आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 17, 2012

श्रीतुळसीमाहात्म्य

                                       ॐ
श्रीतुळसीमाहात्म्य
तो तरी माझा आत्मसखा ।। आणि मी तयांचा पाठिराखा ।।
तो मज प्राणाहून अधिक निका ।। तुलसी – पूजने ।। ४२ ।।
भावे तुलसी प्रदक्षिणा करिती ।। ते माझे भक्त
सखे निश्र्चिती ।।
उद्धवा ते मज अतिप्रीती आवडती ।। मी त्यांचा अंकित ।। ४३ ।।
जो करी तुलसीपूजन तो माझा चित्तचैतन्य ।। उध्दवा मी त्यांचा सज्जन ।।
सत्य सत्य जाण पां ।। ४४ । त्यांच्या ।
तुलसीची आणि माझी प्रीती ।। तुलसी पूजन ज्या नारी करिती ।।
चिरंजीव तयांची संतती ।।अखंड सौभाग्य तयांसी ।। ४५ ।।
तुलसी मी अभेद्द दोनी ।। जे हरिकथा करिती याचि नेमी ।।
त्यांची चुकेल यमजाचणी ।। ते होती वैकुंठवासी ।। ४६ ।।
तुलसीस जे करिती प्रदक्षिणा ।। त्यांच्या चुकती यमयातना ।।
बळे नेती वैकुंठभुवना ।। त्या प्राणियांसी ।। ४७ ।।
तुलसीस घालिती लोटांगण ।। ते माझे प्रेमळ भक्त जाण ।।
कृष्ण म्हणे इच्छाभक्तीकरून ।। उद्धरती प्राणी ।। ४८ ।।
जे प्राणी तुलासीचें करिती लग्न ।। त्यांचे चुकेल जन्ममरण ।।
ते जाती वैकुंठालागून ।। असत्य न म्हणावे ।। ४९ ।।
व्यास सांगे जनमेजयाप्रती ।। जे करिती तुलसीभक्ती ।।
तयांसी नाही जन्ममरण अंती ।। चिंरजीव ते जाणावे ।। ५० ।।
स्त्रीपुरुष दोघेजण ।। करिती तुलसीपूजन एकचित्तेकरून ।।
त्यांचे फिटे वांझपण ।। सांगे वेदव्यास ऋषी ।। ५१ ।।

         DSCF3431

%d bloggers like this: