आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी, 2013

मेथीमीठहिंगमिरची

                                    ॐ
हिरवी लवंगी मिरची 5 पाच रुपये ची आणली.धुतली.
मेथी चे पिवळे दाणे 100 शंभर ग्र्याम घातले.मीठ चवी प्रमाणे घतेले.
हिंग वासाला थोडा घतेला. मेथी चे दाणे मिक्सर मधून बारीक पूड
करुन घातले.त्यात मीठ हिंग घालून एकत्र केले.
मिरची देठा सगट मध्य कापून घातली मिरची मध्ये मेथी ची पूड हिंग मीठ एकत्र
केलेले मिरची मध्ये भरले.अशा भरपूर हिरव्या मिरच्या बरल्या .आता छान
ऊन येते त्या मिरच्या चाळणीत ठेवून उन्हात वाळवत ठेवल्या. अशा मेथी मीठ
तळलेली मिरची दही ह्यात घालून हाताच्या चा बोटाने करुन दहित घालतात.
दही मेथी मीठ हिंग याची चव तोंडी लावण्यास मस्त लागते.
हिंग भरलेली हिरवी मिरची वाळवून तळून तोंडी लावण्यासाठी तयार करतात.

DSCF3687 DSCF3689

गुगल पेस्ट

                                        ॐ
आता गुगल पेस्ट कोणती ही भाषा वापर करतांना
नवीन
Google Input Tools Cloud
येथे मराठी टाईप करावे लागते.
लांब च वेगवेगळ्या भाषा लिहिल्या आहेत.
त्यात निवडून भाषा इंग्रजी शब्द तयार करुन
तयार करावे लागते.तेच आहे.पण
निट ह्यात लक्ष देऊन नवीन करावे लागते
लिंक मध्ये पण पहिले येत नाही .

DSCF3594

शाकंभरी भाजी

                                        ॐ
शाकंभरी भाजी
एक काकडी घेतली.दोन गाजर घातले.ढोबळी मिरची दोन घेतल्या.
लंनंगी मरची दोन घेतल्या मटार दाणे सोलून थोडे घेतले.आल किसून घेतले.
बटाटा दोन घेतले कच्चे शेंगदाणे थोडे घेतले.भाजी धुवून विळिने चिरून घेतली.
गयास पेटवून प्यान थेवले.तेल मोहरी ची फोडणी केली. त्यात सर्व भाजी घातली
पाणी भरपूर घालून शिविली.एकीकडे गव्हाचा रवा भाजुन घेतला. भाजी शिजली.
त्यात गव्हाचा रवा भाजलेला घातला. मीठ हळद हिंग घातले.
परत थोडे पाणी घातले.गव्हाचा रवा व भाज्या मीठ हळद हिंग शिजवुन
गव्हाचा उपना भाज्या सगट तयार केला.
असा उपमा मी व ही बेंगलोर येथे श्री गोंदवले महाराज यांचे देऊळ आहे.
वाडयात आहे.तेथे प्रथम असा उपमा खाल्ला !
आमची सौ सूनबाई अनु असा उपमा फार च चांगला तयार बनवते.

DSCF3683 DSCF3684

DSCF3686 DSCF3665

                                          ॐ
काही भाजी राहिली ती भाजी दुसरे दिवस ला अशा प्रकारे चिरुन शिजविली.
त्यात शेंगदाणे न टाकता तीळ भाजलेले याचा कूट घातला. लाल तिखट मीठ
हिंग हळद घातली. बाजरी ची भाकरी केली. तीळ न लावता केली.भाजी त
खूप तीळ भजलेले कूट घातला आहे.ती तिळ कूट ची चव बाजारी च्या भाकरी ला
पुरे होते. !लिंबु थेवले. भाजीत दोन टम्याटो चिरून दोन्ही भाजीत घातले आहे.
लिंबू ची चव व टम्याटो ची चव वेगळी लागते त्यासाठि लिंबू पण वापरले आहे.
कदिपत्ता चा वास पण चांगला आला आहे.आल याची चव पण वेगळी च
मस्त लागली आहे. दोन दिवस मस्त शाकंभरी भाजी करण्यास मला
खुप मना पासून चांगले वाटले !
खाण्यास पण भाजी उपमा ! भाजी बाजरी ची भाकरी गोड चव आता हि
लागते. !

DSCF3692 DSCF3693

                 DSCF3664

आमची सोसायटी

                                              ॐ
               नाद !
सर्व माणसांना व्यक्ती नां काहीतरी काम करण्याचा नाद असतो.
कोणी त्याला छंद म्हणतो . वेड म्हणतो .आपल्याला आवडणारे काम होय.
ह्यांना कविता लिहिण्याचा नाद वर्तमान पत्र ह्यातिल कोडी सोडण्याचा नाद होता.
वाटतं हे कसल काम पण आडवे उभे शब्द तयार करून सर्व शब्द एकत्र करणे केवढे
शब्द तयार केले जातात. आणि रोज असे शब्द किती माहिती असतात.ते लिहुन
काढले जातात.हा एक अभ्यास च व नाद असतो.
आमच्या सोसायटित प्राध्यापक आबंरडेकर रहात असतं वयाच्या सत्तरिला पण ते
असेच वर्तमान पत्र मधील कोड सोडवित असतं.भाताची पेटी वाजवत असतं आम्हाला
वरच्या मजल्यावर त्यांची पेटी ऐकू येत असत.
आमच्या सोसायटित कोलगुड सौ बाई भजन म्हणतं दर सोमवार दहा / वीस बायका
पेटी तबला झांज सर्व मिळून भजन म्हणत. सौ कोलगुड बाई शंख छान वाजवित असतं
स्वत: कोलगुड भाता ची पेटी वाजवितात ती पण आम्हाला वर च्या मजल्या वर ऐकु येते.
मी मंत्र जप पूजा एवढे करत, रांगोळी काढणे विणकाम पेंटिग करत. नतंर सतार शिकले.
मी सतार सकाळी पाच वाजता किंवा दुपारी चार वाजता रियाज वाजवित असे .
सकाळी फिरायला जाणारे माणसं काय छान वाजविता ऐकत ऐकत आम्ही पुढे
पुढे जातो.आता मला सतार पेक्षा संगणक मराठी लिखान करायला आवडते.व
ईतर मराठी समजल्यास इंग्रजी वाचन करण्यास आवडते.
सत्तर च्या व्यक्ती पण आपण कामात राहून आभ्यास व नाद छंद ठेवतात.
जोपासातातं . हे फार स्वत: आयुष्यात महत्वाच आहे.
सगळ्या स्त्री या नोकरी करत नसल्या तरी काही तरी कामात नाद ह्यात गुंतलेल्या असतात.
DSCF1961

फळ


फळ कशा प्रकारे खावीत ज्यूस करुन खावीत किंवा नुसते
सहज फोडी करुन खवीत :
पूर्वी केळ साल सोलले की थोडे थोडे खातं लहान मुलांना
हाताने च मऊ करुन भरवित असत.अंबा मऊ करुन खात अंबा याचा रस
जेवतांना घेत असत. मध्यंतरी अंबा याच्या लांब लांब फोडी करुन खाता.
सिताफल गर बी दाताने बाजुला करुन दाताने जिभेने बाहेर काढतं.
डाळींब दाताने बी चावून बी सगट गिळत.चिकू साला सगट खात.बी काढून
टाकतं पपई साल व बी काढून साल काढून खात.अननस साल काढून
काटे दाताने चावून खात व गिळत.फणस बी काढून गरे खात. उस दाताने
सोलुनकवरे खात . संत्रा मोसंब साल काढून आतील पातळ साल चावून गिळत.
हे सर्व करताना दात जीभ याच्या बरोबर जो रस तयार होतो तो नैसर्गिक
रित्या पोटात जातो.व शरीर ईतक तयार असतं हव तेवढ सत्व शरीरात रक्त
ह्यात तयार होते.बाकीचे नैसर्गिक रित्या बाहेर पडते.दाता जिभेला डोक मेंदू
सर्व अवयव यांना व्यायाम मिळतो. ही पध्दत पद्दत खरी चांगली.
आता आता ज्यूस करणे व पटकन संपवणे चालू आहे.पोट तात्पुरते भरते.
लहान मुले व वयस्कर व ज्यांना दात नाही त्यांनी ज्युस करून अवश्य प्यावा
ज्युस मशीन मध्ये गरम होतो.साध्या पूर्वी मोसंब सोलायचे काचेचे भांड मिळत असे.
ते वापरल्यास चांगले. फळ ईतकी महाग व पचनास जड असतात एक फळ एकटा
खाऊ शकत नाही.फोडी च करण्याची पध्दत आहे एक फळ सर्वांना मिळते.
दाताने खाल्यास आंबट पणा गोड पणा यांची चव एकदम छान लागणार समजणार !
गार खातांना गिळताना घशाला पण व्यायाम होणार !
ज्युस करणे व फोडी करणे हे फळ खाण्या ची पध्दत पद्दत वापरू शकतां !

 

जांभळ , करंवद डोंगराची मैना अंजीर

फळ ही उन्हाळाऋतुत येतात.

 

इच्छे प्रमाणे आहे!

DSCF3109 DSCF3096 DSCF3103 mahalaxmi_ yantra

श्री शाकंभरी देवी 2


श्री शाकंभरी देवी म्हणजे
श्री रेणुका देवी श्री तुळजाभवानी देवी व श्री यमाई देवी
तेथे नवरात्र उत्सव व पूजा भा करतात.
कोल्हापूर येथे श्री त्र्यंबोली देवी तेथे पण उत्सव करतात.
कोल्हापूर महालक्ष्मी येथे भाजी ची पूजा बांधलेली आठवते.
पेपर वर्तमान पत्र मध्ये.


श्री जीवनदान देणारी देवी श्री सिध्दपीठ देवी श्री दुर्गादेवी
ह्या सर्व श्री शाकंभरी देवी आहेत .
फार पूर्वी फार काळ पूर्वी दुष्काळ पडला होता.
ऋषी मुनीं नीं श्री देवी ला साकडे घातले .
श्री देवी धान्य दिले त्याचा नैवेद्द ऋषी मुनी नी
श्री देवी ला दाखविला तेंव्हा पासून पौष शुक्लपक्ष
मध्ये अष्टमी दुर्गा अष्टमी व लिहिलेल्या श्री देवी नां
भाजी चा नैवेद्द दाखवितात. भोगी करुन घरोघरी भाजी भाकरी
देण्याची रित पध्दत आहे.


श्री सिध्देश्र्वर देवी श्री यमाई देवी श्री योगी देवी
ह्या देवी नां पण शाकंभरी देवी म्हणतात.

mahur renuka devi Tulajapur Bhavani

DSCF3680 DSCF3678

श्री शाकंभरी देवी १


स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण हेमंतऋतु पौष शुक्लपक्ष दुर्गाष्टमी , शाकंभरी देवी
८ अष्टमी .शनिवार
उत्सवारंभ झाला .
आता १५ रविवार शाकंभरी पौर्णिमा पौष पौर्णिमा आहे.
श्री शाकंभरी देवी चे नऊ दिवस नवरात्र असते.
श्री शाकंभरी देवी भाजी ची देवी आहे. पौष महिना त
भरपूर भाज्या ताज्या मिळतात.काकडी, मेथी,वांग हिरवी जांभळी
पावटे, मटार, गाजर कांदापात बरेच भाज्या ह्या महिना मध्ये
ताज्या मिळतात. श्री शाकंभरी देवी ला भाजी ची देवी नाव आहे.
तारिख दिनांक १९ .१ (जानेवारी )२०१३ साल पासून प्रारंभ झाला आहे.
व तारीख दिनांक २७ १ (जानेवारी ) २०१३ साल ला संपत आहे.
शुक्लपक्ष पौष ८ अष्टमी ते पौष पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा
पर्यंत चालू आहे.
माझा वसुधालय ब्लॉग १९ .१. (जानेवारी ) २०१३ साल
ला १.१११ एकहजार एकशे अकरा वां ब्लॉग पोस्ट केला झाला
आहे.मला ८ अष्टमी शाकंभरी देवी उत्सावारंभ ला
हा ब्लॉग झाल्या बध्दल बद्दल मनाला खूष आनंद
समाधान तृप्त वाटतं आहे.
शाकंभरी भाजी ची देवी ला माझा मना पासून नमस्कार !

DSCF3545  

पौष पौर्णिमा

                         ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण हेमंतऋतु शुक्लपक्ष पौष महिना
नक्षत्र पुष्य राशिप्रवेश कर्क वार रविवार आहे.
शांकभरी पौर्णिमा पौष पौष पौर्णिमा आहे.१५
तसेच दिनांक तारीख २७.१ (जानेवारी ) २०१३ साल आहे.
रविवार आहे.
                                   ॐ
दिनांक तारिख २७. १.(जानेवारी ) २०१३ साल ला
सौ मीना वहिनी चिवटे व नाना भाऊजी चिवटे यांचा
लग्न याचा वाढ दिवस आहे.५० पन्नास साव वर्ष लागत आहे.
सौ मीना वहिनी व नाना भाऊजी यांना
                मना पासून
                  शुभेच्छा !

DSCF3089 DSCF3101

कुंभमेळा

कुंभमेळा
कुंभपर्व नावाच्या पुण्यकारक मुळे कुंभमेळा भरतो
दर १२ बारा वर्षाने कुंभमेळा भरतो .
समुद्र मंथनाच्या वेळी अमृतकुंभ हातातुन निघून
धन्वंतरी हातात आले.दैत्य व देव यांच्यात युध्द झाले.
इंद्र पुत्र जयंता करवी अमृतकुंभ पळविले काही अमृतकुंभ
खाली पडले.
ते ह्या ठिकाणी
१अलाहाबाद २ प्रयाग३ हरव्दार ४ नाशिक
उज्जयनी पण कुंभमेळा भरतो.
हिंदू मानवतेचा संगम दिसतो. एकत्र येऊन सण साजरा करतात.
सिंहस्थ कुंभमेळा त्रंबकेश्वर गोदावरी नदी काठी भरतो.
गुरु सिंह राशित चंद्र सूर्य कर्क राशित
उज्जयनी सूर्य आणि गुरु अनुक्रमे तुला राशित वृश्चिक राशित
असता .
प्रयाग ला मकर राशित चंद्र सूर्य राशित असताना गुरु आणि अमावस्या तिथिला.
हरिव्दार ला गुरु कुंभ राशित सूर्य मेष राशित असताना कुंभमेळा भरतो .
1अमावस्या 2 वसंतपंचमी 3 मकरसंक्रांत हे तीन पर्व आहेत

पौष शुक्लपक्ष च्या महिना मध्ये कुंभमेळा भरतो.
हत्ती व उंट संरजामासह कुंभमेळा ला हिंदु मानव तेचा एकत्र 12 वर्षान
येणारा कुंभमेळा भरतो.

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण हेमंतऋतु पौष शुक्लपक्ष १४ शनिवार
नक्षत्र पुनर्वसु राशिप्रवेश ला कुंभमेळा चा शेवट चा दिवस आहे.
तसेच दिनांक तारीख २६ १ (जानेवारी ) २०१३ साल आहे.
शनिवार आहे.
शाकंभरी पौर्णिमा १५ रविवार आहे.पौष पौर्णिमा आहे.
माघस्नानारंभ सुरु होत आहे.शुक्लपक्ष पौष महिना आहे.
तसेच दिनांक तारीख २७ .१ .(जानेवारी) २०१३ साल आहे.

DSCF1363

गोदावरी

प्रजासप्ताक दिन


दिनांक २६ .१ (जानेवारी ) २०१३ साल ला
भारत देश यांचा
प्रजासप्ताक दिन दिवस आहे.
भारत देश व जेथे भारतीय जनसमुदाय आहेत
त्या सर्वांना
शुभेच्छा !

तिरंगा भारत

dscf1897

DSCF3673rangoli

रांगोळी

                                      ॐ
रांगोळी
        मी रांगोळी काढली आहे .
चौकोन व गोल हाताने रांगोळी ने तयार केले आहेत.
जरा लहान मोठे झाले आहेत.
तरी एका ठिकाणी बसने मन एकाग्र करणे व पूर्ण रांगोळी तयार करणे
हे माझ्या हातून पूर्ण काम होणे याला चं जास्त महत्व आहे. !

DSCF3673 DSCF3674

जग !

               ॐ
जग हे दोन मार्गाने भरलेले आहे.
काही जनांना मानसिक त्रास असतो.
काही जनांना व्यवस्थित आहे असं वाटत असत.
काम करून लगेच यश मिळाले तर ते मानसं एकदम
खूष व प्रामाणिक असतात.
काही जनांना किती कष्ट काम केले तरी यश मिळत नाही
त्या साठि ते असमाधानी व चिडचिडे संतापी असतात.
मग ते वेगळ्या मार्गाला लागतात.व घर समाजात तसे वागुन
वाईट काम करतात.
ईतरांना वाटतं असे का वागतात त्रास देतात. त्यांची मन समजून
त्यांना हवे ते मीळवून दिले तर घर समाज सुधारेल.!
काही जण देवाचं देवाचे करणारे आहेत.तर काही देऊळ
येथे न जाणारे आहेत.मंत्र जप देवाचे वाचून आपली शक्ति
ताकद वाढविणारे काही जन आहेत तर ह्या पोथी त काय आहे
न वाचणारे आहेत.ह्या मध्ये काय समजत .
जे काही थोडे जन देवाचे देवाचं करणारे आहेत त्यामुळे
जग लोक चालु आहे.शक्ति निर्माण होऊन वाईट बाजूला ठेवुन
देव साक्षात उभा राहुन जग शांत व पुढे नेतात नेतो.
एक तीळ सात जनांनी खावा !असे जेंव्हा सर्वांना वाटणार तेव्हा
व जे देवाचे व प्रामाणिक सत्य काम करणारे जन आहेत त्या मुळे
हे जग चालु राहणार !DSCF3587

गोड धिरडी

                                        ॐ
गोड धिरडी
छोटा गूळ याचा खडा घेतला .किसनी ने किसला.
एका पातेल्यात गूळ याचा किसलेला किस घातला थेवला.
थोड पाणी एक वाटी पाणी गूळ हयात घातले. अर्धा तास पाणी गूळ
पातेल्यात भिजत ठेवले.त्यात कणिक गव्हाचे पीठ घातले.दोन डाव
गव्हाचे पीठ घातले.पातळ सर ठेवले ही धिरडी जाडसर च चांगली लागतात.
पातळ हवी असल्यास कणिक गूळ याचे पीठ पातळ करावे.मी जाडसर ठेवले
आहे.मऊ छान होतात. गयास पेटवून पेटलेल्या ग्यास वर तवा ठेवला.
तवा तापू दिला.तूप तवावर टाकले.उलथन्याने च तूप पसरविले.
डावाने कणिक व गूळ याचे एकत्र केलेले पातळ पीठ डावा ने घातले.
उलथन्याने ते पीठ तवा त पसरविले.दोन्ही बाजूने छान भाजले.
मस्त जाळी धीरड याला पडली आहे.
हे धिरडे धिरडी दूध बरोबर काण्यास चांगली लागतात.
वाटल्यास दूध हयात गूळ घालून जास्त गोड खाता येते करता येते.
पण जास्त गोड फार जात नाही थोड्या वेळ चांगले लागते.फार गूळ ही
फार खाऊ नये .
मस्त गूळ पाण्यात बिजवून कणिक गव्हाचे पीठ पातळ सर करून
त्याची धिरडी गावन डोसा तयार केला आहे मी !
असेच तांदुळ याचे नुसते पीठ पाण्यात पातळ करून डोसा करतात.
त्यात गूळ घालु नये व तो दूध गूळ एकत्र करून ह्या बरोबर तांदूळ पीठ
याचा डोसा खातात.मी आपला गव्हाचे पीठ कणिक याचे धिरडी गूळ एकत्र
करून दुध व थोडा गूळ घालून तयार केले आहे.

DSCF3669 DSCF3671

मनाची ठेवण

                                            ॐ
मनाची ठेवण
खूप पूर्वी प्राचीन काळातील भरत नावाचा राजा वरून आपल्या देशाचे नाव भारत असे पडले .!

काही काळा हिंदुस्थान !

आताच्या भारत आणि पाकिस्तान मधील सिंध नावाच्या नदीच्या नावाचा अपभ्रंश होऊन हिंद व मग इंड असे झाले.

इंग्रजांनी इंड वरून इंडिअन देश म्हणून इंडिया असे नाव झाले.

हिंदू म्हणून पूर्वी धर्म नव्हता. तर हिंद काठी राहणाऱ्या लोकांची पध्धत, म्हणजे राहणी कशी, मंत्रोच्चार, राहणीमान, जेवण, कपडे, संस्कृती, योग – साधना इत्यादी हिंदू राहणी म्हणून प्रसिध्द झाली.

इंग्रजांमुळे इंडीया असे लोक जनसमुदाय म्हणावयास लागले.

आतां आतां पाचं सहा वर्षात परत भारत असे म्हणावयास लागले.

भारत म्हणण्यात लोकांना देश ह्या बध्दल बद्दल आपुलकी आपले पणा वातण्यास निर्माण झाला आहे.

जेंव्हा भारत आपला देश आहे असे वाटणार तेंव्हा लोकांना आपुलकी निर्माण होणार, लोकांमध्ये देशभावना निर्माण होऊन सुधारणा होऊ शकतील.

एकमेका मध्ये भांडण कमी होतील आपुलकी निर्माण होऊन प्रगती सर्व एकत्र पणान एकत्र काम करून आपल आहे ही भावना मनात कामात निर्माण होणार व भारत देश एक आहे वाटून भारत जनसमुदाय याची प्रगती भरभराट होऊन होईल.

संगणक फोन ईतर सोयी आहेत पण समाधानी वृत्ती व्हायला पाहिजे, इमानदारी व पवित्रता होणे गरजेचे आहे.

जेंव्हा माझा भारत देश, माझे भारतीय लोकं हे मनांत भिणेल तेंव्हा जनसमुदाय व भारत देश याची भरभराट प्रगति होणार!

आता कॉलेज विद्दार्थी यांच्या त आपण पाई पंढरपूर येथे किंवा कुंभ मेळा मध्ये जावे वाटते ते आता करून दाखवतात.योग साधना करतात.स्वत: मनानं करतात.

आमच्या वेळेला आपण नापास होऊ देवाला नाही गेलो तर ह्यासाठी देवाचे व जप करत होतो.

आता मात्र देवल न भिता मनापासून विद्दार्थी भक्ती भावाने स्वत: तयार झाल्या सारखे ते साधना योग देवाच करणे, मंत्र करणे असा फरक पडला आहे

आत्मविश्वास आजच्या विद्दार्थी मध्ये असल्याने नक्की ते माझा भारत देश आत्मविश्वासान म्हणत प्रगती च्या सुधारणा च्या मार्गात राहणार असा विश्वास वाटतो !

तिरंगा DSCF1897

DSCF3665 DSCF3664

 

निसर्ग व परमेश्र्वर


निसर्ग व परमेश्र्वर
देवानं देवाने पाऊस पाडून नदी व विहिरी ला पाणी दिले
देवा मला पाणी पिण्याची ताकद दे.देवा ने समुद्र येथे मीठ तयार केले
देवा मला मीठ खाण्याची ताकद दे.देवाने निसर्ग याने फळ धान्य तयार केले.
देवा मला जेवण फळ खाण्याची ताकद दे.तेल याच्या खाणी आहेत देवा मला तेल
जेवनात खाऊ दे.देवाने निसर्ग याने पेट्रोल तयार केले देवा मला वाहन यानी प्रवास करु दे.
फूल झाड याचा वास देवाला वाहण्यास डोक्यात केसात माळण्याची ताकद दे. साखर गूळ
गोड खावयाची ताकद दे दूध पिण्याची ताकद दे. आंबट खाण्याची ताकद दे.
हल्ली मीठ कमी खावे .साखर खाऊ नये.प्रवास होण्या करता पाय दुखतात.
आंबट खाल्ले की खोखला येतो म्हणून देवाला व निसर्ग याला मला सर्व याचा
उपभोग सर्व करण्यास ताकद दे असे मी निसर्ग व परमेश्र्वर यांना मना
मागणे मागते.

देवा मला सुका मेवा सादूक तूप खाऊ दे.
कोणा कोणाला याची एलर्जी असते. मी सुका मेवा
काजू  बदाम सादूक तूप खाऊ शकते. देवा मला अशा प्रकारे

सर्व खाण्याची ताकद दे. !
मी आता साखर ,मीठ पाणी ,आंबट सर्व व्यवस्थित खाते.पथ्य पाळावी लागतात.
इंजक्षन गोळ्या घ्याव्या लागतात. त्या साठी निसर्ग व परमेश्र्वर यांना मागणे केले.
माझ्या आई व वडील यांनी ताकदी च शरीर मन दिले आहे ह्यांनी खाण्यासा चांगले
घातले आहे.मी स्वत: काम व खाणे नीट ठेवून ताकदी ची राहिली आहे.

DSCF3596 DSCF3619

पळस फुलला

                                               ॐ
महाराष्ट्र टाइम्स कोल्हापूर
तारिख दिनांक 19 ,1.( जानेवारी ) 2013 / १९,१.(जानेवारी )२०१३ साल
शनिवार अंकात पेपर मध्ये पान नंबर २ ह्यात पळस फुलला …
असे छान छायाचित्र फोटो पाहण्यास मला मिळाले.
एकदम मला आठवले हा असा च फोटो छायाचित्र आपल्या कडे आहे.
तर खर चं एक भेट कार्ड GRITIMGA दिवाळी आलेले आहे.
ते मी आजही जपून ठेवले आहे.त्यात तारीख नाही पण खूप जून
भेट कार्ड आहे. मला माझ्या जवळ पळस फुलला मी कसा
सांभाळून ठेवला आहे .याचे मलाच पळस फुलला सारखे मन भरून येत आहे.!

DSCF3653 DSCF3644

              DSCF3650

ब्लॉग पोस्ट १,१११ वां


ब्लॉग पोस्ट 1,111वां १, १११वां
एकहजार एकशे आकारा वां ब्लॉग पोस्ट
दिनांक तारिख 19.1 (जानेवारी ) 2013 साल ला
१९.१ (जानेवारी ) २०१३ साल ला होत आहे.
२०. १२ (डिसेंबर ) २०१२ साल ला भेटी १, ०३९
एक हजार एकूण चाळीस भेटी झाल्या आहेत जास्तीच
जास्त रेकोर्ड आहे.

13.12 डिसेंबर 2012 साल ला
१३ .१२ ( डिसेंबर )२०१२ साला ला
१.०११ / 1,011 एक अकरा ब्लॉग पोस्ट केला झाला आहे.
व १९, १ (जानेवारी )२०१३ साल 19.1 (जानेवारी ) 2013 साल ला
1,111/ १,१११ एक हजार एकशे अकरा ब्लॉग पोस्ट होत आहे.
कमी दिवस मध्ये एवढे ब्लॉग पोस्ट तयार वसुधालय मध्ये
मी तयार केले आहेत याचे माझे मलाच खूप छान व आरे बाप रे !
असे होत आहे
आपण सर्वांनी ब्लॉग पोस्ट वाचून प्रतिक्रिया व भेटी दिल्यात
त्या बद्दल बध्दल मना पासून धन्यवाद ! धंयवाद !


एकूण भेटी 107,816 / १०७,८१६
एक लाख सात हजार आठशे सहा .
Comments /प्रतिक्रिया 465
DSCF3578 DSCF3619

1111-2 1111-1

श्री मल्हारी माहात्म्य १५

              ॐ
|| श्री मल्हारी माहात्म्य ||
खंडोबाची आरती
जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार |
मृत्युलोकीं दुसरें कैलासशिखर |
नानापरींची रचना रचिली अपार |
तये स्थळीं नांदे स्वामी शंकर || १ ||
जय देव जय देव जय शिवमार्तंडा |
अरिमर्दन मल्लारी तूंचि प्रचंडा || ध्रु o ||
मणिमल्ल देत्य प्रबळ तो झाला |
त्रिभुवनी त्यानें प्रळय मांडीला |
नाटोबे कोणास वरें मातला |
देवगण गंधर्व कांपतीत्याला | जय o ||२ ||
चंपाषष्ठी दिवशीं अवतार धरिसी |
मणिमल्ल देत्यांचा संहार करिसी |
चरणीं पृष्ठींखड् गे वर्मी स्थापीसी |
अंतीं वर देऊनि त्यां मुक्तीतें देसी | जय o || ३ ||
मणिमल्लदैत्य मर्दुनि मल्लारी |
देवं संकट पडतां राहे जेजुरीं |
अर्धांगी म्हाळगा शोभे सुंदरी |
देवा ठाव मागे दास नरहरी | जय o || ४ ||
* * *
समाप्त

DSCF3588 DSCF3590

DSCF3591 DSCF3592

DSCF3573 DSCF3594

 

                                            ॐ

                             खंडोबाचा दशाक्षरी मंत्र

                           ॐ नमो मार्तंडभैरवाय ||

 

              DSCF3578

श्री मल्हारी महात्म्य १४

                       ॐ
|| श्री मल्हारी महात्म्य ||
मल्हारी म्हाळसाकांताच ची आरती
मणिमल्लासुरपीडीती मुनी ते जन वाया |
येती तव कैलासा मनी दु:ख कथाया |
ऐकुनि त्यांचे गुण रिपुते नाशाया |
मार्तंडेश्र्वर प्रकटे लोकी गुन गाया | जयदेव || १ ||
जयदेव जयदेव जय मल्हारी |
वारी देसी दासा पद मुक्ती चारी जयदेव || धृ.||
मांथारला किरीटा खंडा करी धरीशी |
मणिमल्लाने मर्दुनि जयसंगशिवरासी |
अश्र्वारुढ म्हाळसीका वामांगी धरिशी |
घेऊनि रजनी धूसर धुळीत वपु करिशी || २ ||
सुमनांची वाशिंगे रत्नांच्या माळा |
करी कंकण शोभतसे सुंदर मेखंळा |
भूलोकाते येसी भक्तांच्या पाळा |
रक्षिसी गणपती ठेवीन तव पदि निजमाळा || ३ ||

DSCF3587 DSCF3590

DSCF3573 DSCF3578

                                    ॐ

                       खंडोबाचा दशाक्षरी मंत्र

                      ॐ नमो मार्तंडभैरवाय ||

श्री मल्हारी माहात्म्य १३

                            ॐ
|| श्री मल्हारी माहात्म्य ||

भूपाळी
उठी उठी हो मैराळा | मालो महिपती |
अमृत भरोनि गंगा | तिप्टे रानांची झारी || धृ . ||
इंद्रादिक सूर मिळोनि आले दरबारी |मृदंग कहाळ बाजविताती |
पण वानक भरी || २ || तुज नाही कोणी आम्हा |
दुसरा कैवारी | मुख प्रक्षाळूनी देई | सुकृत पेमाची वारी || ३ ||
हळदीकेशकर्दम करुनी गंधी | उटणे करु तिष्ठती दासीसिध्दी अष्टविधी |
सनकादिक नारद गाती नाना प्रबंधी | ज्ञानार्कोदय झाला वेगो प्रबोधी || ४ ||
वस्त्रे अलंकार घेउनि तिष्ठती गण कोटी | जयजयकारे सुखर करिती
सुमनांची वृष्टी | ध्यानी त्याला देसी संतती, संपत्ती, यश सृष्टी |
दत्त वरद विठ्ठल कवि बंदीत गर्जुनि यळकोटी || ५ ||
                          * * *

DSCF3573

                    ॐ

        खंडोबाचा दशाक्षरी मंत्र

        ॐ नमो मार्तंडभैरवाय ||

श्री मल्हारी माहात्म्य १२

|| श्री मल्हारी माहात्म्य || श्रीमल्हारी कवच ॐ नमोश्रीगणेशाय : || अस्यश्रीमल्हारीकवचमंत्रस्य || स्कंदऋषि : || श्रीमल्हारीर्देवता || अनुष्टुप् छंद : || श्रीमल्हारीकवचजपेविनियोग : || सनत्कुमार उवाच || मुनीनां सप्तकोटी वरदं भक्तत्सलं || दुष्टमर्ददेवेश वंदेहं म्हाळसापतिम् || १ ||
अनुग्रहायदेवानां || मणिरत्नगिरौ स्थितं || प्रसन्नवदनं नित्यं || वंदेहं मल्लवैरिणं || २ ||
सर्वदेवमयं शातं || कौमारं करुणाकरं || आदिरुद्रं महारुद्रं || वंदेह सात्विकप्रियम || ३ ||
भुक्तिमुक्तिप्रदं देवं || सर्वाभरणभषितं || कोटिसूर्यप्रतीकाशं || वंदेह असुरांतकं || ४ ||
आदिरुद्र महादेव || मल्हारिपरमेश्र्वरम् || विरस्त्वत्यसविरुपाक्षं || वंदेहं भक्तवत्सलं || ५ ||
भोगरुपरपरं ज्योति : || शिरोमाला विभूषितं || त्रिशूलदिधरं देवं || वंदेहं लोकरक्षक || ६ ||
इदं पठति यो भक्त्या || मल्लारीप्रीतिकारकं || भक्तानां वरदं नित्यं प्रणतोस्मि महेश्र्वरम् || ७ ||
वने रणे महादुर्गे || राजचौरभयोप्युत || शाकिनीडाकिनीभूत || पिशाचोरगराक्षस || ८ ||
ग्रहपीडासु रोगेषु || विषससर्पभयेषु च || सदामल्लारी मल्लारी तिकीर्तनं || ९ ||
सप्तजन्मंकृतं पापं तत्क्षणादेव नश्यति || त्रिकालेतु पठेन्नित्यं विष्णुलोक स गच्छति || १० ||
देहांतेतु प्राप्नोती सर्वलोके महीयते || इति श्रीब्रह्मांडपुराणे || क्षेत्रखंडे मल्लारीमहात्मे मल्लारी कवचं संपूर्णम् ||

DSCF3573 DSCF3587

ॐ खंडोबाचा दशाक्षरी मंत्र ॐ नमो मार्तंडभैरवाय ||

दिनांक तारिख 18 .1 (जानेवारी )2013 साल 

१८ .१ (जानेवारी) २०१३ साल ला सौ ज्योत्स्ना तुझा

वाढ दिवस आहे तुला वाढ दिवस च्या भरपूर मनापासून 

शुभेच्छा !

rangoliJk divejk

श्री मल्हारी माहात्म्य ११


|| श्री मल्हारी माहात्म्य ||
श्रीमल्हारीमार्तंडाचा प्रभावी मंत्र
हा मंत्र ४७ वर्णांचा असून तो अनुभवसिध्द ,
अत्यंत प्रभावी, लवकर फळ देणारा आहे,या
मंत्राचा दररोज शुचिर्भूतपणे अकरा वेळा
जप करावा किंवा अकरा माळा इतका जप
करावा. मंत्र जप अत्यंत हळू आवाजात,
शक्य तर मनात करावा. मंत्राचा उच्चार
स्पष्ट शुध्द असावा.म्हणून जाणकार
व्यक्तीकडून त्याची संथा घ्यावी.
ॐ ऱ्हीं भ्रूं त्रुं स्त्रुं ऱ्हुं ध्रुं
पीयाणानंद गंगामहालसाभ्यां सहिताय श्रीमार्तंडभैरवरुपाय
श्रीमल्लारये नम : |
भ्ह्युं ध्रुं ऱ्हुं स्त्रुं भ्रुं ऱ्हीं ||
* * *
हे सर्व मंत्र दीर्घ पाहिजे त पण मराठी व संस्कृत मध्ये
दीर्घ होत नाहीत पण लिखान पूर्ण बरोबर आहे.

DSCF3573  DSCF3587 DSCF3588

खंडोबाचा दशाक्षरी मंत्र

ॐ नमो मार्तंडभैरवाय ||

श्री मल्हारी मल्हारी १०


|| श्री मल्हारी माहात्म्य ||
मिलिंदमाधवकृत मार्तंडभैरवाष्टक
नमो चंड मार्तंड ता खड् गधारी || १ ||
उभा जेजुरीला असे सौख्यकारी || २ ||
करीं शूल शोभें तुझी सत्ता || ३ ||
नमो भैरवा शंकरा विश्वनाथा || ४ ||
अगा म्हाळसेच्या वरा देवराया || ५ ||
असावी शिरीं ती कृपाछत्र छाया || ६ ||
तुझ्या आतां नसे कोण त्राता || ७ ||
नमो भैरवा शंकरा विश्वनाथा || ८ ||
* * *
DSCF3573

खंडोबाचा दशाक्षरी मंत्र

ॐ नमो मार्तंडभैरवाय ||

दिनांक तारिख 14 .1 .(जानेवारी ) १. १ (जानेवारी ) २०१३ साल
संक्रात सुरु झाली आहे.
संक्रांत व रथसप्तमी पौष महिना व माघ शुक्लपक्ष ७ सप्तमी मध्ये
हळदी कुंकू व लुटणे काही वस्तू फळ धान्य देतात.

आमच्या शेजार च्या श्री व सौ दोशी यांच्या सौ सुनबाई

सौ रचना निलेश दोशी यांनी
रुमाल ह्यावर विणकाम हाताने स्वत: विणून रुमाल तयार केले आहेत.
हळदी कुंकू साठी व स्वत: तयार केले विणलेले रुमाल लुटण्यासाठी देण्यासाठी
रुमाल मध्ये विणलेले काही नमुने मी येथे दाखवित आहे.
सौ रचना निलेश दोशी यांचे विणलेले रुमाल स्वत:त्यांनी विणले आहेत ह्याला महत्व आहे.
DSCF3638 DSCF3636 DSCF3635 DSCF3578_thumb.jpg

श्री मल्हारी माहात्म्य ९

|| श्री मल्हारी माहात्म्य ||
तळी भंडार
अगडडूम नगारा, सोन्याची जेजुरी |
निळा घोडा, पाव में तोडा |
मस्तकी तुरा, बेंबी हिरा |
अंगावर शाल, सदाहि लाल |
म्हाळसा सुंदरी, आरती करी |
खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भडका ।
बोला सदानंदाचा येळकोट
खंडेराया महाराज की जय |
हरहर महादेव | चिंतामणी मोरया |
आनंदीचा उदो उदो, भैरीचा चांगभले |
सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय |

* * *

DSCF3573

खंडोबाचा दशाक्षरी मंत्र

ॐ नमो मार्तंडभैरवाय ||

तारिख दिनांक 13 .1 ( जानेवारी ) 2013 साल ला भोगी
झाली आहे. घरात तिळ बाजरी ची भाकरी तीळ चटणी व हिरवे वांगे
पावटे तांदूळ तूरडाळ यांची खिचडी केली आहे .! होती .

तारिख दिनांक 15 .1 (जानेवारी )2013 साल १५ .१.( जानेवारी ) २०१३.
करिदिन क्रिक्रांत सण आहे. सुगडी बोळक्यात दूध तांदूळ भात करतात.
किंवा दूध ऊतू जाऊ देतात. मी ग्यास शेगडी वर दूध ऊतू दिले आहे.

bhogi2 bhogi1

Bhogi4 Bhogi3

भाजी चा पेपर मधील फोटो माझ्या ब्लॉग मधील आहे असे वाटते !
शंका येते. !

गुगल मध्ये भोगी असे मराठीत लिहून शोधले तर “प्रतिमा” (images) मध्ये हा फोटो येतो. बहुतेक तेथून घेतलेला दिसतो.


ज्या ब्लॉग वर हा फोटो आहे त्याची लिंक –
https://vasudhalaya.wordpress.com/2011/01/14/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-2/

मकर संक्रांति

स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण हेमंतऋतु पौष शुक्लपक्ष 3 / ३ सोमवार
मकर संक्रांति मकर संक्रांत आहे.
तसेच दिनांक तारीख १४ .१ (जानेवारी) २०१३ साल आहे.
संक्रांत हा सण नेहमी १४.१ ( जानेवारी ) ला येतो.
सूर्य पासून होणारा सण आहे.मकर राशीत सूर्य भ्रमण
करायला सुरुवात करतो त्यामुळे मकर संक्रांत पण म्हणतात.
कधी कधी मकर संक्रांत १५. १. ( जानेवारी ) ला पण येते.
२०११ साल व २०१२ साल ला मकर संक्रांत १५ .१.(जानेवारी ) ला
आलेली आहे. लिप वर्ष अधिक महिना मुळे संक्रांत ची
तारीख १५ .१.(जानेवारी ) होत असते.

DSCF3584 DSCF3583

DSCF3582

१९६७ साल

sankrant

तिळगुळ घ्या गोड बोला

श्री मल्हारी माहात्म्य ८

                   ॐ
|| श्री मल्हारी माहात्म्य ||
भंडारमंत्र
भंडार वाहताना म्हणावयाचा मंत्र
समुद्रभूते | श्रीमैरालप्रियकरि |
गौरीप्रिय ताडिदगौरी | लक्ष्मीसुते नमस्तुते |
                   * * *
|| गोंधळ ||
वाहिली आरती गोंधळाला , गोंधळाला, जेजुरी गडच्या
खंडेरायाला भंडारा उधळा || धृ ||
नऊ लाख पायरी गडा | मगच वर चढा |
मंदिरी दिवटी पेटवा | भंडारा खोबरे उधळा || १ ||
अशी तुझिया मंदिरा | पावशी आह्मा लवकरा ||
भक्त लागे पाया | आवा घुमविशी सुबकाला || ३ ||
या आरतीच्या सुरावरी | वाघ्या – मुरळी चाल धरी |
जीव फुले आमुचा | पाहूनी घंटीला || ४ ||
मल्हारी मार्तंड जय ….मल्हारी मार्तंड जय मल्हार !

DSCF3573

                      ॐ

              खंडोबाचा दशाक्षरी मंत्र

             ॐ नमो मार्तंडभैरवाय ||

श्री मल्हारी माहात्म्य ७

                          ॐ
|| श्री मल्हारी माहात्म्य ||
श्रीमल्हारी मार्तंडाचा ध्यान श्र्लोक
ध्यायेन् मल्हारिदेव कनकगिरीनिभं
म्हालसाभूषिताड्.कम् |
श्र्वेताश्र्वं खड्ग हस्तं विबुधबुध
गणै सैव मानं कृतार्थे ||
युक्तांघ्रि दैत्यमुर्घ्नी
डमरुविलसितं नैशचूर्णाभिरामम् |
नित्यंभक्तेषु तुष्टं
श्र्वगणपरिवृतं नित्यमोंकाररुपमंम् ||
( भावार्थ – ज्याचा वर्ण सोनेरी आहे, म्हाळसा ज्याच्या
मांड् ि वर आहे, ज्याचा घोडा शुभ्र वर्णाचा आहे,
ज्याच्या हातात खड् ग आहे, शहाणे लोक
ज्याची सेवा करतात अशा
मल्हारी देवाचे सदैव ध्यान करवे.
दैत्याच्या मस्तकावर त्याने पाय दिला
असून हाती डमरु घेतला आहे,
भंडाऱ्यामुळे जो सुंदर दिसतो,
त्याच्यासोबत कुत्रे आहेत,भक्तांवर त्याची नित्य
कृपा असते तो हा मल्हारी देव ॐकारस्वरुप आहे.)
                        * * *

DSCF3573

                              ॐ

               खंडोबाचा दशाक्षरी मंत्र

                 ॐ नमो मार्तंडभैरवाय ||

                                        ॐ

                              साल 1966 ! १९६६ !

 

                   DSCF3620

श्री मल्हारी माहात्म्य ६

                                 ॐ
|| श्री मल्हारी माहात्म्य ||
सिध्दहस्त कवि थोरथोर | त्यांनी मल्हारीच्या चरित्रावर |
ग्रंथरचना केली असे सुंदर | त्यानेंच प्रेरणा जाहली || ९६ ||
अनेकांनी लिहिले अनेक ग्रंथ | त्यांतील मुख्यमुख्य मतितार्थ |
खंडोबाभक्तांप्रीत्यर्थ | सारांशरुपें दिला इथें || ९७ ||
ज्यांच्या ग्रंथांचा घेऊनी आधार | गुफिंला हा शब्दसुमनहार |
त्यांचें ऋण मान्य साभार | कृतज्ञतेनेंसर्वथा || ९८ ||
ग्रंथ असेल हा ज्या घरातं | तेथें न राही पिशाच्चभूत |
दुर व्हावया व्याधी समस्त | भंडार भालीं लावावा || ९९ ||
नित्य करितां या ग्रंथाचें पठण | अडुसष्ट तिर्थांचें लाभेल पुण्य |
सकल मनोरथ होतील पूर्ण | मल्हारीच्या कृपेनें || १०० ||
पोथी वाचावी रविवारी तरी | खंडोबा स्मरावा अखंड अंतरीं |
श्र्वान एखादा येतां दारीं | अन्नदान अवश्यकरावें || १०१ ||
करितां खंडोबा माहात्म्य श्रवण | बहात्तर रोग जातीपळून |
मिळेल आयुरा रोग्यधन | निश्र्चयें हे जाणावें || १०२ ||
खंडोबाचा दशाक्षरी मंत्रजप जाळील सप्तजन्मींचें पाप |
अशुभ तळेल आपोआप | म्हणे मिलिंदमाधव || १०३ ||
शक अठराशेंसत्याण्णवासी | आश्र्विनमासीं शुक्लपक्षीं |
गुरुवारी ललितापंचमिसी | ग्रंथ पूर्ण झाला हा ||१०४ ||
श्रीखंडोबार्पणमस्तु || शुभंभवतु || ॐ शांति : शांति : शांति : ||
भक्तकवि मिलिंदमाधवकृत ‘ मल्हारीमार्तंड विजय अर्थात्
खंडोबा माहात्म्य ‘ ग्रंथ संपूर्ण ||
            ॐ
खंडोबाचा दशाक्षरी मंत्र
ॐ नमो मार्तंडभैरवाय ||
हा मंत्र कमीतकमी 108 / १०८ एकशेआठ वेळा जपावा.

DSCF3573

मार्गशीर्ष अमावास्या

                                ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण हेमंतऋतु मार्गशीर्ष कृष्णपक्ष ३० शुक्रवार
दर्ष वेळा अमावास्या आहे.
तसेच दिनांक तारीख ११ .१(जानेवारी) २०१३ साल आहे.
शुक्रवार आहे.

DSCF3578

श्री मल्हारी ५

                                       ॐ
|| श्री मल्हारी मल्हारी ||
नैदेद्द फेकिला म्हणून | खंडोबा झाला कोपायमान |
त्याच्या शापाने तो कृष्ण | श्र्वानरुप जाहाला || ८४ ||
पुढें नारदानें करुनी प्रयत्न भंडार मिळविला वाघ्याकडून |
तो शिपडतां श्र्वानावरुन | कुत्राचा कृष्ण जाहला || ८५ ||
ऐसें चमत्कार झाले किती | याची मुळीच नसे गणती |
चोर दरोडेखोरांप्रती | जबरदस्त शिक्षा होतसे || ८६ ||
मात्र भक्तांची हांक ऐकुन | धाव घेतसे न लागतां क्षण ||
बिकट संकटे करी निवारण | ऐसा अनुभव सर्वांचा || ८७ ||
कोणत्या रुपें केव्हां येईल | हें कोणालाही नच कळेल |
धावा करितां होईला मंगल | अमंगल अवधें तळेल || ८८ ||
नवस करितां खंडोबामागावें स | इच्छापूर्ति होईल खास |
म्हणुनी सर्वांनी तयास शरण जावें सर्वदा || ८९ ||
विडे खोबरें भंडार | यांनी तळी भरावी सुंदर |
त्रिवार करावा जयजयकार | ‘ सदानंदाचा येळकोट येळकोट ‘ || ९० ||
जन्मा येऊनी एकदांतरी | पहावी खंडोबाची जेजुरी |
ध्रध्दा ठेवुनी त्याचेवरी | मनीं मागणें || ९१ ||
जय खडोबा जय म्हाळसादेवी | सदैव आम्हांसी सुखी ठेवी |
योगक्षेमाची चिंता नसावी | विजय व्हावा सर्वत्र || ९२ ||
पत्नी सुना कन्या पुत्र | कुटुंबपरिवार आणि पौत्र |
बंधुभगिनी आप्त मित्र | सुखी असोत सर्वही || ९३ ||
नोकरचाकर गुरेंढोरें | विद्दा वैभव मिळो सारें |
वाहनसौख्यही लाभो खरें | शत्रु कोणी नसावा || ९४ ||
दुरित अवघे व्हावें दुर | ज्ञानसूर्ये जावो अज्ञानतिमिर |
धनधान्य मिळो अपार | हीच पायी प्रार्थना || ९५ ||
KEDAARA JEJURI YETHE TUJHI MOUMJA JHAALI TEMVHAA MI JEJURI LAA AALELI !

DSCF3573     

                       ॐ

         खंडोबाचा दशाक्षरी मंत्र

         ॐ नमो मार्तंडभैरवाय ||

श्री नरसोबावाडी

 वसुधालय लॉग मध्ये मी श्री दत्त दर्शन चे २८ ब्लॉग केले आहे.
तारीख दिनांक ५ ,१ जानेवारी २०१३ साल ला २८ वा ब्लॉग करून
पूर्ण केले आहेत माझ्या मनात आले आपण मी नरसोबावाडी येथे
जा ऊ न यावे आमचे घरोबा असलेले आराध्ये आराद्दे १९६७ साल
पासून चे त्यांना विचारले ते मला वहिनी च आताही म्हणतात.!
तारीख दिनांक ९ ,१ जानेवारी २०१३ साल ला आह्मी रिक्षा ने
नरसोबावाडी येथे जाऊन आलो आहोत आले आहे. !
नदी मध्ये पाय धुतले. श्री दत्त दर्शन घेतले निवांत बसलो.
प्रसाद घेतला भात आमटी वांग याची भाजी व गोड शिरा असा प्रसाद घेतला
लिहून झाले व ठरल्या प्रमाणे नरसोबावाडी चे श्री दत्त दर्शन व प्रसाद पण
मिळाला त्या बद्दल बध्दल मला खुप मना पासून हलक व तृप्तता वाटत आहे.!
पुष्कर म्हणाले तेथे कऊट वडी छान मिळते येताना आठवण याची
कऊट वडी घेतली घरी आणली ! आहे.! घरात देवाला आम्हाला प्रसाद
झाला ! मिळाला ! आहे ! खाल्ला ! आहे ! पूर्ण श्री दत्त दर्शन प्रसाद
मिळाला मन अगदी तृप्त व शांत आहे हे नक्की चं !

DSCF3602 DSCF3601

dscf3603 DSCF3606

DSCF3611 DSCF3612

DSCF3616 DSCF3619

DSCF3596 DSCF3595

श्री मल्हारी माहात्म्य ४

                                          ॐ
|| श्री मल्हारी माहात्म्य ||
नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखालीं | वाघ आले धनगराजवळी |
त्यांनी मेंढीची मागणी केली । तेव्हां चमत्कार जाहला || ७६ ||
खंदोबानें स्वत: त्यांचेवर | फुंकिला आपला भंडार |
तोचं झाला त्यांचा उध्दारा | मानवरुपी वाघे झाले ते || ७७ ||
एकदां यावनी सैन्य हल्लेखोर पाठलाग | चाल करुनी आले जेजुरीवर |
तेव्हां तेथील रखवालदार | हल्ल्यांत ठार जाहला || ७८ ||
सैन्य थोडें पुढें आलें | गडाचा तट फोडूं लागलें |
तेव्हां खंदोबानें काय केलें | तेंच आतां ऐकावें || ७९ ||
एक छोटें छिद्र निर्माण झालें | त्यातून लाखों भुगें बाहेर पडले |
अविधांच्या सेनेला बेजार केलें | त्यांचा करोनी || ८० ||
शत्रुसेना पळूं लागली | गडगडता गडाखालीं गेली |
त्यांची भली खोड मोडली | जाज्वल्य मार्तंडभैरवानें || ८१ ||
ऐसा तो देव खंडोबा | म्लेंच्छ करी ‘ तोबा तोबा ‘|
त्या पवित्र गडाचा ताबा | घेतां न आला तयाला || ८२ ||
पूर्वी एकदां बाळकृष्णानें | मार्तंडाचा नैवेद्द फेकिला रागानें |
तेव्हां त्याला यशोदेनें | उखळीस बांधून ठेविला || ८३ ||

DSCF3573

                             ॐ

                   खंडोबाचा दशाक्षरी मंत्र

                  ॐ नमो मार्तंडभैरवाय ||

शंगदाणे गूळ तूप गोड

                         ॐ
शंगदाणे व गूळ याचे गोड दाणे
मुठभर कच्चे शेंगदाणे घेतले थोडा मूठभर गूळ घेतला.
दोन चमचे सादूक तूप घेतले.गयास पेटविला त्यावर पातेले
ठेवले.दोन चमचे तूप घातले.गूळ घातला पातळ करुन घेतला.
त्यात कच्चेच सालासगट शेंगदाणे घातले. तूप व गूळ कच्चे शेंगदाणे
ला गूळ लागे पर्यंत सारखे केले.शेंगदाणे गूळ व सादूक तूप सारखे एकत्र
केले चिकी केली नाही .सुटे शुटे शेंगदाणे खाता येतील असे ठेवले.
एक एक गूळ तूप लागलेला शेंगदाणा निघाला
गूळ तूप तळलेला चिकट थोडा गोड सादूक तूपाचा खमंग पणा
गोड गूळ लावलेला चांगला चविष्ट लागतो गोड लागतो.
आता 14 जानेवारी १४ ला आली आहे तीळ गूळ याचे चकी लाडू
रेवडी पोळ्या केल्या जातील व वाटणे लुटणे होईल !
तरी पण गूळ तूप कच्चे शेंगदाणे गोड खाण्यास चांगले एक एक
तोंडात टाकण्यास नक्कीचं आवडणार ! फार तीळ खाऊन उष्ण
होण्याची शक्यता असते !

DSCF3585 DSCF3586

                             DSCF3578

श्री मल्हारी महात्म्य ३

                                                   ॐ
|| श्री मल्हारी महात्म्य ||
जिकडे तिकडे पिवळेंच दिसतें | जेजुरी जणुं सोन्याची भासते |
गुप्तरुपें गंगा राहाते | गडाखालीं बाणाई || ६६ ||
आश्र्विन शुक्ल नवमीसी | आणि त्रिपुरी पौर्णिमेसी |
शिवाय चंपाषष्ठीचे दिवशीं | खंडोबा देव पुजावा || ६७ ||
खंडोबादिवस राविवार | शुध्दाचरण असावें दिवसभर |
खोबरें दवणा, बेल, भंडारा | भक्तिभावें वाहावा || ६८ ||
पवित्र महिना मार्गशीर्ष | त्याच्या शुक्ल प्रतिपदेस | मार्तंडभैरवाच्या षड् रात्रोत्सवास | हर्षे प्रारंभ करावा || ६९ ||
उत्सव करावा सहा दिवस | मनींची इच्छा सांगावी खंदोबास |
मग शेवटीं चंपासष्ठीस | मार्तंडभैरवोत्थापन करावें || ७० ||
खंडोबासी पुरणपोळी व खीर | भरित, रोडगा प्रिय फार |
हळदीचा पिवळा भंडार | खंडोबावरी उधळावा || ७१ ||
मल्हारीमार्तंड देव थोर | भक्तांसाठी करी चमत्कार |
त्याचें माहात्म्य असे अपार किती कैसें वर्णावें || ७२ ||
एक कथा असे आगळी | मुरलीची ‘ मुरळी ‘ झाली |
वाघांनी मानवरुपें घेतली | तेच ‘ वाघे जाहले || ७३ ||
तिलोत्तमानामें लावण्यवती | एक सुंदर अप्सरा होती |
इंद्र – शापें मुरली रुपें ती | कृष्णाहातीं धोभली || ७४ ||
पुढें बाणाईच्या शापानें | मुरली नाचूं लागली मुरळीरुपानें |
तीच प्रथा कालांतरानें | तेथें रूढ जाहली || ७५ ||

DSCF3573

                    ॐ

        खंडोबाचा दशाक्षरी मंत्र

       ॐ नमो मार्तंडभैरवाय ||

उंच पाखरे जाती

अॅटलांटा वरून स्वारी

श्री मल्हारी माहात्म्य २

                                            ॐ
|| श्री मल्हारी माहात्म्य ||
मार्तंडभैरवासी आला संताप | असुरसेना कापी सपासप |
घायाळ मल्लदैत्य आपोआप | शरण आला भैरवा || ५४ ||
मरतां मरतां म्हणे हात जोडुनी | ‘ महादेवा तुझी अगाध करणी |
तव हस्तें आला म्र्यत्यु म्हणोनी | उध्दार माझा जाहला || ५५ ||
आता चरणी एक विनवणी | माझें नावं तव नामीं जोडुनी |
याच ठिकाणीं वास्तव्य करुनी | दर्शन द्दावें सर्वांसी ‘ || ५६ ||
‘ तथास्तु ‘ म्हणाला मार्तंडभैरव | मल्लारिमार्तंड घेतलें नांव |
कडेपठारीं केलें वास्तव्य | पुष्पवृष्टि केली देवांनी || ५७ ||
मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीदिनीं | स्वयंभू लिंगांच्या रुपानीं |
वास केला शिवपार्वतिनीं | मल्हारीची ही कथा असे || ५८ ||
जय मिळाला जेथें तो जयाद्रि | खंडोबा नांव कारण खड्गधारी |
असंख्याचें कुलदैवत मल्हारी | दिमाखानें विराजतो || ५९ ||
जयाद्रीचें रूपांतर जयपुरी | जयपुरीचें रूपांतर जेजुरी |
खंडोबा त्या कडेपठारी | आणि ठिकठिकाणीं अवतरला || ६० ||
पुढें केलें मनुष्यरूप धारण | महाल क्षेत्रातील मुलीशीं केलें लग्न |
म्हाळसानामें ती तेव्हांपासून | प्रसिध्द तेथें जाहली || ६१ ||
पौष शुध्द पौर्णिमेला | सातारा जिल्ह्यातील पालीला |
म्हाळसा खंडोबाचा विवाह झाला | तेही खंडोबास्थान असे || ६२ ||
श्रीशिव आणि पार्वतीची | इच्छा योजना पूर्वजन्मींची |
या अवतारीं पूर्ण झाली साची | खंडोबा म्हाळसा रुपानें || ६३ ||
खड्गधारी म्हणुनी खंडोबा म्हणती | हयपती म्हणूनी तो हैबती |
तोच मल्हारी म्हाळसापती | कैवार घेई भक्तांचा || ६४ ||
हळदीचें पिवळे जर्द चूर्ण अनेक रोगांचें करी निवारण |
यासाठीं भंडार म्हणून | उधळती भाली लाविती || ६५ ||

          DSCF3573

                                ॐ

                     खंडोबाचा दशाक्षरी मंत्र

                    ॐ नमो मार्तंडभैरवाय ||

अंतर्मन

जसे काही… आपल्या मध्ये वेगवेगळ्या खोलीच्या विहिरी आहेत
काही पटकन छोट्याश्या पावसानी सुध्दा भरतात
काही खूप खोल आहेत… पटकन भरण्यासाठी

– हफिझ संत कवी

 

श्री मल्हारी माहात्म्य १

                                             ॐ
|| श्री मल्हारी माहात्म्य ||
नमन – श्लोक
असे जेजुरी राजधानी जयाची | सती म्हळसा पट्टराणी साची ||
असा थोर मार्तंडराणा मल्हारी | सदा वंदितों देव तो खड्गधारी || १ ||
|| सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट ||
               * * *
मल्हारीमार्तंडविजय अर्थात् खंडोबा माहात्म्य
ॐनम : शिवाय || ॐनमो श्रीगजवदना | गणराया गौरीनंदना |
विघ्येशा भवभयहरणा | नमन माझें साष्टांगी || १ ||
नंतर नमिली श्रीसरस्वती | जगन्माता भगवती |
ब्रह्मकुमारी विणावती | विद्दादात्री विश्र्वाची || २ ||
नमन तैसें गुरुवर्या | सुखनिधान सद्गुरुराया |
स्मरुनी त्या पवित्र पायां | चित्तशुध्दि जाहली || ३ ||
थोर ऋषिमुनी संतजन | बुधगण आणि सज्जन |
करुनि तयांसी नमन | ग्रंथरचना आरंभिली || ४ ||
धन्य धन्य जेजुरीचा डोंगर | मार्तंड मल्हारीचे एक क्षेत्र थोर |
घ्यावयासी भक्तांचा कैवार | खंडोबा तेथें उभा असे || ५ ||
हें दैवत जागृतभारी | नांव कां पडलें मल्लारी |
तीच गोड कथा सारी | मिलिंदमाधव वर्णितो || ६ ||
एके काळीं दोन दैत्य | बलाढ्य प्रचंड मदनमस्त |
माजले झाले उन्मत्त | पिडिती छळिती सर्वांना || ७ ||
एक मणी दुसरा मल्ल | क्रूर भयंकर महाचांडाळ |
पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ | स्वैराचारें जाळिती || ८ ||
निर्दय निष्ठुर महादुष्ट | सुंदर तें करिती नष्ट |
सज्जनांवरी घोर अरिष्ट | अकस्मात ते आणिती || ९ ||
देवदेवता होऊनी भयभीत | वाट मिळेल तिकडे सुटले पळत |
ऋषिमुनी सिध्द समस्त | लपले गिरिकंदरीं || १० ||

  DSCF3561 

                      ॐ

       खंडोबा चा दशाक्षरी मंत्र

       ॐ नमो मार्तंडभैरवाय ||

कोकाकोला

कोकाकोला
मी लहान असताना पेय घरगुती पिण्यास मिळत.ताक आमटी दुध चहा
सार असे काही पेय नव्हते.परिक्षा झाली की आमचे भाऊ ( भाऊ च त्यांना म्हणत होतो.)
ते हॉटेल मध्ये नेत व आयस्क्रीम खाण्यासा देत असतं तेही आंबा आयस्क्रीम च असे नंतर
कॉफी कधी कधी मिळत असे.खूप मोठे झाल्या नंतर हॉटेल मध्ये monga कोल्डरींग पिण्यास
मिळे कधी कधी कोकाकोला पण पिण्यासा मिळे straw ने दहा मिनिटमध्ये सर्व संपावलागायचे.
नंतर घरी फ्रीज घरी आले.थोड आयस्क्रीम घरी तयार करायला शिकलो जेली पण करायला शिकलो.
किती फरक पडतो.
मी व हे मुला कडे व सौ सूनबाई कडे अमेरिका येथे गेलो तेथे कोकाकोला factory पाहिली
किती भरभर कोकाकोला च्या बाटल्या फिरतांना दिसतात.तीन चार मजली कोकाकोला च
पाहायला मिळते आह्मी तेथे कोकाकोला प्यालो असे वाटतं आठवत नाही
वरच्या मजल्या वरून खालच्या मजल्यात कोणकोण आहे ते पण दिसत,
व एक जागा आहे त्यात गोल कापलेले आहे त्यात आपण चेहरा ठेवावयाचा व आपला फोटो
काढता येतो माझा फोटो माझ्या सौ सूनबाई ने काढलेला आठवतो कोकाकोला येथे काढलेला
फोटो आठवतो मस्त कोकाकोला factory अमेरिका येथे पाहण्यास मिळाली.
Atlanta येथे !


 

मुळा पाला थालिपीठ

                                      ॐ
मुळा व मुळाचा पाला याचे थालिपीठ :
एक मुळा पाला सगट 8 / ८ आठ रुपये ला घेतला आणला.मिळाला .
मुळा व पाला धुतला पाला विळी ने बसून कापला चिरला.मुळा किसनी ने किसला.
त्यात पाणी न घालता ज्वारीचे पीठ हरबरा डाळी चे पीठ अंदाजाने घातले.
मीठ लाल तिखट हिंग हळद कच्चतेल मोहन म्हणून घातले.सर्व एकत्र
गोळा केला.तवा वर तेल हाताने लावून पसरविले.त्यावर मुळा चा केलेला गोळा
ठेवून हाताने पसरविला भोक पाडली. ग्यास पेटवून तवा थालीपिठा चा ठेवला दोन्ही
बाजूने मुळा चे थालीपीठ भाजले भाजून घेतले मस्त मुळा पाला ज्वारीचे पीठ हरबरा डाळीचे
पीठ मीठ हिंग लाल तिखट कच्च तेल तवा वर ग्यासवर भाजलेले थालीपीठ तयार झाले केले.
दही बरोबर खाण्यासा मुळा व पाला याची चव एकदम छान आली आहे.

DSCF3574 DSCF3575

DSCF3576 DSCF3577

श्रीदत्त दर्शन २८

                                  ॐ
श्रीदत्त दर्शन
|| दत्तात्रेयांची आरती ||
त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा
| त्रभुवनी आधार त्रैलोक्य राणा |
नेति नेति शब्द न ये अनुमाना |
सुरवर मुनिवर योगी समाधि न ये ध्याना || १ ||
जय देव जय देव जय सद् गुरु दत्ता | आरती ओवाळीता
हरसि भवचिंता || ध्रु. || सबाह्य अभ्यंतरीं तू एक दत्त |
अभाग्यासि कैची न कळे ही मात | पराही परतली येथे
कैंचा हा हेत | जन्म मरणाचा पुरलासे अंत || २ ||
दत्त येवोनिया उभा ठाकला | सद् भावे साष्टांगें
प्रणिपात केला | प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला |
जन्मरणाचा फेरा चुकविला || ३ ||
दत्त दत्त ऐसें लागलें ध्यान | हारपले मन झालें उन्मन |
मीतूंपणाची झाली बोळवण | एका जनार्दनी श्रीदत्तध्यान || ४ ||
( समाप्त )

DSCF3526 DSCF3533DSCF2827DSCF3467

DSCF3542ImageDSCF2852 DSCF3507DSCF2882 DSCF2883DSCF3512

श्रीदत्त दर्शन २७

                                         ॐ
श्रीदत्त दर्शन
श्रीदत्तात्रेयाची भूपाळी
समर्थ रामदास हे सर्वार्थाने ‘ अवधूत ‘ होते.
त्यामुळे ते रामोपासक असले तरी, दत्तात्रेयांशी
त्यांच्या ह्रदयाचे जवळकीचे नाते होते.समर्थ पहाटेच
कृष्णेचे स्नान करुन व पूजासाहित्य हाती घेऊन ‘ कवाड ‘
उघडण्याची व वाट पाहत आहेत आणि भक्तीभावाने दत्तप्रभूला
आवाहन करीत आहेत, असे ह्रदययंगम दृश्य पुढील भूपाळीत पाहा :
उठिं उठिं बा दत्तात्रेया | भानू करुं पाहे उदया |
करि दिनांवरि तूं दया | चरण दावीं वेगें बा || ध्रु .||
मंद वायु जो सुटला | पक्षी करितां किलबिला |
दिपवर्ण शुध्द जाहला | पूर्व दिशा उजळली || १ ||
करुनी कृष्णेचें स्नान | घेउनि पूजेचे सामान |
मनीं लागलें हें ध्यान | कवाड केव्हां उघडेल || २ ||
आले देवादिका दर्शना | त्यांच्या पुरवावया कामना |
संतोषोनि आपुल्या मना | तीर्थप्रसाद अर्पावा || ३ ||
गुरु त्रयमूर्ती अवतार | केला पतितांचा उध्दार |
म्हणूनी घेतला अवतार | भक्त तारावयासी || ४ ||
रामदास लागे पायीं | हेचिं मागणें मज देईं |
तूंचि माझी बाप-माई | करुणा करीं भक्तासीं || ५ ||

DSCF3560 DSCF3507

DSCF3527 DSCF2828

श्रीदत्त दर्शन २६

                                    ॐ
श्रीदत्त दर्शन
औदुंबरातळी निवास
दत्तत्रेयांचा वास औदुंबरातळी असतो अशी सर्व
दत्तभक्तांची श्रध्दा आहे आणि म्हणूनच
‘ गुरुचरित्र गुरुचरित्रा ‘ दि ग्रंथांचे आणि ध्यानधारणादि साधन
औदुंबरातळी करण्याचे विशेष फल मानले जाते.हे
औदुंबराचे महिमान नरसिंह सरस्वतीं नी
औदुंबराच्या छायेत भिलवडी येथे चार महिने वास्तव्य
केल्यामुळे रूढ झाले.’ गुरुचरित्रा ‘ च्या एकोणिसाव्या अध्यायात
अध्यायात औदुंबर महिमा वर्णन केला आहे.
वरील विवेचना वरुन एक गोष्ट स्पष्ट होते, की दत्त देवता गेली
हजार वर्षे क्रमश : विकास पावत आली आहे. आज सर्वमान्य
झालेले दत्तास्वरुप ही सदैव स्थिर राहील, असे सांगता येणार नाही.
भक्तांच्या अनुभूती नुसार आणि चिंतकांच्या प्रतिभेतून उद् भव णाऱ्या
कल्पनां नुसार त्या रूपांत कदाचित् आणखी ही भर पदत जाईल.
दत्तावताराची ऐतिहासिक कामगिरी तर खचित च फार मोठी आहे ;
परंतु दत्तोपासने च्या व्यापक व उदार अशा समन्वयात्मक
दृष्टिमुळे जीवनाच्या चिरंतन व शाश्र्वत मूल्यांवर भर दिल्यामुळे
ही उपासना प्रणाली व तिचे तत्वज्ञान आजही नितांत अनुकरणीय आहे
व पुढे ही तसेच राहील यात तिळमात्र ही संशय नाहीं
जो पर्यंत जगात माणूस तापत्रयांनी ग्रस्त राहील व जो पर्यंत त्याला
स्वत: च्या अपूर्ण तेची जाणीव व बोचणि राहील तोपर्यंत
दत्तात्रेय अज्ञान – अंध:कारात त्याला दीपस्तंभा प्रमाणे
पथप्रदर्शन करीत राहतील.
|| श्रीगुरुदेव दत्त ||

      * * *

DSCF3532 DSCF3511

DSCF3512 DSCF3533

DSCF3507 DSC00042a

शिक्षक

खरा शिक्षक तो आहे जो तुम्हाला मार्ग दाखवतो परंतु तुम्हाला स्वतंत्र पणे चालू देतो

ज्ञानी शिक्षक तो आहे जो तुम्हाला दरवाजा दाखवितो परंतु त्याच्या मागे काय आहे ह्याचा विचार तुम्हाला करू देतो 

खरा शिक्षक तो आहे जो तुम्हाला पुढाकार घ्यायला शिकवतो, मागे मागे चालायला नाही 

अंतर्ज्ञानी शिक्षक तो आहे जो स्वतः हि विध्यार्थी असतो 

सत्य शिक्षक तो आहे जो जाणतो कि विध्यार्त्याला आता मला सोडून जा असे केंव्हा सांगावे 

दयाळू शिक्षक तो आहे जो उदाहरणाने शिकवतो 

धैर्यवान शिक्षक तो आहे जो आपल्या ज्ञाना पलीकडे जायचे धैर्य दाखवतो  

सर्वात चांगला शिक्षक तो आहे जो तुमच्यातील शिक्षकाचा विकास करवतो कि तुम्ही खरे, ज्ञानी, अंतर्ज्ञानी, सत्य, दयाळू आणि धैर्यवान शिक्षक बनावे. 

श्रीदत्त दर्शन २५

                                            ॐ
श्रीदत्त दर्शन

दत्तात्रेयां बरोबर असलेली धेनु ( गाय ) ही पृथ्वी चे प्रतीक आहे.
तसेच चार श्र्वान (कुत्रा) चारी वेदांचे प्रतीक आहेत. त्यांचा डावा भाग
ईश्र्वर स्वरुप असून तो त्यांचे मायेवरील प्रभुत्व दाखवितो.त्यांचा
उजवा भाग गुरुस्वरूप असून तो भक्तां ना माया भ्रमनिवर्तपूर्वक मोक्षदायक
आहे.दत्त हे नावच त्यांच्या लोकोपकारित्वाचे निदर्शक आहे.’ दत्त ‘ म्हणजे
ज्यांनी स्वभक्ताला सर्व काही दिले आहे व स्वत:सकट सर्वस्वाचा दाता तो ‘ दत्त !
भूत, प्रेत पिशाच्चादीं चे तर दत्तात्रेय कर्दनकाळ च आहेत.हा त्यांच्या अवतारा चा
आणखी एक महत्वाचा विशेष होय.वासुदेवनंद सरस्वती यांच्या दत्तस्तवस्तोत्राच्या
पहिल्या श्र्लोकात हा त्यांचा विशेष दखवितात –
भूतप्रेतपिशाचाद्दा यस्य स्मरणमात्रत 😐 दूरादेव पलायंते दत्तात्रेय नमामि तम् ||
‘ अवधूत ‘ शब्द उच्चारला, की सर्वसामान्यां च्या डोळ्यां समोर दत्तत्रेयां ची मूर्ती उभी राहते.
याचे कारण की, ‘ अवधुतावस्था दत्तत्रेयां शीं दत्तसंप्रदाया शी अभिन्न आहे,
इतकेच नव्हे तर ‘ अवधूत ‘ शब्द कानावर पडताच आपण तत्काळ नतमस्तक होतो.

DSCF3511 DSCF3507DSCF2821 DSCF2873

श्रीदत्त दर्शन २४


श्रीदत्त दर्शन
महाराष्ट्र : दत्तावताराची लिलाभूमी
महाराष्ट्र हीच दत्तावताराची लिलाभूमी असल्यामुळे
दत्तोपासनेचे प्राबल्य येथे नांदणे स्वाभाविक आहे.आज
‘ तीन शिरे सहा हात ‘ या स्वरुपाची दत्त देवता संपूर्ण भारतात
प्रसृत झाली असली, तरी दत्तभक्ती चा संप्रदाय इतिहासकाळात
किंवा आजही महाराष्ट्र – कर्नाटक काबाहेर नांदलेला नाही श्रीनरसिंह सरस्वतीं
च्या गाणगापूर येथील वास्तव्यामुळे दत्तो पासनेचा महाराष्ट्राप्रमाणे
कर्नातकात ही व् विपुल झाला. गुरुचरित्राचा कर्ता सरस्वती हा कानडी होता.
आजही कानडी दत्तभक्तांची संख्या मोठी आहे.
नाथसंप्रदायात दत्तदेवतेचा महत्व प्राप्त झाले होते आणि हा संप्रदाय
संपूर्ण भारतात प्रसार पावला होता आणि म्हणून च त्या संप्रदायाच्या
केंद्रस्थानी कदाचित काही दत्तमूर्तीं ची वा पादुकांची प्रतिष्ठापना
झालेली असेल; परंतु नाथसंप्रदायात देवतांच्या उपासनेच्या
विधिविधानातला गौण स्थान असल्यामुळे तशी शक्यता कमी आहे.
दत्तसंप्रदायाची उन्नती विक्रम संवताच्या चोउदाव्या शतकात
विशेषत्वाने झाली आणि त्याचे मुख्य महाराष्ट्र हेच राहिले.
या संप्रदायाच्या पुनत्थानाच्या काळातील पहिले दत्तवतार
श्रीपाद श्रीवल्लभ हे महाराष्ट्रीयन नव्हते ते गोदावरी च्या
मुखाजवळील पिठापूर चे त्यांच्या पूर्वीं त्या प्रदेशात
दत्तोपासने चा प्रसार झाला असावा.
अतिथिरुपाने घरी आलेल्या दत्तत्रेयाने च त्यांच्या आई
आशिर्वाद दिल्याची कथा गुरुचरित्रात आहे.हा दारी आलेला
योगी दत्तोपासनेच्या पंरपरे तील असावा.
श्रीपाद श्रीवल्लभ नंतर दुसरे दत्तवतार
सरस्वती यांच्या शिष्या पैकी पहिला शिष्य प्रयाग चा
माधव सरस्वती त्यांच्या शिष्यात महाराष्ट्राबाहेर अनेक
शिष्य होते.शिष्य समुहाला त्यांनी तीर्थ यात्रेचा आदेश देउन
आपल्या पासून दुर धाडले होते.तीर्थ भ्रमण करणा रे यांनी
दत्तभक्ती चा प्रसार केला असणार असो. DSCF2800

DSCF2807 DSCF2803DSCF2801 DSCF3507DSCF2802 DSCF2788

श्रीदत्त दर्शन २२


श्रीदत्त दर्शन
दत्तसंप्रदाय ही मराठी भक्तीपरंपरेची एक प्रभावी धारा आहे.
नाथसंप्रदाय महानुभाव महानुभाव संप्रदाय , वारकरी संप्रदाय
दत्तसंप्रदाय आणि समर्थ संप्रदाय या पंचगंगां नी प्राचीन मराठी साहित्य व
संस्कृती यांचे सर्वागीण भरणपोषण केले.या पाच मुख्य प्रवाहात आणखी ही लहान – सहान
निर्झरांनी आपापले जीहीवनौघ आणून सोडले आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक श्रीवृद्धी करण्यात
आपापला वाटा उचलला
धर्म आणि अध्यात्माच्या क्षेत्रात व्यापक आणि उदार असा समन्वयात्मक दृष्टीकोन हा
दत्तावताराचा आणखी एक महत्वाचा विशेष होय. दत्तात्रेय म्हणजे त्रिमूर्ती
– ब्रह्मा – विष्णु आणि महेश एकाच परब्रह्म परमात्म्याची सृष्टी व्यापाराच्या
संदर्भात कार्यभेदाने भिन्न झालेली; परंतु तत्वत: एकच असलेली तीन रूपे होत.
थोडक्यात दत्तमूर्ती न हणजे एकात अनेकत्वाचे व अनेकात एकत्वाचे प्रतीक होय.
दत्तात्रेयांचे ‘ तीन शिरे सहा हात ‘ हे सगुणरुप प्रसिध्द च आहे.त्याच्या ध्यानासाठी
प्रसिध्द असलेला हा संस्कृत श्र्लोक पाहा –
मालाकंडलुरध : करपादयुग्मे , मध्यस्थपाणियुगुले डमरूत्रिशुले |
यस्य स्त उर्ध्वकरयो : शुभशंखचक्रे, वन्दे तमत्रिवरदं भुजषट् कतुक्तम् ||
दत्तत्रेयाच्या या सगुणमूर्ती ने धारण केलेल्य निरानिराळया वस्तू प्रतीकात्मक आहेत.
सगुनोपासने साठी या प्रतीकां चे रहस्य समजून घेणे क्रमप्राप्त आहे.याचे कारण असे की
जी गोष्ट आंतरिक रहस्य जाणून श्रध्दापूर्वक केली जाते ती अधिक फलदायी होते.
असा शास्त्रसिध्दान्त आहे – ” यदेव विद्दावा करोति श्रध्दया उपनिषदा तदेव विर्यवत्तरं भवति “।।
गुरुदेवां च्या उजव्या बाजूचे खालच्या हातात रुद्राक्षांची माळ आहे. त्यांची संख्या बावन्न आहे.
ती बावन्न वर्णां ची प्रतीक आहे. जगातील सर्व मंत्र बावन्न वर्णां मध्ये सामावलेले आहेत
सहाजिकच ही माळ भगवंताच्या सबीज सरहस्य सर्व मंत्रां वरील प्रभुत्वाची द्दोतक आहे.
त्यातील जल हे संसार स्थितिला कारणीभूत होणाऱ्या कर्माचे प्रतीक आहे.
ईश्र्वर हा कर्मफलांचा नियंता आहे हेही यावरून ध्वनित होते.

DSCF3532 DSCF2798DSCF2823 DSCF2826

DSCF3507 DSCF2825

श्रीदत्त दर्शन २३


श्रीदत्त दर्शन
नरसिंह सरस्वतीं च्या अवतार चरित्राचा प्रभाव गेल्या
पाच शतकांवर उमटला आहे.औदुंबर,नरसोबा ची वाडी आणि
गाणगापूर ही त्यांच्या निवासमुळे उदयास आलेली दत्तक्षेत्रे म्हणजे साधनेच्या
क्षेत्रांतील जागत्या ज्योती आहेत.
दत्तात्रेय बालब्रह्मचारी, अनिकेत ( म्हणजे कोठेच कायमचे वास्तव्य न करणारे )
अयाचित ( म्हणजे याचना न करता मिळेल तेवढयावर संतोषाने राहणारे ) व
परिव्राजक ( म्हणजे संन्यासी ) असा आहेत. ‘ योगीश्र्वर ‘, ‘ अवधूत ‘ असेही त्यांचे
वर्णन आढळते .
दत्तात्रेयांचे अवतार चिरंतन, चिरंजीव असा आहे.राम व कृष्ण या अवतारां प्रमाणे
दत्तत्रेयांचा अवतार केवळ दुस्कृत्यांचा विनाश करण्यासाठी नसुन अज्ञानरुपी अंध:काराचा
नाश करण्यासाठी आहे. या अवताराची सुजाण जाणीव श्रीधर स्वामींच्या
‘ अवतारही उदंड होती । सर्वेचि मागुती विलया जाती ।
तैशी नव्हे श्रीदत्तात्रेयमूर्ति । नाश कल्पान्ती असेना ।। ”
( रामविजय -१३ -२१ )
या चरणात प्रभावीपणे प्रगट झाली आहे. किंबुहुना दत्तात्रेयांच्या
अवताराअचा प्रमुख उद्देश अखंड ज्ञानदानाने प्रबोधन हाच आहे.
दत्तत्रेयांचा अवतार म्हणजे साक्षात परब्रह्ममूर्ती सद् गुरुचा अवतार.
शांडिल्योपानिषदांत यांना ‘ विश्र्वगुरू ‘ म्हटले आहे. दत्तत्रेयंच्या
सगुणमूर्ती उजवे अंग गुरुरुप असून डावे मायाधिपती ईश्र्वररूप आहे.
दत्तात्रेय हे ‘ गुरुतत्वाचे प्रतीक ‘, ‘ गुरुतत्वाचा अंतिम आदर्श ‘ आहेत
आणि म्हनुणच अन्य संप्रदाय ही त्यांना आद्दगुरु समजून अग्रपूजेचा
मान देत असल्यास नवल ते काय !
गुरुदेव दत्तत्रेयांत ‘ ईश्र्वर ‘ आणि ‘ गुरु ‘ अशी दोन्ही रूपे सामावलेली
असल्यामुळे उपासकांना श्रीगुरु व ईश्र्वर या दोघांची उपासना एकाच
वेळी घडते व तिचे दुहेरी फल ही मिळते, हा या अवताराचा प्रमुख विशेष
होय आणि यावरुन त्यांच्या ‘ श्रीगुरुदेवदत्त ‘ हा जयघोष अगदी
अर्थपूर्ण वाटतो.
दत्तात्रेय नुसतेच गुरुदेव नसून ते ‘ अवधूतचिंतन गुरुदेव दत्त ‘
या स्वरुपात आहेत. अवधूत मूर्ती ची पूजनियता पुढील ओविवरुण दिसून येते.
” सकळ ब्रह्मांडींची दैवते धावती | अवधूतमूर्ती पहावया || ”
‘ अवधूत ‘ हा शब्द अध्यात्ममार्गात परमोत्कर्षाचा वाचक आहे.
अवधूत म्हणजे मूर्तिमंत ज्ञानवैराग्य ” ते चालते ज्ञानाचे बिंब.”
जीवन्मुक्त.

DSCF3533 DSCF2852

DSCF3507 DSCF3513

ढोभळीहिरवीमिरची मेथी पुऱ्या

                                 ॐ
ढोभळी हिरवी मिरची व मेथी च्या पुऱ्या
दहा १० रुपये च्या ढोभळी मिरची आणली.
एका जुडी मेथीची पेंडी दहा रुपये १० ला आणली.
मेथी निवडून घेतली मेथी व मिरची धुवून घेतले.घेतली.
बसून विळीने मेथी व ढोभळी मिरची चिरून कापून घेतली.
मिक्सर मध्ये घालून थोडेसे पाणी घालून बारीक पातळ सर केले.
त्या मेथी व मिरची मध्ये मीठ हळद हिंग घातले व कणीक व
हरबरा डाळीचे पीठ घातले.गोळा केला त्याचे छोटे गोळे करून
पुऱ्या केल्या ग्यास वर कढई त तेल ठेवून तेल तापवू दिले तेलात
मेथी व हिरवी ढोभळी मिरची चे केलेले पुऱ्या तळून काढल्या.
मेथी व ढोभळी मिरची हिरवी असल्यामुळे कणिक हरबरा डाळीचे पीठ व
हिंग मीठ मोहन तेल हळद सर्व तयार केलेले पुऱ्या तळून हिरव्या गार केल्या
झाल्या. ढोभळी मिरची व मेथी ची मीठ हळद हिंग याने चव चांगली आली येते.

DSCF3545 DSCF3546

DSCF3550 DSCF3429

%d bloggers like this: