आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 25, 2013

स्वामी विवेकानंद

                            ॐ

२१ – स्वामी विवेकानंद – पोवाडा  

         सन १८६३  त
बाळ जन्मले भारतात
नाव असे त्याचे नरईंद्र
तेज असेसूर्य आणि चंद्र 
पण होते खोडकर फार ॥ १ ॥
वाढ – दिन करी साजरा
जो मागे देई त्याजला
त्याग वैराग्य, अंकुर फुटला
आई करित काळजीला
ऐकली कथा नरेंद्राला ॥ २ ||
कधी घेई तो रुप वेगळे
बसे मूर्तीसमोर मिटूनी डोळे
आई विचारी काय चालले
बाळ आनंदे हसुनी बोले
माय बहु गलबले ॥ ३ ॥
दाटे मनात भीति आईच्या
    बाळ जाईल का
वळणी आजोबाच्या 
मार्ग चालेल संन्याशाला
परी अभिमान पुत्राचा ॥ ४ ॥
बाळ गाई गोड  भक्तिगीते
पिता भरवी बोधामृते

करी पालन हो सत्याचे
नसे कारण कधि भितीचे
वारे संचारले देशभक्तीचे
१८८० कॉलेजात गेले
दिसे, मासे ज्ञान वाढले
ज्ञानासाठीच तहानलेले
किती पुस्तके  वाचुनी गेले
मन नाही शांत झाले || ६ ॥
रामकृष्ण परमहंस भेटले
जीवनाचे गूढ उलगडले
गुरुभेटीचे वेड लागले
बाह्य जग विसरुनी गेले
गुरुष्याने ओळखिले ॥ ७ ॥
नरईंद्र असा हा तरुण
ध्येय गाठी हिंमत धरून
देई भाषणे गहिवरून
देशपरदेशात यात्रा करून
लुटी आनंद लोकसेवेचा || ८ ॥
मायभूमीसाठी हाक जनतेला
घ्या वाहून तुम्ही राष्ट्राला
जागे करी तो बंधूत्वाला
घाली मोहिनी साऱ्या जगताला
माझा प्रणाम दिव्य पुरुषाला ॥ ९ ॥
व्यक्ति अशी तेजस्वी भारताची
कनवाळू अति मायेची
जान होती त्यास गरिबीची
ना पर्वा त्यास मुक्तीची
आस अंतर्मुख बनण्याची ॥ १० ॥
गेले समींदर पोहून
शिळेवरी एका बसून
ध्यान करिती मग्न होऊन
सार जीवनाचे समजून
सार्थ केले अपुले जीवन ॥ ११ ॥
पुरुष असा विवेकानंद
साऱ्या जगास हो आनंद
लुटी स्वत:ही परमानंद
करी विचार रात्रदिन
जीवन घडविले सारे सोसून ॥ १२ ॥
    सौ सुनीती रे . देशपांडे     

आज विवेकानंद यांची पुण्यतिथी आहे त्या साठी
विवेकानंद यांची आठवण म्हणून हि कविता लिहिली आहे
सौ सुनीती रे. देशपांडे यांच्या नदीची वाट ह्या पुस्तक मध्ये आहे

IMG_0063[1] IMG_0064[1]

पपई

                       ॐ

पपई सिताफळ संत्र आता खूप छान फळ मिळतात. पपई १० दहा रुपये
ला मिळाली २५ पंचवीस रुपये ला पण आहेत.
संत्र सीताफळ १० दहा रुपये ला एक मिळते

फळ खाल्ली कि पोट भरतं व साखर न खाणारे यांना फळ मधील साखर पुरे होते
तरी फळ खावीत ताकद साखर प्रमाण सारखे राहते.

अर्थात वैध्यकिय सल्ला प्रमाणे फळ खावीत

मी आपली फळ खाते पपई गोड व मस्त आहे चवीला .

  IMG_0033[3] IMG_0037[2]

%d bloggers like this: