आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 14, 2013

विद्दा अभ्यास

                                  ॐ
स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण शिशिरऋतु माघ शुक्लपक्ष

                         नक्षत्र  रेवती
                 ४ गुरुवार वसंत पंचमी

                                   
                                      ॐ

विद्दा अभ्यास याला सुरुवात करतात.पूजा करतात.

DSCF3795 DSCF3796

वसंत पंचमी


स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम संवत्सर
उत्तरायण शिशिरऋतु माघ शुक्लपक्ष
नक्षत्र रेवती राशिप्रवेश नं मेष ४ वसंत पंचमी आहे.गुरुवार आहे.
सरस्वती व लक्ष्मी ची पूजा करतात.
दिनांक तारिख १४ .२. (फेब्रुवारी ) २०१३ साल आहे.गुरुवार आहे.


वसंत पंचमी च्या दिवस साला सरस्वती चा जन्म झाला.
ह्यासाठि सरस्वती ची पूजा करतात.
ब्रह्म यांनी शृष्टि श्रुष्टि निर्माण केली.झाडांची पाने गळून
नवीन पाने यतात.नवीन पाने व फुले आल्यामुळे बहर श्रुष्टि ला
शृष्टि ला येतो ब्रह्म यांनी नवीन शृष्टि श्रुष्टि झाल्याने सगळी
कडे हिरवे गार दिसते.

DSCF3155 DSCF3024

३ बुधवार ला माघ विनायक चतुर्थी गणपती चा जन्म दिवस
साजरा करतात.घरात चं मी पूजा गणपती ची केली आहे.
दिनांक १२ .२ .(फेब्रुवारी ) २०१३ साल आहे.बुधवार आहे.

DSCF3781 DSCF3783DSCF3780 DSCF3784DSCF2338श्रुष्टि  DSCF1636

                                                                                                                   श्रुष्टि

वसंत पंचमी


स्वस्ति श्रीशालिवाहन शक १९३४ नंदननाम सवत्सर
उत्तरायण शिशिरऋतु माघ शुक्लपक्ष
४ वसंत पंचमी आहे.कामदेव पूजन आहे.
मदन – रती प्रेमिकांचा दिवस आहे.
मदन व सरस्वती व लक्ष्मी यांचा जन्म दिवस आहे.
असे मानन्यात येते.)


ह्या दिवस ला सरस्वती व लक्ष्मी व कामदेव याची पूजा करतात.
तसेच विद्दा अभ्यास ला सुरुवात करतात.

पाश्र्चिमात्य संस्कृती मधील प्रेमिकांचा दिवस
दिनांक तारीख १४ .२. (फेब्रुवारी ) ला असतो.
यंदा तारिख दिनांक १४.२ (फेब्रुवारी .२०१३ ला
‘व्ह्यालेटाईन डे ‘ १४. २. (फेब्रुवारी ) २०१३ साल ला आला आहे.
तारीख दिनांक १४. २. (फेब्रुवारी )१९६७ साल आला होता व
त्याच वेळेला भारतीय पंचांग वसंत पंचमी आली होती.
४६ वर्षा नंतंर भारतीय पंचांग प्रमाणे वसंत पंचमी व
१४ .२ ( फेब्रुवारी )२०१३ साल ला ‘ व्ह्यालेटाईन डे ‘
एकत्र एकाच दिवस ला आला आहे.

पिवळा रंग रंगाचे वस्त्र परिधान करतात.

DSCF3073 DSCF3075

ब्रह्म

                                               ॐ

ब्रह्म : भारतीय तत्त्वज्ञानातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना. ‘ब्रह्म’ हा शब्द ऋग्वेदात अनेक वेळा आला आहे. सुरूवातीस त्याचे अर्थ ‘मंत्र’, ‘देवतास्तवन’, ‘प्रार्थना’, ‘मंत्राच्या ठिकाणी असलेले दिव्य अद्भु’त सामर्थ्य’, ‘गूढ शक्ती’ अशा तऱ्हेचे होते. उपनिषत्काली त्याच्या अर्थाचा आणखी विकास होऊन तो ‘विश्व आद्य कारण’, ‘पर तत्त्व’, ‘अनुभवास येणाऱ्या क्षर विश्वाच्या विविधतेच्या उगमस्थानी असणारे अक्षर तत्त्व’ अशा प्रकारचा झाला. हा अर्थ मनात आणून बृह = वाढणे, मोठे होणे या धातूपासून ब्रह्म शब्दाची व्युत्पत्ती दिली जाते. जे सतत वाढतच राहते, ज्याला मर्यादा नाही, अत्यंत व्यापक असे जे काही ते ब्रह्म असे त्या व्युत्पत्तीने सुचवावयाचे आहे. त्या शब्दाच्या अरथा्च्या विकासातील कोणत्याही अवस्थेत पावित्र्य आणि गूढता ही दोन्हीही येतात. अन्न, प्राण, वायू, आकाश, प्रणव इ. ब्रह्माची विविध प्रतीके उपनिषदांत सांगितलेले आहेत. त्या सर्वांत⇨ओम हे अक्षर ब्रह्मप्रतीक म्हणून महत्त्वाचे आहे. त्या अक्षरात ‘अ’, ‘उ’ आणि ‘म्’ अशा तीन मात्रा असून त्या अनुक्रमे आत्म्याचे (= ब्रह्माचे) जागरित स्थान, स्वप्नस्थान व सुषुतस्थान यांचा निर्देश करतात आणि या तिन्ही अवस्थांपलीकडच्या निर्गुण ब्रह्माचा निर्देश सबंध ओंकाराने होतो, असे मांडूक्योपनिषदात सांगितले आहे.

ब्रह्म निर्गुण आहे, असा एक विचार उपनिषदांत जागोजागी दिसतो. बृहदारण्यकात (२.३.६) ब्रह्मासंबंधी ‘ते असे नाही, ते असे नाही’ (नेति, नेति) अशी नकारार्थी भाषा वापरली आहे. निर्गुणता सांगण्याकरिता कधी ‘ते स्थूल नाही, सूक्ष्म नाही, ऱ्हस्व नाही, दीर्घ नाही’ (बृहदारण्यक ३.८.८) अशा तऱ्हेची वाक्यरचना करून विशेषणे नाकारलेली असतात, तर कधी ‘ते अणूपेक्षाही लहान व मोठ्यापेक्षाही मोठे आहे’ असे सांगून परस्पर विरोधी विशेषणे ब्रह्मास दिलेली असतात. जेथे न पोहोचताच वाणी आणि मन परत येतात ते ब्रह्म (तैत्तिरीय २.४.१) अशा तऱ्हेने स्पष्टपणे ब्रह्माची निर्गुणता सांगणारे उल्लेखही आहेत. याच्या उलट, ‘त्याची श्रेष्ठ शक्ती विविध प्रकारची आहे, त्याचे ज्ञान आणि बल यांची क्रिया त्याला स्वाभाविकच आहे’ (श्वेताश्वतर ६.८), ‘तो भूक नसलेला, तृष्णा नसलेला, सत्यकाम, सत्यसंकल्प आहे’ (छांदोग्य ८.७.३) अशा तऱ्हेची ब्रह्माचे गुण सांगणारी वचनेही उपनिषदांत आहेत.
ब्रह्माचे सगुणत्व आणि निर्गुणत्व अशी दोन्हीही सांगणारी वाक्ये ज्याप्रमाणे उपनिषदांत आहेत त्याचप्रमाणे ब्रह्म निष्प्रपंच, निष्क्रिय, अविकारी, अमृत आहे असे सांगून त्याजबरोबर ब्रह्माकडे जगत्कर्तृत्व व जगाचे संचालकत्व देणारी वाक्येही उपनिषदांत आहेत. आणखी दिसून येणारा एक विरोध असा : ‘हे सर्व ब्रह्म आहे’, ‘हा आत्मा ब्रह्म आहे’, ‘ते एकच आहे, अद्वितीय आहे’, ‘तू ते आहेस’, येथे कोठल्याही तऱ्हेचे नानात्व नाही अशा रीतीने जाव व ब्रह्म (तसेच जग व ब्रह्म) यांचे संपूर्ण अद्वैत सांगून प्रसंगी, ‘ठिणग्या जशा अग्नीचा अंश तसा जीव ब्रह्माचा अंश आहे’ असे म्हटले आहे. या दुसऱ्या प्रकारच्या विधानात जीव आणि ब्रह्म नसलेले असे आहे, ही एक संकल्पना व ते शुभगुणयुक्त, जग उत्पन्न करणारे आणि जीवांच्या अंतर्यामी असलेले (पण सर्वस्वी एकरूप नसलेले) असे आहे, ही दुसरी संकल्पना.

                   DSCF3772

%d bloggers like this: