आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 11, 2013

फूलं यांची रांगोळी

                                     ॐ

फूलं यांची रांगोळी

भवानी मंडप येथे रिक्षा करून गेले. देऊळ येथे जातांना बाहेर चप्पल काढली
आत देऊळ येथे जाण्यासाठी कुक कुक मशीन मधून जावे लागते आता गेले.

मुख दर्शन येथे गणपती चे दर्शन घेतले. देवी श्री महालक्ष्मी चे दर्शन घेतले
चौक येथे बसले परत दर्शन घेतले
दत्त यांचे दर्शन घेतले. साक्षी गणपती चे दर्शन घेतले. विठोबा चे दर्शन घेतले
तेथे पण बसले बराचं वेळ सर्व करण्यात लागला.
परत बाहेर पडले येतांना कुक कुक येथून दुसरा रस्ता आहे तेथून बाहेर पडले चप्पल
घातलि. येथे सहसा चप्पल चोरी ला जात नाहीत

महाव्दार येथे आले. कांही आणायचे  नसल्याने

नुसती पांढरी फुलं पाचं ५ रुपये ला घेतली अबोली पाचं ५ रुपये ची घेतली
दोन्ही मिळून १० दहा रुपये झाले.

रिक्षा करून घरी आले.

घरी आल्यानंतर वाटलं फुल याची रांगोळी काढू वेग वेगळ्या फूलं लावली
चांगले वाटले
सर्व करतांना किती मन लावून कामं केल आहे. देव दर्शन फुल रिक्षा व
फूलं याची रांगोळी सर्व होतांना घडतांना वेळ व मन कसे करून घेते !

आश्र्चर्य आश्चर्य व भरून येते ह्या वय मध्ये पण !

IMG_0385[1] IMG_0386[1]

IMG_0387[1] IMG_0098[2]

                     ॐ

पुण्य नगरी वर्तमान पत्र बुधवार , तारीख दिनांक  ११ डिसेंबर २०१३ ला

११ . १२ . १३ चा आज जल्लोष

असे छापून आले आहे

मी पण तारीख दिनांक ११ . १२ . १३ ला ब्लॉग केला आहे

आणि सहज चं भवानी मंडप महाव्दार फूल रिक्षा
फुलं यांची रांगोळी आली  आहे

आणि हो श्री महालक्ष्मी चे  गहू पेरलेले || श्री यंत्र || आले आहे
कोल्हापुर करवीर चं महत्व महत्व पुर्वक वैशिष्ठ ! वैषिष्ठ !

दिनांक तारीख  ११ . १२ . १३ ला आले आहे

२०१३ या चा वर्षी आकडा ३६५ व्या दिवस तील आकडा
आज ३ . ४ . ५  दिवस आला आहे.
असा पण दुर्मिळ योग आज आला अहे.

 

मला स्वत : ला खुप हलकं वाटतं आहे लिहितांना

आपोआप कोल्हापुर आले आहे याचे महत्व !

IMG_0550[1]

%d bloggers like this: