आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 22, 2012

श्रीदत्त १

                                      ॐ
श्रीदत्त दर्शन
श्रीदत्त दर्शनपूर्वी !
बाह्य शत्रूवर विजय मिळविणारा ” वीरपुरुष “आणि आंतरिक
शत्रूवर विजय मिळविणारा “सिध्दपुरुष ” यांनाही देवत्व प्राप्त
होते.वेदातील इंद्र ही विरदेवता आहे.तर मध्ययुगातील दत्त ही
सिध्ददेवता आहे.
दत्तात्रेय ही देवता भारतीयांच्या प्रगल्भ चिंतनाची निर्मिती आहे.
भारतीय संस्कृतीतील अंत्यत परिणत विचार आणि गूढ भावना व्यक्त
करण्यासाठी इतिहासाच्या गर्भातून हे अद् भूत प्रतीक जन्म पावले आणि त्यात
समग्रता आणि सामंजस्य असल्यामुळे ते सार्वत्रिक श्रध्देचा विषय बनले आहे.
भाविकांच्या दृढ श्रध्देनुसार आणि अनुभूती नूसार दत्तात्रेयाचे स्वरुप अनाद्दनन्त
असले, तरी या दत्त दैवताचा दृश्य इतिहास दोन हजार वर्षाहून जुना नाही.
संस्कृती च्या इतहासात देवतांच्या निर्मिती चा आणि
विकासाचा विचार अतिशय महत्वपूर्ण असतो.मानवाच्या
वैयक्तिक आणि सामूहिक चिंतनाच्या मुशीतूनच विविध
देवदेवतांच्या मूर्ती आकारास येत असतात.
आदिमानवाच्या मनातील भीती, आश्र्चर्य आणि कृतज्ञता या
तीन भावनांनी प्रथम देवतांना जन्म दिला आहे.ऋतुचक्रांत विविध
रंग – रूपे धारण करणारी पंचमहाभूते, वृक्षवेली आणि पशु – पक्षी
यातून माववाच्या आदिदेवता जन्म पावल्या. या बाह्य शृष्टी बरोबर मानवाच्या
जीवनातील ‘ जनन आणि ‘ मरण ‘ या दोन घटनांनीही देवता निर्मितीला
साहाय्य केले.जननाच्या आश्र्चर्यातून लिंगपूजेचा उद् भव झाला आणि
मरणाच्या भूत – पिशाच्यांची आणि संहारक देवतांची निर्मिती झाली.
पुढे जसजसे मानवाचे जीवन विषयक आणि विश्र्वविषयक चिंतन
वाढू लागले, तसतसे या प्राकृतिक देवतांची सुसंस्कृत स्वरूप धारण केले.

                 DSCF3507

श्रीतुळसीमाहात्म्य

                                             ॐ
श्रीतुळसीमाहात्म्य
तुलसीविवाहाची कथा
पूर्वी जालंदर नावाचा महापराक्रमी योद्धा होता.
त्याने सर्व देवांस जिंकून त्यांचे वैभव आपणाकडे आणून ठेविले होते.
जालंधर सर्वांस अजिंक्य झाला होता,त्याचे मुख्य कारण त्याची स्त्री वृन्दा ही महापतिव्रता होती
हे होय.त्याचा नाश करण्याची युक्ती श्रीविष्णूने कापताने योजिली.
जालंधर रणांगणात पडला असे दाखविण्यासाठी श्रीविष्णूने दोन
माकडांकडून त्याचे शिर व धड आणून व्रन्देपुढे ठेविले.
ते पाहताच ती शोक करू लागली.इतक्यात एका
साधूने संजीवनीमंत्राने जालंधर याचा वेष घेतलेल्या त्या
श्रीविष्णूस उठविले तो जीवंत झालेला पाहताच तिने
मोठ्या आनंदाने त्याला आलिंगनं दिले. काही दिवस
श्रीविष्णु तिच्या घरी राहिले.पुढे तिच्या हातून काही पातक झाल्यामुळे खरोखर
जालंधर रणांगणात पडला.नंतर वृंदेला खरा प्रकार समजला.
तेव्हा ती संतप्त होऊन श्रीविष्णूस म्हणाली,
‘ तुला पत्नीचा वियोग होऊन दोन माकडांचे साह्य घ्यावे लागेल .
” ( ही गोष्ट रामावतारात घडून आली.) नंतर तिने अग्निकाष्ठे भक्षण केली.
कपटाने महापतिव्रतेचा छळ केल्यामुळे श्रीविष्णूस वाईट वाटले व
तो वेड्यासारखा तिच्याजवळ बसला.पुढे पार्वतीने त्या चितेजवळ
तुळस, आवळा व जाईचा वेल अशी तीन प्रकारची झाडे निर्माण केली.
त्यातील तुळस हीच व्रन्देप्रमाणे आहे मानून त्याला प्रिय झाली.
पुढे त्या वृंदेने रुक्मिणी चा अवतार घेऊन श्रीकृष्ण यास कार्तिक शुद्ध व्दादशी
स वरिले. तेव्हापासून दरवर्षी तुळशीविवाह करण्याची चाल पडली असावी .

             DSCF3431

%d bloggers like this: