आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर, 2013

दुर्वां चा गणपती

Ganpati

ganapati1 ganapati2

फोडणी चि भाकरी कुस्करा !

फोडणी चि भाकरी कुस्करा !
भाकरी गार केली जुनि शिळी केली मिक्सर मधून बारिक केली
हिरवी मिरची दोन 2 घेतल्या दगडी खलबत्ता तं ठेचल्या जाडसर केल्या
एक लिंबू विळीने बसून चिरून घेतले.
ग्यास पेटवून प्यान ठेवले. तेल मोहरी ची फोडणी केलि. त्यात हिरवी मिरची
घातली विलीने बसून चिरलेला कांदा घातला लाल सर केला भाकरी कुस्करलेली
कांदा मिरची तेल्मोहारी ची फोडणी घातली थोडे वाफ येण्या साठी पाणी घातले एक
लिंबू पिळून घातले. परत कुस्करलेली भाकरी व सर्व मसाला याला वाफ आणली
हळद घातल्याने हळदी चा रंग व हिरवी मिरची चा रंग मस्त व लिंबू मूळे आंबट
पणा चावी ला आला. शेंगदाणे चटणी चवी ठेवली .
मस्त शिळी भाकरी चा फोडणी चा कुस्करा केला.

bhakari2bhakari1

दूध भाकरी

दूध भाकरी
परात घेतली ओटा वर ठेवली तवा ग्यास पेटवून त्यावर तवा थेवला.
चिमटा उलथणे घेतले एका भांड्यात पाणी घेतले.
परातित ज्वारी चे पीठ घेतले. थोड्या पीठात पाणी घातले ज्वारि चे पीठ
भिजविले तिंबले मस्त मऊ केले. परातित ज्वारिचे थोडे पसरविले ज्वारि चा
भिजविलेला गोळा हातात घेऊन गोल केला थोडा गोल मोथा हातात चं मोठा
केला तो ज्वारि चा गोला परातित पिठ घातले त्यावर थेवला उजव्या हाताने
ज्वारिचा गोला थापला परातीत थापला मोठी ज्वारिचि भाकरी थापली
तापला तव्यावर हातात पिठ लावलेली भारी घेतली त्यावर पिथाचि बाजु वर
येईल अशा प्रकारे टाकली ज्वारिच्या पिठ असलेल्या भाकरिला पाणी लावले
दुसरी बाजूने उलथ न्याने भाकरी दुसऱ्या बाजूने तव्या वर केली ती बाजू भाजून
घेतली तवा बाजूला केला पेटत्या ग्यावर ज्वारी भाकरी पीठ लावलेली भाजलेली
ग्यावारा भाजली मस्त ज्वारी ची भाकरी फुगली
भाकरी गार होऊ पर्यंत
शेंगदाणे भाजलेले सोललेले मिक्सर मध्ये घातले मीठ कोल्हापुर चटणी जिरे चवी
प्रमाणे घातले बारीक सर्व करून शेंगदाणे चटणी केली
खर तर शिळी भाकरी लगेच कुस्करी जाते माझी ताजी भाकरी असल्याने मी
मिक्सर मधून बारिक केली
ज्वारी ची भाकरी कुस्करलेली त्यात वाटी भर दूध घातले थोडे चवी साठी मीठ
घातले पोळी असल्यास साखर पण चालते
मस्त हलकासा आहार व पोटं भर ज्वारी ची भाकरी असल्याने गोड चवं लागते लागली !
शेंगदाणे चटणी पण बरोबर असल्याने ती चवं पण गोड लागली
खरं तर रात्री साठी असा आहार चांगला असतो मी सकाळी केला आहे !

 

dudh-bhakari4 dudh-bhakari3dudh-bhakari2 dudh-bhakari1

भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी

अथ स्वस्ति श्रीशालिवाहन शके १९3५ विजयनाम संवत्सरे
दक्षिणायने भाद्रपद शुक्लपक्ष चित्रा नक्षत्र तूळ रास योग ब्रह्मा
४ श्री गणेश चतुर्थी सोमवार आहे
तसेच श्रीपाद वल्लभ पिठापूर यांचा अवतार वाढदिवस असतो
उत्तम दिवस कोल्हापूर चंद्रस्त रात्री ९ . २२ वाजतां
तसेच माझे मामा विनायकराव यांचा वाढ दिवस गणेश चतुर्थी ला
असायचा माझ्या मामी अजून आहेत मी नुकाती चं मामी नां
भेटून आले आहे !
दिनांक तारीख ९ . ९  (सप्टेंबर)  २०१३ साल आहे
गणपती बाप्पा मोरया !

ganapati

हरतालिका

अथ स्वस्ति श्रीशालिवाहन शके १९३५ विजयनाम संवत्सरे
दक्षिणायने नक्षत्र हस्त राशी प्रवेश तूळ योग शुक्ल
भाद्रपद शुक्लपक्ष ३ तृतीया मध्यम दिवस
हरतालिका तृतीया वराह जयंती रविवार आहे
तसेच दिनांक तारीख ८ ९ (सप्टेंबर) २०१३ साल आहे
रविवार आहे
नवीन येणांऱ्या पाम्नापावासाने येणाऱ्या पानांची पूजा करतात
नवरा चांगला मिळावा ह्या साठी महादेव याची पूजा करतात.

hartalika

वरण फळ

  || श्री ||
= वरण फळ =

———————
साहित्य :- १ वाटी तुरुचे शिजविलेले घट्ट वरण
दीड वाटी कणीक तेलाचे मोहन मिठ घट्ट भिजविले
कृती = तुरीच्या डाळीचे खमंग फोडणी घालून त्यात
तेल मोहरी, त्यात मिरच्या कडीपत्ता (गोड – लिंबाचा )
पातळ पातळ वरण करावे त्यात वरण फळ टाकावी
वाफेने शिजतात
पोळपाटवर कानाकीची पोळी लाटून त्याचे शंकर पाळ्याचा
आकारचे किंवा (छोटी) गोलाकार फळ करावी वरणात
टाकावी त्यात कोथिंबीर घालावी.
वेगळी चटणी वा भाजीची गरज नाही
हि सर्व माहिती सौ परिणीता कुसुम देशपांडे यांनी दिली आहे
मी फक्त संगणक मध्ये लिहित आहे

vf

श्रीकृष्ण – सुदामा

  ॐ
|| श्री ||

= श्रीकृष्ण – सुदामा =

——————————
श्रीकृष्ण सुदामा गुरुकुल मधील मित्र श्रीकृष्ण परमात्मा चा अवतार
पण सुदामा खूपच गरीब होता, तो गुरुकुल मधून घरी आला
श्रीकृष्ण पण आपल्या घरी गेला सुदामा ने कधीच श्रीकृष्ण यांना
काहीही मागितले नाही पण तो सर्व जाणून होता श्रीकृष्णा कडे
भरपूर संपत्ती आहे तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी मागा असे सुदामाची
पत्नी त्याला म्हणाली तो तिच्यासाठी म्हणून श्रीकृष्णाच्या घरी आला
सोन्याची नगरी श्रीकृष्णाची होती सुदामाचे फाटके – तुटके वस्त्र
हातात पोह्याची पुरचुंडी होती श्रीष्ण सुदामासाठी महालातून खाली
आला व त्याला कडकडून भेटला श्रीकृष्णांनी व त्यांच्या बायकांनी पोह्याचा
आस्वाद घेतला पोहे खाल्ले तृत्पतेचे ढेकर दिले सुदामा घरी आला श्रीकृष्णा
ने सुदाम नागरी सोन्याची केली
न मागे तयासी रमा होये दासी सुदामाचे डोळे अक्षण ओले आले झाले
त्याचे खरे प्रेम श्रीष्णावर होते
हि सर्व माहिती मला सौ परिणीता कुसुम देशपांडे यांनी दिली आहे
नुकताच श्रीकृष्ण जन्म व फ्रेंड सर्कल झाला आहे
ह्यासाठी सौ परिणीता देशपांडे यांनी दिली मी ते सर्व संगणक मध्ये
लिहिले आहे

ss

Maggi

Maggi
मेरी Masala
असे पाकिट पांच 5 / ५ रुपये ला मिळते वाणी यांचा दुकानं मध्ये
एक पाकीट आणले
सकाळी तुरीची डाळ मेथी ची पालेभाजी व दोन लाल टम्याटो याची
धुवून चिरून विळीने घेतले कुकर मध्ये पाणी घालून ग्यास पेटवून
चार शिट्या दिल्या  कुकर गार केला तेल मोहरी याची फोडणी केली
पाताल्यात ग्याअस पेटवून त्यात शिजलेली पालेभाजी मेथी व तुरी चे हळद
घातलेले शिजविलेले वरण घातले दोन भांडी पाणी घालून आमटी केली मीठ
लाल कोल्हापूर चटणी घातली उकळू दिले सकाळी व्यवस्थित पोळी बरोबर
जेवण केले
संध्याकाळी पालेभाजी मेथी ची आमटी तं दोन वाटी पाणी घातले पाताल्यात
म्यागि आणलेले पाकीट कात्री ने कापले म्यागि हाताने थोडे बारीक केले फार
लांब खाता येत नाही त्यात म्यागि चा मसाला घातला घरातील मीठ व लाल
तिखट घातले सर्व पातेले तयार केले पेतत्याग्यावर ठेवले उकळू शिजवी दिले
पातळ सर रस्सा सारखे पातळ ठेवले फार कोरडे पेक्षा चव रस्सा ला येते व
फुर्रर असा आवाज आलाकी मस्त वाटतं  खाण्यास कांही हि पातळ पदार्थ  !
व खाण्यासा दिले बाऊल मध्ये काटा पेक्षा चमचा ने चांगले खाता येते घर पणा
सारखे वाटते बरोबर लिंब याचे लोणचे दिले मस्त
पालेभाजी मेथी तुरीचे वरण लाल टमयाटो म्यागि रात्री च्या वेळेला चविष्ठ व
पोट भर खाली जाते गेली !
Maggi  मेरी Masala !

maggi2 maggi1

पालक भाजी च्या वड्या

पालक भाजी च्या वड्या
अर्धा पालक भाजी चि पेंडी ठेवली ति पालक भाजी देठ घेऊन धुवून निवडुन
वीळि वर बसून बारिक चिरली चिरलेला पालक भांडयात घातला हरबरा डाळी
चे पीठ एक १ वाटी त्यात घातले हिरवी चार बारीक घेतल्या मिक्सर मधून बारीक
करून त्यात घातले हळद मीठ घातले कच्च तेल घातले अर्धा लिंबू पिळून घातले
अर्धा तास भिजत ठेवले कुकर मध्ये पाणी घातले पेटत्या ग्यार वर ठेवले कुकर च्या
भांड ह्यात सर्व पालक भाजी चे मिश्रण घातले आधी भांड याला कच्च तेल लावून घेतले
कुकर चे झाकण लावून वाफ आणली शिट्टी दिली नाही मस्त वाफ आली कुकर गार करण्यास
ठेवला तो पर्यंत हिरवी कोवळी चिंच व हिरवी दोन मिरची मीठ मिक्सर मधून वाटून घेतले फोडणी
तेंल मोहरी ची फोडणी केली कुकर गार झाल्या नंतर वाफ आलेले पालक वड्या उलथ न्याने कापल्या
फोडणी घातली हिरवी चिंच चटणी बरोबर मस्त पालक वडी खाण्यास चव आली लिंबू ने आंबट पणा
आला नाही फक्त मोकळा वड्या होण्या करतां घातले खायचा सोडा मी वापरत नाही तरी पण
पालक वाडी मोकळी झाली तळून काढले तरी चालते
कोणती हि पाले भाजी ची वडी करतां येते
मेथी ची पण !कोथिंबीर वडी सारखी चं रीत पध्दत आहे !

pv1

pv3 pv2

शेवया यांचा उपमा

शेवया यांचा उपमा
पंधरा रुपये ला शेवया चे पाकिट आणले पालक भाजी 10.दहा रुपये पेंडी आणली
लाल टम्याटो पावशेर आणले पण मी दोन लाल टम्याटो घातले पालक भाजी पेंडी
अर्धा घेतली गव्हाच्या शेवया अंदाज प्रमाणे घेतल्या पा
धुवून लक भाजी देठ सागत घेऊन विळीने बसून चिरली टम्याटो दोन धुव्हून विलीने चिरले
प्रथम ग्यास पेटवून पातेले ठेवले तेल मोहरी याची फोडणी केली चिरलेले पालक भाजी व लाल
ट म्या टो फोडणी तं घातले वाटी भर पाणी घातले सर्व शिजवू  दिले परत दोन वाती पाणी घातले
शेवया तो पर्यंत नुसत्या चं परतून भांड्यात गरम करून घेतल्या त्या शेवया भाजी शिजली त्यात
घातल्या मीठ कोल्हापूर चटणी लाल तिखट असते ते त्यात सर्व मसाला असतो तो घातला हळद
घातली परतलेल्या शेवया मसाला भाजी सर्व मस्त शिजवू दिले थोडे सं रस्सा पाणी मासालाचे शेवया
भाजी ह्यात ठेवले
ट म्या टो मुले आंबट पणा आला पालक भाजी ने चव आली मसाला तेल मोहरी ने गोगा पणा तूऱट
पणा आला व मुख्य गव्हा च्या परतलेल्या शेवया यांनी रंग व पोट भर खाण्यास मिळाले हलक सर
न चावता मऊ असे पोट भर गव्हाच्या शेवया याचा उपमा केला झाला.

shevaya1 shevaya2  shevaya3

पालेभाजी चे थालिपिठ

पालेभाजी चे थालिपिठ
ठेवलेला पोकळा पालेभाजी धुवून देठ
घेऊन निवडून विळीने चीरीना घेतली
एका वाटी ज्वारीचे पीठ घेतले एक वाटी हरबरा डाळीचे पीठ घेतले
मीठ कोल्हापुर चटणी चे तिखट घेतले हळद घेतले अंदाजाणे सर्व पीठ
व पोकळा भाजीत घातले कच्च तेल थोडे घातले पाणी घालून कालविले
लोखंडी तवा मध्ये तेल लावून पेटत्या ग्यास वर तवा ठेवला व दोन्ही बाजूने
पोकळा पालेभाजी चे थालीपीठ भाजले
लोखंडी तवा सल्याने खमंग ओव्हन सारखे भाजले गेले जाते
दही बरोबर खाण्यासा सिले
तसेच कांही त्याचा पिठाचे तेलात वडे तळले प्रत्येक वेळेला भाजणी पेक्षा
कच्चे पीठ व पालेभाजी कोणती हि घालून असे वडे किंवा थालीपीठ केले तरी
चंव गोड काच्चा पीठ याची लागते वडे कढी तं घातले आमटी तं घातले तरी मस्त
लागतात स्वंयापाक करावा तेवढा पुष्कळ चविष्ठ करतां येतो
कोनातीवी पालेभाजी घेतली तरी चालते.

thalipeeth1 thalipeeth3 thalipeeth4thalipeeth2

कामं करणारी माणसं

कामं करणारी माणसं
सकाळ झाली कि दुध घरपोचं करतात.पेपर वाले
सायकल ने पेपर घरोघरी टाकतात वाणी वाले सकाळी
नऊ वाजे पासून रात्रि नऊ पर्यंत दुकान हयात असतात
भाजी मंडई वाले पण सकाळी नऊ ते रात्रि नऊ पर्यंत
मंडई असतात रस्या वरील रांगोळी वाले चिंच कपडे
पर्स बांगड्या विकणारे सर्व माणसं भरपूर कामं करतात
महिला पण असतात मुली वयस्कर नंतर महिला असतात
इतक्या वेळ बायका रस्यावर दुकानात असतात त्यानां रेडीओ
स्पीकर कांही लागत नाही हल्ली मोबाइल फोन असेल
पण पूर्वी कामही चं नव्हते त्यांचा वेळ किती काम उध्योग
मध्ये जात असेल जातो ह्या बायकां नां कोणी बरे त्रास देत
नाही
शिक्षण नावाने मुलं मुली बाहेर पडतात शिक्षण निट केले तर बरे
शिक्षण ह्या नादात वय पंचविस तिस होते नंतर नोकरी पस्तीस वय
होते ह्यात निसर्ग प्रमाणे माणूस मुल मुली प्रेम प्रकरण केले जाते नीट

झाले तर बरे नाही तर बलात्कार आत्महत्यानां
मला एवढं चं सांगायच आहे
वेळे तं शिक्षण घेऊन
वेळेत लग्न करायला पाहिजे
वेळेत मुलं व्हावयाला पाहिजे
चाकोरी तून जागा माणसं राहिली तरं बलात्कार
आत्महत्या होणार नाही
व महिला नीं आपले सौंदर्य राखून नट्टा पट्टा करून
अबदिने व्यवस्थित राहायला पाहिजे
आपल्या कडे कोणाची वाईट नजर जाणार नाही
पण सुरेख आहे वेवस्थित आहे असे पाहिल्या नंतर
वाटायला पाहिजे हवं ! होतात
पूर्वी मुलगी वयात आली कि साडी नेसायची आतां साठी व लहान मुली
पण गाऊन वर असतात बाप सासरातिसी ची मुल घरात असतात
लाज वाटतं नाही मग म्हातारे चढले मुले त्रास देतात असे आहे
महिला नीं नीट राहावयास पाहिजे
लग्न झाल्या नंतर पण शिकता येते काम उद्योग करता येतो महिलां

KKM1 KKM2

संस्कार

 ॐ

संस्कार
देवाला जाणे मंत्र पोथी वाचणे जिभ जिभ मन ह्याने शांत राहते
देवाला पैसे किंवा ओटी भरणे ह्यांनी भ्राह्मण यांना दान केले जाते त्यांचे
यवसाय पोट भरणे असल्याने त्याचे काही दान केल्याचे वाटतं नाही
सण वार याला कोणाला जेवणास बोलावून दक्षिणा दिली तर ते पण दान असते
एकमेकाची बोलणे होते माहिती होते
देवाला नैवेद्द दाखविला तर सर्व पदार्थ एकत्र केले जातात व ते जेवण  आपण खातो
एकत्र जेवण केल्या ने अन्न पूर्ण पोटात एका वाला जाते अन्न पचन होते लगेच भूक
लागत नाही पोट याला विश्रांती मिळते
देव धातू चे  असल्याने धातू दुध शोषून घेतात त्यासाठी देव जेवला भावना असते

घसा कोरडा होत असल्याने पूर्वी लिंबू बरोबर नात असत हल्ली कोठेही सरबत मिळतात
मीठ मिरची ठसक्याने हवा शुध्द होते दुध ओवाळले तर तुळसी लां ते दुध दिले जाते पूर्वी
हे सर्व करतांना अंधश्रध्दा मनांत नसते सहज घडते
तरी कोणी आजारी असेल तर वैध्यकिय सल्ला ने उपचार करणे अगदी महत्व पूर्वक
जाणीव पूर्वक काळजी पूर्वक oushadha घेतले पाहिजे
हे फार महत्व पूर्वक आहे
हे सांगणे चुकीचे नाही
त्यासाठी कायदा शिस्त करायला हवां सर्वांनी लक्ष देणे आवश्यक आहे

त्यासाठी सर्वांनी

%d bloggers like this: