आपले स्वागत आहे!

Archive for जुलै, 2013

वसुधालयसावित्रीची प्राचीन कथा

सावित्रीची प्राचीन कथा – भाग ४
वाचन: सौ. सुनीति देशपांडे

[youtube:http://www.youtube.com/watch?v=bF6DcjrcFaw%5D

सावित्रीची प्राचीन कथा

सावित्रीची प्राचीन कथा – भाग ३
वाचन: सौ. सुनीति देशपांडे

[youtube:http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=ozdDDyYW3mU%5D

महाभारताच्या वनपर्वातील तीनशे श्लोकात – व बव्हंशी अनुष्टुप छंदात – सावित्रीची कथा गोवली गेली आहे. द्यूतात हरल्यामुळे पांडवांच्या नशिबी बारा वर्षांचा वनवास व नंतर एका वर्षाचा अज्ञातवास आला होता. रानावनात इतस्तत: भटकं ती केल्यानंतर वनवास काळाच्या अखेरीच्या दिवसात ते काम्यक वनात आले. प्रत्यही फुलाफळांनी बहरलेले, सरोवरांनी भरलेले, झन्यांच्या झुळझुळत्या मंद स्वरांनी भारलेले असे ते एक नितांत रमणीय स्थान होते. वन्य प्राणी तेथे निर्भयपणे संचार करीत आणि पक्षीजनांच्या मधुर कूजनाने आकाश भरून राही. आजन्म कठोर तपाचरण करून कठीण सिद्धी प्राप्त केलेले शेकडो मुनिजन त्या शांत वनात रहात होते. या संत समागमात काही काळ व्यतीत करण्यासाठी पांडवांनी हे रम्य स्थान निवडले होते. यापूर्वी एकदा मार्कंडेय ऋषींनी पांडवांना भेट दिली होती. त्यांवेळी श्रीकृष्ण सत्यभामेसह पांडवांकडे मुक्कामास होता. नारदमुनीही त्याचवेळी तेथे आले होते. त्या भेटीत जीवनातील उदात्त तत्त्वांची व सद़्वर्तनाची महती ऋषीवर्यांनी युधिष्ठिराच्या मनावर बिंबवली होती. दरम्यानच्या काळात पांडवांना वनवास तर भोगावा लागलाच, पण दुर्दैव असे की त्यांचे कट्टर शत्रू अजूनही त्यांच्या मागावर राहून त्यांना पीडा देत. द्रौपदीसह पाच पांडवांना अपमान गिळावा लागत असे आणि नीतिधैर्य सतत खच्ची केल्यामुळे होणान्या मनस्तापाला तोंड देणे भाग होते. एकदा तर जयद्रथाने द्रौपदीलाच पळवून नेले होते आणि अखेर लढाईत त्याचा पराभव करून तिची सुटका करावी लागली होती.

या सान्या प्रकारामुळे उद्विग्न आणि अंतर्मुख झालेला युधिष्ठिर राजा मार्कंडेय मुनींकडे येतो आणि पृच्छा करतो की अशा प्रकारच्या हालअपेष्टा सहन करण्याची आणि क्लेशदायक जीवन जगण्याची पाळी मानवजातीच्या इतिहासात कुणावर तरी आली होती का. युधिष्ठिराचे सांत्वन करण्यासाठी मार्कंडेय मुनी त्याला अयोध्यापती श्रीरामचंद्राची कथा कथन करतात. सावत्र मातेमुळे त्याला घडलेला चौदा वर्षांचा वनवास, दुष्ट रावणाकडून झालेले सीतेचे हरण आणि त्यामुळे राजाला सोसाव्या लागणान्या अपरंपार यातना यांचे एक विदारक चित्र मार्कंडेय मुनी युधिष्ठिरापुढे उभे करतात. शेवटी त्याचा विजय कसा झाला हेही त्याला सांगतात. हे सारे सदाचरणाचेच फलित असल्याचे ते दाखवून देतात. पण द्रौपदीसारख्या पतिव्रता असलेल्या दुसन्या एकाद्या स्त्रीच्या नशिबी इतके कष्टभोग आल्याचा दाखला आहे का अशी विचारणा युधिष्ठिराने पुन: पुन्हा केली असता मार्कंडेय ऋषी त्याला उदाहरण म्हणून सावित्रीची कथा सांगतात.

शृणु राजन् कुलस्त्रीणां महाभाग्यं युधिष्ठिर ।

सर्वमेतद् यथा प्राप्तं सावित्र्या राजकन्यया ।।

हे राजा युधिष्ठिरा, ऐक! उच्च कुळीच्या स्त्रिया ज्या बहुमोल प्राक्तनाची आकांक्षा धरतात ते राजकन्या सावित्रीने त्यांच्यासाठी कसे प्राप्त करून घेतले आहे ते मी तुला सांगतो.

मार्कंडेय ऋषींचे सावित्रीचे आख्यान अशा रीतीने सुरू होते.

खूप खूप वर्षापूर्वी मद्र देशात एक उदारमनस्क राजा राज्य करीत होता. तो कठोर धर्माचरणी, भक्त्तिपरायण वृत्तीचा आणि सत्यनिष्ठेने वागणारा होता. सर्व साधुसंतांचा तो आदर करी आणि आपल्या पौरजनांची काळजी घेई. त्याचे नाव होते अश्वपती अनेकविध यज्ञकर्मे करणान्या, दानधर्मात रत होणान्या, कर्मकुशल, षडूरिपूंवर ताबा मिळविणान्या या राजावर सान्या प्रजाजनांची भक्ती होती आणि तोही त्यांच्यावर तसेच प्रेम करी. प्रत्येक नागरिकाच्या कल्याणाची अधिपतीला चिंता होती आणि त्याचे दुःख निवारण करण्याच्या प्रयत्नात तो मागे रहात नसे.

पण त्याच्या पोटी संतान नव्हते. जसजसा काळ जाऊ लागला आणि वृद्धत्त्वाची छटा त्याच्या देहावर दिसू लागली तसतसा या गोष्टीमुळे तो दुःखाने झुरू लागला. म्हणून पुत्रप्राप्तीच्या अभीप्सेने सतत अठरा वर्षे त्याने घोर तपाचरण केले. तो सावित्रीदेवीला दररोज एक लक्ष आहुती देत असे. तपाचरणाच्या या काळात त्याने कडक नियमांचे काटेकोर पालन केले. आपली सर्व इंद्रिये त्याने काबूत ठेवली. तो अत्यल्प प्रमाणात अन्नग्रहण करीत असे आणि तेही दिवसभराच्या सहाव्या प्रहरातच. अखेर त्याच्या भक्तीने व तपश्चर्येने प्रसन्न होऊन स्वत: देवी सावित्री यज्ञवेदीतून त्याच्यासमोर प्रकट झाली. तिने राजाला आशीर्वाद दिला व त्याच्या इच्छापूर्तीसाठी तिने त्याला उचित वर दिला. देवीने अधिपतीला असेही सांगितले की त्याच्या महान तपश्चरणाचे प्रयोजन पाहून त्याची पुत्रप्राप्तीची इच्छा तिने आधीच ब्रह्मदेवाच्या कानावर घातली आहे. ती पुढे असेही सांगते की त्याला लवकरच एका तेजस्वी कन्येचा लाभ होईल. या बाबतीत कोणताही अनमान न करता राजाने या वराचा स्वीकार करावा असाही आदेश ती देते. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या कृपेने राजाला हे वरदान प्राप्त झाले असून त्याचा त्याने सानंद स्वीकार करावा हेही ती त्याला सांगते.

कालांतराने आपली ज्येष्ठ पत्नी व सहधर्मचारिणी मालवी हिंच्या पोटी राजाला कन्यारत्नाचा लाभ झाला.

सावित्र्या प्रीतया दत्ता सावित्र्या हुतया ह्यपि ।

सावित्रीत्येव नामास्याश्चकुर्विप्रास्तथा पिता ।।

सावित्रीच्या कृपेने आणि सावित्री व्रताच्या तपःश्चरणाने ती प्राप्त झाली असल्याने व थोर वडीलधान्यांच्या अनुमतीने त्याने तिचे नाव सावित्री असेच ठेवले.

सौंदर्यवती सावित्री निसर्गक्रमानुसार वयात आली. ती प्रत्यक्ष लक्ष्मीच वाटत होती. पुष्ट नितंबिनी, कृश कटी आणि कमलनेत्र असलेली सावित्री आता खरोखरच एकाद्या स्वर्गस्थ देवतेसमान भासू लागली. अश्वपतीची दुहिता बनून एकादी देवकन्याच पृथ्वीवर अवतीर्ण झाली आहे की काय असे नगरवासियांना वाटू लागले. एवढेच नव्हे तर तिच्या त्या अप्रतिम लावण्याने आणि यौवनाच्या जोषपूर्ग प्रभेने दिपून गेल्यामुळे कुणीही राजा वा राजपुत्र तिला विवाहाची मागणी घालण्यास धजत नव्हता.

एकदा शुक्ल पक्षातील पर्वणीच्या शुभदिनी सावित्री सुस्नात होऊन देवळात गेली व प्रार्थना करून तिने अग्नीला समिधा अर्पण केल्या. पुरोहितांनी तिच्या कल्याणाप्रीत्यर्थ स्वस्तिवेदमंत्र म्हटले. पूजा आटोपल्यावर थोडी फुले व प्रसाद घेऊन ती आपल्या पित्याकडे आली. वाकून त्यांच्या चरणांना स्पर्श केला. नंतर तिने त्यांना फुले व प्रसाद अर्पण केला आणि हात जोडून ती त्यांच्याजवळ उभी राहिली.

पूर्णपणे वयात आलेल्या व देवरूपिणीचे सौंदर्य ल्यालेल्या कन्येचे अद्याप पाणिग्रहण झालेले नसल्याने पिता अश्वपतीला औदासिन्याने घेरले. समानशील जोडीदाराचा शोध घेण्यासाठी आता सावित्रीने स्वत: च बाहेर पडावे असे तो सुचवितो. आतापर्यंत कुणीही तिला लग्नाची मागणी घातली नसल्याने वरसंशोधनाचे काम तिचे तिलाच करावे लागेल असे पित्याने तिला सांगितले. वयात आलेल्या कन्येचे पित्याने धर्माज्ञेप्रमाणे जर वेळीच लग्न करून दिले नाही तर तो दोषी व लोकनिंदेस पात्र होतो याची जाणीवही राजाने सावित्रीला करून दिली.

किंचित सलज्ज होऊन राजकन्या आपल्या पित्याच्या चरणांना वंदन करते आणि क्षणार्धात आपल्या इप्सित कार्याच्या सिध्दीसाठी बाहेर पडते. राजदरबारातील काही ज्येष्ठ व जाणित्या मंत्र्यांना बरोबर घेऊन सुवर्णरथात आरूढ झालेली सावित्री विविध देशांना भेटी देते. पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन ती सत्पात्र विद्वानांना सढळ हाताने दानधर्म करते. वृक्षराजीनी बहरलेल्या हरित वनातून जात असता ती विविध आश्रमात जाऊन तपश्चर्येत आपले समग्र जीवन व्यतीत करीत असलेल्या ऋषिमुनींचा आदरसत्कार करते.

इकडे एके दिवशी राजवाडयात राजा अश्वपती देवर्षी नारदांशी विषय संवाद करीत बसले होते. योगायोगाने जवळ जवळ त्याच सुमारास विविध तीर्थस्थळांना आणि अनेक आश्रमांना भेटी देऊन सावित्री पितृगृही परतते. आपले पिताश्री व देवर्षी नारद बोलत असल्याचे पाहून सावित्री त्यांना चरणस्पर्श करते आणि त्यांना भक्तिपूर्वक अभिवादन करते. ती एकाद्या वधूसारखी लावण्यवती व तेजस्वी अशी शोभत होती. नारद सावित्रीकडे कटाक्ष टाकतात आणि वयात आलेल्या आपल्या तरुण कन्येचा अद्याप विवाह कसा करून दिला नाही अशी पृच्छा राजाकडे करतात. नेमक्या याच कारणास्तव आपण सावित्रीला बाहेरदेशी धाडले होते असा खुलासा अश्वपती करतो. आता आपले इप्सित पूर्ण करूनच ती परतली असावी असे अनुमानही राजा करतो. सावित्रीने आपल्या प्रवासाची सगळी हकिकत कथन करावी आणि आपला पती म्हणून तिने कुणाची निवड केली आहे तेही सांगावे असे राजा सुचवितो. वडिलांच्या विचारण्यावरून सावित्री आपल्या प्रदीर्घ प्रवासातील एकेक प्रसंगाचे वर्णन करू लागते आणि त्यातून आपल्या शोधाचे काय फलित निघाले हेही जाहीर करते.

सावित्री सांगते की दूरवरच्या शाल्व देशापर्यंत आपण गेलो होतो. सर्वशक्तिमान, अजिंक्य व तितकाच सदाचरणी असलेला द्युमत्सेन राजा एके समयी त्या देशात राज्य करीत होता, दुर्दैवाने त्याला कालांतराने अंधत्व आले. त्याच्या या असहाय परिस्थितीचा फायदा घेऊन पूर्वापार शत्रुत्व बाळगणान्या शेजारी देशाच्या राजाने शाल्व राज्यावर हल्ला केला आणि द्युमत्सेनाचा पराभव करून त्याला बायकोमुलासह वनात हुसकून लावले. इकडे राजाने वनात घोर तपस्या आरंभिली तर त्याचा एकुलता एक मुलगा सत्यवान ऋषिमुनींच्या मार्गदर्शनाखाली अध्ययन करू लागला. त्यातून त्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. याच सत्यवानाला मी जीवनसाथी म्हणून निवडले आहे.

पण हा वृत्तांत ऐकल्यावर देवर्षी नारदांनी तात्काळ भयसूचक धोक्याची घंटा वाजविली आणि सावित्रीने सत्यवानाला आपला पती निवडावा ही अत्यंत दुदैवाची गोष्ट असल्याचे राजाच्या निदर्शनास आणले.

अहो बत महत् पापं सावित्र्या नृपते कृतम्।

अजान्त्या यदनया गुणवान् सत्यवान् वृतः।।

‘अरेरे ! हे राजा, प्तत्यवान गुणी खरा, पण त्यांची निवड करून सावित्रीने अजाणता अनिष्ट कृत्य केले आहे. कारण त्यातून नष्टचर्य ओढवणार आहे.

आता हे खरे आहे की त्याचा पिता सत्याचरणी होता, त्याची माता थोर मनाची होती आणि अशा दांपत्याच्या पोटी जन्माला आल्यामुळेच विद़्वान लोकांनी मुलाचे ‘सत्यवान’ असे सार्थ नाव ठेवले. या बालकाला चित्रे काढण्याचा मोठा नाद होता व तो नेहमी घोडयांची चित्रे काढी. म्हणून त्याला ‘चित्राश्व’ या टोपण नावानेही ओळखत.

अश्वपतीने विचारलेल्या आणखी काही प्रश्नांना उत्तर देताना नारदमुनी म्हणाले की सत्यवान सूर्यासमान तेजस्वी असून तो बृहस्पतीतुल्य बुध्दीचा आहे. संकृतीचा मुलगा रतिदेव याच्यासारखा तो उदारहृदयी असून ययातीसारखा अतिशय नि:स्वार्थी व सढळहाती आहे. उशिनारपुत्र शिबीप्रमाणे तो विद्वज्जनांचा आदर करणारा व सत्यवचनी आहे. चंद्रासारखा सुंदर दिसत असल्याने तो अश्विनीकुमारांपैकी एक तर नव्हे अशी शंका पौरजनांच्या मनाला चाटून जाते. आपल्या सर्व विकारांचे त्याने दमन केले आहे. वीरकर्मे करण्यात अग्रणी असूनही सर्वांशी तो मित्रभावाने वागतो. वनातील ऋषिजनांना तो प्रिय आहे आणि सत्यवानाच्या सद़्गुणांची ते नेहमीच प्रशंसा करतात.

पण सत्यवानात काही दोष आहेत काय अशी अश्वपतींनी वारंवार विचारणा केल्यानंतर नारदमुनी म्हणाले की त्याच्यात फक्त एकच त्रुटी आहे व ती म्हणजे बरोबर एका वर्षने त्याचा मृत्यु ओढवणार आहे. अगदी नकळत व अज्ञानातून आणि फक्त या एकाच कारणास्तव सावित्रीने आपला जीवनसाथी म्हणून केलेली सत्यवानाची निवड एक अनिष्ट नव्हे, शापित बाब ठरली आहे.

इतकी सारी हकीकत कळाल्यावर अश्वपतीने सुचविले की सावित्रीने वरसंशोधनासाठी पुन्हा नव्याने प्रवासास निघावे आणि आपला पती म्हणून अन्य एकाद्या व्यक्तीचा शोध घ्यावा. देवर्षी नारदांनी सत्यवान हा अल्पायुषी असल्याचे सांगितल्याने त्याच्या अंगचे सारे गुणविशेष निःशेष ठरले आहेत आणि म्हणून जे दोषास्पद असल्याचे आधीच ज्ञात झाले आहे त्याचा तिने स्वीकार करता कामा नये. पण सावित्री आपल्या निश्चयाशी ठाम होती. सत्यवानाची निवड आपल्या अंतरात्म्यानेच केलेली असल्याने केवळ त्याचेच अनुशासन आपण मानू असे सांगून ती आपल्या निर्णयाशी चिकटून राहिली. भावाभावांतील पैतृक संपत्तीची वाटणी, कन्यादान, दानशूरांचे दान या तिन्ही गोष्टी एकेकदाच घडून येतात, पुनःपुन्हा नाही असे सांगून ती म्हणाली की सत्यवान अल्पायुषी आहे की दीर्घायुषी, तो सद़्गुणी आहे की दुर्गुणी हे प्रश्न आता उद़्भवत नाहीत. ही निवड मी केलेली आहे आणि आता त्याबाबत मी दुसरा विचार करू शकत नाही. तिचा निर्णय आता पक्का झालेला आहे. उच्चतर जीवनाचे एक महान सत्य सांगून तिने आपले म्हणणे अधिंक स्पष्ट केले.

मनसा निश्चयं कृत्वा ततो वाचाभिर्धीयते।

क्रियते कर्मणा पश्चात् प्रमाणं मनस्ततः।।

आधी एकाद्या गोष्टीचा मनोमन निश्चय करून व्यक्ती त्याचा नंतर उच्चार करते व मग कृतीत आणते. तो मनोमन निश्चयच माइया द़ृष्टीने मला प्रमाण आहे.

नारद मुनींनी अंतर्यामी जाणले की सावित्रीत द़ृढ व निश्चल अंतर्भेदी द़ृष्टी आहे आणि ती धर्मपथावर निश्चयपूर्वक वाटचाल करीत असल्याने त्या मार्गावरून तिला कुणीही परावृत्त करू शकणार नाही. तसेच सत्यवानासारखा सद़्गुणी दुसरा कुणी आढळणार नाही हे ठाऊक असल्याने या विवाहाला त्यांनी संमती दर्शविली. कोणताही अनुचित प्रसंग न येता सावित्रीचा विवाह निंर्विघ्नपणे पार पडेल असा शुभाशीर्वादही त्यांनी दिला. नंतर सर्वांचे कल्याण चिंतून नारदमुनींनी आपल्या निवासस्थानी स्वर्गलोकी प्रयाण केले.

अविघ्नमस्तु सावित्र्या: प्रदाने दुहितुस्तव।

साधयिष्याम्यहं तावत् सर्वेषां भद्रमस्तु व:।।

अधिक माहिती साठी इथे क्लिक करा

सावित्रीची प्राचीन कथा

सावित्रीची प्राचीन कथा – भाग २
वाचन: सौ. सुनीति देशपांडे

[youtube:http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=0u3idVK9oBw%5D

यातच त्यांच्या भविष्यवाणीचा पूर्ण अन्वयार्थ भरलेला आहे. यामुळेच व्यासप्रणित सावित्रीच्या कथेला एक प्रकारचा दिव्य व द़ृढ आधार लाभला आहे आणि श्रीअरर्विंदांच्या सावित्रीच्या आध्यत्मिकतेचा सारा भार पेलण्याची क्षमता त्यात निर्माण झाली आहे.

पृथ्वीवरील अस्तित्वाचे सारे सार सत्यवानाच्या मृत्यूत प्रतिबिंबित झाले आहे. आपल्यात व सभोवती परिपूर्ण प्रमाणात अस्तित्वात असलेल्या या सर्वंकश धागधुगीवर पूर्ण स्वामित्व मिळवून या समस्येची सोडवणूक करण्यासाठी सावित्री या वास्तवाचा स्वीकार करते. सत्य-चेतनेचा दिव्य प्रकाश खराखुरा मार्गदर्शक करण्याच्या तिच्या ध्यासाने जगाचे रक्षण होईल हे मात्र निर्विवाद.

सावित्री उपाख्यानाची कथा आणि महत्व जर अशा प्रकारचे असेल तर खरोखरच त्यात नव्या भविष्यकाळाची शक्यता अनस्युत आहे आणि सर्जनशील दिव्य वाणीच्या – मंत्राच्या – सामर्थ्यानेच त्याचा शुभारंभ होऊ शकेल. जेव्हा अशी दिव्य वाणी अत्युच्च स्तरावरून येते, जेथे शब्दाला परावाणीचे परिमाण असते तेव्हा त्याबरोबर शक्तीचा प्रपातही घडून येतो. या पार्श्वभूमीवरून पाहिले तर ही कथा एकाचवेळी आख्यायिका व रूपक बनते. एकादे ऐतिहासिक सत्य कालद़ृष्टया इतके पुरातन होते की त्याची आख्यायिका बनते आणि ऐहिक जीवनातदेखील विधायक आध्यात्मिकतेच्या अतीन्द्रिय कार्याचे रूपक बनते. व्यासांच्या उपाख्यानात आणि श्रीअरविंदांच्या महाकाव्यात आपणाला याचीच प्रचीती येते. समृद्ध ऋषिपदातून आलेली ती निर्मिती असल्याने न्यातील प्रत्येक प्रसंग, प्रत्येक वाक् प्रचार, प्रत्येक काव्य पंक्ती, प्रत्येक शब्दाचा ध्वनी व प्रतिमा, द़ृश्य कवितेचे संविधानक व संरचना या प्रत्येकावर अस्सलपणाची मुद्रा असते. जे काव्यमय सत्य ‘पाहू’ शकतात व काव्यमय शब्द ‘ऐकू’ शकतात त्यांनाच हे शक्य आहे. त्यामुळेच कलात्मक द़ृष्टयादेखील ही कृती अत्यंत परिपूर्ण व समाधानकारक बनून खूप आनन्ददायकही ठरते. त्यात काहीही मागेपुढे करायला वा कमी जास्त करायला कुठेही वाव नाही. विंटरनिट्झच्या यथोचित शब्दात सांगायचे झाल्यास ‘सश्रद्ध सावित्रीचे हे अद्भुत काव्य’ आहे.

दुर्दैवाने सावित्रीच्या कथेत मोठया प्रमाणावर मध्ययुगीन कल्पनाविलास धुसडण्यात आला आहे. त्यामुळे केवळ गोंधळ व विकृतीच उद़्भवत नाही तर व्यासांनी आपल्या अत्युत्कृष्ठ हाताळणीने या कथेला जे शांत व समतोल श्रेष्ठत्व दिले त्यालाही बव्हंशी कमीपणा येतो. रमेशचंद्र दत्त यांनी झुंजार कवीच्या तेजस्वी नायिकेचे रुपांतर एका मुळुमुळु रडण्यान्या गृहीणीत केले आहे. या बाबतीत श्रीअरविंद म्हणतात, ‘‘ज्या शक्तीने ती घडविली गेली ती शक्तीच त्यांनी काढून घेतली.’’ अशी एकादी भावना प्रधान दुबळी स्त्री करारी व कंणखर यमराजावर विजय प्राप्त करू शकेल आणि मृत्यूच्या कराल दाढेतून आपल्या पतीला बाहेर खेचून त्याच्या आत्म्याला पुनर्जीवन देऊ शकेल ही कल्पनाच अशक्य कोटीतील वाटते. आपापल्या काळाला पचेल व रुचेल अशा पद्धतीने व्यासांच्या सावित्री आख्यायिकेत तत्कालीन लेखकांनी कित्येक बारीक सारीक व कधीकधी ओंगळ तपशीलही भरले आहेत. पण त्यामुळे मूळ काव्याची गोडी वाढण्याऐवजी ती कमीच झाली आहे आणि त्याच्या हिन्यासारख्या शुद्धतेला आणि लखलखीत सुसंगतपणाला बाधाच आली आहे. पतिसेवेतून लाभलेल्या पातिव्रत्याने स्त्री अशक्य गोष्टी शक्य करून दाखवते असे म्हणणे म्हणजेदेखील या प्रश्नावर नैतिकतेचे आवरण चढवून एका विशिष्ट सामाजिक तत्त्वज्ञानाची भलावण करण्यासारखे आहे. मानवाच्या सखोल व तीव्र उपजत बुध्दीचे त्यामुळे मुळीच समाधान होण्यासारखे नाही. कालांतराने पापभीरू धर्माच्या जागी श्रद्धा वरचढ होते आणि अशा अंधश्रध्देने पर्यवसान सहजासहजी आत्मघातकी आसक्तीत होऊ शकते. पण ही अगदीच गावंढळ बाब झाली व तिला आपण दाद देऊ शकत नाही आणि काहीही झाले तरी ज्याचे दार्शनिक अभिव्यक्तीवर पूर्ण प्रभुत्व आहे व ज्याची द़ृष्टी प्रत्यही जीवनाचे उन्नयन घडविते त्या कवीर्मनीषीच्या मनात असा विचार असूच शकत नाहीं.

आणखी एक दोन उदाहरणे घेऊ. पहिले उदाहरण नारदमुनींनी अश्वपतीला दिलेल्या भेटीचे. वरसंशोधनाचा कार्यभाग उरकून सावित्री राजवाडयात परतलेली असते आणि आपण सत्यवानाला आपला पती म्हणूनू निवडले असल्याचे ती प्रकट करते. यानंतरच्या कथाभागाला मात्र एका लेखकाने भलतेच वळण दिले आहे. कन्येच्या भविष्याच्या काळजीने ग्रस्त झालेला पिता नारदमुनींना वधुवरांच्या कुंडल्या जमतात का ते बघायची विनंती करतो. आपल्या मुलीचा संसार सुखाचा होईल की नाही याची त्याला काळजी लागून राहिलेली असते. विशेष म्हणजे नारदमुनीही अश्वपतीची विनंती मान्य करतात आणि दोन्ही कुंडल्या ताडून वर्षभरात सत्यवानाला मृत्यू येणार असल्याचे भविष्य वर्तवितात. अशा रीतीने लेखकाने देवर्षीला आपल्या अंतर्ज्ञानापासून वंचित ठेवले असून त्याला खेडयापाडयातील एकाद्या कुडमुडया ब्राह्मण ज्योतिषाच्या पंक्तीला नेऊन बसविले आहे. जर या असामान्य दंपतीच्या जीवननौकेचे सुकाणू केवळ कुंडलीच्या हातात असते तर आकाशस्थ ग्रहतारेच यमराजावर विजय मिळविण्यास समर्थ होते, त्यासाठी ‘सावित्री’ ला पृथ्वीवर जन्म घेण्याचा खटाटोप करण्याची काय गरज होती? पण ‘दोन ज्योतिर्गणाच्या सुखी साहचर्या’ चे आध्यात्मिक आविष्कारात आगळेच औचित्य आहे. ही गोष्ट जर मान्य केली नाही तर पुन्हा रमेशचन्द्र दत्त यांच्या कथेचीच पुनरावृत्ती व्हायची – काळ्याकुट्ट अपशकुनी अवस्थेचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी देवीच्या अवताराने स्वत: मध्ये जी शक्ती स्थित केली होती तीच तिच्यापासून हिरावून घेण्यासारखा हा प्रकार व्हावयाचा.

आणखी एका भाषांतरात तर मूळ कथेत कोणताही आधार नसता असे म्हटपे आहे को देवी सावित्री अश्वपतीला उत्साहाच्या भरात केवळ मुलाचाच नव्हे तर एका तेजस्वी कन्येचाही जादा वर देते! अशा अविचारी हाताळणीने निश्चितच मूळ कथेतील जोमदारपणा कमी होतो आणि प्राचीन प्रभेच्या कितीतरी छटा क्षीण व धूसर होतात. ज्या कथेची कलात्मक व आध्यात्मिक हाताळणी मुळातच औचित्यपूर्ण आहे आणि जिच्या विदग्धतेचा विशुद्ध स्वर लागला आहे त्यात तन्हेवाईकपणे वरची पट्टी लावण्याचा या कविर्मनीषीचा उद्देश नाही किंवा त्यात आणखी नाटकीपणाची भर घालण्याची किंवा भावनोद्रेकात वाहवत जाण्याची त्याला मुळीच गरज भासत नाही. त्यात एकाद्या नीतिवाद्याची शिकवण नाही तर सूज्ञपणा व सद़्गुण यांना उंचावणान्या प्रेमाच्या शक्तीचे रेखाटन आहे, तीच शक्ती अखेर नियती व मृत्यू यावर मात करू शकते.

सावित्रीची आख्यायिका केवळ सर्वसामान्यांसाठीच आहे आणि जाणत्या जाणित्यांना वा विद्वत्वर्गाला त्यात काहीच गवसण्यासारखे नाही असे मुळीच नाही. खरे तर अत्यंत तेज:पुंज व स्वर्गभूमीकडे झेपावणान्या साक्षात् यज्ञाच्या अग्निज्वाळेप्रमाणे ते एक गहन व सजीव रुपक आहे. आध्यात्मिकतेच्या आयामातील विविध समृद्ध तत्त्वे आणि पृथ्वीतलावरील जीवनातील अपरिमिंत विकासाच्या शक्यतेतील कल्याणकारी संतोषाचे आत्मकिरण यांना सामावून घेण्यास सावित्रीच्या आकृतीबंधात पूर्ण वाव आहे. वेदांनी कंठरवाने आणि हर्षभराने गायलेला पुरुषाचा महान् आत्मयज्ञ किंवा अधिक धीटपणे सांगायचे झाले तर त्याचा पहिला मृत्यु जर विश्वनिर्मितीला कारणीभूत होतो तर प्रकृतीचा सर्वंकष विध्वंस पुरुषाच्या दिव्य देहात या निर्मितीला नवसंजीवन प्राप्त करून देईल. आख्यायिका व रुपक या द़ृष्टीने हाच सावित्रीच्या कथेचा हेतू व महत्त्व असल्याचे अनुभवातीत स्तरावरुन जाणवते. पुरुषाचा मृत्यु आणि नंतर तिहेरी दिव्यानंदात नव्या विश्वरचनेसाठी प्रकृतीच्या माध्यमातून त्याचे पुनरुत्थान हेच त्यामागील विचारसूत्र आहे. ही कल्पना आधीच प्रगतावस्थेत असून सत्यवचनाचे सूक्ष्म-भौतिक रुप तिने धारण केले आहे आणि प्रकाशमय सिद्धतेसाठी ती आपल्या चेतनेत कार्यरत आहे. मृत पुरुषाचा देह याआधीच दिव्य सद़्सद़्विवेकाच्या प्रखर सूर्यप्रकाशात चलनवलन करण्याइतपत उत्क्रंतिक्रमात पुरेसा अमर्त्य झाला आहे. अशा रीतीने अमर्त्य जगात जो महान आहे तो रुपांतरित मर्त्य जगातही महान ठरणार आहे.

हे सारे मृत्युलोकात, मानवी स्तरावर साध्य व्हावे म्हणून सत्यवानाने मृत्युला कवटाळण्याची आवश्यकता आहे. या विश्वनिर्मितीत पुरुषाचा हा दुसरा मृत्यु असेल. या निर्मितीत आपल्या पतीवरील मृत्यूचा ललाटलेख पुसून त्याला अमरत्त्वाचे वैभव पुन्हा सावित्रीच मिळवून देणार आहे. आपल्यात साक्षात् वावरणान्या या व्यक्ती आहेत. जी एकमेवात निःशब्द होती ती प्रकृती येथे कृतिशील झाली असून द्रष्टयाचे अकर्ता रूप स्वीकारलेल्या, मृत्युसद़ृश विश्रांती घेत असलेल्या पुरुषाला जागृतावस्थेत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या रुपकाचा आश्रय घेऊन सांगायचे झाल्यास ‘‘जेव्हा शिव निद्राधीन होतो तेव्हा भवानी जागी असते आणि दोघांची भूमिका ती एकटयानेच निभावते.’’ आध्यात्मिक संकल्पनेतील पुरुष व प्रकृतीही या भौतिक जगात रक्तामासाचे सत्यवान व सावित्री बनतात आणि असत्याचे सत्यात, अंधाराचे प्रकाशात, मृत्युचे अमरत्त्वात रूपांतर करण्याची महान किमया करण्यास सिद्ध होतात.

जर हे सावित्रीकथेचे विविधांगी पदर असतील तर ही कथा आपण पुन्हा मुळापासून वाचू या आणि तिचे नि:संदिग्ध वैभव आपल्या अंतरंगात मुरवू या.

अधिक माहिती साठी इथे क्लिक करा

सावित्रीची प्राचीन कथा

सावित्रीची प्राचीन कथा – भाग १
वाचन: सौ. सुनीति देशपांडे

सन्तो हि सत्येन नयन्ति सूर्यं
सन्तो भूमिं तपसा धारयन्ति।
सन्तो गतिर्भूतभव्यस्य राजन्
सतां मध्ये नावसीदन्ति सन्तः।।

आपल्या सत्याचरणाने संतमंडळी
सूर्याचा प्रशस्त मार्ग निश्चित करतात;
तपश्चरणाने संत पृथ्वीला आधार देतात;
भूत, वर्तमान व भविष्यकाळ
यांना संतांच्या ठायी आसरा मिळतो.
संतांच्या संगतीत
सत्युरुष कधीही दुःखी होत नाहीत.

[youtube:http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=HJAUr9MuPi0%5D

उपोद़्घात
स्त्रीच्या पातिव्रत्यातील आणि पतिभक्तीतील सामर्थ्याचा प्रत्यय घडविण्याच्या निमित्ताने महाभारतातील सावित्रीची कथा येते. या महाकाव्याच्या वनपर्वामध्ये सात भागात सावित्रीचे उपाख्यान येते. द्रौपदीच्या हालअपेष्टा पाहून उदास झालेल्या युधिष्ठिराचे सांत्वन करणसाठी मार्कंडेय मुनी त्याला सावित्रीची कथा सांगतात. ते त्याला दिलासा देतात की सावित्रीप्रमाणे द्रौपदीही दु:खी पांडवांची उद्धारकर्ती आणि भाग्यविधाती ठरेल.

मद्र देशाचा राजा अश्वपती निपुत्रिक असतो. सतत अठरा वर्षे ‘सावित्री यज्ञ’ केल्यानंतर त्याला एका तेजस्वी कन्येच्या रूपाने वरदान मिळते. यथावकाश सावित्री वयात येते, पण तिच्या तेजःपुंज लावण्यापुढे फिके पडलेले राजकुमार विवाहासाठी तिला मागणी घालण्यास धजावत नाहीत. अखेर सावित्रीने स्वत: च आपला पती निवडावा असे राजा अश्वपती सुचवितो आणि मग राजदरबारातील ज्येष्ठ व जाणिते मंत्री घेऊन सावित्री वरसंशोधनार्थ बाहेर पडते. सावित्री निरनिराळ्या देशात हिंडते आणि नदीकाठावरील कित्येक आश्रमांना, मंदिरांना आणि राजधान्यांना भेटी देते. पवित्र तीर्थस्थळी ती पूजाअर्चा करते आणि सत्पात्र विद्वानांना भरपूर दानधर्म करते. अखेर शाल्व राज्याच्या घनदाट वनात सावित्री सत्यवानाला पाहते आणि तत्क्षणी जीवनसाथी निवडण्यासाठी तिने चालविलेला शोध थांबतो. सत्यवानही तिच्यावर अनुरक्त होतो आणि दोघेही परस्परांना मनोमन वरतात.

इकडे देवर्षी नारद राजा अश्वपतीच्या भेटीला आलेले असतात. दोघे संभाषणात निमग्न असतानाच सावित्री वरसंशोधनाचे आपले इप्सित साध्य करून परत येते. राजाने पृच्छा केल्यावर आपण सत्यवानाची पती म्हणून निवड केल्याचे सावित्री प्रकट करते. सावित्रीची ही निवड ‘दुर्दैवी’ असल्याची टिप्पणी नारद लगोलग करतात. कारण विवाहानंतर वर्षभरातच सत्यवानाचा मृत्यु घडून येणार असे विधिलिखित असते. साहजिकच सावित्रीने दुसप्या एकाद्या व्यक्तीची पती म्हणून निवड करावी असे राजा सुचवितो. पण ती आपल्या निश्चयापासून ढलत नाही. सावित्री एकदाच निवड करते, पुनः पुन्हा नाही. तिचा हा निश्चय धर्मानुरूप आहे व म्हणून त्यावर स्वर्गीय शिक्कामोर्तब आहे याची जाणीव नारदमुनींना असते. ते या विवाहाला आशीर्वाद देतात आणि कार्य निविघ्नपणे पार पडो असे चिंतितात. मग रीतीरिवाजाप्रमाणे सत्यवानाचे पिता द्युमत्सेन यांच्याकडे राजाकडून विवाहाचा प्रस्ताव जातो आणि यथावकाश शाल्ववनात ऋषिमुनींच्या आशीर्वादाने सत्यवान व सावित्री यांचे शुभमंगल संपन्न होते.

विवाहाला जवळजवळ एक वर्ष पूर्ण होते आणि सत्यवानाच्या आयुष्यात अखेरचे फक्त चारच दिवस शिल्लक राहिले आहेत असे पाहताच सावित्रीची अस्वस्थता वाढते. अन्नत्याग करून सतत तीन दिवस एकाच जागी स्थिर उभे राहण्याचे ऊग्र त्रिरात्र व्रत ती आचरते. अखेर तो निर्वाणीचा दिवस उजाडल्यावर सावित्री अग्निदेवाची पूजा करते आणि थोरामोठयांचां आशीर्वाद घेतल्यावर पतिदेवासह वनात जाते. वनात आपले नित्यकर्म पार पाडत असता सत्यवानाला एकाएकी विलक्षण थकवा येतो व त्याचे सारे अंग घामाने डबडबून जाते. सावित्री त्याचे मस्तक आपल्या मांडीवर घेते. नारदमुनींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीप्रमाणे अंतिम क्षण येत असल्याचे तिला उमगते. तेवढयात सावित्रीला असे दिसते की एक तेजस्वी देव सत्यवानाचा आत्मा घेऊन दक्षिण दिशेला प्रयाण करीत आहे. सावित्री त्याच्या पाठोपाठ जाते आणि यमराजाशी उदात्त विषयावर वादविवाद करून त्याच्याकडून अनेक वर हस्तगत करते. अखेर सत्यवानाचा आत्मा परत मिळविण्यात तिला यशं येते.

पृथ्वीवर परतल्यावर या दंपतीला असे आढळून येते की संध्याकाळ झाली असून अंधाराचे साम्राज्य पसरू लागले आहे. वडीलधारी मंडळी काळजीत असतील या अपेक्षेने ते लगबगीने आश्रमाला परतण्याचे ठरवितात. खरे तर राजा द्युमत्सेन बराच अधीर आणि अस्वस्थ झाला होता, पण आश्रमातील ऋषीमुनी त्याला दिलासा देत होते. मग लवकरच सत्यवान-सावित्री घरी परततात अणि सर्वत्र एकच हर्षोत्फुल्ल वातावरण निर्माण होते, अखेर गौतम ऋषींच्या आग्रहावरून, नारदमुनींच्या भविष्यवाणीपासून सुरुवात करून सत्यवानाचे प्राण यमराजाच्या तावडीतून परत मिळविण्यापर्यंतची इत्थंभूत हकीकत सावित्री कथन करते.

महाभारतातील ३०० श्लोकात किंवा ६०० पंक्तीत सांगितलेल्या सावित्री आख्यानाचा हा सारांश आहे. अगदी प्राणाशी गाठ पडली असतानाही प्रेम आणि पतिभक्ती त्यापुढे किती समर्थ़पणे उभे ठाकू शकता येते याचे दर्शन घडविणे हे कवीचे तात्कालिक उद्दिष्ट असले तरी नैतिक वा धार्मिक परीघाबाहेरही त्याची दूरवर धाव आहे. हे काव्य म्हणजे एक आध्यात्मिक दस्तऐवज असून दैनंदिन व्यावहारिक जीवनातील आत्मबलाचे श्रेष्ठत्त्व या साध्यासुध्या कथेत प्रतिबिंबित झाले आहे. खरे तर ऋषीकवी असे सुचवीत आहे की सत्याचा मार्ग हाच चिरंतन आनंदाचा व मुक्तीचा मार्ग आहे. जी जीवनमूल्ये आत्मशक्तीने भारलेली असतात तीच अगदी ऐहिक व्यवहारातही उपकारक ठरतात. वनामध्ये भेटल्याक्षणीच सावित्रीला सत्यवानाच्या अंतर्यामी असलेल्या सत्याची खूण पटली आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ती त्याला दुरावली नाही, तिच्या आत्म्यातील प्रेमाच्या शक्तीने ती निवड केली होती, इतकेच नव्हे तर त्या सत्याला एक सुस्पष्ट व अचूक मार्गदर्शक मानण्यास ती तयार झाली होती. तिला ज्ञात झालेल्या त्या अनन्य सत्याच्या प्राप्तीला प्रतिबंध करणान्या सर्व अडथळ्यांवर तिच्यातील ‘अंतःप्रेरित’ व नवजागृत प्रेमाच्या अद़्भुत किमयेने मात केली.

सावित्रीच्या कथेचा सारा भर आंतरिक ज्ञान आणि त्याला खंबीरपणे चिकटून रहाण्यासाठी आवश्यक असलेल्या मनोधैर्यावर आहे. सत्यधर्माचे तेच खरे स्वरूप आहे. सदैव स्वर्गीय मान्यता असूनही जीवनातील सारे धोके आणि अनर्थ त्याला पार करावे लागतात. सावित्रीची खरी थोरवी हीच की ऐन माध्यान्हीला काळेकुट्ट ढग माथ्यावर आले असताही तिने सत्यधर्माची कास सोडली नाही. सत्यवानाचा मृत्यू हा काही साधारण स्वरूपाचा मानवी मृत्यू नव्हता, प्रत्यक्ष यमराज त्या विशिष्ट माध्यान्ही सत्यवानाचा आत्मा हिसकावून घेण्यासाठी आला होता. त्या असाधारण परिस्थितीत सावित्रीचा दुर्दम्य आत्मा ठाम उभा ठाकला आणि त्याने मातीच्या त्या कलेवरावर दिव्यत्वाचा अधिकार सांगून त्याला स्वत: चा अद़्भुत प्रकाशही प्रदान केला. हा विजय प्रस्थापित करण्यासाठी सावित्रीने दीर्घ व कठीण तपस्येची तयारी केली होती. ती केवळ तेजस्विनी कन्याच नव्हती तर, ध्यानयोगातही तिने फार मजल मारली होती. त्यावर तिचे प्रभुत्व होते, तसेच अतींद्रिय शक्तींचा वापर करण्यातही ती प्रवीण होती. समाजासमोर अशी उदात्त, उत्तुंग सावित्री उभी करून स्वत: द्रष्टा कवीही अत्युच्च स्तरावर पोहोचला आहे.

या उपाख्यानाच्या प्रत्येक ओळीवर व प्रत्येक प्रसंगावर व्यास महर्षींच्या धीरगंभीर व उदात्त शैलीचा ठसा उमटला आहे. कलात्मक अभिरुचीच्या शुद्धतेवर त्यांचा कटाक्ष आहे आणि त्यांच्या स्वयंपूर्ण व नेमक्या चित्रणात एक प्रकारची परिपूर्णता आहे. व्यासांच्या साहित्याचा वेध घाईघाईने घेता येण्यासारखा नाही. ‘तपशीलात परिपूर्ण पण संयमित असलेली ही परिपक्व व उदात्त’ सावित्री-कथा जोमदार आणि आशयाला थेट भिडणारी आहे. ही कथा व्यासांनी जरी आपल्या ‘प्रतिभेच्या प्रभातकाळात’ लिहिलेली असली तरी तिच्यावर त्यांच्या ऋषिपदाची मुद्रा स्पष्टपणे उमटलेली दिसते. व्यासांच्या शैलीतील धीरगंभीर भव्यतेचे आकलन श्रीअरविंद पुढील शब्दात करतात, ‘‘एकाद्या भावुक रोमँटिक वृत्तीच्या कवीने मृत्यूचे एवढे अवडंबर माजविले असते आणि मानवी जीवात्मा आणि अश्रूचा व विरहाचा स्वामी यांच्यातील संघर्षाचे केवढे शब्दबंबाल चित्र रंगविले असते! पण ते व्यासांच्या जणू खिजगणतीतच नाही. स्त्रीच्या निःशब्द प्रेमाची शक्ती प्रकट करणे हे त्यांचे एकमेव उद्दिष्ट आहे आणि म्हणून ही मर्यादा ओलांडणारे वा निव्वळ कलाकुसरीचे ठरणारे लालित्य त्यांनी टाकून दिले. मृत्यूशी जीवघेणा संघर्ष करणान्या प्रेमाचे कल्पनारम्य आणि भावनोत्कट वर्णन करू शकणारे उदंड लेखक आहेत, पण आपणाला ‘सावित्री’ देऊ शकणारा हा एकच आगळा कवी आहे.’’1 व्यासांनी चितारलेली ही कथा आध्यात्मिक तत्त्वांनी भारलेली असल्याचे श्रीअरविंदांना भावले आणि तिचे अनेकविध आयाम घेऊन त्यांनी दिव्य उत्क्रांतीच्या परिपूर्तीचे एक महाकाव्य रचले. अशा रीतीने सावित्रीची कथा पुरातन असली तरी तिची प्रेरकशक्ती नित्यनूतन आहे.

सावित्रीच्या कथेतील प्रतीकात्मक संभाव्यतांबाबत श्रीअरविंद म्हणतात, ‘‘महाभारतात सत्यवान व सावित्री यांची कथा ही मृत्यूवर दांपत्यप्रेमाने मिळवलेल्या विजयाच्या कथेचे रूप धारण करते. पण या मानवी कथेतील अनेक विशेषतांमधून दिसल्याप्रमाणे ही आख्यायिका म्हणजे वैदिक कालचक्रातील प्रतीकात्मक ‘‘मिथक’’ (गोष्टीरूप कथन) असल्याचे जाणवते. मृत्यू व अज्ञान यांच्या सापळ्यात सापडलेला जीवात्मा म्हणजे सत्यवान. सर्वोच्च सत्याची देवता, दिव्य शब्द असलेली सूर्यकन्या सावित्री ही मानवजातीचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेते. तिचा मानवी पिता अश्वपती हा पार्थिव स्तरावरून अपार्थिव स्तरापर्यंत उत्थान करण्यास मानवास साह्यभूत ठरणाप्या तपस्येचा स्वामी आहे. सत्यवानाचा पिता द्युमत्सेन हा दिव्यमनाचा अधिपती आहे, पण तो द़ृष्टीचे स्वर्गीय राज्य गमावून अंध बनतो व मग आपल्या राज्याची प्रतिष्ठाही गमावतो. तरीही हे काही केवळ रूपंक नव्हे, यातील पात्रे म्हणजे केवळ व्यक्तिरूप धारण केलेले गुणविशेष नव्हेत, तर सजीव व सचेतन दिव्य शक्तीच्या साक्षात मूर्ती आहेत. त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष संबंध जोडू शकतो आणि त्या दिव्य शक्तीही मानवाला साहस करण्यासाठी आणि त्याला त्याच्या मर्त्य अवस्थेपासून दिव्य चेतनेप्रत व अविनाशी जीवनापर्यंत जाण्याचा मार्ग दाखविण्यासाठी मानवी आकार धारण करू शकतात.’’

वैदिक कालचक्रातील प्रतीकात्मक मिथके व्यासांना परंपरेने प्राप्त झाली आणि आपल्या भव्य व उदात्त आत्मिक उपलब्धीतून त्यांनी या मिथकांची पुनर्निर्मिती केली. या निर्मितीलाही स्वर्गकन्येचे स्वरूप लाभले आहे. स्वत: व्यासांनीच एके ठिकाणी सावित्रीला ‘देवरुपिणी’ म्हटले आहे.

अशा रीतीने आध्यात्मिक स्वरुपातील सावित्रीची कथा ही दिव्य शक्तीने स्वत: निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी होऊन मृत्यूवर मात करण्याची कथा आहे. ज्यावेळी अशा तन्हेची दिव्य कृती ही नि:संदिग्धपणे निकडीची ठरते असा सर्वोच्च क्षण उत्क्रांतिक्रमात निर्माण झाला आहे. मनुष्यमात्रातील हजारो दुष्टप्रवृत्ती आणि त्याच्या आत्म्याला झाकोळून सारे असत्य धड बाजूलाही सारता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. उरते ते केवळ अनंत काळपर्यंत पुनःपुन्हा उभे ठाकणारे भयावह प्रश्नचिन्ह. अनिश्चित, दुःसह काळापर्यंत चाललेल्या बलिदानातदेखील ऐहिक तमात खोलवर बुडी मारून बसलेल्या देवतेची तुष्टी होत नाहीसे दिसते. या प्रचंड तमस्वरूप जीवाची भूक अगदी दुराराध्य आहे. स्वार्गीय देवेदेवताही त्यापुढे हताश होतात. पण अस्तित्वाचे चिरंतन सत्य म्हणून ही परिस्थिती स्वीकारता येत नाही. म्हाणून स्वत: सावित्री पृथ्वीवर येते आणि मर्त्य मानवाचे ओझे आपल्या शिरावर घेऊन ही मूलभूत समस्या सोडविण्याचा नेटाने प्रयत्न करते.

सत्यवानाच्या मृत्यूचे तीव्र दुःख ती पचवते आणि ईश्वरी निर्मितीतील आपली भूमिका पार पाडते. नारदमुनींचे ‘‘सत्यवानाचा मृत्यू झालाच पाहिजे’’ असे वचन आहे, ‘‘सत्यवान मरेल’’ असे त्यात विधान नव्हते.

अधिक माहिती साठी इथे क्लिक करा

माकडं

माकड

माकड म्हटले की एकदम आश्र्चर्य वाटणारं आहे

जुलै महिना माकड खूप फिरतात खर तर मे महिना तं
माकडं फिरतात व जून जुलै गाढव दिसतात

पण आमच्या कॉलनी तं सध्या माकडं फिरतांना दिसतात

गम्मत आमच्या मागच्या ग्यालरीत दोन माकडं बसलेले दिसले
मी सहज दार उघडले तर माकडं आरे बाप रे घाबरले प्रथम दार लावलं
ग्यालरी चं

थोड्या वेळाने परत दार उघडलं तर एक माकडं खाली उतरतांना दिसलं
नंतर परत दार उघडलं परातं वाटलं फोटो काढावा माकडं यांचा जवळ चं
क्यामेरा असल्याने मी पटकन फोटो काढला माकड यांच्या मजा वाटली
भीती वाटली नाही माकड पण छान बघत बसले मस्त मी फोटो काढला आहे

माकड याच्या आमच्या ग्यालती बसलेला माकड यांचा फोटो
पाहण्यासा आपणास नक्की चं आवडेल !

DSCF4012 DSCF4011

श्री वट सावित्री ची आरती

                          ॐ 

श्री वट सावित्री ची आरती 

अश्र्वपती पुसता झाला || नारद सांगताती तयाला ||

अल्पायुषी सत्यवंत || सावित्री नें प्रणीला ||

आणखी वर वरी बाळें || मनीं निश्र्चय जो केला ||

आरती वड राजा || १ || दयावंत यमदूजा || 

सत्यवंत ही सावित्री || भावे करीन मी पूजा ||

आरती वड राजा || धृ o || ज्येष्ठ मास त्रयोदशी ||

करिती पूजन वडाशी || त्रिरात्र व्रत करुनिया ||

जिकीं तूं सत्यवंता शी || आरती वड राजा || २ || 

स्वर्गावरी जाऊनिया || अग्निखांब कचळीला || 

धर्मराज उचकला || हत्या घालील जिवाला || 

येई गे पतीव्रते पती नेइ गे आपुला || 

आरती वड राजा || ३ || जाऊनीया यामापाशी || 

मागतसे आपल्या पती || चारी वर देऊनीया || 

दयावंत द्दावा पती आरती वड राजा || ४ || 

पतिव्रते तुझी कीर्ती || ऐकूनी नारी || 

तुझी व्रते आचरती ॥ तुझी भुवने पावती || 

आरती वड राजा || ५ || पतिव्रते तुझी स्तुती || 

त्रिभुवनी ज्या करिती || स्वगीं पुष्प वृष्टी करुनिया || 

आणिलासी आपुला पती || अभय देऊनीया || 

पति व्रते तारी त्यासी || आरती वड राजा || ६ || 

            || श्रीकृष्णार्पणमस्तु || 

 

    DSCF3997 DSCF4008

सत्यवान – सावित्री कथा

                                       ॐ 

सत्यवान – सावित्री कथा 

        कांही क्षणा नंतर घोड्या च्यां टापाचा आवाज ऐकू येऊ लागला 

द्दुमत्सेन राजाच्या जयजय काराने सारे आसमंत दुमदुमू लागले 

वाद्दे वाजू लागली. ते सर्वजण बाहेर येऊन पाहताच त्यांच्या राज्याचा प्रधान सेनापति व सैन्य तिथे येऊन पोहचले. त्याचे राज्य हिरावून घेतलेल्या शत्रूला जिंकून द्दुमत्सेन राजा आणि त्याच्या परिवार सह

राज्यात घेऊन जाण्यासाठी ते तिथे आले होते. सावित्री च्या पुण्याई ने तिने यमधर्म कडून मिळवलेल्या वाराप्रसादा मुळे हे सारे घडून आले होते   द्दुमत्सेन राजाचा सर्व परिवार सत्यवान व सावित्री या सर्वांना रथात बसवून वाजता गाजत मिरवणूक सन्मानपूर्वक त्यांनी शाल्व देशांत नेले . 

सत्यवान याला राज्याच्या सिंहासनी बसविले. 

सावित्री चे पिताश्री राजा अश्र्वपती राज्यारोहण समारंभ यास उपस्थित राहून 

राजा सत्यवान व राणी सावित्री देवी यांना नजराणा दिला. 

राजा अश्र्वपति ला पुत्र प्राप्ती झाली . 

पतिव्रता धर्मा मुळे सावित्री अखंड सौभाग्य वती पुत्र वती बनली . 

पातिव्रता पतिव्रता च्या सामर्था वर तिने पितृ कुळा चा व पति कुळा चा नाव लौकिक केला , उद्धार केला. सावित्री स्री जाती ला आदर्श बनली. 

जगात अजरामर झाली. 

लोमेश ऋषी नी ही कथा पांडव तीर्थ यात्रा करीत असतां धर्मराजा ला सांगितली . 

‘ श्री पांडव प्रताप ‘ या महान ग्रंथाच्या अठ्ठा विसाव्या अध्यायात ही कथा आली आहे 

                *                     *                      *                      *                        *

 

                               DSCF3997

सत्यवान – सावित्री कथा

                                          ॐ

सत्यवान – सावित्री कथा 

 

वट सावित्री 

           स्वर्गातील देव ते दृश्य पाहात होते. देवांनी स्वर्गातून सावित्री वर 

पुष्पवृष्टि केली सावत्री ने जाऊन सत्यवान याच्या शरीरास स्पर्श करताच तो खडबडून जागा होऊन उठून बसला 

‘ सावित्री मी झोपलो असतां एक भयानक पुरुष येऊन मला ओढून घेऊन 

जाऊ लागला परंतु तुम् त्याच्या कडे गेलीस त्याचाशी बोललिश त्याने हातउंचावून तुला आशिर्वाद दिला व मला सोडून दिले. मी त्या स्वप्नात होतो 

तूं येऊन मला जागं केलं स ! ‘ सत्यवान म्हणाला 

‘ ते स्वप्न नव्हतं ते सत्य होतं !’ सावित्री सर्व वर्तमान सत्यवान यास सांगितले 

‘ सावित्री … मी अल्पायुषी असल्याचं भविष्य मला माहिती होतं , परतुं तूं आपल्या पातिवत्यच्या प्रभावाने यमधर्म माझे गेलेले प्राण परत आणलेस. धन्य आहेस तूं !’

सावित्री 

सावित्रिने वट वृक्ष याची मनोभावे पूजा केली त्याच्या समोर ही घटना घडली होती 

वट वृक्ष ला प्रदक्षिणा घालून तिने नमस्कार केला नंतर ती दोघं घरी गेली.सावित्रीयमाकडून मिळवलेल्या वरामुळे तिच्या सासरा यांना चांगले दिसू लागले त्यामुले 

त्याला अतिशय आनंद झाला परंतु लाकडे आणण्यास रानात सत्यवान व सावित्री गेले ते अजून परत कसे आले नाहीत म्हणून त्यांना काळजी वाटू लागली होती. 

इतक्यात त्यांनी सत्यवान व सावित्री यांना येतांना पाहिलं.रानातून येण्यास विलंब का लागला असं त्यांनी विचारल्या वरुन सावित्री नं त्यांना घडलेली सर्व हकिगत 

सांगितली ते ऐकुन त्याना परम हर्ष झाला

                  DSCF3997

सत्यवान-सावित्री कथा

                                            ॐ 

सत्यवान – सावित्री कथा 

           लग्न झाल्या नंतर सावित्री आपले सासू सासरे व पतिबरोबर 

त्याच अरण्यांत राहू लागली सासुसासरे यांची व पतिव्रता धर्माने आपल्या पती ची तिनें अतिशयच सेवा केली त्यामुळे सर्व देव तिच्यावर संतुष्ट झाले 

त्या पतिव्रतेच्म दर्शन घेण्या करतां ते सारे देव प्रयत्न करित असतं नारद मुनी ने सांगितलेला तो दु:ख याचा दिवस जवळ येऊन ठेपला तिला चिंता ती दोघं दिवस भर रानांत हिंडली परंतु त्यांना पुरेशी लाकडे मिळाली 

नाहीत तेव्हा ती दोघं कष्टी बनून एका वड याच्या झाडा खाली बसली    सावित्री मनांत एकसारखे ईश्र्वर याचे नाम : स्मरण करित होती वारंवार 

सत्यवान कडे पहात होती ती अतिशय घाबरली होती 

हळू हळू काळोख पडू लागला सत्यवान वड याच्या एका फांदीवर घाव मारु लागला तोच ती फांदी त्याच्या मस्तक वर जोरानं आपटून तो कोसळला 

सावित्री ने हंबरडा फोडला शोक केला 

       तो दिवस पौर्णिमा चा होता तिला ती काळ रात्र भासली स्वच्छ चांदणे पडले होते. यमराज तिथे आला. सत्यवान याचे प्राण 

घेऊन दक्षिण दिशेस जाऊ लागला 

सावित्रीने  उठून नमस्कार केला विनय पूर्वक विचारले ‘ महाराज कोण आपण ? ‘

यावर यमराज म्हणाले ‘ मी यमधर्म आहे ! तूं महान पतिव्रता आहेस म्हणुन तुझ्या पति चे प्राण नेण्या करिता मी स्वत: आलो आहे . तू पुण्यवान असल्या मुळे मी तुझ्या 

दृष्टी स पडलो .’

यमराज पुढे चालला तशी सावित्री सुध्दा त्याच्या मागून जाऊं लागली. त्यांनी तिला परत जाण्यास सांगितले तिची समजूत घातली तरी हि मागे फिरली नाहि तिची निस्सिम 

पतिभक्ति , उज्वल प्रशंसनीय पति निष्ठा व अलौकिक त्याग वृत्ति पाहून यमराज याने तिला पती च्या प्राण वाचुन दुसरा कांहिहि वर माग असे म्हटले , तेव्हा तिने 

आपल्या सासरे यांना दृष्टी द्दावी असा वर मागितला ‘ तथास्तु ‘ असे म्हणुन यमराज पुढे निघाला तरिहि ती फिरेना म्हणुन त्याने तिला आणखी एक वर माग असे सांगितले 

सावित्री ने दुसरा वर याला सासरे यांना राज्यप्राप्ति , व तिसरा वर याला निपुत्रीक ता याला पुत्र प्राप्ति व चवथा वर याला आपणास ह्याच जन्मात अखंड सौभाग्य व 

पुत्र लाभ व्हावा असे सांगितले 

‘ तूं सत्यवान याच्या शरीर याला स्पर्श करताच तो जिवंत होईल तुझा पिता याला पुत्रलाभ होईल तुला हि पुत्र संतती होईल तुमचे गेलेले राज्य परत तुमच्या

हाती येईल ‘ इतके बोलुन यमधर्म गुप्त झाला .

                        DSCF3997

सत्यवान–सावित्री कथा

                                              ॐ 

सत्यवान – सावित्री कथा 

       नारदमुनी चे हे उद्गार ऐकुन राजाने सावित्री ला स्पष्टपणे सांगितले कीं ,निवडलेला तो राजपुत्र आमच्या तोलामोलाचा नाहीं तुला योग्य असा नाही !’ तू दुसऱ्या वर याची निवड कर !’ यावर सावित्री ने सांगितले ‘ सत्यवान याला 

मी मनापासून वरले आहे त्याच्या शिवाय दुसरा पुरुष वारावा असाविचारा माझ्या 

मनांत कधीच येणार नाही ‘

  ‘ सावित्री, एक वर्षाने सत्यवान मृत्यु पावणारा आहे अशा अल्पायुषी युवकयाच्या रोबर लग्न के ल्याने दु:खी होशील तूं !माझ ऐक ! तूं त्यांच्या तून दुसरा पुरुष वरण्या चा 

विचार करा !’ नारदमुनी म्हणाले ,

‘ नाहीं तो विचार माझ्या मनांत कधीच येणार नाहीं जर माझ्या नशिबी वैभव असेल र ते कुणाशीहि लग्न केल्याने प्राप्त होईल च ,परंतु तसे नसेल तर सत्यवान याचे मरण तरी 

चुकेल . ‘ सावित्री ने सांगितले 

सावित्री सत्यवान शी लग्न करण्याचा निश्र्चय ऐकून नारद मुनी ने रुकार दिला ‘ ही न पतिव्रता होईल ! ‘ असे जाताना त्यांनी उद्गार काढले नंतर अश्र्वपति राजानेधुमत्सेन ची जाऊन भेट घेयाली आणि सावित्री सत्यवान शी लग्न लावून दिले

                                             DSCF3997

सत्यवान–सावित्री कथा

                                                       ॐ 

सत्यवान – सावित्री कथा 

फार प्राचीन काळी भद्र देशाचा अश्र्वपति या नांवाचा एक राजा होता त्याला कांही चं अपत्य नव्हते त्याने सावित्री देवीची आराधना केली .देवीच्या कृपा प्रसादाने त्याला एक कन्या झाली राजाने आपल्या त्या कन्ये चं नांव सावित्री ठेवले 

सावित्री रूपवान होती ती उपवर झाल्या वर तिला योग्य वर मिळण्यासाठि राजाने खूप प्रयत्न केला परंतु तिच्या मनासारखा वर मिळत नव्हता अखेर 

राजाने तिलाच आपल्या इच्छे प्रमाणे वर निवड ण्यास सांगितले तेव्हा ती पल्या सोबत सैन्य घेऊन बरेच देश फिरली त्यांत शाल्व देशाचा राजा ध्रुमसेन याचा राजपुत्र सत्यवान याला पाहुन त्याचाशी लग्न करण्यास तिने 

निश्र्चय केला तिने आपल्या पित्यास येऊन आपण सत्यवान या रूप संपन्न पराक्रमी राजकुमार यास वरले असल्याचे सांगितले .अश्र्वपति राजाला ते ऐकुन अत्यंत आनंद झाला तेवढया त नारदमुनी आले राजानें मुनिवर्यां ना 

ते वर्तमान सांगितले यावर नारदमुनी म्हणाले ‘ धुमसेन राजाला राज्य नाहिं त्याचे राज्य त्यांच्या भाऊ बंदानि हिरवुन घेऊन त्याच्या परिवारास अरण्यात हांकून दिले आहे शिवाय राजाचे डोळे गेलेले आहेत .राजकुमारा चं रूप हिच्या 

मनांत भरलं असेल , परंतु आपणास हा संबंध उपयोगी नाहीं |

                         DSCF3996

स्वातंत्र्य दिवस

   ॐ 

खूप दिवस पूर्वी मी एका ब्लॉग मध्ये 

एक देश याचा स्वातंत्र्य दिवस केला आहे 

कोणता देश हे मला आठवतं नाही व कोणता ब्लॉग ते पण आठवतं नाही 

ते मनांत राहील ! कोणता हि देश असो त्याचा स्वातंत्र्य दिवस करायला 

काय हरकत आहे असे लिहून तो ब्लॉग केलेला आहे 

मला पण वाटले आपल्या माहित आहे 

अमेरिका यांचा स्वातंत्र्य दिवस 4 जुलै ( 7 ) आही 

ह्यासाठी मी पण यंदा 

4 जुलै ( 7 ) 2013 साल ला अमेरिका यांचा स्वातंत्र्य दिवस 

माझ्या ब्लॉग मध्ये केला आहे

वाचन संस्कृती खूप चांगली असते 

 

              DSCF4006

तारिख 4.जुलै

                            ॐ 

दिनांक तारिख 4.जुलै ( 7 ) 2013 साल 

अमेरिका चा स्वातंत्र्य दिवस आहे                        

सर्व अमेरिका बंधु भगिनी राष्ट्रपती ओबामा 

             यांना सर्व शुभेच्छा !

 

नर्सोबा वाडी

                                            ॐ 

नर्सोबा वाडी 

मी कोल्हापुर येथे आले आहे 

मी देवी दर्शन घेतले आहे बरेच दिवस नंतर मला पाहुन भाजिवाले वाणी वाले 

सौ रांगोळी वाली पुस्तक याचे दुकान व ईतर जन परिवार मला भेटले एकदम आपल्या गावात आल्यामुळे मन चलबिचल व मन भरुन आले 

तसेच अमेरिका येथील बाग मध्ये आम्ही तबकडि खेळलो त्यांचे ई मेल मला आले त्यांना हि तबकडि खेळ खेळ तांना मजा वाटली त्यांनी आठवण ठेवून ई मेल केले मला बघा एकदा ओळख केली ति अमेरिका येथे व कसे मन राहते असे महत्व पूर्वक आहे 

मी नर्सोबा वाडी ला रिक्षा ने जा ऊ न आले 

रिक्षा वाले म्हणाले रस्यात एक श्रीपाद वल्लभ यांचे देऊळ आहे ते बघु त्या ठिकाणी एक साधुअसत असे त्यांना एक 80ऐंशी वर्ष वय असलेली सौ बाई 

रोज भिक्षा जेवण देत असे एक दिवस ति जेवण न देता रागा रागाने बोलत निघालीत्या साधुं नीं तिला विचारले आज काय झाले मला जेवण दिले नाहि व रागावून बोलत आहे तेव्हा ति सौ बाई म्हणाली 

मला मूल नाहि ईतके दिवस झाले तुम्ही माझ्या पोटी या ते शाधु म्हणाले ह्या जन्मी 

तरी शक्य नाहि ति नाहि याच जन्मी यावयाला हवे 

काहि दिवस नंतर 80 ऐंशी वर्ष सौ बाई नां मूल झाले ते 

ते मूल श्रीपाद वल्लभ होय हे खरे दत्त यांचे अवतार हे जे ठिकाण आहे ते 

मूळ ठिकाण येथे श्रीपाद वल्लभ यांचे देऊळ बांधले आहे 

ते ठिकाण मला रिक्षा वाले यांनी दाखविले आहे त्याचे फोटो काढु देत नाहि पण माझ्या मनांत डोळ्या त आहे हे नक्की रिक्षा वाले मुळे मला हे समजले व पाहण्यास मिळाले 

नंतर नर्सोबा वाडी येथे दर्शन घेतले प्रसाद घेतला व रिक्षा वाले यांनी घरी आणले 

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 

 

DSCF3998 DSCF4000

DSCF4005 DSCF4003

DSCF4006 DSCF4007

वट सावित्री

                                             ॐ 

वट सावित्री 

    सुवासिनिंच्या मंगल पवित्र भावनावर हे व्रत अधिष्ठित आहे आपल्या पतीचे प्रेम कायम रहावे , आपले पति आरोग्यवान् आयुष्यवान् भाग्यवान बनावे, पतिव्रताच्या या कोमल भावना या व्रताशी अगदीं निगडित झाले ल्या आहेत 

हे व्रत वट सावित्री पूजा सौभाग्यवती स्त्रिया मोठ्या निष्ठेने अत्यंत उत्साहाने प्राचीन काळा पासून करीत आल्या आहेत नवविवाहित युवती देखील वटसावित्री 

पूजा अतिशय प्रेमाने करित असतात त्यांना वटसावित्री पूजेचे आकर्षण वाटत असते सत्यवान वडा ची फांदी तोड तांना ती त्याच्या मस्तकावर जोराने आपटून तो जमिनी वर कोसळला यमधर्म सत्यवान याचे प्राण नेण्या करितां स्वत : आला 

सावित्री महान पतिव्रता होती पुण्यवान म्हणून यमधर्म , पतिभक्ति , पतिनिष्ठा ,पतिव्रता धर्माने तिने केलेली पतिसेवा या बळा वर तिने सत्यवान यांचे प्राण यमधर्म कडून परत मिळविले .

ह्या घटनेचा साक्षिदार तो वट वृक्ष होता ह्या साठि ह्या पूजेत वट वृक्ष याचा 

समावेश केलेला आहे सावित्री नें सत्यवान याचा शरीराला स्पर्श करतां च तोतो सत्यवान उठुन बसल्या नंतर त्या वट वृक्ष याची पूजा सावित्री ने केली .

आजच्या दिनी आजचा दिवस ज्या पतिव्रता स्त्री या वट वृक्ष याची पूजा करतील 

त्यांच्या पतिंना उदंड आयुष्य लाभेल 

त्याचे सौभाग्य अखंड राहिल त्या पुत्र वती बनतिल . असे सावित्री ने उद्गार काढले तेव्हा पासून वट सावित्री पूजा करण्याची प्रथा सुरु झाली वट वृक्ष हा 

वंश विस्तारित विस्तारणारा द्दोतक आहे 

सावित्री हि दृढ निश्र्चयी , स्वाभिमान पतिव्रता स्त्री जाति चा महान आदर्श आहे 

ह्यासाठी हे व्रत हि पूजा करुन आनंदी सुखी व्हावे 

 

                                DSCF3996

वट सावित्री आपणास प्रसन्न होवो . 

वट सावित्री

                                             ॐ 

वट सावित्री 

       वटसावित्री हे एक परम मंगल व्रत आहे.महाराष्ट्र मध्ये 

सौभाग्यवती स्त्रिया वटसावित्री पूजा मोठ्या प्रेमाने, भक्ति भावाने करतात     स्त्री जातिला सोभाग्य इतके मंगलत्व दुसरे कशाताहि आढळत नाही 

सौभाग्य हेच स्त्री चे सर्वस्व असते.हे सौभाग्य पती पासून प्राप्त होते म्हणून वटसावित्री ची पूजा सुवासिनी मनोभावे श्रध्देने करून आपल्या पती याला 

उत्तम आरोग्य दिर्घायुष्य लाभावे आपले सौभाग्य अखंड राखावे सासर माहेर या दोन्ही कुळाचे मंगल व्हावे अशी प्रार्थना देवी सावित्री कडे करतात .

वट पौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ शुध्द पौर्णिमा या दिवस    ला सौभाग्य काक्षिणी आणि 

सौभाग्यवती स्त्रियांनी वट सावित्री चि पूजा करावयाची असते   वट सावित्री हे एक सौभाग्य व्रत आहे. हे व्रत अत्यन्त प्रभावी असून शुभकारक 

लाभदायक सौभाग्य रक्षण व सौभाग्य संवर्धन करणारे आहे

पुत्रवती बनवनारे आहे यश आनंद कीर्ति सुख ऐश्र्वर्य वैभव प्राप्त करुन देणारे आहे 

          DSCF3996

विमान


विमान
Atlanta ते Mumbai ( Bombay ) विमान प्रवास

लुक्तांसा विमान याने मी आलेली आहे

मी कोल्हापूर येथे येण्या करतां

Atlanta विमान तळ येथे बसले घरातून कार गाडी ने प्रवास केला
Atlanta विमान तळ येथे आले घरच्यां नीं ब्याग विमान येथे नेण्यास
माझा पासपोर्ट तिकीट गेट वर दाखाविले व ब्याग आत गेली तेथे हिंदी बोलणारे
यांची ओळख करून दिली व भाषा समजण्याकरता एका भारत ग्रहस्थ यांनी मला मदत केली
आतं गेल्या नंतर बॉक्स मध्ये माझी पर्स एका बॉक्स मध्ये ठेवली

ते ग्रहस्थ म्हणाले अंटी चप्पल पण दुसऱ्या बॉक्स मध्ये ठेवा सरकत सर्व सामान
आता गेले नंतर चप्पल पायात घातली एका गेट जवळ पाय याची खूण ह्यावर उभे राहण्यास सांगितले हात उंच
करण्यास सांगितले आतं सोडले एका महिला चेकिंग ने माझी पाठ व सर्व कडे हात
लावून चेकिंग माझे केले मी जरा वेळ थांबले मला सोबत करणारे ग्रहस्थ पण आतं आले
जेथे विमान येणार त्या गेट मध्ये आम्ही बसलो वेळा झाली ओलोउन्स केले ऐकले आम्ही
विमान येथे बसलो ते ग्रहस्थ खुप पुढे बसले मी माझ्या नंबर शोधत सीट मध्ये बसले
पट्टा बांधण्यास सांगितला मला पट्टा बांधता आला विमान सरकण्याचा उंच उडण्याचा आवाज आला
एकदम मस्त वाटलं

दुपारी 5 / ५ पाचं वाजता विमान असल्याने उंच गेल्या वर ढग ह्यात विमान गेले
ढग पुढे पुढे सरकत असतांना दिसले

ई ,स . १९६३ साली माझे भाऊ अमेरीका येथे जाऊन आले ५० पन्नास वर्ष झाली ते
त्यावेळा म्हणाले विमान ढग मध्ये जाते व तेव्हा एकदम भीती व नवल वाटले व मी
आतां तेच विमान ढग मध्ये गेलेले पाहिले अनुभव हा खरा मित्र श्रेष्ठ असतो
आता माझे भाऊ पण मी विमान प्रवास केल्याचे समजले तेव्हा माझे भाऊ आदर युक्त
माझी विचार पूस केली आहे मला मन भरून आले आतां

दुसऱ्या विमान Frankfurt मध्ये बदलले ते ग्रहथ्स यांनी मला चेकिंग वाले यांना
मुंबई गेट दाखविण्यास इंग्रजी त सांगितले चेकिंग वाले यांनी मला व असे पाच लोक यांना
लिफ्ट ने नेले विमानतळ येथील बस ने नेले गेट मध्ये मोळी कार याने नेले मुंबई गेट मध्ये
सोडले
तेथे चार तास थांबले परत गेट वर पासपोर्ट दाखवून पर्स दाखवून विमान मध्ये दुसऱ्या बसले
पट्टा बांधला विमान सुटले

पहिले विमान नंतर ते ग्रहस्थ दिल्ली विमान कडे अंट्टी करून गेले

विमान मध्ये हवाई सुंदरी हवाई सुंदरा यांनी पेय यांची विचार पूस केली मी ऑरेंज मागितले
तळलेले बदाम पाकीट मधून दिले थोड्या वेळाने ब्रेड गोल लोणचे भात वरण भाजी फळ याचा फोडी
दिल्या काटे चमचे सुरी कागद टॉवेल दिले
दुसऱ्या विमान मध्ये तोंड पुसण्यास गरम काडाद टॉवेल दिला पेय मी कोकाकोला मागितला
लांब ब्रेड मध्ये पाले भाजी होती असे विमान येथे जेवण नास्टा केला

फॉर्म भरावा लागतो मला येत होता पण चौकोन मध्ये भरतांना एका ग्रहस्थ यांनी मदत केली आहे

रात्र एक वाजता मुंबई आली विमान जमीन याला लागले थांबले मी सामान घेऊन पासपोर्ट तिकीट
दाखवून गोल गोल ह्यातून ब्याग घेतली गाडीने गेट च्या बाहेर आणली

आमचा मुलगा प्रणव आलेला आई हाक मारली व त्याने भाड्याची कार गाडी आणलेली त्यात सामान ठेवले
व रात्री चं अडीच वाजता मुंबई सोडली व दहा वाजता सकाळी कोल्हापूर येथे मी प्रणव बरोबर भाड्याच्या कार गाडीने
कोल्हापूर घरी आले

अमेरिका ते मुंबई प्रवास विमान याचा येतांना मी एकटीने घरातील कोणी नसतांना केला
भाषा येत नसतांना कसे जन परिवार मदत करतात अंट्टी बोलून हे फार महत्व पूर्वक आहे

IMG_20130623_162620

%d bloggers like this: