आपले स्वागत आहे!

श्रीदत्त दर्शन २३


श्रीदत्त दर्शन
नरसिंह सरस्वतीं च्या अवतार चरित्राचा प्रभाव गेल्या
पाच शतकांवर उमटला आहे.औदुंबर,नरसोबा ची वाडी आणि
गाणगापूर ही त्यांच्या निवासमुळे उदयास आलेली दत्तक्षेत्रे म्हणजे साधनेच्या
क्षेत्रांतील जागत्या ज्योती आहेत.
दत्तात्रेय बालब्रह्मचारी, अनिकेत ( म्हणजे कोठेच कायमचे वास्तव्य न करणारे )
अयाचित ( म्हणजे याचना न करता मिळेल तेवढयावर संतोषाने राहणारे ) व
परिव्राजक ( म्हणजे संन्यासी ) असा आहेत. ‘ योगीश्र्वर ‘, ‘ अवधूत ‘ असेही त्यांचे
वर्णन आढळते .
दत्तात्रेयांचे अवतार चिरंतन, चिरंजीव असा आहे.राम व कृष्ण या अवतारां प्रमाणे
दत्तत्रेयांचा अवतार केवळ दुस्कृत्यांचा विनाश करण्यासाठी नसुन अज्ञानरुपी अंध:काराचा
नाश करण्यासाठी आहे. या अवताराची सुजाण जाणीव श्रीधर स्वामींच्या
‘ अवतारही उदंड होती । सर्वेचि मागुती विलया जाती ।
तैशी नव्हे श्रीदत्तात्रेयमूर्ति । नाश कल्पान्ती असेना ।। ”
( रामविजय -१३ -२१ )
या चरणात प्रभावीपणे प्रगट झाली आहे. किंबुहुना दत्तात्रेयांच्या
अवताराअचा प्रमुख उद्देश अखंड ज्ञानदानाने प्रबोधन हाच आहे.
दत्तत्रेयांचा अवतार म्हणजे साक्षात परब्रह्ममूर्ती सद् गुरुचा अवतार.
शांडिल्योपानिषदांत यांना ‘ विश्र्वगुरू ‘ म्हटले आहे. दत्तत्रेयंच्या
सगुणमूर्ती उजवे अंग गुरुरुप असून डावे मायाधिपती ईश्र्वररूप आहे.
दत्तात्रेय हे ‘ गुरुतत्वाचे प्रतीक ‘, ‘ गुरुतत्वाचा अंतिम आदर्श ‘ आहेत
आणि म्हनुणच अन्य संप्रदाय ही त्यांना आद्दगुरु समजून अग्रपूजेचा
मान देत असल्यास नवल ते काय !
गुरुदेव दत्तत्रेयांत ‘ ईश्र्वर ‘ आणि ‘ गुरु ‘ अशी दोन्ही रूपे सामावलेली
असल्यामुळे उपासकांना श्रीगुरु व ईश्र्वर या दोघांची उपासना एकाच
वेळी घडते व तिचे दुहेरी फल ही मिळते, हा या अवताराचा प्रमुख विशेष
होय आणि यावरुन त्यांच्या ‘ श्रीगुरुदेवदत्त ‘ हा जयघोष अगदी
अर्थपूर्ण वाटतो.
दत्तात्रेय नुसतेच गुरुदेव नसून ते ‘ अवधूतचिंतन गुरुदेव दत्त ‘
या स्वरुपात आहेत. अवधूत मूर्ती ची पूजनियता पुढील ओविवरुण दिसून येते.
” सकळ ब्रह्मांडींची दैवते धावती | अवधूतमूर्ती पहावया || ”
‘ अवधूत ‘ हा शब्द अध्यात्ममार्गात परमोत्कर्षाचा वाचक आहे.
अवधूत म्हणजे मूर्तिमंत ज्ञानवैराग्य ” ते चालते ज्ञानाचे बिंब.”
जीवन्मुक्त.

DSCF3533 DSCF2852

DSCF3507 DSCF3513

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: