.रोज बदलून बदलून फळ भाजी खावी संत्राची साल पूर्वी
आम्ही डोळ्यात रस पिळत होतो असत. पण आता औषध मिळतात ती घालावी वापरवित.वापरावीत.
मस्त थंडी चा सिझन ऋतु आहे. याचा भरपूर शरीराला मनाला उपभोग करून घ्यावा थंडी म्हणून भरपूर झोपु नये.
सकाळी उठून ध्यान मंत्र व्यायाम संगीत येत असल्यास त्याचा रियाज करावा.मन दिवस भर छान ताजतवान राहत.
राहते.

                            DSCF3457

श्रीतुळसीमाहात्म्य

                                         ॐ
श्रीतुळसीमाहात्म्य
जे ऐकती तुलसीचें महिमान ।। तयांपाशी अक्षयी नारायाण ।।
सांगे जनमेजयालागुन ।। ऐके राया ।। २२ ।।
धूप दीप नैवेद्द आरती ।।जे तुलसीस नित्य करिती ।।
त्या प्राणियां पुनरावृत्ती ।। नाही कल्पांती जाण पां ।। २३ ।।
तुलसीच्या काष्ठाची करून स्मरणी ।। रामनाम स्मरण नित्यनेमी ।।
ती दरिद्री न होय प्राणी ।। निश्र्चायेंसी ।। २४ ।।
जे तुलसीपासी सारविती ।। नित्य घृतदीप उजळती ।।
तयां घरची न सरे संपत्ती ।। ते केवळ भक्त माझे ।। २५ ।।
जे तुलसीस विनविती ।। मनोभावें सेवा करिती ।।
जवळी बैसोनि प्रार्थिती ।। ते प्राणसखे माझे ।। २६ ।।
उद्धव म्हणे शार्ड.ग धरू ।। तुलसीपूजने उतरे पारू ।।
जे तुलसीस न पूजिती अवधारू ।। काय विचारू तयांचा ।। २७ ।।
उद्धवासी म्हणे शारंगपाणी ।। जे तुलसीस निंदा करिती प्राणी ।।
अधोगती त्यांलागुनी ।। ते कोडे वेडे होताती ।। २८ ।।
जो प्राणी तुलसीचे मोडीत आळे ।। त्या प्राणियाचे तोंड काळे ।।
सदा प्राणी तो तळमळे ।। भाग्य नाही तयासी ।। २९ ।।
जो प्राणी मोडिती तुलसी वृंदावन ।। यम सांगे दूतांलागून ।।
कुंभीपाकी टाका नेऊन ।। सत्य जाण उद्धवा ।। ३० ।।
उद्धव म्हणे श्रीपती ।। पुरूषांची सांगितली गती ।।
आतां स्त्रियांची कैसी रीती ।। सांगावी स्वामिया ।। ३१ ।।

          DSCF3431

%d bloggers like this: