आपले स्वागत आहे!

Archive for सप्टेंबर 7, 2013

वरण फळ

  || श्री ||
= वरण फळ =

———————
साहित्य :- १ वाटी तुरुचे शिजविलेले घट्ट वरण
दीड वाटी कणीक तेलाचे मोहन मिठ घट्ट भिजविले
कृती = तुरीच्या डाळीचे खमंग फोडणी घालून त्यात
तेल मोहरी, त्यात मिरच्या कडीपत्ता (गोड – लिंबाचा )
पातळ पातळ वरण करावे त्यात वरण फळ टाकावी
वाफेने शिजतात
पोळपाटवर कानाकीची पोळी लाटून त्याचे शंकर पाळ्याचा
आकारचे किंवा (छोटी) गोलाकार फळ करावी वरणात
टाकावी त्यात कोथिंबीर घालावी.
वेगळी चटणी वा भाजीची गरज नाही
हि सर्व माहिती सौ परिणीता कुसुम देशपांडे यांनी दिली आहे
मी फक्त संगणक मध्ये लिहित आहे

vf

श्रीकृष्ण – सुदामा

  ॐ
|| श्री ||

= श्रीकृष्ण – सुदामा =

——————————
श्रीकृष्ण सुदामा गुरुकुल मधील मित्र श्रीकृष्ण परमात्मा चा अवतार
पण सुदामा खूपच गरीब होता, तो गुरुकुल मधून घरी आला
श्रीकृष्ण पण आपल्या घरी गेला सुदामा ने कधीच श्रीकृष्ण यांना
काहीही मागितले नाही पण तो सर्व जाणून होता श्रीकृष्णा कडे
भरपूर संपत्ती आहे तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी मागा असे सुदामाची
पत्नी त्याला म्हणाली तो तिच्यासाठी म्हणून श्रीकृष्णाच्या घरी आला
सोन्याची नगरी श्रीकृष्णाची होती सुदामाचे फाटके – तुटके वस्त्र
हातात पोह्याची पुरचुंडी होती श्रीष्ण सुदामासाठी महालातून खाली
आला व त्याला कडकडून भेटला श्रीकृष्णांनी व त्यांच्या बायकांनी पोह्याचा
आस्वाद घेतला पोहे खाल्ले तृत्पतेचे ढेकर दिले सुदामा घरी आला श्रीकृष्णा
ने सुदाम नागरी सोन्याची केली
न मागे तयासी रमा होये दासी सुदामाचे डोळे अक्षण ओले आले झाले
त्याचे खरे प्रेम श्रीष्णावर होते
हि सर्व माहिती मला सौ परिणीता कुसुम देशपांडे यांनी दिली आहे
नुकताच श्रीकृष्ण जन्म व फ्रेंड सर्कल झाला आहे
ह्यासाठी सौ परिणीता देशपांडे यांनी दिली मी ते सर्व संगणक मध्ये
लिहिले आहे

ss

%d bloggers like this: