आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 10, 2013

तांदूळपिठ त्याची धिरडी

तांदूळ याचे पिठ व त्याची धिरडी
पातेल्यात वाटी भर तांदूळ पिठ घेतले मीठ चवी प्रमाणे घातले.
पाणी घालून पातळ सर केले सोडा अजिबात घातला नाही.
एक तास तांदूळ पिठ पातळ केलेले ठेवले.गयास पेटवून
लोखंडी तवा तापविण्यास ठेवला.तवा वर तेल लावले पाणी लावले.
तांदूळ पिठ पातळ केलेले डावाने तवा वर घातले.उलथन्याने
पसरविले छान भाजु दिले वाफ आली परत दुसऱ्या बाजूने भाजले.एक
पांढरे तांदूळ पिठ धिरडे केले.परत थोडी मेथी धुतलेली चिरलेली
तांदूळ पिठात घातली.व त्याचे पण धिरडे केले.दोन्ही बाजूने भाजले
दोन्ही धिरडी यांना छान मस्त जाळी पडली आहे.
ही धिरडी खोबर चटणी पातळ करून किंवा दूध गूळ एकत्र करून
त्या बरोबर खावीत .

DSCF3745 DSCF3746

DSCF3747 DSCF3750DSCF3751 DSCF3729

DSCF3748 DSCF3752

%d bloggers like this: