आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 31, 2012

ब्लॉग पोस्ट १, ०६९

                                  ॐ
दिनांक तारीख 31.12.2012 /३१.१२.२०१२ साल ला
वसुधालय ब्लॉग पोस्ट 1,069 / १,०६९ एक हजार एकुण सत्तर वां
ब्लॉग पोस्ट होत आहे.
भेटी 102, 851 / १०२,८५१ /एक लाख दोन हजार ,आठशे एक्कावन .
होत आहे. COMMENT /प्रतिक्रिया 409 / ४०९ चारशे नऊ आहेत.
आपण सर्वांनी वसुधालय ब्लॉग वाचन करून भेटी व प्रतिक्रिया
COMMENT बद्दल बध्दल धन्यवाद ! धंयवाद ! आभारी आहे. !

DSCF3429 DSCF3428

श्रीदत्त दर्शन १६

श्रीदत्त दर्शन

दत्तात्रेय दैवताची निर्मिती –

शाक्तपंथाच्या तंत्र साहित्यात दत्तात्रेयांचे स्थान सर्वश्रेष्ठ असून यांना त्रिपुरसुंदरी च्या उपासनेने प्रवर्तक मानले आहे. त्रिपुरारहस्यांचे विवेचन करणारी अष्टादशसहस्त्री ‘ दत्तसंहिता ‘
दत्तत्रेयप्रणित असून ‘ दत्तात्रेय तंत्र ‘ नामक ग्रंथ शाक्त पंथात प्रमाणभूत मानला गेला आहे. दत्तोपसनेत सर्वत्र प्रचलित असलेले ‘ दत्तात्रेय वज्र कवच स्तोत्र ‘ शाक्तांच्या ‘ रुद्रयामल ‘ या तंत्रग्रंथा तील आहे.या सर्व बाबीं चा विचार करुन काही संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे, की ” इसवी सन च्या प्रारंभी त्रिपुरोपासक शाक्त उपासनेच्या क्षेत्रात दत्तत्रेयाची निर्मिती झाली असावी. कदाचित या तंत्रप्रणालीचा प्रवर्तक दत्तात्रेय नामक कोणी महान
सिध्दपुरुष असावा आणि त्याचे च पुढे पुराणांत अंतिम संस्कारांच्या काळी दत्त दैवतात रूपांतर झाले असावे.” मार्कंडेय पुराणाच्या अठराव्या अध्यायात एक विलक्षण प्रसंग आहे. गर्ग्यऋषीं नी कार्तवीर्याला दत्तत्रेयाची कृपा संपादन करण्यास सांगितले असता त्याने तत्संबंधीचा आधार विचारला तेव्हा गर्ग्यऋषीं नी सांगितले, की ‘ फार पूर्वी देवांनी जंभदैत्यच्या नाशासाठी युध्द पुकारले असता सतत वर्षभर देवांचा पराभव होत राहिला. परिणामी त्यांनी बृहस्पती ला तोडगा विचारला. त्याने बाह्यरूपाने विकृत असलेल्या तपस्वी दत्तात्रेयाला प्रसन्न करुन घेण्यास सांगितले. देव दत्तात्रेयां कडे गेले तेव्हा ते लक्ष्मीसह मद्दपान करताना त्यांना आढळले.देवांनी त्यांच्याकडे येण्याचा आपला हेतु प्रगट
करत्ताच दत्तात्रेय म्हणाले,की ” मी मद्दपी, भोगासक्त व अजितेंद्रिय आहे. माझ्या कडून तुम्ही जंभदैत्याचा पराभव कसा अपेक्षिता ? ” त्यावर देव म्हणाले, की ” हे जगन्नाथा, तू भोग व पापरहित आहेस.” हा संवाद चालू असतानाच देवांचा पाठलाग करणारा जंभदैत्य च तेथे येऊन थडकला. त्याने चक्का लक्ष्मीचेच हरण केले; परंतु दत्तात्रेयांनी आपल्या योगसामर्थ्याने जंभदैत्याला ठार केले व देवांवरील संकट दूर केले.जो महेश्र्वर आहे त्याला मद्दपान, स्त्रीसहवास इत्यादींच्या संसर्गाचा दोष प्राप्त होत नाही, असा याचा मथितार्थ आहे. असाच एक प्रसंग ‘ त्रिपुरा रहस्या ‘ त ही आढळतो. असो.

DSCF3507 DSCF3533

श्रीदत्त दर्शन १५

                                     ॐ
श्रीदत्त दर्शन
‘ योगसिध्दी ‘ प्राप्त करुन देणारी देवता –
नाथसांप्रदायिकांच्या मते ही ‘ योगसिध्दी ‘ प्राप्त करुन देणारी देवता आहे,
तब्बल सातशे वर्षांपूर्वी नाथसंप्रदायाने दत्तसंप्रदायाची ध्वजा थेट नेपाळ मध्ये
फडकवली होती.महानुभाव पंथ ही दत्तसंप्रादायाची च एक शाखा असून स्वत:
त्याच्या संस्थापकांनी म्हणजे चक्रधरांनी असे नमूद केले आहे, की
” या मार्गासी श्रीदत्तात्रेय प्रभू आदिकारण .” महानुभावांच्या कल्पनेप्रमाणे
दत्तात्रेयांचा अवताराचा अदृश्य संचार महासंहारापर्यंत निर्वेधा चालु राहणार आहे.
इतकेच नव्हे तर त्यांचा अवतार त्रेतायुगात झाला असला तरी त्यांचा संचार
सर्व युगात चालु असतो. महानुभावी यांनी पंचकृष्णात दत्तत्रेयांचा समावेश केला आहे.
चक्रधरांचे गुरु चांगदेव राउळ यांना दत्तत्रेयाने व्याघ्ररुपात दर्शन दिले होते.
वारकरी संप्रदायातील दत्तोपासनेचा आदर केला जातो.याचे कारण असे, की
संप्रदायाचे पुनरुज्जीवन करणारे ज्ञानदेव अवधूत पंथातील नाथसंदायाच्या
पम्रपरेचा वारसा सांगणारे ‘ योगियांचा रा ओ ‘ होते. अभंगगाथेतील एका अभंगात
‘ ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रेय योगिया ‘ चा उत्कट भाव व्यक्त झाला आहे.
एकनाथ महाराज थोर दत्तोपासक होते.परिणामी नाथांच्या अंत:करणात
विठ्ठलमूर्ती इतकेच ‘ त्रिगुणात्मक त्रिमूर्ती ‘ ला परमोच्च स्थान प्राप्त झाले असल्यास
नवल ते काय ! समर्थ संप्रदायाचे प्रवर्तक रामदास स्वामीं नाही दत्तात्रेयाचे
दर्शन घडल्याची कथा त्यांच्या चरित्रात आढळते.नाथ, महानुभाव वारकरी किंवा
समर्थ सांप्रदायिक काय सर्वांच्याच ठायी गुरुसंस्थे विषयी नितांत पूज्य भाव
असल्यामुळे ‘ गुरुदेव दत्तात्रेय ‘ हे त्यांचेच उपास्य दैवत बनले असल्यास
आश्र्चर्य नाही.संत तुकाराम तुकारामां च्या अंत: करणातील
दत्तात्रेयां विषयी उत्कट भाव पुढे दिलेल्या अभंगातून प्रत्ययास येतो.
” तीन शिरे सहा हात । तया माझे दंडवत ।।
काखे झोळी पुढे श्र्वान । नित्य जान्हवीचे स्नान ।।
माथा शोभे जटाभार । अंगी विभूती सुंदर ।।
शंख चक्र गदा हाती । पायी खडावा गर्जती ।।
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।
श्रीगुरुदेव दत्त । गुरुदेव दत्त ।

DSCF3524 DSCF3526

DSCF3507 DSCF3528

DSCF3527 DSCF3532

%d bloggers like this: