आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 28, 2012

नृसिंहवाडी दत्तजयंती

                                                    ॐ
दत्तजयंती : नृसिंहवाडी दुमदुमली
दत्तजयंती गुरुवार आला आहे.दत्त यांचा वार गुरुवर आहे .
नृसिंहवाडी येथे गुरुवार ला दर्शना साठी भाविकांनी मोठी
गर्दी केली होती.कृष्णा – पंचगंगा नदी संगमावर स्नान केले.
‘ श्री गुरुदेव दत्त ‘ चा अखंड गजराने व
‘ दिगंबरा .. दिगंबरा .. श्रीपाद वल्लभ .दिगंबरा ‘ गजराने जप याने
नृसिंहवाडी दत्तगुरू च्या दर्शनाने भाविकांनी मोठी गर्दी केली.!
पहाते ३ वाजता काकड आरती व पूजा झाली.सात ७ ते १२ बारा वाजता
पंचामृत अभिषेक भक्तांनी केला.अबीर गुलाल बुक्का फुल मुक्त पणे
उधळली .गुरुवार २७ .१२.२०१२ साल ला सायंकाळी ५ पाच वाजता
दत्त जन्मकाळ सोहळा उत्साहात पार पडला .
नृसिंहवाडी येथे !
मी पूर्वी खुप वेळा नृसिंहवाडी पाहिली आहे !आता पण डोळ्या पुढे
नृसिंहवाडी दिसली !

DSCF3535 DSCF3533

DSCF3512 DSCF3521

श्रीदत्त १०

श्रीदत्त दर्शन

ब्रह्मा.विष्णू महेशंचा समन्वय दाखविणारी तीन मुखे सहा हात, वरच्या दोन हातात शंख आणि चक्र ( विष्णु द्दोतक ). मधल्या दोन हातात डमरु आणि कमंडलू ( शिवाचे द्दोतक ) आणि खालच्या दोन हातात माला आणि कमंडलू ( ब्रह्माचे द्दोतक ) ही आयुधे, माथा जटाभार देहाला विभूती चर्चिलेली,पायी खडावा, व्याघ्रांबर परिधान केलेले आणि काखेत झोळी असलेले,मागे गाय आणि आसपास चार श्र्वान ( कुत्री ) असलेले दत्तात्रेयांचे ध्यान वाचकांना सुपरिचित आहे. आता या ध्यानातील प्रतिकात्मकता समजून घेऊ या तीन मुखे – ही ब्रह्मा,विष्णु,महेश यांचे प्रतीक आहेत . सहा हात – विविध प्राचीन ग्रंथांत दत्तात्रेयांचे स्वरुप एकमुखी व्दिभुज किंवा चतुर्भुज दाखविले असले तरी दत्तसंप्रदायाने मान्य केलेल्या मूर्तीच्या संद र्भात विचार करावयाचा झाल्यास त्या मूर्तीला सहा हात ब्रह्मा विष्णु महेश यांचे प्रतीक असून ब्रह्माच्या हातातील माला व कमंडलु , तपस्व्याचे , ‘ सत्वा ‘ चे प्रतीक म्हणता येईल विष्णु च्या हातातील शंख आणि चक्र ही आयुघे ‘ रजा ‘ प्रतीक आणि  महेश च्या हातातील त्रिशूळ आणि डमरु ‘ तमा ‘ म्हणजे च संहाराचे प्रतीक मानता येईल . वेष – पुराणातील दत्तात्रेयांचे स्वरुप श्रीमान विष्णू सारखे असले  तरी मस्तकी जटाभार, पायी खडावा,अंगाला विभूती चर्चिलेली काखेत झोळी असलेली व्याघ्रांबर परिधान केलेली मूर्ती तो अवधूत दिगंबर योगी असल्याची द्दोतक आहे.  धेनु – हे ‘पृथ्वी ‘ चे किंवा ‘ माये ‘ चे प्रतीक मानले जाते. श्र्वान – दत्तत्रेयंच्या आसपास असणारे चार श्र्वान वेदांचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते.काही विव्दानांनी यावरून ही देवता अवैदिक असल्याचे अनुमान काढले आहे. दत्तसंप्रदायाच्या प्रारंभी त्यावर नाथसंप्रदायाचा मोठा प्रभाव होता.जेव्हा भिक्षा मागण्यासाठि नाथजोगी गावोगावी सातत्याने संचार करत तेव्हा त्यांच्या बरोबर गाईं चे कळप आणि त्यांच्या रक्षणा साठी कुत्री असता, नाथ संप्रदायात ‘ आदिगुरु ‘ चे स्थान पावलेला महायोगी ‘ दत्तात्रेय ‘ आपापतत: च हे स्वरूप पावला असावा. निवास – दत्तत्रेयांचा वास सतत औदुंबर तळी असतो अशी श्रध्दा असल्याने अनेक दत्तभक्त वेदतुल्य ‘ गुरुचरित्र ‘ ग्रंथाचे परायण औदुंबर आवर्जून करतात.

 DSCF3519 DSCF3521

श्रीदत्त दर्शन ९


श्रीदत्त दर्शन
‘ अत्रि ‘ म्हणजे तिन्ही नव्हे तो. असा हा परमात्मा
त्रिगुणातीत आहे.satva,,raja,tamaया तीन गुणांच्या देवता
अनुक्रमे विष्णू , ब्रह्मा व महेश मानल्या जातात.साधकाची
‘अनसूया ‘अनुसूया म्हणजे अनन्य -एक ध्यानवृत्ती होते,तेव्हा
त्रिगुणात्मक – त्रिवेदात्मक ही सष्टी त्याचे बाळ होते.अत्रि म्हणजे त्रिगुण नाही
तो आणि अनसूया अनुसूया म्हणजे जिच्या ठिकाणी दोषदृष्टी नाही ती
अशा अत्रि आणि अनासूयेपासून दत्तात्रेयांचा जन्म झाला. हा
परमात्म्याचा साधन ज्याजोगे परमात्म्याशी एकरुप होतो.ते
साधन म्हणजे योग आत्म्याचे परमात्म्याशी योग साधणे म्हणजे
दत्तजन्म होय.किंवा जेथे अत्रि व अनसूया अनुसूया या
महाभावांचा संयोग होतो ते दत्ततत्व प्रगट होते.
दत्तात्रेयांनी अत्रि ऋषीं च्या आदेशा नुसार गौतमी नदीच्या
काठी शिवोपासना करुन ‘ योगसिद्धी ‘ आणि ब्रह्मज्ञान ‘
प्राप्त केले.त्यांचा आश्रम सिंहाचला जवळ प्रयाग वनात
असून ते स्वेच्छा विहारी आहेत माह.
माहूर पांचाळेश्र्वर , कोल्हापूर ही त्यांची विहारास्थाने आहेत.
माहूर हे पुरातन दत्तक्षेत्र दत्तात्रेयाचे शयनस्थान समजले जाते.
ते पांचाळेश्र्वरी स्नान करतात.आणि कोल्हापूर भिक्षाटन करतात.
एकनाथांनी एका अभंगात दत्तात्रेयांचे वर्णन करतांना म्हटले आहे –
” दत्त वसे औदुंबरी । त्रिशूळ डमरू जटाधारी ।।
कामधेनू आणि श्र्वान । उभे शोभती समान ।।
गोदातीरी नित्य वस्ती । अंगी चर्चिली विभूती ।।
काखेमाजी शोभे झोळी । अर्धचंद्र वसे भाळी ।।
एकाजनार्दनी दत्त । रात्रंदिन आठवीत ।। ”

DSCF3513DSCF3514

DSCF3515 DSCF3511

%d bloggers like this: