आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 29, 2012

लालटम्याटो च्या दशम्या

                                       ॐ
लाल टम्याटो च्या दशम्या पराटे पोळी :
चार लाल टम्याटो घेतले.धुतले.बारीक विळीने बसून चिरले.
नंतर मिक्सर मधून सार सारखे केले.पाणी घातले नाही.पातेल्यात सार
टम्याटो चे घातले.टाकले.ओतले. त्यात अदांजाने मीठ लाल तिखट हिंग
हळद कच्च तेल मोहन सारखे घातले.त्या सार मध्ये कणिक व हरबरा डाळीच
पीठ घातले कणिक जास्त घातली.मऊ सर तिंबले भिजविले.त्याच्या पोळया
प्रमाणे एक एक असे चार 4 पाच 5 गोळे केले ग्यास पेटवून तवा ठेवला .
पोळपाट व लाटणे घेतले.पोळी सारखे दोन्ही बाजूने लातले.तवा वर भाजून
दोन्ही बाजुला तेल लावले.तव्यावर च.छान खमंग व मऊ पोळी केली.
टम्याटो सार कणिक हरबरा दाळि चे पीठ मीठ लाल तिखट हिंग हळद
तेल याचे मोहन दोन्ही बाजूने भाजलेले तेल लावलेले टोम्याटो चे पराटे
पोळी दशमी तयार केली. झाली. डाळ याची चटणी व कच्च तेल चटणी त
घातले.मस्त लाल टम्याटो आंबट याची छ चव कणिक हरबरा डाळी पीठ व
सर्व मसाला याचे याची चव लाल टम्याटो ची चव दशमी पोळी पराटा काही
म्हटले तरी एकच चव आली आहे.असेच पुऱ्या केल्या तरी चालते.

DSCF3537 DSCF3538

DSCF3540 DSCF3428

श्रीदत्त दर्शन १२

                                         ॐ
श्रीदत्त दर्शन
दत्तात्रेयांचे शिष्य –
सहस्त्रार्जुन, कार्तवीर्य, भार्गव परशुराम,यदु,अलकं,आयु
आणि प्रल्हाद हे दत्तात्रेयांचे प्रमुख पौराणिक शिष्य मानले
जातात.या शिवाय ‘ अवधूतोपनिषदा ‘ त आणि ‘
‘ जाबालोदर्शनोपनिषदात ‘ संस्कृती नामक आणखी एक
शिष्य उल्लेखिलेला आहे.
दत्त एकमुखी की त्रिमुखी –
आज सर्वत्र आढळणारी दत्तमूर्ती त्रिमुखी आहे.उपनिषदे.
पुराणे व महाभारत पाहिले तर त्या सर्व वर्णनात
दत्तात्रेय त्रिमुखी नसून एकमुखीच आहेत इतकेच नव्हेतर प्राचीन
मूर्ती विज्ञानात ही दत्तात्रेय एकमुखीच आहेत.भागवतात
देवत्रयीं नी अत्रिं ना ‘यद् न घ्यायति ते वयम् ‘
“तू ज्या एका तत्वाचे ध्यान करीत आहेस त्याचेच आम्ही
तिघेजण अंशभूत आहोत ”
तेराव्या शतकात त्रिमूर्ती कलपनेचा उदय –
पुढे तेराव्या शतकापासून ” त्रिगुणात्मक त्रैमूर्ती ” असे
दत्तात्रेयांचे स्वरुप आहे.अनेक साक्षात्कारी दत्तभक्तांना
दत्तात्रेयांचे दर्शन एकमुखी च झाले आहे.’ गुरुचरित्रा ‘ तील
परंपरेला आदरणीय मानणारे आणि नरसोबाच्या वाडी हून
दत्तभक्ती ची प्रेरणा मिळविणारे असे सप्तपुरुष ही एकमुखी
दत्तात्रेयांचेच पुरस्कर्ते होते.
थोर दत्तोपासक दासोपंतां चे उपास्य दैवत एकमुखी व
षड्भुज दत्तात्रेय आहेत.या मूर्ती च्या सहा हातात शंख,चक्र, त्रिशूल,
डमरु आणि कमंडलू व रुद्राक्ष धारण केलेले आहे.मस्तकावर
जटाभार असून मुकुट आहे. व कमरेला पीतांबर आहे.ही मूर्ती
तांब्याची असून तिचेच चित्र दासोपंतां नी पासोडीवर चितारले आहे.असो.
निरंजन रघुनाथ व त्यांचे गुरु रघुनाथ स्वामी यांना साक्षात्कार झाला तो
एकमुखी व षड्भुज दत्तात्रेयांचा. निरंजन रघुनाथां चे पट्टशिष्य ज्हाषिचे नारायण
महाराज यांना गिरनार पर्वतावर दत्तत्रेयांचा साक्षात्कार झाला तोही
एकमुखी व षड्भुज दत्तात्रेयांचा. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी एकमुखी
व व्दिभुज अशी दत्तमूर्ती पुरस्कारिली आहे; परंतु राजमहेंद्री येथील दत्तभक्तां च्या
आग्रहावरुन त्यांनी त्रिमुखी दत्तमूर्ती स्थापन केली आहे.

DSCF3507 DSCF2857DSCF2840 DSCF2828

श्रीदत्त दर्शन ११

                                     ॐ
श्रीदत्त दर्शन
दत्तात्रेयांचे अवतार –
एकूण सोळा अवतार दत्तत्रेयांनी घेतले असे भाविक मानतात.
दत्तसांप्रदा यिक श्रिपादश्रीवल्लभ यांना व नरसिंह सरस्वतीं ना
इतिहास काळातील अनुक्रमे पहिले आणि दुसरे अवतार मनतात.
दासोपंतांना सतरावा अवतार मानण्यात येते.इतकेच नव्हे तर अल्ललकोट
स्वामी महाराजां ची आणि माणिकप्रभूं चिही दत्ता अवतारातच गणना होते.
दत्तात्रेयांचे सोळा अवतार असे –
१ योगिराज २ अत्रिवरद ३ दत्तात्रेय ४ कालाग्निशमन ५ योगिजनवल्लभ
६ लीलाविश्र्वंभर ७ सिद्धराज ८ ज्ञानसागर ९ विश्र्वंभर १० माया मुक्त
११ मायामुक्त १२ आदिगुरु १३ शिवरूप १४ देवदेव १५ दिगंबर
१६ कृष्णश्याम कमलनयन ह्या सोळा अवतारां च्या
जन्मकथां चा संस्कृत ग्रंथ श्रीवासुदेवानंद सरस्वतीं नी सिद्ध केला आहे.
दत्तत्रेयाचे चोवीस गुरु –
‘ भागवता च्या एकादश स्कंधात विशद करुन सांगितलेले
दत्तात्रेयांचे चोवीस गुरु दत्तसामप्रदायिकां नीही मान्य केले आहेत.
‘ जो जो जयाचा घेतला गुण | तो तो म्यां गुरु केला जाण ‘
असे एकनाथांनी म्हटले असून भागवत करांनी या चोवीस
गुरुं चा उल्लेख ज्या श्र्लोकात केला आहे तो असा –
‘पृथिवीवायुराकाशमाषो s ग्निश्र्चचन्दमा : |
कपोतो s जगर : | सिन्धु : पत ड्.गो मधुकृत् गज : ||
मधुहा हरिणो मीन : पीड्.गला कुररो s र्भक : |
कुमारी शरत्कृत्सर्प उर्णनामी सुवेशकृत : || ‘
सहिष्णुता, धैर्य, परोपकार,पृथ्वी, पर्वत,वृक्षापासून.
अनासक्ती, वैराग्य, अलिप्तता,वायु,आकाश देहापासून .
स्निग्धता व माधुर्य पाण्यापासून.
तेजस्विता,मलनाश अग्निपासून.
दुर्गुणांचा परिहार व सद् गुणां चा उदंड व व्यवहार सूर्यापासून.
स्त्रीसंगाचा त्याग, कपोत,पतंग हत्ती हरणापासून.
यदृच्छालाभसंतोष, अजगरापासून.
अक्षुब्धता, प्रसाद,गांभीर्य, लाभालाभ, समानदृष्टी, समुद्रापासून.
असंग्रह,अपरिग्रह माशी, मधमाशी, कुरर सर्पापासून.
स्वावलंबनाने स्वोध्दार पिंगळेपासून.
एकांतरुची कुमारिकेपासून.
खाद्दपेयासंबंधाने संयम माशापासून.
एकांतिक एकाग्र ध्यान इषुकार भिगुरषेपासून.
कर्त्या संहर्त्या इष्र्वराचे ज्ञान कोळी, कांतीणीपासून .
मानापनाची समानदृष्टी बालकापासून .
असे चराचर गुरुं कडून दत्तात्रेय यांनी गुण मिळविले .

DSCF3507 DSCF2808

%d bloggers like this: