आपले स्वागत आहे!

Archive for नोव्हेंबर, 2013

वसुधा

कोल्हापुर येथे फिरायला जातांना दुकान भाजी फल घेतांना

मी  राहते कशा प्रकारे फिरते दिसते ह्या साठि

मी माझा चं फोटो लावला आहे.

दुकान मधील मुलाने काढला आहे आजी आज्जी म्हणतात मला !

आपली मूलं नोकरी निमित्त लांब  लांब असतात.

रोज वावरतांना हिचं मूलं उपयोगी पडतात !

 

 

 

IMG_0290[1]

रोज निशी डायरी

रोज निशी डायरी

मी पूर्वी फारसं लिखाण करतं नव्हते आत्ता संगणक शिकल्याने
रोज काहि हि विषय घेऊन लिखाण आपोआप लिहिले जात आहे.
घोंगडी, प्रामाणिक पणा,डाळीचा ढोकळा, फूल याची रांगोळी, किल्ला
फुल गुंफलेली, दुकान वाढ दिवस असे बरेच विषय लिहिले आहेत

हे सर्व विषय लिहितांना पूर्वी च्या आठवणी आठवण वर्तमान पत्र वाचून
मन वेगळा विषय मांडून लिहिणं सर्व त्यात आपोआप येत आहे.

किरकोळ विषय असले तरी आपण फुल कशी आणली कोणा बरोबर
बोललो फळ वाले धान्य दुकान सर्व आपल्या बरोबर कसे बोलतात
सर्व त्यात येते
गरज नसणार पण गाव देश आपण कसे राहतो सर्व त्यात डायरी तं
रोज निशी तं येते
काही दिवस नंतर हा काळ व जनसमुदाय वागणं
नक्की आठवण माहिती साठी राहील !
हे रोज बरेच वर्ष डायरी लिहितं मला वाटलं काय लिहायच एवढं
पण ह्यांच्या डायरी डायऱ्या वाचल्या तर किती तरी जुने प्रसंग आठवतातं

आरे अमक्या तारीख ला आपण ह्या वास्तूतं आलो तारिक तिथी पण आहे

कधी बरे तेव्हां काय घडले असे मनात आले तर ह्यांची डायरी बघितली तर
लगेच सापडते

इसवी सन १९६६ साल ची डायरी आहे
तीन चार डायरी ह्यांच्या आज हि आमच्या घरात आहेत

त्यांच्या सौ चुलत बहिण  सौ अलका पाटील चिवटे यांनी त्यांना दिलेली डायरी भेट
पण आहे !
सर्व डायरी लिखाण पाहतांना रोज काय लिहायचे असे नसून ती मनाची
करमणूक साधना आहे आज आपण वेळ कसा घालविला याची नोंद
रोज निशी डायरी आहे
आत्ता संगणक मुळे जगभर आपण काय लिहोतो विचार काय आहेत
जग कसे चालले आहे माहिती सर्वजण सर्वांची माहिती वाचतात

छोटसं  घरगती  वर्तमान पत्र चं तयार होत असते डायरी मूळे !

ह्यांच्या डायरी !

IMG_0291[1] IMG_0292[1]

IMG_0293[1] IMG_0279[1]

शाल

 

 

शाल

आत्ता नोव्हेंबर महिना चालु आहे.थोडी थंडी पडली आहे.
डिसेंबर महिना तं भरपूर थंडी असते जानेवारी तं सूर्य
मकरवृत्त मध्ये येतो थोडी असते. संक्रात  मध्ये थोडी थंडी असते
फेब्रुवारी माघ महिना तं शिवरात्र ला परत भरपूर थंडी असते.

थंडी तं लोक गरम कपडे याचा वापर करतात.ते पण व सुरेख दिसावं
यासाठी स्वेटर शाली वापरतात.
माझ्या कडे चार 4/४  पाचं 5/५ शाली आहेत.
शाल मध्ये ऊब पण येते व पांघरून पण वापरून ऊपयोग करता येतो.

खरं तर शाली मला प्रेझेंट आलेल्या आहेत मी व हे ब्यांक म्यानेजर च्या
सौ मुली च्या लग्न याला गेलो तेथे आम्ही सौ मुलीला चांदी चा छला दिला
त्यांनी मला शाल दिली किती वर्ष पंधरा आठरा वर्ष झाली असणारं पण ती
शाल अजून हि माझ्या जवळ आहे चांगली आहे कोठे हि किडे यांनी खाल्लेलं
नाही मी ती वापरते आत्ता सुध्दा हिरवी आहे.

तसेच आमच्या सौ सुनबाई यांच्या माहेर  ची   कडील लाल शाल अजून हि
चांगली आहे. ती शाल पण खूप जुनी असली तरी व्याही यांच्या कडील जपून
ठेवली आहे.

अशा बऱ्याच शाली आलेल्या आहेत
साडी तर भेट असते पण शाली चा मान वेगळा असतो !

किती जुन्या शाली जपून ठेवल्या आहेत मी

ह्याच चं माझं मला कौतुक आश्चर्य वाटतं आश्र्चर्य वाटतं आहे.

IMG_0286[1]  IMG_0223[1]

IMG_0288[1] IMG_0287[2] IMG_0279[1]


आणि हो !माझ माहेर च्यांनी वहिनी ची ( आई ) ची आठवण
साठी मला साल दिली आहे.
किती ह्या वय मध्ये पण माहेर ची आठवण व ऊब आहे !

IMG_0310[1] IMG_0311[1]

गुंफलेली फूलं !

                                                          ॐ

 

      गुंफलेली फूलं !   

 

                           

नुसती चं दोरा न वापरतां फूल याची वेणी केली.

उपाध्ये यांचा बंगला येथे लाल फुल खुप दिसली त्यांच्या
सौ सूनबाई बाग मध्ये भेटल्या. त्यांना विचारून फूल घेतली
घरी आल्या नंतर तांब याच ताह्मण मध्ये पाणी घातले त्यात फूल
एक तास ठेवली. 
मस्त टवटवीत ताजी झाली. थोड्या वेळानं फूल ताह्मण याचे पाणी काढले.
प्रथम दोन फूलं घेतली तिरपी फूल याची गाठ मारली परत दोन देठ मध्ये
एक फूल ठेवले परत गाठ मारली करतं करतं सर्व फूल विणून बांधून वेणी
फूल याची तयार केली.  झाली .
फूल गुंफून फूलं याची वेणी तयार झाली.

मस्त वाटलं !फूलं याची वेणी करतांना !शाळा असतांना पांढरे फुल याची वेणी
करतं असतं त्याची आठवण आली !
आता पण पांढरी फुल दिसतात पण ह्या महिना तं दिसली नाही
ह्यासाठी लाल हिरवी देठ असलेली फुल मिळाली त्याची वेणी करून
बघितली
खूप नाजूक देठ आहेत ह्या फूलं यांची पण वेणी करतांना देठ करतांना तुटली
नाहीत
हिरवा देठ याचा रंग व लाल फुल याची देखणी बिन दोरा याची फुल गुंफून

गुंफलेली फूलं

वेणी तयार केली मी ह्या वय मध्ये सुध्दा !

IMG_0273[1]  IMG_0279[1]

 IMG_0283[1]

घोंगडी

घोंगडी
म्हणाल जुने नांव काय वापरले आत्ता कोण घोंगडी वापरतं नाही !

आठवण व जपणूक कशा प्रकारे करावी याला महत्व पूर्ण  आहे.

पुष्कर जन्म ला तेंव्हा  वर्ष ४४ झाली. मला बाळंतपणा तं माझ्या
आजी ने दिलेली घोंगडी आहे. आजी वडील यांची आई आम्ही पण
सर्वजण आजी ला आई चं म्हणतं होतो !

तिने सर्व सौ नाती नां बाळांतपणा घोंगडी दिली आहेत
मी अजून जपून ठेवली आहे व रोज वापरते पण !
मी गादी पलंग वापरत नसून जमीन वर सतरंजी घोंगडी वापरून
झोपते पाठ दुखत नाही थंडी वाजत नाही

हल्ली परत पलंग न वापरता जमीन ह्यावर झोपतात
पाठ दुखते ह्यासाठी !
रग blyaamket पेक्षा असे गरम वापरणे चांगले मी फक्त
अंथरून ह्यासाठी वापरते घोंगडी !जशा प्रकारे थंडी असेल तसे
कपडे वापरले जातात.
नोव्हेंबर महिना चालू आहे बायका नायलॉन च्या साड्या नेसतात
त्यावर स्वेटर घालतात काय उब येत असणार
कॉटन हलकी साडी त जास्त उब असते

. मला  सांगायचं आहे !
इतकी वर्ष मी घोंगडी  ठेवली जपून माहेर आमचं गावं नागापूर येथील आहे
हे तेथील व आजी ने दिलेली घोंगडी आहे
याला महत्व आदर प्रेमाची भावना सर्व येत आहे
घोंगडीत !
दिनांक तारीख २६ . ११ (नोव्हेंबर )  ला
माझे वडील यशंवत देशपांडे यांचा समाधी चा दिवस आहे
त्यांच्या आठवण व माहेर पण सर्व लिहिले आहे !


माझ्या आमच्या वडील यांचे नावं यशंवत होतं !
दाजीसाहेब यांना माझा नमस्कार आम्ही वडील यांना
दाजीसाहेब म्हणत होतो.

IMG_0284[1] IMG_0285[1]

IMG_0025[1] IMG_0151[2]

                                    ॐ
                      माझे वडील यांचे अक्षर

IMG_0433[2] IMG_0432[1]

रवा याचा ढोकळा

बारिक रवा याचा ढोकळा

बारीक रवा एक वाटी घेतला पातेल्यात टाकला
एक वाटी ताक रवा ह्यात घातले हिरवी मिरची आल मीठ
वाटलेले एक चमचा घातले
सर्व रात्रभर भिजवू दिले सकाळी त्यात युनो सोडा चिमूट भर घातला.
सर्व रवा याचे ढोकळा याचे साहित्य कुकर च्या भांड याला तेल लावलेले
त्यात ठेवले टाकले कुकर मध्ये पाणी घातले ष्ट्यामड मध्ये आधी एक भांड
ह्यात पाणी घातले ते ठेवले नंतर रवा ढोकळा याचे पातेले भांड ठेवले
कुकर ला झाकण लावले ग्यास पेटवून चार वेळा नुसती वाफ आणली शिट्टी
ठेवली नाही
गार करून वड्या पाडल्या मोहरी तेल याची फोडणी दिली कोथिंबिर घातली

मस्त रवा याचा ढोकळा तयार केला झाला
थंडी असल्याने फार रवा फुगला नाही पण मोकळा मात्र रवा झाला
ताक हिरवी मिरची आल मीठ कोथिंबीर तेल मोहरी ची फोडणी मूळे
रवा ढोकळा याला मस्त चं चव आली आहे.

IMG_0227[1] IMG_0229[1]

IMG_0232[1] IMG_0219[2]

ब्लॉग पोस्ट १, ४ ० १ वां

ब्लॉग पोस्ट १, ४ ० १ वां

दिनांक तारीख  २४ .  ११ ( नोव्हेंबर ) २०१३ साल ला
वसुधालय ब्लॉग पोस्ट

१, ४०१ / 1, 4 0 1 वां

एक हजार,चारशे एक वां होतं आहे
सावित्री, वल्लभ, गुरु नानक, दिवाळी दुर्वा चा  गणपती,
जास्वंद फुल याचा गणपती आवळा याचे झाड फुल याची
रांगोळी, पणती याची रांगोळी किल्ला गहू याचे श्री यंत्रम्
तुळस याचे विठ्ठल शंकर पाळी सर्व लिखाण आहे कला अभ्यास
सर्व आहे
एवढं सर्व लिखाण करतांना करतांना
माणसाचे मन कसे असते
काळजी ब्लॉग मध्ये लिहिले आहे
सर्व चं जर चांगले व देव देव लिहिले तर जग व मन याची पण
माहिती लिहिली आहे मी !
लिखाण लेखिका साठी सर्व प्रकार चे लिखाण असणे आवश्यक आहे.
वाढ दिवस पण लिखाण जेचे तेचे वैशिठ्ठ वैशिठ्य दाखवून ब्लॉग केले आहेत
आपण सर्वांना जे आवडेल ते तर लिखाण आहे चं पण थोड खटकणार खर लिखाण
आहे माझ्या ब्लॉग मध्ये !

आपण सर्वजण वसुधालय ब्लॉग वाचन करतां कांही ब्लॉग  नां प्रतिक्रिया देतातं

त्या बध्दल बद्दल मी आभारी आहे.

धंयवाद !  धन्यवाद !


ब्लॉग पोस्ट

१ , ४ ० १

IMG_0318[1] IMG_0319[1]


भेटी

एक लाख ,  एकषष्ठ  हजार एकशे अकरा !

161,111 !

१६१, १११ !

IMG_0321[1] IMG_0322[1]

                  ॐ

भेटी

एक लाख   एकषष्ठ     हजार , एकशे एकषष्ठ   !      

161, 161 !

१६१, १६१
असा पण आकडा झाला आहे.

IMG_0325[1] IMG_0326[1]

नवीन पान


कुंडी तली नवीन पान

दिवाळी तं नवीन कुंड्या आणल्या त्यात नवीन झाडं रोप लावली
उन्हात कुंड्या ठेवल्याने थंडी त पण नविन झाड याला पान आलीतं
थोडे थोडे पाणी घातले माती व रोप मूळ घट्ट बसली व झाड कुंडीत
चांगले लागले
झाड यांना नवीन पान आली आहेत

मनाला खूप चं हलक उच्छाह वाटतं आहे
आरे नवीन रोप नवीन पान बघायला !

IMG_0208[1] IMG_0213[1]

IMG_0312[1] IMG_0313[1]

दुकान

दुकान

धान्य दुकान मोबाइल दुकान टि व्ही दुकान संगणक दुकान
oushadha मेडीकल दुकान

येथे किति तरी लहान मूल काम करतात.मूला चिं काही प्रसिद्धी होत नाही
राजकारण भाषणं करणारे खेळ णारे शास्त्रज्ञ चं जास्त करून प्रसिध्द
प्रसिद्धी तं येतात.

किती तरी डी. ग्री वाले मूल नोकरी नाही लग्न नाह प्रसिद्धी नाहीत

असे मुलं जगात आहेत त्याची कोणी दखल  घेत नाहीतं

घरात, सरकार मध्ये जे पैसे वाले हुशार खेळाडू वृत्त्ती चे मुल आहेत त्यांच चं
कौतुक व मान सम्मान करतात.
अशाने थोडे चं मूल मोठी कारकिद्र साठी प्रसिद्ध होतात

देश मोठा व्हावयाचा असेल तर सामान्य मुलं काय करतात त्यांना
काम धंदा आहे कि नाही हे पाहणे जरुरी चे चं आहे !

कसे समजणार म्हणाल ! लोकसंख्या बघता तेंव्हा व्यवसाय विचारला जातो
खरं चं काय काम आहे ते बघणे महत्वाचे आहे.
धंदा करतांना गिऱ्हाईक यावयाला  नको का म्हणत
एकदंरीत सर्व आवघड जगणं आहे
मध्य लोकं यांना काम मिळाले पाहिजे असे शोध लागून हि काही नाही
याची रुख रुख वाटतं राहते.

IMG_0023[1] IMG_0024[1]

कार्तिक कृष्णपक्ष चतुर्थी

                               ॐ

कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्थी

किती जास्वंद  फूल आहेत एका झाडं याला
आणि हो !कुंडीत जास्वंद झाड असून एवढी
फूलं आली आहेत एकदम
मस्त वाटतं बघायला

IMG_0215[1] IMG_0214[1]

डाळी चां ढोकळा

डाळी चां    ढोकळा

एक बाऊल हरबरा डाळ घेतली. एक बाऊल तूर डाळ घेतली. एक बाऊल उडीद डाळ घेतली.
सर्व डाळी पातेल्यात एकत्र केल्या धुतल्या. भरपूर पाणी घातले झाकण ठेवले रात्री नऊ ९
वाजता सर्व डाळी व चार हिरव्या मिरच्या आल आधी बारीक करून घेतले. त्यात चं सर्व
डाळी जाडसर बारीक करून घेतल्या पातेल्यात सर्व वाटलेले डाळी घातल्या. झाकण ठेवले.
रात्रभर भिजवू दिले सकाळी नऊ ९ वाजता कुकर मध्ये पाणी घातले कुकर च्या भांड याला तेल
लावले थोड तेल डाळी वाटले त्यात घातले सकाळी चं मीठ हळदकरतांना डाळीत घातले

सकाळी नऊ वाजतां डाळी पाणी ह्यात भिजत घातल्या.
रात्री नऊ वाजतां बारीक केल्या. दुसरे दिवस ला
नऊ वाजतां ढोकळा केला डाळी भिजत ठेवून वाटून २४ चोविस तास लागले.
ढोकळा करायला.

 

सोडा युनो लिंबू असे काही हि घातले नाही ताक पण घातले नाही

डाळी चा डबा कुकर मध्ये घातलेल्या पाणी त ठेवला मस्त वाफ आणली
झाकण काढून दाली चा ढोकळा तयार केलेला बाहेर काढला गार केला
काचेच्या डिश मध्ये ठेवला मोठे मोठे काप केले तेल मोहरी ची फोडणी दिली

मस्त हलका फुगलेला रंग पिवळा असा ढोकळा चवी ला व दिसायला मस्त झाला
मी केला आहे !

IMG_0237[1] IMG_0253[1]

IMG_0250[1] IMG_0230[1]

IMG_0258[1] IMG_0216[2]

फूल याची वेणी

                                       ॐ

फूल याची वेणी

फूल एकत्र केली फुलाचा पुडा बरोबर दोरा आलेला तो घेतला.
दोरा दुहेरी केला परत तीन पदर केले मध्यात गाठ बांधली थोडा
मोठा दोरा  ठेवला
तो मोठा दोरा फुल बांधण्यासाठि ठेवला एक फुल व तुळसी चे पान एकत्र करून
दोन दोरात ठेवले तिसरा दोरा गाठ मारण्याकरता वरून टाकला घट्ट केला असे सर्व
फुल एकत्र केले सर्व दोरा व फुल याची वेणी दाराला कडीला असतांना केली नाही तर
पायाच्या अंगठा ह्यात धरून करतात. मी दार याच्या कडीला बसून फुल याची
वेणी केली आहे बरेच दिवस वर्ष नंतर फुल याची वेणी मी केली ह्या बद्दल मला
च मला मजा व मस्त वाटत आहे.
कोल्हापूर येथे ह्या फुल याच्या वेण्या वेणी विकत मिळतात चांदी लावलेल्या असतात
मी तुळसी ची पान लावली आहेत. खुप मला खूष वाटतं आहे राहील घरात.

देव याला   वेणी  दिली तरी      चालते.

IMG_0222[1] IMG_0226[1]

IMG_0224[1]

फूल याची रांगोळी

                            ॐ

फूल याची रांगोळी

दहा १० रुपये  चा फूलं याचा पुडा आणला कागद दोरा याने बांधून दिला
प्ल्येष्टिक पिशवी तं दिला नाही
फूलं पूडात झेंडू बेल तुळस दुर्वा  सर्व देतात
मला वाटले आता नुसते फुल कसे लावू कमी पडतील रंग व एकाच प्रकार चे
फुल असल्याने रंग दिसणार नाही
पण मी फुल आधी लावून घेतले ईतर जागा येथे दुर्वा बेल तुळस ठेवली मस्त
वाटले परत काही फुल बाजू बाजूने लावले मना सारखे फुल दुर्वा बेल तुळस याची
रांगोळी केली झाली
मस्त केळ घंटा दिवा दोन वातीचा तेल याचा पणती याचा दिवा लावला
मीच फोटो काढला

मनाला व घर याला उच्छाह हलक खूष वाटतं आहे.

IMG_0219[1]  IMG_0221[1]

कार्तिक पौर्णिमा

                   ॐ

कार्तिक पौर्णिमा

 

IMG_0197[1] IMG_0196[1]

                ॐ
गुरु नानक जयंती

गुरू नानक यांचा जन्म पाकिस्तान लाहोर् तलवंडी गाव येथे झाला
ईसवी सन  1469 साल ला १४६९ सला जन्म झाला कार्तिक पौर्णिमा ला झाला 

त्याचे वडील शेती करतं असतं वडील यांचे नावं  कल्याणचंद ( मेहता कालू ) होते.

सरळ मार्ग मार्ग आवडणारा ईश्वर या पर्यंत पोहचतो
सत्य सेवा इनामदारी करायला पाहिजे
ईश्वर एक आहे त्याची आराधना करायला पाहिजे

धार्मिक एकता साठी शिकवण दिली

बाबर च्या काळात गुरु नानक यांनी काही शब्द उच्चारले

ते हिंदुस्तान !

ईसवी सन 1539 / १५३९ देह त्याग केला !

IMG_0221[1]

वैकुंठ चर्तुदशी

वैकुंठ चर्तुदशी

हा दिवस विष्णू व शंकर रात्री बारा १२ वाजतां भेटतात
शंकर यांना ना तुळशी ची पान देतात व विष्णू यांना बेल
याची पान देतात शंकर यांना जरी बेल आवडत असेल व
विष्णू यांना तुळस आवडत असेल तरी पण शंकर यांना
तुळस व विष्णू यांना बेल देतात.

मणिकर्णिका नदी विष्णू ने स्नान केले
हजार स्वर्ण कमल शंकर यांना दिले

विष्णू नदीत स्नान करून हजार कमळ शंकर यांना देतात
शंकर यांची पूजा करतात

शंकर वष्णू ने एवढी पूजा केली ह्या करता प्रसन्न होतात
विष्णू ला शृष्टी सांभाळाला देऊन हिमालय येथे तपश्चर्या करायला जातात

तो दिवस कार्तिक शुध्द वैकुंठ चर्तुदशी हा दिवस मानला आहे

विष्णू राम याचे अवतार आहेत पुणे येथे तुळसी बाग येथे राम मंदिर आहे
तेथे ह्या दिवस रात्री बारा १२ वाजता राम मंदिर मध्ये बायका जातात

एरवी ह्या राम मंदिर मध्ये बायका जात नाहीत
कार्तिक पौर्णिमा ला चं बायका कार्तिक स्वामी मंदिर याचे दर्शन घेतात
त्या प्रमाणे
ह्या राम मंदिर ला बायका दर्शन घेण्या साठी जातात महत्व आहे.

 

 

 

IMG_0242[1] IMG_0241[1]IMG_0075[1]

 

 

आवळा याच झाड

आवळा

कार्तिक महिना तं आवळे खूप मिळतात झाड यांना आवळे कार्तिक महिना त येतात
आवळी भोजन करतात सकाळी बाग मध्ये रात्री अंगण गच्ची तं जेवण करतात आवडी प्रमाणे
पदार्थ करून आणतात एकत्र सार्वजन जेवतात

मी मागे असाच नारळ वडी कोबर किसून दुध साखर सर्व शिजवून नारळ याची वडी नेली केली
होती जेवण झाल्या नंतर गोड स्विट डिश सर्वांना खुप आवडली
डॉ कारंडे ह्यांनी तर खुप छान नारळ वडी आहे परत मागून घेतली आता सुध्दा डॉ कधी कधी
भेटतात !
मी नुकताच आवळा याच झाड याचा फोटो काढला आहे काढतांना आजूबाजूचे लोक आरे
फोटो काढतात असे हसून म्हणाले मला पण हसू आले वयस्कर व हे नसतांना मजा नाही पण
वेळ चांगला घालविते ह्या साठी सर्वांना बरे वाटते !

IMG_0216[1]

राय आवळे याचे झाडं आहे
आवळी भोजन कार्तिक शुध्द अष्टमी किंवा कार्तिक शुध्द एकादशी पासून
सुरु करतात
कार्तिक पौर्णिमा पर्यंत करतात.
आवळा आर्युवेद मध्ये गुणकारी oushadha मानला जातो
एरवी आवळा सुपारी आवळा आवळाबां खातात नुसता सुध्दा चोखतात
शाळा देऊळ आ. ळा पातळ काप मिळतात

तुळसी

                               ॐ
तुळसी  तुलसी

 IMG_0204[1]       IMG_0205[1]

IMG_0207[1]

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

                                                 ॐ
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

कार्तिकी एकादशी

तुळसी ची पान वापरून विठ्ठल लिहिले आहे मी !

म्हणाल एवढं काय करायचे करायचं पण तुळसी ची पान
वापरतांना एवढा तुळसी चा वास  आला    सांगू  कि सांगता येत नाही
एवढा घमघमाट सुरेख तुळसी चा वास तुळसी च्या झाड जवळ सुध्दा
एवढा एकदम येत नाही.

आधी पाचं ५ रुपये ची तुळस आणली बाटली त पाणी घातले पाणी
मध्ये तुळस ठेवली एक १ तास तुळस पाणीमध्ये टवटवीत झालि.
पाणी मधून तुळस बाहेर काढली. तो पर्यंत ओटा वर विठ्ठल खडूने
लिहून घेतले. त्या मराठी अक्षर मध्ये तुळसी चे एक एक पान ठेवले
परत मोठ्ठ अक्षर दिसावे ह्या साठी परत तुळसी चे पान ठेवल्र
मना सारखे मराठी अक्षर विठ्ठल तुळसी ठेवलेली अक्षर केली.

खाली मंजिरी मंजिऱ्या ठेवल्या शेंगदाणे गूळ वाटीत ठेवले घंटा ठेवली.
पणती कापूस याची  वात दोन लांब वाती केल्या तेल घालून दिवा तयार केला
पणती चा दिवा ठेवला
मस्त झकास फोटो काढला

तुळसी ठेवलेला विठ्ठल मराठी अक्षर लिहिलेला. !
सर्व करतांना मला तुळसी इतका वास येत होता कि
अजून हि हाताला तुळसी चा वास आहे !

 

IMG_0177[1]  IMG_0182[1]

IMG_0180[1] IMG_0186[1]

IMG_0181[1]  IMG_0089[3]

प्रणव

                                   ॐ

प्रणव

प्रणव तुमचा दिनांक तारीख  १२ . ११ नोव्हेंबर २०१३ साल ला

बारा नोव्हेंबर दोनहजार तेरा साल ला

वाढ दिवस आहे

खुप खूप यशस्वी व्हा

सर्व शुभेच्छा वाढ दिवस निमीत्त !

IMG_0187[1] IMG_0188[1]

IMG_0190[1] IMG_0029[1]

काळजी

                                                  ॐ

काळजी

एकदम धस्स वाटले वाटलं असणार !

वाटतं मला कशा प्रकारे काळजी आहे तसे काही नाहि

मूली असल्या कि शिकतिल कि नाहि सासर कसे मिळेल
पैसे मागितले तर कसे ध्यावयाचे मूल होतील कि नाहि मुलगा
झाला तर बरे असे बरेच काळजी मूली असल्या कि वाटतं असते

जग हिंडतांना घरोघरी काळजी असते मूली चीं

पण तितकं मूला चीं कोणी कोणी काळजी करतं नाहि
असे  का होते  हे समजत नाहि माणसा चं मन मुला तं
जास्त असल तरी मुलगा आहे घरात चार पैसे आहेत त्यात
सर्व करेल असे वाटून मनान शांत असतातं राहतात

पण काहि वेळेला मुलगा doktar व्हावा d ग्रि वाला व्हावा
phorina ला जावा ह्या आशा कल्पना असतात.
वेगळ्या प्रकार ची हि काळजी म्हणावी लागेल

मूलाला मुलगा झाला तर बरे हि इच्छा असते ति काळजी
रुपातं असते

सर्व होतांना किति किती मन धावतं असते हे कोणाला सांगणे कठिन
आहे

असं सुध्दा हल्ली मूलं म्हणतात मूलं कशाला पाहिजे
आराम मजेत राहूं

एक एक मुल असतात तरी लोक संख्या वाढली आहे
पूर्वी एक एक नवरा बायको ला चार सहा मूल सहज असायची
छान वाढून शिक्षण संसार व्हावयाचा
आता एक मुल आहे तरी लोक संख्या वाढली आहे
विचार करणे पध्दत बदलली आहे
जेष्ठ लोक समस्या आता जास्त झाली आहे
ह्यामुळे पिढीत फरक पडत आहे पूर्वी पण पिढी त
फरक असायचा पण असे विचार नक्की चं नसायचे

पुरुष असो बाई असो वाटतं शुल्लक काळजी आहे

पण तसे नाहि विचार करणारी मनाला भावनारी त्रास देणारी
काळजी आहे

मूल मुलगा यांची !

 

मूल मुलगा यांची !IMG_0153[1]

प्रामाणिक सज्जन माणुस

प्रामाणिक पणा सज्जन पणा

मन दोन प्रकारे असते आपण चांगले वागले कि यश मिळते
असे वाटतं असते व दुसरे मन असते नाहि सज्जन पना दाखवून
यश मिळत नाहि

काय करावे बरं माणुस याला संगत ज्या प्रमाणे असते तसे माणुस
वागतो असे म्हणतात
पण तसे होत नाहि
माणूस स्वत: हा चा एक प्रकारे स्वभाव ठेवण हयात असतो तो कशा
प्रकारे असला तरी तो बदल तं नाहि.
मग यश मिळाले नाहि तरी चालते पैसा मिळाला नाहि तरी चालतो.
बोलने आपले लोकांना आवडले नाहि तरी तो खरं बोलतो ते लोकांना
पसंत पडत नाहि
ह्या मूळे नंतर नंतर शेवटी जीवन जगतांना अपयश येते काय करावे बरं
असे होऊन नुसता बसतो
प्रथम प्रथम लोकांना उलटी उत्तर देतो लोक मारामारी करून त्रास देतात ते पण
सहन करतो
तरी आपला प्रामाणिक पणा सज्जन पणा सोडत नाही
मधल्या काळात यश मिळत नाही समजल्या नंतर

आयुष्य
बाद झाले असे आयुष्य याचे नुकसान झाले असे वाटून मनस्ताप करून घेतात

संसार होत नाही मुल बाळ नाही मन कोणात चं नाही

शेवट माणूस याचे अति प्रामाणिक सज्जन पणा असल्या ने

तो माणूस कोणाला च विचार तं नाही मी जे काम केले ते
प्रामाणिक व सज्जन आहे
याची मला भिती नाही असे मन तयार करून तो जग मध्ये
आजू बाजू च्या परिसर नातेवाईक ह्यात राहतं असतो

संधी मिळून हि त्याला भ्रष्ट्राचार खोटे काम करून नोकरी
टिकविता न येणे नुकसान झाले तरी
त्याची खंत किंवा दखल घेत नाही
तो माणूस खरा !

त्याला काही येत नाही असे म्हणणारे पण माणूस माणसं आहेतं
तुम्हाला काय करायचे ते करा सांगून मोकळे होतातं


अति प्रामाणिक पणा मानसाला आयुष्यातुन उठून ठेवतो

IMG_0151[2]

अभिनंदन

                                      ॐ

दिवाळी

दिवाळी हा सण ह्याची फोटो काढून घालून मी माहिती लिहिली आहे.
दिली आहे.

खर चं दिवाळी येते वाटलं की घरोघरी कुंड्या लाल गेरू लावून सजवितात.
तेल कोणते खाण्यासाठी पदार्थ करण्यासाठी वापरावे ह्याचा विचार करतात.
सुका मेवा थंडी साठी खाण्यासाठी आणतात. थडी तं फळं पपई सिताफळ
चांगली मिळतात ते फळ आवडीने पोष्टिक असतात खातात.

पणत्या रांगोळी आकाश दिवा घर प्रसन्न राहण्यासाठी सजवितात.

थंडी तं किडे घरात येतात चावतात. दिवा ह्याला शेड लावली कि

किडे तेथे फिरतात. ह्यासाठी शोभा व किड्या पासून सरंक्षण साठी
आकाश दिवा वापरतात. पूर्वी दिवा ह्याला बारा महिनात स्टील ची
शेड असे.
पाऊस थांबलेला असतो आजुबाजू चं परिसर स्वच्छ करतात,

स्वच्छता करतात.
रांगोळी कला व शोभा आणण्यासाठी काढतात.
थंडी असल्याने शांतता असते अंधार पडतो आवाज साठी
फटाके उडवितात.
नवीन धान्य आल्याने त्याचे गोड तिखट पदार्थ करतात.

गिरणी जवळून जातांना भाजणी पिठ याचा वास इतका येतो कि
दिवाळी आली असे वाटतं असते.

अंधार पडत असल्याने मंद मंद पणत्या लावतात.
झेंडू ची फुलं भरपुर येतात. त्याचा रांगोळ्या तोरणा साठी वापरतात

आपण केलेले पदार्थ याचे कौतुक करून घेण्यासाठी  सर्वांना फराळ देतात.

पाऊस थांबल्याने नवीन कपडे आणतात.

ऋतु प्रमाणे उच्छाह पूर्वक दिवाळी सण करतात.

मातीत खेळण्यासाठी   किल्ला तयार करतात.
पूर्वी दगड माती लावून आंगोळं स्नान  करतं असतं
हल्ली साबण मुले प्रथा बंद झाली किल्ला करतांना
माती अंगाला लागते.

 

रांगोळी पणत्या आकाश दिवा वाले विक्री वाले आधी पासून
तयारी करतात पैसे गुंतवून ठेवतात

त्या कोठे सर्वजण दिवाळी साजरी करतात.

सर्वांना दिवाळी च्या शुभेच्छा अभिनंदन ! अभिनन्दन !

IMG_0137[1] IMG_0168[2]

 

IMG_0118[1]IMG_0089[4]

 

IMG_0158[1]IMG_0098[1]IMG_0038[1]IMG_0037[2] IMG_0162[1] IMG_0172[1]IMG_0045[1] IMG_0046[1]

साडी

                                       ॐ

साडी

सध्या दिवाळी चालु आहे.
रोज सासर माहेर ओळखी चे यांचे फोन दिवाळी साठि येतात.

असेच माझ्या सौ भावजय यांचा पण फोन आला !
सौ सुनीती रे. देशपांडे म्हणाल्या साडी घ्या दिवाळी त. !
आपण आपल्या काय पाहिजे ते आणतं असतो चं पण
कोणी मानानं साडी घ्या सांगण व साडी आणणं
ह्याला आपुलकी आदर याची भावना असते.

आणि मी खर चं दिवाळी तं चं मला मी साडी आणली आहे.
सौ भावजय यांना कळल्या नंतर खूप बरे वाटले त्यांचा
मान ठेवून मी साडी आणली आहे ह्या बद्दल !

पूर्वी आम्ही सर्वजन मुले पण दिवाळी त. पुण्यात सासरी जात.
मी व माझ्या सौ जावा यांनी अस्या चं साड्या दिवाळी तं
घेतल्या नाहीत
हि गोष्ट आमच्या आमचे बाबा सासरे यांच्या लक्षात आले
बाबा यांनी आम्हाला शंभर शंभर १०० रुपये दिले जा साड्या
घेऊन या !

आम्ही जावा इतक्या खूष झालो कि त्याच दिवस ला आम्ही साड्या
आणल्या घडी मोडून सर्वांना नमस्कार केला

नंतर आम्ही कोल्हापूर येथे आलो !
कसे मन आपल्या सौ सुना बद्दल आपुलकी लक्ष असते

असे सासर पण असते चं !

        आश्विन शुध्द प्रतिपदा ते दसरा पर्यंत देवी चे नवरात्र त्रात
मी महालक्ष्मी देऊळ येथे दसरा पर्यंत देवी चे दर्शन घेत असे असे
भरपूर वर्ष २५ / ३० पंचवीस / तिस वर्ष महालक्ष्मी गावातील देवी ला
जात असे यंदा अनुकामिनी टाकाळा जवळ च्या देवी ला जाऊन आले आहे.

पूर्वी हे म्हणतं एवढं नवरात्र दसरा केला तुला साडी आणं आणि मी दरवर्षी
नवरात्र दसरा ची साडी घेतली आहे. नवरात्र म्हटलं कि साडी ची ह्यांची  आठवण येते
आता सुध्दा !

 

 

वर्तमान पत्र वाचले कि सासर विषय वाचून असे कसे करू शकतात.
असे मनात येते वाटते !

IMG_0176[1]

IMG_0174[2]

स्वच्छता

                                                            ॐ

                      स्वच्छता

कोल्हापूर तांब धातू ची    कळशी त्यात  ठेवलेलातांब धातू चा  लोटा
तांब धातू चे ताम्हण पळी तांब धातूची व फुलपात्र तांब धातूचे
व ईतर सर्व भांडी किती स्वच्छ  दिसतात.

चिंच मिठ पाण्यात घातले प्रथम भिजवू दिले. तांब याची भांडी यांना
चिंच मिठ पाणी असलेले लावले स्वच्छ केले धुतले परत व्हिम पावडर
ने लावली परत स्वच्छ पाणी याने धुतले किती स्वच्छ केले गेले आहे.
स्वत: मी सर्व भांडी स्वच्छ केली आहेत.

स्वत: सर्व तांब भांडी स्वच्छ केल्याने मला स्वत: ला खूप उच्छाह व
खूष वाटतं आहे. ईतर भांडी पण मिच स्वच्छ केली आहेत.
मनाला एकदम पसंत पडत आपण स्वत: कामं केल्याचं !

घर स्वत: साफ केले भांडी धुतली कि घर घर पण घाराला मालकीण
याचा हात लागतो व
वास्तू चांगली राहते.

मी सर्व दिवाळी आधी केलेले आहे.

वास्तू तं फिरतांना आपले पणा माणूस पण राहते.

IMG_0171[1]

IMG_0172[1]

दार दिवा व रांगोळी

                           ॐ

दार येथे रांगोळी व दिवा

घरी केलेले बेसन लाडू घरातं ठेवलेले !

सर्व फोटो लावतं आहे.

IMG_0151[1] IMG_0126[1]

IMG_0152[1] IMG_0153[1]

शंकर पाळी

                               ॐ

शंकर पाळी

एक वाटी मैदा घेतला. अर्धी वाटी  कणिक घेतली.
दोन डाव डालडा घेतला हल्ली डालडा मिळत नाही
Nalurralle’s Vanaspati तूप मिळते.
पाणी मध्ये चं भिजविले दूध याचे फार दिवस राहत नाहि.
एक तास भिजविले छोटे छोटे उंडे केले पोळपाट यांनी वर लाटणे
लाटून चौकोन आकाराचे काप केले तूप ह्यात तळून काढले.
रवा व मैदा दोन्ही ने फार चं कडक होतात व रवा असल्याने
कुटावे लागते कणिक याने खुशाखुषित व कडक होतात.

मी दिवाळी त शंकर पाळी करते कोल्हापूर येथे प्याष्टिक पिशवी तं
फाराळा चं देण्याची रित आहे.

असेच डॉ प्राध्यापक S. K . देसाई यांना दिलेले फराळाचे हे नेहमी त्यांच्या
कडे जात ह्यांनी चं दिले
नतंर स्वत: हा डॉ प्राध्यापक देसाई  यांचा फोन आला शंकर पाळी चांगली झाली आहेत
मला आज हि देसाई सर यांची आठवण येते.

IMG_0123[1] IMG_0124[1] 

IMG_0089[3]

पणत्या झेंडू रांगोळी

             ॐ

दिवे लावलेल्या झेंडू फूलं ठेंवलेली रांगोळी

झेंडू ची फूलं ठेवून गोल केला त्या भवति लावलेल्या पणत्या ठेवल्या
मला फुल पाकळ्या काढण्याचे मन झाले नाही तसे करून रांगोळी
काढांवि ठरविले परत एक एक झेंडू फूलं ठेवून त्या भोवती
दिवे लावलेल्या पणत्या ठेवल्या आहेत.

ओटा तं पण दिवे दिसतात.

IMG_0137[1]  IMG_0141[1]

IMG_0145[1] IMG_0147[1]

IMG_0148[1] IMG_0149[1]

‘यंत्र’ युग जिंदाबाद

                                   ॐ

पुण्य नगरी

पुण्य नगरी अंक शनिवार २ नोव्हेंबर (११ ) २०१३

ह्या अंक मध्ये पहिल मान पहिल्या पानामध्ये

चिमटा ह्यात ‘यंत्र’ युग जिंदाबाद
आमके यंत्र, तमके यंत्र
कसले कसले यंत्र पूजले जाते.
शिकलेल्यांचा यांत्रिकपणा बघून
विज्ञानदेखील लाजले जाते

घरात आहे,दारात आहे,
नको नको तिथे यंत्राचा वापर आहे !

विज्ञान युगामध्ये देखील
‘यंत्र युग अगदी सुपर आहे !!

  – सूर्यकांत डोळसे
         मो. ९९२३८४७२६९

असे मी वाचले आहे
मला खूप चं खूप आवडले आहे वाचन संकृती माझी
मी इतक बारीक नजर देऊन वाचले आहे ह्याचं मला
अभिमान वाटत आहे
सुरेख लिहिले आहे
कोणता हि वर्तमान पत्र घेतला तरी यंत्र दिसतात.

विज्ञान युगामध्ये देखील

IMG_0151[2]

श्री यंत्रम् ! महालक्ष्मी यंत्र

                                            ॐ

दिवाळी शुभेच्छा

महालक्ष्मी यंत्र ! श्री यंत्रम् ! श्री चक्रम्

 

श्री यंत्र ! महालक्ष्मी यंत्र

गहू याचे श्री यंत्र महालक्ष्मी यंत्र

प्रथम खडू ने महालक्ष्मी यंत्र काढले आहे
रांगोळी सरकेल ह्या साठी खडू वापरला आहे

गहू एक एक ठेवून मधील त्रिकोण चौकोण मध्य बिंदू
गहू ठेवून केले आहे.

गोल व दार भरपूर गहू वापरून मोठे दिसेल असे गहू ठेवले आहे.

गहू याचे महालक्ष्मी श्री यंत्र तयार केले मी !

 

IMG_0097[1] IMG_0098[1]

IMG_0089[1]    IMG_0096[1]

             ॐ

आश्विन कृष्ण पक्ष अमावस्या असते.

दिवाळी तं आश्विन अमावस्या येते.
आश्विन कृष्णपक्ष अमावस्या ला

केरसूनि केरसुनी चि पण पूजा करतात.
आता सुध्दा केरसुनि दुकान मध्ये मिलतातं.

कोल्हापूर येथे रस्यात विक्री वाले यांच्या कडे पण
केरसुनि पूजा करन्या करता विकायला बसलेले असतात.

कोल्हापूर रोज देव यांची जागा स्वच्छ करण्या करता छोटे
छोटे
कुंचा केरसुनि मिळतात.असे छोटे कुंचे केरसुनि बारा महिना तं
दुकान रस्ता वरचे विक्री वाले यांच्या कडे मिळतात.

आमच्या घरात देव येथील जागा साफ करण्या साठि बारा महिना भर
असा कुंचा केरसुनि आहे.

IMG_0162[1] IMG_0140[4]

दिवाळी शुभेच्छा

                      ॐ

दिवाळी शुभेच्छा

धने वापरुन अक्षर मराठी तं लिहिली आहेत.मी !

 

   IMG_0145[1]  IMG_0168[2]

IMG_0167[1]

मका चिवडा ! अनारसा !

                     ॐ

मका चा चिवडा

मकापोहे मिळतात ते मी आणले तेलात तळले.
शेंगदाणे भाजलेले सोललेल घातले डाळ कडीपत्ता
सर्व साहित्य घेतले परत फोडणी केली नाही तळलेले तेलात
चं कडीपत्ता शेंगदाणे तळून घेतले तिखट मीठ  घातले.
हल्ली डाळ चावत नसल्याने डाळ याची पूड केली ती घातली
मसाला सारखे झाले व डाळ याची चव पण आली पोहे तळलेले
असल्याने ते चावता येतात.

IMG_0112[1] IMG_0114[1]

 

अनारसा

मी नेहमी दिवाळी तं अनारसे  करते अनारसा नाही तर दिवाळी ला
मजा व नैवेद्द वाटतं नाही कसे हि हो वो अनारसा माझा दिवाळी तं
असतो चं असतो.

मी साखर पिठी साखर याचे करते आंबट होत नाहीत गूळ याचे आंबट
खारट असतात माझे अनारसे गोड कडक कुरकुरीत असतात.

IMG_0118[1] IMG_0119[1]

IMG_0120[1] IMG_0089[4]

किल्ला

                                           ॐ 

किल्ला

लाल माती आहे.  लाल गुलाबी दगड आहेत.
रंगीत पेंसिल आहेत. शिट्टी आहे. आकाश दिवा
अहे.
पिवळा झेंडा आहे.
पणती तेल दोन वाती ची दिवा आहे.

मुख्य शाहू राजे शाहू महाराज आहेत.
मागून फेटा पण काय चांगला दिसतो
शाहूराजे यांचा !

पन्हाळा किल्ला व शाहू राजे म्हटलं कि

कोल्हापूर आले चं फक्त किल्ला साठी
बाकी खूप आहे.
आता किल्ला व शाहू माहाराज शाहूराजे
डोळ्या पुढे दिसतात.  आहेतं !

 

 

IMG_0158[1] IMG_0160[1]

कुबेर यंत्र

                                ॐ

कुबेर यंत्र

कुबेर यंत्र गहु लावून केले आहे मी !

IMG_0103[1] IMG_0102[1]  IMG_0089[3]

IMG_0025[1]

%d bloggers like this: