आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 29, 2013

समर्थांना पत्र

केशवस्वामी भागानगरकर यांचे समर्थांना पत्र

ओम् नमो जि सच्चिदानंदा । पदत्रयस्वरुपसिद्धा ।
वीज तरु अरविंदा । स्वये आमोद परिमळसि  ।। १ ।।
तया स्वादामृताची चाखवटी ।तूचिं रूची तुझे पोटी ।
निरखुनिया दीजे भेटी । स्वानंद दृष्टी अवलोकन  ।। २ ।।
श्रीरामदासा परम सखया । स्वानंदकंदा गुरुवर्या ।
केशवे विज्ञाप्ति ल्याहावया । हेंचि कारण  ।। ३ ।।

*      *       *

वरील पत्रास समर्थांचे संक्षिप्त उत्तर

पदातीत वाक्यार्थ शोधी समाधी |
क्षयातीत जो निर्विकल्पावबोधी ।। १ ।।
जया उगमी जन्म नाही जिवासी ।
मिळे दास त्या संगमी केशवासी ।। २ ।।
एकदा येथे अवश येवोन जाणे .
*       *        *

DSCF3965 DSCF3962

%d bloggers like this: