आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 16, 2012

श्रीतुळसीमाहात्म्य

                                ॐ
श्रीतुळसीमाहात्म्य
उध्दवासी सांगे नारायण ।। तुलसी – देवीचे आख्यान ।।
ही कथा एकचित्तेंकरून ।। यथानिगुतति ऐके पां ।। ३२ ।।
ज्या नारी तुलसीपूजन करिती ।।
त्या सदा सौभाग्यवती होती ।। पुत्र पौत्र संपत्ती ।।
होय तुलसीपूजने ।। ३३ ।।
तुलसीपाशी चैतन्य वनमाळी ।।
भक्तांसी सांभाळी चंद्रमोळी ।।
ज्या नारी भाव धरोनि प्रात:काळी ।।
तुलसीस पूजिती ।। ३४ ।।
ज्या तुलसीपूजा चुकती ।। पुढिले जन्मी सौभाग्य न पावती ।।
हा वृत्तांत सांगे श्रीपती ।। उध्दवालागुनियां ।। ३५ ।।
ज्या नारी करिती तुलसीपूजन ।। नित्य त्यांसी माझें ध्यान ।।
म्यां ठाव दिधला तयांलागुन ।। वैकुंठासी रहावया ।। ३६ ।।
वैकुंठलोकींची तुलसी ।। सत्य मृत्युलोकासी ।।
पातकी उध्दरावयासी ।। म्यां आणिली निश्र्चये ।। ३७ ।।
मृत्युलोकींची जन महाअभिमानी ।। न ओळखिती तुलसीलागोनी ।।
म्हणोनि यम करी जाचसी ।। तयां प्राणियांसी ।। ३८ ।।
तुलसीमंदिर माहेर ।। तेथे वसे साचार ।।
दुसरा नाही विचार ।। सत्य जाण गा उध्दवा ।। ३९ ।।
तुलसी वनींचे झाड म्हणती ।। ते झाड नव्हे विष्णुमूर्ति ।।
श्रीकृष्ण म्हणे उद्धवाप्रती ।। शुक ऐसे सांगतसे ।। ४० ।।
जो तुलसी पूजी नित्यकाळी ।। मी त्याचे बालक तो माझी माउली ।।
तळहाताची साउली ।। म्यां केली त्यावर ।। ४१ ।।

            DSCF3431

%d bloggers like this: