आपले स्वागत आहे!

श्रीदत्त दर्शन १२

                                         ॐ
श्रीदत्त दर्शन
दत्तात्रेयांचे शिष्य –
सहस्त्रार्जुन, कार्तवीर्य, भार्गव परशुराम,यदु,अलकं,आयु
आणि प्रल्हाद हे दत्तात्रेयांचे प्रमुख पौराणिक शिष्य मानले
जातात.या शिवाय ‘ अवधूतोपनिषदा ‘ त आणि ‘
‘ जाबालोदर्शनोपनिषदात ‘ संस्कृती नामक आणखी एक
शिष्य उल्लेखिलेला आहे.
दत्त एकमुखी की त्रिमुखी –
आज सर्वत्र आढळणारी दत्तमूर्ती त्रिमुखी आहे.उपनिषदे.
पुराणे व महाभारत पाहिले तर त्या सर्व वर्णनात
दत्तात्रेय त्रिमुखी नसून एकमुखीच आहेत इतकेच नव्हेतर प्राचीन
मूर्ती विज्ञानात ही दत्तात्रेय एकमुखीच आहेत.भागवतात
देवत्रयीं नी अत्रिं ना ‘यद् न घ्यायति ते वयम् ‘
“तू ज्या एका तत्वाचे ध्यान करीत आहेस त्याचेच आम्ही
तिघेजण अंशभूत आहोत ”
तेराव्या शतकात त्रिमूर्ती कलपनेचा उदय –
पुढे तेराव्या शतकापासून ” त्रिगुणात्मक त्रैमूर्ती ” असे
दत्तात्रेयांचे स्वरुप आहे.अनेक साक्षात्कारी दत्तभक्तांना
दत्तात्रेयांचे दर्शन एकमुखी च झाले आहे.’ गुरुचरित्रा ‘ तील
परंपरेला आदरणीय मानणारे आणि नरसोबाच्या वाडी हून
दत्तभक्ती ची प्रेरणा मिळविणारे असे सप्तपुरुष ही एकमुखी
दत्तात्रेयांचेच पुरस्कर्ते होते.
थोर दत्तोपासक दासोपंतां चे उपास्य दैवत एकमुखी व
षड्भुज दत्तात्रेय आहेत.या मूर्ती च्या सहा हातात शंख,चक्र, त्रिशूल,
डमरु आणि कमंडलू व रुद्राक्ष धारण केलेले आहे.मस्तकावर
जटाभार असून मुकुट आहे. व कमरेला पीतांबर आहे.ही मूर्ती
तांब्याची असून तिचेच चित्र दासोपंतां नी पासोडीवर चितारले आहे.असो.
निरंजन रघुनाथ व त्यांचे गुरु रघुनाथ स्वामी यांना साक्षात्कार झाला तो
एकमुखी व षड्भुज दत्तात्रेयांचा. निरंजन रघुनाथां चे पट्टशिष्य ज्हाषिचे नारायण
महाराज यांना गिरनार पर्वतावर दत्तत्रेयांचा साक्षात्कार झाला तोही
एकमुखी व षड्भुज दत्तात्रेयांचा. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी एकमुखी
व व्दिभुज अशी दत्तमूर्ती पुरस्कारिली आहे; परंतु राजमहेंद्री येथील दत्तभक्तां च्या
आग्रहावरुन त्यांनी त्रिमुखी दत्तमूर्ती स्थापन केली आहे.

DSCF3507 DSCF2857DSCF2840 DSCF2828

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: