आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 27, 2012

श्रीदत्त दर्शन ८

                                         ॐ
श्रीदत्त दर्शन
अत्रि ऋषीं नी पुत्रप्राप्तिसाठी रुक्षकुळ पर्वतावर घोर तपश्र्चर्या केली.
त्या तपाने पोळू लागले परिणामी ब्रह्मा,विष्णू ,महेश हे तिनही देव
अत्रि ऋषींसमोर प्रकट झाले आणि त्या त्रयींनी त्यांना तपाचे कारण
विचारले,त्यावर ते म्हणाले,की ” आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने
जन्म घ्यावा. ” तीनही देवांनी त्यांची विनंती मान्य केली.
देवत्रयीं च्या आशीर्वादाने अनुक्रमे
ब्रह्मदेवापासून सोम, विष्णूपासून दत्तात्रेय आणि शिवापासून
दुर्वास हे तीन पुत्र अनसुयेच्या उदरी जन्म पावले.
कालांतराने शुभात्रेयी नावाचे कन्यारत्न त्यांना प्राप्त झाले.
पतिपरायण अनसूयेच्या तेजामुळे त्रिलोक्यातील लोक
प्रभावित झाले.इंद्राचे आसन डळमळीत झाले.
इतकेच नव्हेतर नारद याने केलेल्या अनसूयेच्या सतित्वाच्या
गौरवामुळे ब्रह्मा, विष्णू , महेश यांच्या पत्नींच्या मनात
अनसूये विषयी असूया निर्माण झाली.अनसूयेचे सत्व हरण
करण्यासाठी त्यांनी आपल्या पतींना अतिथी वेशाने
अनसूयेकडे पाठविले.आश्रमात अत्रि नव्हते.
अनसूयेने अतिथीं नाविश्रांती घेण्याची विनंती केली;
परंतु सत्वहरणा च्या हेतूने आलेल्या त्रिदेवांनी तिच्याकडे
मागणी केली,की
” तू विवस्त्र होऊन भोजन वाढणार असशील तरच ते आम्ही स्वीकारू.”
अनसूयेने ते तत्काळ मान्य केले आणि त्रिदेवां च्या मस्तकावर
पतिस्मरण पूर्वक तीर्थ शिंपडले तत्क्षणी च त्या तिघांची
बालके झाली.पती गंगेवरुन आश्रमात परतात च त्यांच्या पुढे
तिन्ही बालके ठेवून ” स्वामिन् देवेन दत्त ” असे म्हटले.
अत्रिं नी त्यांचे नामकरण ‘दत्त ‘ असे केले.
इकडे आपल्या पतीं ची वाट पाहून थाकलेल्या
देवभार्या पतिशोधात अत्रि ऋषीं च्या आश्रमात आल्या ,
त्यांना अनसुयेने आपल्या पतीं चे रूपान्तर
तीन बालकात केल्याचे आढळून अले.
देवभार्यां ची ती शोचनीय अवस्था पाहुन
अनसूयेने क्षणार्धात त्रिदेवांना पुन्हा पूर्वरुप दिले.
मग अनसूये च्या सत्व साक्षात्काराने चकित
झालेल्या त्रिदेवां नी पुढे यथावकाश तिच्या
उदरी जन्म घेण्याचे मान्य केले.
आपल्या पराजय मान्य करुन
ब्रह्मा व महेश तपश्र्चर्या करण्यासाठी
अरण्यात निघून गेले.मग कालांतराने
ब्रह्मा ‘ चंद्र ‘ ( सोम ) झाले आणि
महेश ‘ दुर्वास ‘ झाले ; परंतु
विष्णू ‘ दत्त ‘ रूपाने अत्रि अनसूयेच्या
इच्छेनुसार त्यांच्या आश्रमात च राहिले.
ब्रह्मा, विष्णू आणि महेश या
त्रिदेवां चे प्रतीक म्हणून त्याने
ब्राह्माचा कमंडलू आणि महेश चा शूल हातात
धारण केला,असे भविष्य पुराण ठासून सांगते.

DSCF3512

DSCF3507 DSCF3511

DSCF2831 DSCF2822

श्री दत्तात्रेय जयंती ७

                         ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण हेमंतऋतु मार्गशीर्ष शुक्लपक्ष गुरुवार मृग नक्षत्र
१४ श्री दत्तात्रेय जयंती गाणगापूर क्षेत्र श्री दत्तजयंती उत्सव आहे.
तसेच १५ शुक्रवार आर्द्रा नक्षत्र मिथुन राशिप्रवेश आग्रहायणी,
पूर्वाषाढा रवि २२।२९,अन्वाधान पौर्णिमा आहे.
तसेच दिनांक तारीख २७ डिसेंबर १२ .२०१२ साल श्री दत्तात्रेय जयंती
आहे.दिनांक तारीख २८ .१२ डिसेंबर २०१२ साल ला आग्रहायणी पौर्णिमा
आहे.

DSCF2829 DSCF2780

DSCF2869 DSCF2875DSCF2820 DSCF2883

%d bloggers like this: