आपले स्वागत आहे!

श्रीदत्त दर्शन १५

                                     ॐ
श्रीदत्त दर्शन
‘ योगसिध्दी ‘ प्राप्त करुन देणारी देवता –
नाथसांप्रदायिकांच्या मते ही ‘ योगसिध्दी ‘ प्राप्त करुन देणारी देवता आहे,
तब्बल सातशे वर्षांपूर्वी नाथसंप्रदायाने दत्तसंप्रदायाची ध्वजा थेट नेपाळ मध्ये
फडकवली होती.महानुभाव पंथ ही दत्तसंप्रादायाची च एक शाखा असून स्वत:
त्याच्या संस्थापकांनी म्हणजे चक्रधरांनी असे नमूद केले आहे, की
” या मार्गासी श्रीदत्तात्रेय प्रभू आदिकारण .” महानुभावांच्या कल्पनेप्रमाणे
दत्तात्रेयांचा अवताराचा अदृश्य संचार महासंहारापर्यंत निर्वेधा चालु राहणार आहे.
इतकेच नव्हे तर त्यांचा अवतार त्रेतायुगात झाला असला तरी त्यांचा संचार
सर्व युगात चालु असतो. महानुभावी यांनी पंचकृष्णात दत्तत्रेयांचा समावेश केला आहे.
चक्रधरांचे गुरु चांगदेव राउळ यांना दत्तत्रेयाने व्याघ्ररुपात दर्शन दिले होते.
वारकरी संप्रदायातील दत्तोपासनेचा आदर केला जातो.याचे कारण असे, की
संप्रदायाचे पुनरुज्जीवन करणारे ज्ञानदेव अवधूत पंथातील नाथसंदायाच्या
पम्रपरेचा वारसा सांगणारे ‘ योगियांचा रा ओ ‘ होते. अभंगगाथेतील एका अभंगात
‘ ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रेय योगिया ‘ चा उत्कट भाव व्यक्त झाला आहे.
एकनाथ महाराज थोर दत्तोपासक होते.परिणामी नाथांच्या अंत:करणात
विठ्ठलमूर्ती इतकेच ‘ त्रिगुणात्मक त्रिमूर्ती ‘ ला परमोच्च स्थान प्राप्त झाले असल्यास
नवल ते काय ! समर्थ संप्रदायाचे प्रवर्तक रामदास स्वामीं नाही दत्तात्रेयाचे
दर्शन घडल्याची कथा त्यांच्या चरित्रात आढळते.नाथ, महानुभाव वारकरी किंवा
समर्थ सांप्रदायिक काय सर्वांच्याच ठायी गुरुसंस्थे विषयी नितांत पूज्य भाव
असल्यामुळे ‘ गुरुदेव दत्तात्रेय ‘ हे त्यांचेच उपास्य दैवत बनले असल्यास
आश्र्चर्य नाही.संत तुकाराम तुकारामां च्या अंत: करणातील
दत्तात्रेयां विषयी उत्कट भाव पुढे दिलेल्या अभंगातून प्रत्ययास येतो.
” तीन शिरे सहा हात । तया माझे दंडवत ।।
काखे झोळी पुढे श्र्वान । नित्य जान्हवीचे स्नान ।।
माथा शोभे जटाभार । अंगी विभूती सुंदर ।।
शंख चक्र गदा हाती । पायी खडावा गर्जती ।।
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।
श्रीगुरुदेव दत्त । गुरुदेव दत्त ।

DSCF3524 DSCF3526

DSCF3507 DSCF3528

DSCF3527 DSCF3532

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: