आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 18, 2012

मल्लारी खंडोंबा

                                   ॐ
मार्तंडभैरव (मल्लारी खंडोंबा ) चं षड्रात्सवारंभ देवदीपावली
हे चंपाषष्ठी नवरात्र असते.
खंडोबा चे मल्लार देवाचे नवरात्र असते.हे पांच ५ दिवस करातात.व
चंपाषष्ठी ला उठवतात.एकादशी सारखे भगर साबुदाणा फळ खाऊन
करतात.चंपाषष्ठी ला वांग याच भरीत कांदा याची पात पुरणपोळी
बाजरीचा रोडगा बाजरीचा भात करतात.
पण नैवेद्द ला करतात.चातुर्मास सोडतात.कांदा खाण्यास आज पासून
सुरु करतात.पाच दिवस रात्र दिवस तेल वात याचा दिवा लावतात.
चांदी च्या फुलपात्र ह्यात पाच विड्याची पान ठेवतात.यावर खोबळ
खोबर याची वाटी ठेवतात त्यावर मल्लारी चा टाक ठेवतात.
पुरुषांनी डोक्याला लावायचा व सदानंदाचा येळपोट जय मल्लार म्हणायचा
घट टाक उचलून देवात ठेवायचा.फुलपात्र उचलून ठेवायचे पान
खोबळ खोबर विसर्जन करायचे.हळद उडवयाची गूळ खोबर वाटायचे.
साडे तीन मुहूर्त मधील हा दिवस कोणी कोणी मानतात.
कोणी अक्षयत्रितिया मानतात.
देवदीपावली साजरी करतात.
येळपोट येळापोट जय मल्लार असे म्हणतात.

DSCF3494

चंपाषष्ठी स्कंद षष्ठी

                          ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
दक्षिणायन हेमंतऋतु मार्गशीर्ष शुक्लपक्ष मंगळवार ६ चंपाषष्ठी
मार्तंड भैरवोत्स्थापन, स्कंद षष्ठी नक्षत्र धनिष्ठा राशिप्रवेश कुंभ
तसेच दिनांक तारीख १८ .१२ डिसेंबर १२ साल आहे.
मंगळवार आहे.

DSCF3471 DSCF3470

DSCF3466 DSCF3468

श्रीतुळसीमाहात्म्य

                                      ॐ
श्रीतुळसीमाहात्म्य
जे प्राणी तुलसीस घालिती दंडवत ।। ते माझे भक्त जाण गा सत्य ।।
त्यांचे माझे एक चित्त ।। म्हणे हृषीकेशी ।। ५२ ।।
तुलसीस बोले जो निंद्द वचन ।। तो माझा वैरी प्रत्यक्ष जाण ।।
त्याचे हृदयी घाये करीन चूर्ण ।। सत्य जाण उद्धवा ।। ५३ ।।
उणे बोले जो तुलसीस ।। त्याचा मी करीं निर्वंश ।।
श्रीकृष्ण म्हणे उध्दवास ।। असत्य नव्हे कदाकाळी ।। ५४ ।।
मजसी बोलती न्यूनता ।। त्याची मज नाही चिंता ।।
तुलसीस बोलती अन्यथा ।। ते पावती महापतन ।। ५५ ।।
जो करी तुलसीची पूजा ।। तो प्रीतीची भक्त माझा ।।
वैकुंठासी जावया दुजा ।। मार्ग नसे जाण पां ।। ५६ ।।
तुलसी नांव उच्चारी निशिदिनी ।।तो भक्त माझा शिरोमणी ।।
त्याचिया सत्वाची खाणी ।। उध्दरली आहे ।। ५७ ।।
तेणें षोडशोपचारे पूजा केली ।। ऐसे म्हणे कृष्ण माउली ।।
लाडिवाळपणें आत्मबोली ।। उध्दवाप्रति बोलतसे ।। ५८ ।।
उध्दव म्हणे देवा श्रीपती ।। दोन्ही कर जोडून करी विनंती ।।
बरी सांगितली गती ।। पापियांची ।। ५९ ।।
तुलसीकथा ऐके कानी ।। कृष्ण म्हणे त्यालागुनी ।।
ठाव केला वैकुंठभुवनी ।। त्या प्राणियासी ।। ६० ।।

         DSCF3431

%d bloggers like this: