शिवाजी राजेंचे पत्र
ॐ
सज्जनगडाच्या कल्लेदारास शिवाजी राजेंचे पत्र
सन १६७६ श्रावण शु. १०
श्री
श्रीरामदास
मशहुरल अनाम राजश्री जीजोजी काटकर हवालदार व कारकून किले
सज्जनगड प्रती राजश्री शिवाजीराजे सुहुरसन सब सबैन व अलफ
श्री गोसावी सिवतंरी राहतात. सांप्रत काही दिवस गडावरी राहावया
किलेयास येतील. त्यास तुम्ही गडावरी घेणे . घर जागा बरी करुन देणे .
जे लोक याचे सेवेचे बराबर असतील ते देखील गडावरी घेणे. असतील
तोवरी हरयेकविसी खबर घेत जाणे सेवेस अंतर पडो नदेणे.
उतरो म्हणतील तेव्हा उतरून देणे.
छ.< जमादिलाखर परवानगी हुजूर मोतीब सुद .
मर्यादेयं विराजत
* * *