आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 26, 2012

श्रीदत्त दर्शन ६

                                      ॐ
श्रीदत्त दर्शन
धर्मातील प्रभाव आणि प्रसार –
शैव, वैष्णव आणि शाक्त या तीन ही उपासना प्रवहांना
व्यापनारा दत्तत्रेयांचा प्रभाव सर्व भारतभर गाजत आहे.आपल्या
महाराष्ट्रात दत्तभक्ती चा प्रसार जातिभेदातील, सांप्रदायातील
किंबहुना धर्मातीत आहे.
महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि
समर्थ संप्रदायात दत्तात्रेयां विषयी उत्कट श्रध्दाभाव आहे.
विष्णूचा अंश –
दत्तात्रेय हे विष्णूचे अंश असून अत्रि अनसूया अनसूये चे पुत्र आहेत;
परंतु ते अयोनिसंभव आहेत.महाभारतात वनपर्वांत, शांतिपर्वांत
अनुशासनपर्वांत, दत्तत्रेयां नी सहस्त्रार्जुनावर कृपा केल्याचा
उल्लेख आढलतो.
अवताराचा हेतू –
ब्रह्मपुराणात भगवान दत्तात्रेयांचा अवताराछा हेतू पुढील प्रमाणे
सांगितला आहे –
” जो सर्वभूतमात्राचा अंतरात्मा आहे.त्या विष्णूचा दत्तात्रेय नामक अवतार
झाला.हा अवतार क्षमाप्रधान होता.त्याने वेदांना प्रतिष्ठा मीळवून दिली
यज्ञसंस्थेतील चातुर्वण्यातील शैथिल्य दूर केले.अधर्म आणि असत्याचा
उच्छेद केला व क्षीण होत चाललेल्या प्रजेचा विलक्षण सामर्थ निर्माण केले.
दत्तात्रेयांचे अत्रि ऋषि पिता व अनसूया माता होत.
अत्रि ऋषींनी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले जाते.
चित्रकूटा जवळ पयस्विनी नदीच्या काठी त्यांचा आश्रम होता.
त्यांच्या कठोर तपश्र्चर्ये मुळे विलक्षण ब्रह्मतेज निर्मार्ण झाले.
पृथ्वीवरील क चारीही वर्णातील लोकांची काळजी सतत वाहणारे
अत्रि ऋषी लोकमान्यता पावले होते.त्यांच्या तप:सामर्थ्यावर
लुब्ध होऊन कर्दम प्रजापतीने आपली ‘ अनसूया ‘नावाची कन्या त्यांना दिली.
अनसूया नावाप्रमाणे आसूयारहित होती.तिने तपस्या करुन शंभू महादेवाला
प्रसन्न करुन घेतले होते.याच अत्रि आणि अनसूयेची पुत्र
‘ दत्तात्रेय ‘, ‘ दुर्वास ‘ आणि ‘ सोम ‘ हे होत.
शुभात्रेयी नामक एक कन्या ही त्यांना होती.

DSCF3507 DSCF2795

पदार्पण

                            ॐ
पदार्पण
सजल शामल गर्द घनातून
जशी लकाके धडाड बिजली
चमक कशी थरारुनी ती
गडगडते अवकाशी बोली
मोर मनाचा फुलून पिसारा
उतरे कविता मनी अनावर
जसे बिजांना कोंब फुटावे
मातीमधले झरून अत्तर
पाण्याने उसळी मारावी
कभिन्न फोडून काळा पत्थर
तसे मनातील कोरीव लेणे
हाती उमटते नवेच अक्षर
श्रीकांत चिवटे
तुळसपाणी पुस्तक

DSCF3504

%d bloggers like this: