आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 30, 2012

2012 साल टॉप 10 कार

                    ॐ
2012 साल कार टॉप 10 कार
चारचाकी ची आवड सर्वंनाच असते सरत्या वर्षात ज्या
आलिशान, किमती मोटारीं ची सर्वाधिक विक्री झाली
त्यांची ही माहिती. ( ‘द टेलिग्राफ’ च्या सौजन्याने )
ही माहिती पुढारी शनिवार २९ डिसेंबर २०१२ कोल्हापूर पान
१२ पुढारी वर्तमान पत्र पेपर मध्ये आली आहे.

DSCF3541

श्रीदत्त दर्शन १४

                                      ॐ
श्रीदत्त दर्शन
या त्रिमूर्ती चे आणि दत्तत्रेयाचे एकीकरण कसे आणि केव्हा घडून आले ?
असा प्रश्र्न वाचकांच्या मनात उभा रहाणे स्वाभाविक आहे.
इ.स.1200 इ.स.१२०० पर्यंत दत्तात्रेयाचे स्वरुप एकमुखी होते.परंतु
पुढे पंधरा शतकात सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेल्या
‘ गुचारित्र ‘ यात मात्र दत्ताय्त्र्याचे स्वरुप त्रिमूर्ती बनले. हा बदल घडून यायला
दत्तजन्माच्या कथेत बराच वाव होता.त्रिमूर्ती त समाविष्ट असणाऱ्या तीनही
देवतांचा आशीर्वाद दत्तजन्म ला कारणीभूत आहे.या तीन देवता पासून अंशभूत असे
तीन पुत्र ब्रह्मापासून सोम ( चंद्र ) विष्णू पासून दत्त महेश पासून दुर्वास – झाले
असले तरी या पुत्रांपैकी केवळ दत्त च अत्रि च्या घरी राहिला.परिणामी सोम ( चंद्र )
आणि दुर्वास लोकमानसात विस्मृत होत गेले आणि दत्त ब्रह्मा – विष्णू – महेश यांचा
एकरस अवतार बनला. त्रिमूर्ती दत्तशी एकात्म होण्यापूर्वी त्रिमूर्ती ही केवळ तात्विक व
कलात्मक कल्पना होती.भक्ती प्रवण लोकामानासाने या ब्रह्मा – विष्णू – महेश महेशात्मक
त्रिमूर्ती आणि ब्रह्माअ – विष्णू – महेश यांच्या आशीर्वाद याने जन्मलेल्या दत्तात्रेयांची
सांगड घातली तर त्यात मुळीच आश्र्चर्य नाही.
तांत्रिकांचे गुरु –
तंत्र साधनेत अलौकिक कर्तृत्वामूळे दत्तत्रेयांना श्रीगुरु हे स्थान प्राप्त झाले. स्वत:दत्तात्रेय हे
अवधूत योगी असून नाथसंप्रयाय हा अवधूत संप्रदाय म्हणून च ओळखला जातो.परमात्मा च्या
प्राप्ती साठि योगसाधना व गुरुसंस्थे ची महानियता ही दत्तस्वरुपा तील दोन प्रमुख वैशिष्ये
नाथसिध्दांत व साधनेशी एकरूप झाली आहेत.दत्तात्रेय प्रणित ‘ अवधूतगीता ‘ हा ग्रंथ
नाथसंप्रदायात प्रमाण मानता जातो.’ अविनाशगीते ‘ त दत्तगोरक्ष संवाद आहे.
‘ दत्तप्रबोध ‘ ग्रंथात 46 ४६ व्या अध्यायात मच्छिन्द्र – गोरक्षां ना दत्तत्रेयां नी गिरनार पर्वतावर उपदेश
केल्याचे वर्णन आढळते.तर 47 ४७ व्या अध्यायात गोरक्षनाथ यांच्या गर्वहरण साठी दत्तात्रेयां नी
दाखविलेला अद् भुत चमत्कार वर्णन केला आहे.

DSCF3507 DSCF3523

श्रीदत्त दर्शन १३

                                        ॐ
श्रीदत्त दर्शन
दत्तात्रेय आणि त्रिमूर्ती कल्पना
आज सर्वत्र आढळणादत्तात्रेयरी दत्तमूर्ती ही ‘ त्रिमूर्ती ‘ च आहे.
महाभारत, पुराणे आणि अर्वाचीन उपनिषदातील दत्तात्रेयाच्या
वर्णनात तो त्रिमुखी नसून पकमुखीच आहे. प्राचीन मूर्ती
विज्ञानातही दत्तात्रेय एकमुखी च आहे.इतकेच नव्हे तर
इतिहास काळातील पहिला दत्तभक्त चांगदेव राऊळ ह्याचे
उपास्य दैवतही एकमुखी हेच आहे. मग प्रश्र्न असा उभा रहातो, की
त्रिमुखी दत्तात्रेयाची निर्मिती कशी आणि केव्हा झाली ?
भातारीयपरंपरेतील त्रिमूर्ती ही ब्रह्मा – विष्णू – महेशत्मक आहे,
असे मानले जाते. ह्या तिच्या तीन घटकांमुळे उत्पती – स्थिती – लय
या तीन अवस्था आणि सत्व – रज – ताम हे त्रिमूर्ती तिच्या तून सूचित होतात.
आज सर्वमान्य झालेल्या ब्रह्मा – विष्णू – महेशात्मक त्रिमूर्ती पहिला उल्लेख
मैत्रायणी उपनिषदांत आढळतो .
शिव ही देवता वेद पूर्व भारतीय संस्कृतीत प्राधान्य पावलेली आहे.वेदातील रुद्र आणि
वेदपूर्व लिंगोपासना यांच्या समन्वयातूनच पुढे पुराण कालीन शिव देवता आकारास आली.
मोहेंजोदारो येथील उत्खननात सापडलेली शिवाची मूर्ती त्रिमुखी आहे.आणि याच्या
अनुकरणातून ब्रह्मा – विष्णू – महेशात्मक त्रिमूर्ती चा उद् भव झाला असावा ‘ उत्तरकामिकागम ‘
‘ रुपावतार ‘ रुपमंडन ‘ ‘ शिल्परत्न ‘ इत्यादी ग्रंथातून त्रिमूर्ती ची मूर्तीवैज्ञानिक वर्णने आढळतात.
ब्रह्मा -विष्णु – महेशात्मक त्रिमूर्ती तही तीन भेद आढळून येतात
ते असे – काही शिवप्रधान, काही विष्णुप्रधान तर काही ब्रह्मप्रधान
ज्या देवतेला प्राधान्य द्दावयाचे असेल,तिचे मुख मध्यस्थानी असते.
मैत्रायणी उपनिषदात ब्राह्मा – विष्णु – आणि महेश एकाच अव्यक्ताची
अंगे असून ती सत्व – रज – तम याची प्रतीके होत, असे म्हटले आहे.
अशाप्रकारे त्रिकाची आवड असणाऱ्या भारतीय परंपरेत ब्रह्मा – विष्णु – महेशात्मक
त्रिमूर्ती दृढ झाली.जीव – जगत् जगदीश्र्वर ही त्रितत्वे सत्व – रज – तमा हे त्रिगुण
स्वर्ग – मृत्यु – पाताळ हे त्रिलोक, आदिभौतिक – आधिदैविक- आध्यात्मिक हे
त्रिताप कायिक -वाचिक – मानसिक ही त्रितापे, भूत – भविष्य – वर्तमान हे त्रिकाळ
वात – पित्त – कपह हे त्रिदोष,कर्म – ज्ञान – भक्ती हे त्रियोग इत्यादी अनेक त्रिकाप्रमाणे च
दार्शनिक चीम्ताचे महनीय प्रतीक बनले.

 DSCF3507 DSCF3511

%d bloggers like this: