आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 23, 2012

श्रीदत्त ३

श्रीदत्त

श्रीदत्त स्थान माहूर श्री रेणूका देवी येथे पण येथे श्रीदत्त स्थान व अनसूया देवी चे मंदिर आहे.

हे श्रीदत्त स्थान श्री अनसूया देवी व श्री रेणूका देवी चे स्थान पाहिले आहे त्याचा हा फोटो.

श्री दत्त, श्री दत्त…

Image

श्रीदत्त दर्शन २

                               ॐ
श्रीदत्त दर्शन
दत्तात्रेय हे जरी महाराष्ट्रातील भक्तप्रिय दैवत असले तरी
त्याच्या उपासनेला सर्वाधिक प्रेरणा मिळाली, ती
श्रीनरसिंह सारस्वतीं च्या अवतारामुळे .
त्यांच्या नंतर महाराष्ट्रात दत्त संप्रदाय निर्माण झाला.
औदुंबर, नरसोबावाडी व गाणगापूर ही या
संप्रदायाची प्रमुख तिर्थस्थाने बनली.
नरसिंह सरस्वतीं च्या अवतारा मूळे जो दत्तोपासनेचा
प्रवाह प्रवर्तित झाला, त्या प्रवाहाशिवाय, दत्तोपासनेच्या
क्षेत्रात अन्य प्रवाह निर्माण झाले आणि नांदत राहिले ;
परंतु त्यांचे स्वरुप व्यापक नसल्यामुळे ते वैयक्तिक
उपासनेपुरते च मर्यादित राहिले आणि म्हणून च
त्यांना संप्रदायाचे स्वरुप प्राप्त झाले नाही.
दत्तसंप्रदायाच्या स्वरुपावर दत्तात्रेयांच्या
मूलस्वरूपाचा प्रभाव विशेष आहे,हे तर खरेच ;
परंतु त्याच्या घडणीत, विचार-आचार दत्तावतारी
महापुरुषांचाही सिंहाचा वाटा आहे.
दत्तात्रेयंच्या मूलस्वरुपात पौराणिक कल्पनेनुसार
चातुर्वर्ण्य संरक्षावर विशेष भर आहे.
पुराणांनी वारंवार असे प्रतिपादले आहे,की
दत्तात्रेयांचा अवतार हा चातुर्वर्ण्याच्या
संरक्षण संवर्धनासाठी झालेला आहे.
ज्या काळात श्रीनारसिंह सरस्वतीं चा
अवतार झाला, त्या काळात
‘ कठीण दिवस युगधर्म ।म्लेंच्छराज्य क्रूर कर्म ‘
अशी परिस्थिती सर्वत्र होती.परिणामी ब्राह्मण वर्ग
आचार दृष्ट्या शिथिल होऊ लागला होता.
अशा परिस्थितीत श्रीनरसिंह सरस्वतीं नी
वैदिक परंपरेच्या पुनरुज्जीवनासाठी व
संरक्षणासाठी वर्णाश्रम धर्माला प्राधान्य दिले
‘ धर्मो रक्षति रक्षत : ‘ ही त्यांची त्यामागची
प्रमुख भूमिका होती.
दत्तसंप्रदायाचे उपास्य असलेले दत्तात्रेय हे एक योगी
असल्यामुळे या संप्रदायात स्वाभाविक च योगालाही
प्राधान्य मिळाले.अगदी चांगदेव राऊळांपासून
आजपर्यंत झालेले बहुतेक महान
दत्तोपासक योगी होते.
नाथसंप्रदायाने तर दत्तात्रेय ही योगप्रदायक देवताच मानली आहे.
नाथसिध्दां विषयी जनमानसात आजही असा समज रूढ आहे,
की ते योगसामर्थ्याने काय हवे ते करु शकत .

DSCF3507 DSC00042a

श्रीतुळसीमहात्म्य

                                                   ॐ
श्रीतुळसीमहात्म्य
तुळशीचे माहात्म्य
प्रत्येक हिंदू च्या दारात तुळशीवृंदावन असते,
स्त्रियांनी त्या तुळशीला पाणी घालावे,प्रदक्षिणा घालाव्यात,
पूजा करावी,रांगोळी काढावी व सायंकाळी दिवा लावावा.
लहान मुला-मुलींनी तुळशीजवळ बसून रामरक्षा म्हणावी.
श्रीविष्णूला तुळस प्रिय आहे.तुळशीच्या पानाने त्याची पूजा केली
असता पुष्कळ व्रते,यज्ञ,जप केल्याचे फळ लाभते.
दरवर्षी कार्तिक शुध्द व्दादाशीस तुळशीविवाह करावा.त्या
दिवशी तुळशीवृंदावन सारवून अगर रंग देऊन सुशोभित करावे व
त्यात ऊस लावून आवळा व चिंच टाकून फुलांचा माळा बांधाव्यात,सायंकाळी
बाळकृष्णाच्या प्रतिमेशी तुळशीचा थाटात विवाह लावावा.
जमलेल्या मंडळीस कुरमुरे,पोहे उसाच्या गंडेऱ्या वाटाव्यात.
तुळस ही oushadhi वनस्पती औषधी वनस्पती आहे.
उचकी येत असल्यास तुळशीचा रस थोडा मध घालून चाटावा.
भूक लागता नसेल तर रोज नेमाने तुळशी चा रस घेत जावा
तुळशी च्या काढ्याने पडसे ताबडतोब थांबते.थंडीपासून झालेली
बाधा नाहीशी होते.
दलदलीच्या जागी तुळशी ची लागवड केल्यास त्या जागी डास
होत नाहीत तुळशी च्या झाडा मुळे घराच्या आसपासची जागा निरोगी
राहते.

              DSCF3431

%d bloggers like this: