ॐ
अथ श्रीसूर्यनामाष्टशत स्तोत्र
===============================
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् |
देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरायेत् ||
श्रीगणेशाय नम 😐 श्रीसरस्वतै नम : | ॐ नम : कृष्णव्दैपायनाय
श्री सूर्याय नम :
अर्थ : ——-
सूर्य , अर्यमा , भग , त्वष्टा , पूषा, अर्क , सविता , रवि ,
गभस्तिमान , अज , काल , मृत्यु , धाता , प्रभाकर , || १ ||
पृथिवी , आप , तेज , ख ( आकाश ) , वायु , परायण ,
सोम , ब्रहस्पति , शुक्र , बुध , अड.ग |रक , || २ ||
इंद्र , विवस्वान् , दिप्तांशु , शुचि , शौरि , शनैश्र्चर ,
ब्रह्मा , विष्णु , रुद्र , स्कंद , वरुण , यम , || ३ ||
वैद्दुताग्नि , जाठराग्नि , ऐंधनाग्नि , तेज : पति ,
धर्मध्वज , वेदकर्ता , वेदांग , वेदवाहन , || ४ ||
कृत , त्रेता , व्दापर , सर्वमलाश्रय , कलि ,
कला – कस्ठा – मुहूर्तरूप , क्षपा याम , क्षण || ५ ||
संवत्सरकर , अश्र्वत्थ , कालचक्रप्रवर्तक विभावसु ,
शाश्वत पुरुष , योगी , व्यक्ताव्यक्त , सनातन , || ६ ||
कालाध्यक्ष , प्रजाध्यक्ष , विश्र्वकर्मा , तमोनुद ,
वरुण , सागर , अंशु ,जीमूत , जीवन , अरिहा , || ७ ||
भूताश्रय , भूतपति , सर्वलोकनमस्कृत ,
स्त्रष्टा , संवर्तक , वहिन , सर्वादि , अलोलुप || ८ ||
अनंत , कपिल , भानु , कामद , सर्वतोमुख ,
जय , विशाल , वरद , सर्वधातुनिषेचित , || ९ ||
मन :सुपर्ण , भूतादि , शीघ्रग , प्राणधारक ,
धन्वंतरी , धूमकेतु , आदिदेव , अदितिसुत || १० ||
व्दादशात्मा , अरविंदाक्ष , पितामाता – पितामह ,
स्वर्गव्दार – प्रजाव्दार , मोक्षव्दारत्रिविष्टप || ११ ||
देहकर्ता , प्रशांतात्मा , विश्र्वात्मा , विश्र्वतोमुख ,
चराचराअत्यंत त्मा , सूक्ष्मात्मा , मैत्रेय , करुणान्वित || १२ ||
अशी ही तेजस्वी स्मरणीय अशा
सूर्याची एकशें आठ नावें ब्रह्मदेवाने सांगितली आहेत || १३ ||
देव , पितर , यक्ष यांनी सेवा केलेल्या असुर ,
राक्षस , व सिध्द यांनी वंदन केलेल्या , तसेच
शुध्द सोनें व अग्निप्रमानें कांतिमान असलेल्या
सूर्याला , मी माझ्या हितासाठी नमस्कार करतो || १४ ||
सूर्योदयाचे वेळी एकाग्र चित्त होऊन
जो ( या नावांचें ) पठन करील , तो मानव पुत्र ,
स्त्री, धन , रत्न संग्रह आणि पूर्वजन्मस्मृति
मिळवील . त्याचप्रमाणे तो पुरुष नेहमी धैर्य व
स्थिरबुध्दि मिळवील . || १५ ||
जो पुरुष शुचिर्भूत होऊन , शुध्द अंत : करणानें
एकाग्र होऊन , देवश्रेष्ठ सूर्याचे हें स्तोत्र पठन
करील , तो शोकरुपी दावाग्निनें युक्त असलेल्या
सागरांतून मुक्त होतो , आणि मनानें इच्छिलेल्या
मनोरथांना पूर्ण करील. || १६ ||
————- महाभारत आरण्यकपर्व ( वनपर्व ) , अध्याय ३ रा .
ॐ
ही सर्व माहिती व लिखान
डॉ शरद य . देशपांडे यांनी दिली आहे.
ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...