आपले स्वागत आहे!

Archive for जून 2, 2013

कैरी डाळ

कैरी डाळ
अमेरिका तेथे पण कैरी अंबा मिळतात हे सर्वांना माहित आहे
अक्षय त्रितीया झाली वाटलं कैरी डाळ करावी
Farmer’s Market आहे तेथे सर्व बर्फ सर्व प्रकारच्या भाज्या
आहेत
बोर्डा डॉलर भाव लिहिलेले आहेत Plastic च्या पिशव्यां
आपनायेठीना आपण घ्यावयाचा पाहिजे तेवढे वेगवेगळ्या
पिशवी तं भाजी घावायाची गाडी असते त्यात ठेवावयाची

मी पण बरोबर Farmer’s Market मध्ये गेले आहे मला तेथे हाय

करतात गाडी घेतली नाही खुणवून एकाने विचारले मी माझ्या सौ सूनबाई
कडे हात दाखविला हो असे ते म्हणाले सहज पण कसे बोलणे व आदरातिथ्य आहे
एवढं मला सांगायचे आहे
सर्व भाजी घेतली कैरी घेतली येथे मशीन ला पिशवी लावतात व एका एका भाजी ते
पण पिशवीत भारतात आपल्या गाडीत ठेवतात कागद मध्ये बिल येते ते कार्ड याने
भरतात परत आम्ही कार गाडीत भाजी पिशव्या ठेवल्या येथे फ्रीज मध्ये भाजी चांगली
राहते ंआआएखेटा व कार गाडी किती चालवणार ह्या साठी असा उपयोग करतात

भारत मध्ये सकाळी सात ७ / 7 वाजता भाजी रस्ता वर सायकल ने विकतात भरपूर
जन सकाळी भाजी घेतात पाले भाजी तर भरपूर सकाळी खपते

कैरी एक घेतली आहे हरबरा डाळ एक वाटी घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत
मीठ हळद मोहरी ची तेला फोडणी सर्व घेतले आहे हरबरा डाळ दिवस रात्र भिजत घातली आहे
Air Conditioned असल्याने डाळ जास्त भिगाविली आहे मिक्सर मधून जाड सर बारीक
केली आहे हिरवी मिरची बारीक केली आहे फोडणी तम हळद घातली आहे सर्व कैरी चे साल काढले
आहे बारीक बारीक कैरी कापली आहे ती हरबरा डाळीत घातली आहे सर्व एकत्र केले आहे मस्त
कैरी हरबरा डाळ अमेरिका तेथे केली आहे

IMG_20130518_193845 IMG_20130518_194700 IMG_20130518_194938

लायब्ररी

                                                                                      ॐ
लायब्ररी
पुस्तक व पेपर वर्तमान पत्र याची लायब्ररी आहे
सर्वजन लायब्ररी पाहतात पुस्तक वाचतात
पण मी अमेरिका येथील लायब्ररी पाहिली आहे व सर्व
पुस्तक वर्तमान पत्र इंग्रजी तं आहेत मला काहि हि वाचता आले
नाही तरी पण एवढि पुस्तक पाहण्या चि आवड आहे येथे संगणक पण
फुकट लायब्ररी सारखे करु देतातं
दोन मजली इमारत आहे जुने लेखक यांची पुस्तक आहेत नुसते पुस्तक
पाहून शुध्दा काय लिखाण आहे समजते सगळे आपल्याला यावयाला पाहिजे
असे नाहि पाहणे निरीक्षण करणे मनांत ठेवणे हे महत्व आहे
Washington मध्ये नुसते वर्तमान पत्र याची लायब्ररी आहे
इंग्रजी मराठी तेलगु कन्नड गुजराथी चिन जपान फ्रेंच सर्व भाषा यांचे
वर्तमान पत्र आहेत काचेचि लांब लायब्ररी आहे
हे मी मासिक मध्ये वाचून ब्लॉग केला आहे बघणे वाचणे हे लिहिणे  सर्व
लायब्ररी सारखे चं आहे .
IMG_20130530_194705
%d bloggers like this: