आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 15, 2013

गणपती

                                                                   ॐ
गणपती
एक दिवस काचेच्या डिश मध्ये रंगीत दगड ठेवून एल मिठ ह्याची
कणिक भिजवलेली तिला गणपती चा आकार दिला आहे.
गणपती ठेवला आहे.

दुसरे दिवस ला दुर्वा पसरून जास्वंद याचे फूल ठेवले व त्यात
गणपती ठेवला आहे.

तिसरे दिवस गव्हाची कुरडई तळून त्यात गणपती ठेवला आहे.
तिळ भाजून कुट व गूळ एकत्र करून कणिक याचा मोदक तळून
मोदक ठेवला आहे.

त्याच दिवस ला थोड्या वेळाने पिवळी रांगोळी पसरून
हिरव्या रांगोळी ने दूर्वा काढल्या लाल रांगोळी चे
जास्वंद चे फूल काढले तिन ही गणपती एकत्र ठेवले आहे.
मोदक ठेवला आहे.

मस्त पैकी तीन गणपती चार प्रकारे ठेवले आहेत.

DSCF3779 DSCF3780

DSCF3781 DSCF3783

DSCF3785 DSCF3786

DSCF3787 DSCF3788

                                       DSCF3784

ब्रह्म नक्की कसे आहे ?

                                                  ॐ

ब्रह्म नक्की कसे आहे ?

चौदा ब्रह्मे सांगितल्यावर समर्थ म्हणतात :
पदार्था ऐसे ब्रह्म नव्हे । मा ते हाती धरून घ्यावे । ७ -३ -५२ । ।
ब्रह्म हातात धरता येइल असा पदार्थ नाही .म्हणून चौदा ब्रह्मे तोकडी पडली .मग शिष्य विचारतात :
मग ब्रह्म आहे तरी कसे ?
समर्थ सांगतात :ज्याप्रमाणे आकाश निर्मल असते त्याहून ही ब्रह्म मिर्मल असते .ते आकाशा सारखे पोकळ व अवकाशमय आहे .२१ स्वर्ग व सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मगोलहोतो .अशा अनंत ब्रह्मगोलांना ब्रह्म व्यापते .समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात ,रिता ठाव या राघवेवीण नाही । राघव म्हणजे परब्रह्म .त्याच्या शिवाय एकही अशी जागा नाहीजेथे ब्रह्म नाही .जली स्थली काष्ठी पाषाणी सर्वत्र ब्रह्म व्यापून आहे .ज्याप्रमाणे जलचरांच्या सर्व बाजूंनी जल असते त्याप्रमाणे सर्वत्र ब्रह्म व्यापून असते .
परी जे अखंड भेटले । सर्वांगास लिगटले। अति निकट परी चोरले । सकलांसी जे । । ७ -४ -८ । ।
जन्मा पासून मृत्यु पर्यंत ब्रह्म सतत आपल्या बरोबर असते .सर्वांगाला चिकटलेले असते .पण एवढे निकट असून त्याची जाणीव आपल्याला नसते .अज्ञानी लोकांना ब्रह्म भासतनाही पण भ्रमाने निर्माण झालेले विश्व त्याने त्याचा भास् समजतो .
ज्याप्रमाणे अभ्रांनी आकाश मलिन झाल्यासारखे वाटते ,तो भास् असतो त्याप्रमाणे ब्रह्म व विश्वाचे असते .विश्व हा भास ब्रह्माला अच्छादतो पण ब्रह्माला चिकटत नाही .विश्वब्रह्मात दिसत असलेला भास असतो .
ब्रह्म ब्रह्मांडी कालावले। पदार्थाशी व्यापून ठेले । सर्वांमध्ये विस्तारले । अंशमात्रे । । ७ -४ -१५ । ।
ब्रह्म सर्व विश्वात कालवले आहे ,सर्व पदार्थात ,चराचरात असते ,ते ही अंशमात्राने.ब्रह्माच्या अफाट भागावर एक अंश इतके हे ब्रह्मांड पसरले आहे .ब्रह्मांड सोडून ब्रह्माचाकेव्हढा पसारा आहे त्याचे मोजमाप करणे अशक्य
आहे .ब्रह्म सर्वात कालवले असेल तरी अखंड स्थिर आहे ,ते स्थिर आहे ,पंचभूतांमध्ये ते आंत बाहेर व्यापले
आहे .पण पंचभूतांना चिकटलेले नाही .ब्रह्माला दृष्टांत फक्त आकाशाचा देता येतो .खंब्रह्म -आकाश हेच असे श्रुती
सांगते .गगन सदृशं ब्रह्म आकाशासारखे ब्रह्म हे स्मृती सांगते .ब्रह्म सर्वांना व्यापून आहे .आपल्या आत बाहेर सर्वत्र आहे .फक्त ते पाहण्याची शक्ती आपल्याकडे नाही .
जेथे काही नाही असे आपल्याला वाटते तेथे ब्रह्म असते .आपल्याला जे जे दिसते ते ते खरे असे आपल्याला वाटते कारण सूक्ष्म असणा-या ब्रह्माला समजून घेण्याची कलाआपल्याला साधलेली नसते .अपरंपार ,अनंत ब्रह्म एवढ्याशा विश्वाच्या पोटात सगळे च्या सगळे मावणे शक्य नसते .ब्रह्म शाश्वत तर आहेच पण वज्राहून कठीण
आहे .ब्रह्म पृथ्वीला व्यापून असते पण पृथ्वीचा नाश झाला तरी ब्रह्म नाश पावत नाही .ब्रह्म पाण्यात व्यापून असते ते पाणी शोषले जाते तसे ब्रह्म शोषले जात नाही .ब्रह्मतेजाला व्यापून असते पण तेजाने जळत नाही .ब्रह्म वायूला व्यापून असते पण वायूप्रमाणे चळत नाही ब्रह्म आकाशाला व्यापून असते पण ते आपल्याला कळत नाही .जिकडेपहावे तिकडे ब्रह्म समोरच असते .आपल्या इंद्रियांचे व्यवहार ब्रह्मातच घडतात .
ब्रह्म आपल्या शरीरात कसे असते ते सांगतात :ग्रंथ वाचत असताना ब्रह्म वाचते ,सूक्ष्मपणे डोळ्यातून पहाते,कानाने शब्द ऐकते ,मनाने विचार करताना मनाच्या आतबाहेरब्रह्म च असते .पायांनी वाट चालताना ब्रह्म शरीरात व्यापून असते .ब्रह्मामध्ये सर्व इंद्रिये आपापली कामे करतात पण इंद्रियांनी ते जाणण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा हव्यासउरत नाही .त्या ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी आपली वृत्ती सूक्ष्म झाली पाहिजे .
जे जवलीच असे । पाहो जाता न दिसे । न दिसोन वसे । काही येक । । ७ -६ -४६ । ।

                 DSCF3772

%d bloggers like this: